प्रॉफेट : खलील जिब्रान ; पुस्तक परिचय्

प्रॉफेटः खलील जिब्रान..

प्रॉफेट हे अगदी छोटेखानी पुस्तक . त्यातल्या भाषेने अगोदर लक्ष्य वेधून घेतले. आणि मजकुराने वेड लावले. पुस्तक कधी वाचले हे आता लक्ष्यात नाही. पण रजनीशांची प्रवचने ऐकताना त्याचा उल्लेख बरेचदा होतो.
प्रॉफेट हे पुस्तक प्रकाशित झाल्याला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. जगातील १०० पेक्षाही जास्त भाषांमधे या पुस्तकाचे अनुवाद झालेले आहेत.
( बोरकरांनी याचा कोकणी मधे अनुवाद केला आहे)
खलील जिब्रान हा मूळचा लेबनान मधला. कुटुंबा समवेत तो अमेरीकेत आला. त्याने त्याची कारकीर्द चित्रकार म्हणून सुरु केली पण सोबत अनेक पुस्तकेही लिहीली.
लिहिण्याची भाषा ही एकदम प्रवाही अगदी कविता वाटावी अशी. छोटी छोटी परंतू मार्मीक वाक्ये ही त्याची खास शैली. त्याच्य अलिखाणावर बहाई पंथाचा पगडा जणवत रहातो.प्रॉफेट हे त्याचे सर्वात जास्त गाजलेले पुस्तक. त्याच्या लिखाणावर त्याच्या स्वतःच्या मॅरोनाईट ख्रिश्चन धर्माबरोबरच बहाई पंथाचा आणि इस्लामचाही पगडा जाणवत रहातो.
अल मुस्तफा या प्रेशिताची कथा. त्यानी लोकांना सांगितलेल्या गोष्टींची कथा.
गोष्टीची सुरवात होते ती प्रेषित अल मुस्तफा १२ वर्षे ऑर्फालीस शहरात राहिले आणि आता ते शहर सोडून जाणार आहेत.
टेकडीवरून उतरताना त्याना ऑर्फालीस बंदरात उभी असलेली जहाजे दिसतात.
टेकडीवरुन उतरताच ऑर्फालीसवासी अलमुस्तफाना वेढा घालतात. लोकांना अनेक प्रश्न विचारायचे आहेत. लोक वेगवेगळ्या विषयावरचे प्रश्न विचारतात.आणि ते त्याला उत्तरे देतात.
हे प्रश्न आणि त्यांचे विषय खरेतर त्या काळाला सुसंगत तरीही त्यांची उत्तरे ही कालज्यी असावीत अशीआहेत. कोणत्याही काळात ती तशीच लागू पडतात.
लोक काहिही प्रश्न विचारतात. ते प्रश्न ही त्या पुस्तकातली एक एक प्रकरणे आहेत.यात प्रेम , लग्न जीवन , संसार, मुले , न्याय , चोरी , अन्न , मैत्री , दु:ख , शिक्षण , धर्म सौंदर्य, कायदा ,स्वातंत्र्य , जन्म आणि मृत्यू , प्रार्थना अशा अनेक विषयावर हे प्रश्न आहेत.

त्यांची उत्तरे नुसती वाचण्याजोगी आहेत असे कसे म्हणू. ती उत्तरे आपल्याला अंतर्मूख करतात.
जिब्रान लिहितो.
कडेवर मूल असलेल्या एका महिलेने विचारले की" मला मुले या विषयावर विचारायचे आहे. त्या बाबत मार्गदर्शन करा"
उत्तर येते . मुले ही तुमच्या पासून या जगात आली याचा अर्थ ती तुमच्या मालकीची आहेत असे समजू नका. मुले म्हणजे धनुष्यातून सोडलेला बाण. तो सोडणे तुमच्या हातात आहे. पण एकदा सोडल्यावर बाण ज्याप्रमाणे परत मागे घेऊ शकत नाही. तसेच मुलांचे आहे.
तुम्ही मुलांना तुमची स्वप्ने दाखवू शकता तुम्ही ती त्यांना देऊ शकत नाही

एक न्यायाधीश विचारतो : मला न्याय आणि अन्याय या बद्दल सांगा.
उत्तर येते : न्याय आणि अन्याय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जो एकाला न्याय वाटेल तोच दुसर्‍याला अन्याय वाटू शकतो.
चोरीसाठी चोरा इतकाच ज्याच्याकडे चोरी झाली तो ही जबाबदार आहे. त्याने आपल्या मालमत्तेचे रक्षण करण्यात हलगर्जीपणा का दाखवला.
तुमच्याकडे कोणी माझी बायको पळून गेली अशी तक्रार करत आला तर त्याला विचारा " बाबारे असे नक्की का झाले असेल याचा विचार केला आहेस?"

तेथे उभा असलेला एक वकील विचारतो : मला कायद्या बद्दल ज्ञान सांगावे.
जिब्रान लिहितो. की कायदा म्हणजे तुमच्या साठी एक खेळणे आहे. लहान मुलाला खेळणे दिल्या नंतर ते मोडण्यामधेच जास्त गंमत वाटते. तसेच तुमचे. तुम्ही कायदे करता आणि नंतर त्यांची मोडतोड करण्यात तुम्हाला मजा येते.

एक नवरा-बायको विचारतात की आम्हाला लग्न /संसार याबद्दल सांगा.
उत्तर मिळते की नवरा आणि बायको हे सांसाररूपी मंदीराचे दोन खाम्ब आहेत. मंदीर जर भक्कम बनवायचे असेल तर दोन खांबात छत पेलण्यासठी काही अंतर ठेवायला हवे. नवरा बायको मधे संवादाची देवाणघेवाण होईल / वारे वाहू शकतील इतके अंतर असू दे.
काही वाक्ये मराठी पेक्षाही खलील जिब्रानच्या इंग्रजीतच वाचायला छान वाटतात. Fill each others cup. Drink the same Tea, but not from the same cup.
( तुमच्या विचारांत थोडी तरी भिन्नता असू दे जगताना एकमत होऊ दे. पण बायकोने नवर्‍याच्या विचारांना हो ला हो म्हणण्यापेक्षा दोघांत थोडी मतभिन्नता असू दे. संवादाचे वारे एकमेकांत वाहू द्या. तीला स्वतःचे विचार बाळगू द्या. ) खलील जिब्रान ने हे विचार लिहीले ते साल होते १९२३.

तेथे उभी असलेली एक स्त्री विचारते की मला अन्न या बद्दल सांगा. शाकाहार बरा की मांसाहार.
प्रेषित उत्तरतात की मांसाहार करा की शाकाहार , काहिही केले तरी हिंसा ही होणारच.
जगण्यासाठी अन्न हे गरजेचे आहे. हिंसा पूर्णपणे टाळणे अशक्य आहे. तुम्ही एक करु शकता की अन्न म्हणून ज्या जीवाची हत्या कराल त्या जीवाची माफी मागा. अणि म्हणा जी बाबारे माझ्या शरीरात तु अंश रुपाने तूच नांदणार आहेस.

एक प्रेमी जोडपे विचारते आम्हाला मैत्री बद्दल सांगा
खलील लिहितो
तुमचा मित्र म्हणजे तुमच्या गरजाना मिळालेले उत्तर आहे. तुमचा मित्र म्हणजे तुम्ही ज्यामधे प्रेम पेरता से शेत आहे
खरेतर हे पुस्तक इंग्रजीत वाचायला मजा येते ती त्यातल्या भाषेमुळे. थोडीशी काव्यमय आणि एक प्रकारचा नाद असलेली भाषा. कदाचित खलील जिब्रान ने त्याची सगळी पुस्तके अगोदर लेबनीज अरबी भाषेत मधे लिहीली आणि नंतर इंग्रजीत प्रकाशीत केली म्हणून असेल कदाचित.
इथे पुस्तकातली भाषा द्यायचा मोह टाळता येत नाही. या भाषेची नादमयता आपल्याला वाचतानाही जाणवते.

Your friend is your needs answered. He is your field which you sow with love and reap with thanksgiving. And he is your board and your fireside. For you come to him with your hunger, and you seek him for peace. When your friend speaks his mind you fear not the “nay” in your own mind, nor do you withhold the “ay.”

प्रॉफेट हे पुस्तक आपण एकदा वाचून थांबत नाही. ते वाचताना एकाएका वाक्याचे अनेक अर्थ लागत जातात. ती मनात घर करतात.

प्रॉफेटः खलील जिब्रान

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet