कोकाटेंंचा रोबोट--१
कोकाटेंंचा रोबोट
“सफाया” नावाच्या रोबोटचं प्रात्यक्षिक आयआयटी मुंबई मध्ये होणार होते. हा “हॅन्सम रोबोटटिक्स” नावाच्या हॉंगकॉंगच्या कंपनीने बनवलेला रोबोट होता. आयआयटीमधे “टेक फेस्ट” च्या परिश्रमाने हे प्रात्यक्षिक होणार होते.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कोकाटेंंचा रोबोट--१
- Log in or register to post comments
- 1502 views
टोमॅटोचे भरीत
युट्यूबवर शॉर्ट्समध्ये या चटणीने धुमाकुळ घातला आहे. वांग्याच्या भरतासारखे हे टोमॅटोचे भरीत म्हणता येइल अशी चटणी करणे सोपे आहे. चव तर अप्रतीम होते. कृती तशी सोपी आहे. दोन टोमॅटो अर्धे करून घ्यायचे. एका पॅनमध्ये तेल टाकायचे. तेल थोडे गरम झाले की टोमॅटो सालीचा भाग वर येइल असे त्यावर ठेवायचे. लसूण पाकळ्या दोन ठेचून घेउन पॅनवर टाकायच्या. मध्यम आचेवर झाकण ठेवून टोमॅटो एका बाजूने मऊ होउपर्यंत भाजून घ्यायचा. साल काळपट होऊ लागली की टोमॅटोच्या फोडी पलटायच्या. आणि यातच मिठ, हिंग टाकायचे. परत झाकण ठेऊन वाफ काढून घ्यायची. चिमुटभर साखर टाकायची. व्यवस्थित तेलात भाजल्यानंतर टॉमॅटोची साल सुटू लागते.
- Read more about टोमॅटोचे भरीत
- 14 comments
- Log in or register to post comments
- 5961 views
प्रॉफेट : खलील जिब्रान ; पुस्तक परिचय्
प्रॉफेटः खलील जिब्रान..
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about प्रॉफेट : खलील जिब्रान ; पुस्तक परिचय्
- Log in or register to post comments
- 1355 views
काही(च्या) काही(ही) कविता
कविता -१
गदिमांची माफी मागून...
कोकणची माणसं साधी भोळी
समुद्राबाजूच्या जागा नेत्यांच्या गळी
पंचतारांकित हॉटेले व्यापारांच्या भाळी
भू माफिया देतात अधिकाऱ्यांना हाळी
कोकणी युवांनो दशावतार दाखवा
मुंबैचा चाकरमानी गणपतीत येवा
भूमिपुत्रांना कमी पगारी नोकरी देवा
गावातील टपऱ्या,दुकानं भैय्यांनो चालवा
आंबा, सुपारी कमी भावात उचला
काजू, कोकम उत्पादनं ठेकेदाराला
भावकीच्या जमीनींचा दिवाणी खटला
फार्महाऊसच्या बागा मंत्र्यांच्या दिमतीला
© भूषण वर्धेकर
२६ एप्रिल २०२३
पुणे
- Read more about काही(च्या) काही(ही) कविता
- 5 comments
- Log in or register to post comments
- 2172 views
एका सासूबाईची करुण कहाणी.
लहान माझी भावली
मोठी तिची सावली.
नकटे नाक उडवीते
घारे डोळे फिरवीते.
भात केला कच्चा झाला
वरण केले पात्तळ झाले.
आडाचे पाणी काढायला गेली
धुपकन पडली आडात.
सासू बाई शेजार्याच्या लहान मुलीला गाणे “शिकवत” होत्या.
सून स्वयंपाक गृहात काम करत होती. मनात म्हणाली. “मला शिव्या देताहेत. ऐकतेय मी सगळे. तुम्ही काही म्हणा मी आडात जाऊन जीव देणाऱ्यातली नाही. सज्जड हुंडा देऊन आले आहे. तेव्हा न लाजत मुलाची किंमत खण खण वाजवून घेऊन त्याला विकला न तुम्ही?”
साबा आणि साबू दोघेही व्हाट’स अप अंकल आणि आंटी.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about एका सासूबाईची करुण कहाणी.
- 10 comments
- Log in or register to post comments
- 3566 views
आजोळ
आज पहाटे पहाटे
ओलांडून स्थळकाळ
साकारले माझ्यापुढे
बालपणीचे आजोळ
मामा मावशी प्रेमळ
हात आजीचा सढळ
आजोबांच्या भूपाळीत
उगवतीचे आभाळ
पेरू फणसाच्या मधे
कृष्णकमळीचा वेल
पायरहाटाच्या वर्
धरे सावली पोफळ
कधी पारावर गप्पा
कधी बालिश भांडणे
रात्री चांदण्या मोजत
अंगणातले झोपणे
कधी नदीत डुंबणे
कधी नांगर धरणे
करवंदे तोडताना
काटे बोथटून जाणे
तान्ह्या पाडसांची शिंगे
चाचपडून बघणे
आठवडी बाजारात
निरुद्देश भटकणे
पारंब्यांचे उंच झोके
खो-खो लगोरीचा खेळ
चटपटीत अवीट
खास पंचरंगी भेळ
- Read more about आजोळ
- 6 comments
- Log in or register to post comments
- 2338 views
डिजिटल युगात लोकशाहीचे भवितव्य (भाग 2)

धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about डिजिटल युगात लोकशाहीचे भवितव्य (भाग 2)
- Log in or register to post comments
- 1286 views
माझी राधा - २
तू गोड हसलास. मी त्या हसण्यात विरघळले. तुला रागवायचे होते तेच विसरले. कोण आहेस रे तू माझा?
मग तू विचारलेस. इतके प्रेम करतेस माझ्यावर.......!
तुझ्या त्या प्रश्नाने मी आतून हलले. काय बोलावे ते समजेना मला. डोळ्यात टचकन पाणीच आले.तुझ्या त्या शब्दांनी कुठेतरी आत खोलवर काही तरी छेडले होते.
मागील दुवा https://aisiakshare.com/node/8739
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about माझी राधा - २
- Log in or register to post comments
- 1195 views
माझी राधा -१
मी जागीच आहे.मध्यरात्र उलटून गेली आहे. चंद्र क्षितीजावर मावळतोय. आता पूर्ण अंधार होईल. गडद अंधार. मग शुक्राची चांदणी झळाळून उठेल. दुसरा छोटा चंद्रच जणू. आणखी. सभोवतालचे तारा मंडळ जोरजोरात लुकलुकायला लागेल. पण अर्ध्या प्रहरासाठीच. मग उजाडायला लागेल. पूर्वेकडे आभा येईल. चंद्राच्या उजेडाअभावी लखलखीत वाटणारे तारे हळू हळू फिकुटायला लागतील. पक्षी जागे होतील. दूर कुठेतरी गाईंच्या हंबरण्याचा आवाज येईल. आत्तापर्यंत असणारी नीरव शांतता सम्पेल.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about माझी राधा -१
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1721 views
आउट ऑफ स्टेप:एक अब्सर्डिका -२
आमच्या आधीचे दोन पेशंट तिथे बसले होते. टेबलावर पेपरांची चळत पडली होती. एक जण ‘प्रभात’ वाचत होता. त्याने प्रभात टाकून सकाळ उचलला. बाबांनी चपळाईने प्रभातवर कब्जा केला. डायरेक्ट चौथ्या पानावरच्या काडीमोडच्या नोटीसा वाचायला सुरवात केली.
“आमच्या अशिलाने तुला एकूण चौदा पत्रे लिहिली. तू जी लग्नाच्या आठव्या दिवशी माहेरास निघून गेलीस ती आजतागायत नांदायला परत आली नाहीस. त्यामुळे आमच्या अशिलास लग्नाचा हक्क बजावता...”
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about आउट ऑफ स्टेप:एक अब्सर्डिका -२
- 5 comments
- Log in or register to post comments
- 2480 views