काही रानफुले

खगोलशास्त्रीयदृष्ट्या २१-२२ मार्चपासून वसंत ऋतूची सुरूवात होते. मी तशी उत्तर गोलार्धाच्या दक्षिणेलाच रहात असल्यामुळे आमच्याकडे वसंत ऋतू अंमळ लवकरच येतो. बातम्यांमधे अ‍ॅलर्ज्यांचे उल्लेख वाढायला लागले की समजावं झाडांचा वसंत ऋतू आलेला आहे. इतर हजार गोष्टींच्या अ‍ॅलर्ज्या असल्या तरी या फुलांचा त्रास होतो का नाही माहित नव्हतं. एक प्रयोग करून पाहू म्हणत फुलांचे फोटो काढण्यासाठी बाहेर पडले. मधूनच कधीतरी कॅमेर्‍याने चांगलं काम केलं, त्याचं हे प्रदर्शन:

१.
हे टेक्सन ब्लूबॉनेट. झुडपाची उंची फारतर फूटभर भरेल. आणि फुलांच्या घोसाच्या टोकाला जो पांढरा तुरा दिसतो आहे त्याला मंद पण मादक वास असतो. रस्त्याच्या बाजूचं गवत जिथे कापलेलं नाही तिथे सगळीकडे ही फुलं सध्या दिसत आहेत. टेक्सस राज्यात किंचित अधिक पैसे देऊन ही ब्लूबॉनेटं गाडीच्या नंबरप्लेटवरही झळकवता येतात.

२.

३.
याचं नाव Englemann's Daisy

४.

५.

६.
याचं नाव Large buttercup

७.
"उरलंसुरलं."

८.
Mexican gold poppy

९.
या फुलांचा आकार माझ्या नखांपेक्षाही लहान आहे.

१०.
Eastern red columbine

फुलांची नावं इथे मिळाली. फोटो कसे काढावेत किंवा काढू नयेत याबद्दल काही सूचना असतील तर जरूर करा. बरेचसे फोटो अनावश्यक भाग टाळण्यासाठी कातरले आहेत आणि gimp वापरून काही फोटोंचं एक्सपोजर ठीक केलं आहे.
फोटो फेसबुकावर आहेत. ज्यांच्याकडे फेसबुक बॅन आहे, त्यांच्याकडे पिकासा, फ्लिकर दिसतं का?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पहिल्या फोटोत प्रत्यक्ष फुलापेक्षा मागे धुसर होत गेलेली पार्श्वभूमी आवडली. एखाद्या इंप्रेशनिस्ट पेंटिंगसारखी वाटते. उरलंसुरलंलाही वेगळा पोत आहे.

कॉंट्रास्ट आणि कलर सॅच्युरेशन वाढवलं, आणि ब्राइटनेस थोडा कमी केला तर बहुतेक फोटो अधिक उठावदार आणि थोडे कमी भगभगीत दिसतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदम फुलांचा उत्सवच आहे म्हणा ना!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रानफुलांची चित्रे आवडली.

क्रमांक ३ हे चित्र गतीमुळे विशेष आवडले. यात फक्त कॅमेर्‍याच्या तांत्रिक शक्तीपेक्षा चित्रकाराची दृष्टी दर्दी असल्याचे अधिक स्पष्ट होते.

पहिले चित्रसुद्धा चांगले आहे. गंमत म्हणून एखाद्या ढगाळ दिवशी पुन्हा ही चित्रे काढा. (रंगीत फुलांच्या चित्रांचे रंग ढगाळ दिवशी अधिक बहरतात.) विशेषतः चित्र क्रमांक ६ आणि ८ यांच्यातला कर्कश/रखरखीतपणा (हार्शनेस) कमी होईल.

"उरलंसुरलं"सुद्धा "बाळाचे पाय पाळण्यात दिसतात" प्रकारचे चित्र आहे. परंतु सगळे काही धप्पकन चित्राच्या मध्यभागी ठेवल्यामुळे रटाळपणा येतो, तो टाळायला हवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अदिती, मला तुझी रानफुले कशी दिसत नाहीत ग? नुसतीच अक्षरे दिसतायत, चित्रे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रूपाली, फोटो फेसबुकावर आहेत. तुझ्याकडे फेसबुक ब्लॉक्ड आहे का?

आतिवासः पहिला फोटो रस्त्याच्या कडेलाच काढला आहे. बाकीचे Wildflower centre मधे जाऊन काढले आहेत. त्यामुळे तिथे नेहेमीच "उत्सवी" वातावरण असणार. सध्या मात्र रस्त्यांवर, झाडांवर सगळीकडेच उत्सवी वातावरण आहे.

धनंजय आणि राजेशः ६ आणि ८ मधे मलाही प्रखर प्रकाशाची अडचण आली. UV filter ही आज आल्यामुळे पुन्हा असे फोटो काढणं भाग आहे असं वाटतंय.
हे पुढचे फोटो घराजवळच्याच रस्त्याच्या कडेला काढले आहेत.
११.
या फुलांचं नाव Texan Mountain Laurel.

आज ढगाळ हवा असल्यामुळे खालच्या फोटोंमधे वरच्या फोटोंसारखी अडचण आलेली नाही.
१२.
१३.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Mexican gold poppy बघून आरती प्रभुञ्च्या 'हळदिवा' या शब्दाची आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टेक्सन ब्लू बॉनेट हे टेक्सासचे स्टेट फ्लॉवर आहे. मलाही आवडले ते! हायसिंथ फॅमिलीचे भाऊबंद असावे. हायसिंथना छान वास येतो. आपला निशीगंध याच फॅमिलीतला. अर्थात, निशीगंधाच्या वासाची सर/तीव्रता या हायसिंथना नसते.

नवीन फोटोही आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फेसबुकवर एक दोन फोटो मध्ये छान 'बो(ह्)के' आला होता ते फोटो इथे दिसत नाहीत. पहिल्या फोटोत मला नॅरो पेक्षा डीप फील्ड ऑफ डेप्थ जास्त आवडली असती. तिसर्‍यातही, पण मग जो 'तरंग' इफेक्ट तिसर्‍या फोटोत आला आहे तो आला असता का ते माहित नाही.

बाकी सुर्यप्रकाश अधिक असेल तर कॅमेर्‍यात ऑटम किंवा स्प्रिंग मोड असेल तर तो वापरून फोटो काढून पहावं, रंग चांगले येतात. (नक्की कोणता मोड हे प्रयोगांतीच ठरवावं, अजून त्यामागचा कार्यकारणभाव मला कळलेला नाही)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहिले चित्र काढण्याकरिता ज्या ठिकाणी कॅमेरा ठेवला होता, त्याच ठिकाणी कॅमेरा ठेवून डेप्थ ऑफ फील्ड अधिक ठेवली असती, तर ते वेगळ्याच कुठल्या विषयावरचे चित्र असते.

मध्येच हा एक फुलांचा गुच्छ चोंबडेपणा केल्यासारखा त्रासदायक झाला असता. डेप्थ ऑफ फील्ड बदलायचे तर तो चोंबडा गुच्छ कॅमेर्‍याची जागा/कोनसुद्धा बदलावे लागले असते. मग त्या चित्राचा आणि या चित्राचा काहीच संबंध राहिला नसता.

(पण फुलांनी भरगच्च भरलेल्या मळ्याची चित्रे - शिवाय आणखी काही कथानक असल्यास - सर्वाधिक डेप्थ ऑफ फील्डमध्ये सुंदर दिसू शकतात. सहमत आहे. इथे बहुधा मागच्या काटकुळ्या झाडाचे कथानक बनवता आले असते...)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मध्येच हा एक फुलांचा गुच्छ चोंबडेपणा केल्यासारखा त्रासदायक झाला असता. डेप्थ ऑफ फील्ड बदलायचे तर तो चोंबडा गुच्छ कॅमेर्‍याची जागा/कोनसुद्धा बदलावे लागले असते. मग त्या चित्राचा आणि या चित्राचा काहीच संबंध राहिला नसता.

सहमत आहे. पण दोन वेगळे विषय म्हणण्यापेक्षा, फोटो काढणार्‍याच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास, या दोघोंपैकी डीप डेप्थ ऑफ फिल्डची मी निवड केली असती असे म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मागचं काटकिळं पिवळं झाड तेव्हाही आवडलं होतं. पण हवेनुसार लांडी तुमान घातल्याचा तोटा झाला. ब्लूबॉनेट्स का काय ते समजलं नाही, पण तिथे काहीतरी खाजरं होतं. ही जागाही अमेरिकन हिशोबात घरापासून फार लांब नाही तेव्हा जमल्यास या विकेण्डला पुन्हा तिथे जाऊन पहाते. पण फोटोत पकडता न येणारा ब्लूबॉनेट्सचा वास थोडा अधिकच आवडला हे खरं कारण आहे.

तिसर्‍या चित्रात दोन-अडीच फूटांची बाजू असणारा चौरस होता. तिथे समोरची सगळीच फुलं जवळजवळ होती आणि थोडा वारा होता. उच्च आयएसओला किती नॉईज येईल याची कल्पना नव्हती म्हणून f5.6 वर फोटो काढला.

फुलांच्या मळ्याचे फोटो काढताना फील्ड ऑफ डेप्थचा विचार निश्चित डोक्यात ठेवेन.

नाईलचे इतर प्रश्नः इतर काही फोटो चढवले नाहीत कारण ते फोटो खूप जास्त आवडले नाहीत. शिवाय इथे किती भरताड फोटो दाखवायचे असाही प्रश्न होता.
या फोटोंच्या रॉ फाईल्सही आहेत. या कॅमेर्‍यात तू म्हणतोस ते मोड्स नाहीत. पण इतर मोड वापरून काही फरक पडतो का ते पहाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ब्यान! Sad
प्रतिक्रीया विकांताला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेन्स कोणती आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कॅनन, १८-५५ मिमी (फोकल लेंग्थ)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

क्रमांक १,५ आणि ११ मस्त आहेत, फार आवडले.

१ ल्या चित्राबाबत धनंजयशी सहमत, पण तुमची लेन्स बघता "त्याच ठिकाणी कॅमेरा ठेवून डेप्थ ऑफ फील्ड अधिक ठेवली असती" तर चित्र क्रमांक ६ "लार्ज बटरकप" प्रमाणे आले असते, त्यात क्रमांक एकची मजा येणार नाही, पण १३० - २०० च्या आसपास फोकल लेंग्थ असलेल्या लेन्स मधून धंनजयची सुचना पाळल्यास हाच फोटो उत्तम येऊ शकेलसे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद.

पण १३० - २०० च्या आसपास फोकल लेंग्थ असलेल्या लेन्स मधून धंनजयची सुचना पाळल्यास हाच फोटो उत्तम येऊ शकेलसे वाटते.

गरीब असल्यासारखं दहा दिवसांत वाटायला लागलंय. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सगळी आवडली.
२ नं च्या चित्रातल्या फुलात मला ’एलीयन’ दिसला. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर
प्रसन्न वाटल
फोटो छान आलेत

३,५,८ कम्रांकाचे फोटो विशेष आवडले
तिसरा फोटो पाहून यश चोप्रांचे सिनेमे आठवले

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.