राजकीय

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा

आज रात्रीपासुन ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा कॅन्सल्ड.

#नोटाबंदी #निश्चलनीकरण #demonetization

जे एन यू : मेरा प्यार

मी जेएनयूची विद्यार्थिनी होते, त्यामुळे या विद्यापीठाविषयी मला अत्यंत आत्मीयता आहे. खरं तर माझ्या तिथल्या अनुभवांबद्दल लिहावं असं मला बर्‍याच वेळा वाटतं, पण उगाचच राहून गेलं. एकदा लिहायला लागले, तर कुठे थांबू ते मला समजणार नाही. अनेक पैलूंबाबत लिहण्यासारखं आहे. पण तूर्त, ताज्या घडामोडींशी संबंधित अशा विद्यार्थी संघटनांचं राजकारण या विषयावर वेळ होईल, सुचेल तसं तसं लिहित राहते.

कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर गोळीबार

सोशल मीडीयावर काही ठिकाणी वाचल्यानुसार, कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर गोळीबार होऊन त्यांना गंभीर इजा झालेली असल्याचं समजतं.

हे खरं असेल तर निराशा आणि हतबुद्ध व्हायच्या पलिकडचं काहीतरी चाललेलं आहे.

नरेंद्र दाभोळकर आणि पानसरे यांच्याबद्दलच्या बातम्यांमधलं अस्वस्थ करणारं प्रकरण असं आहे की हे करून नेमका कोणता हेतू साध्य होतो आहे, कुणाला राजकीय भांडवल मिळतं आहे, कुणासमोरचा कसला अडसर दूर होतो आहे हे कळत नाही. त्यामुळे कॉन्स्पिरसी थिअरीज् मांडण्याशिवाय आणि वांझ संताप व्यक्त करण्याशिवाय काहीही करता येणं अशक्य आहे.

बातमीचा प्रकार निवडा: 

डॉ. प्रकाश पवार यांच्या 'आरक्षण' विषयक लेखाच्या निमीत्ताने

आरक्षण या खूप चघळून झालेल्या विषयावर खूप जणांनी वाचल, लिहिल आहेच.
हेमु कर्णिक नावाच्या ब्लॉग धारकाने हे आरक्षण म्हणजे राज्यकर्यांच्या गेल्या साठ वर्षातील अपयशाची कबूली नाही का असा जरासा वेगळा प्रश्न त्यांच्या अनुदिनीतून विचारलेला दिसला. त्यांच्या ब्लॉग मध्ये खूप काही विश्लेषणात्मक आहे अस नाही पण सर्वांच्याच आत्मपरिक्षणाच्या दृष्टीने त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न महत्वाचा राहतो.

बातमीचा प्रकार निवडा: 

अनाकलनीय

माझा मुक्काम सिंगापूरमधे कधीही असला तरी एक गोष्ट मी आवडीने करत असतो. ती गोष्ट म्हणजे टीव्हीवर दाखविल्या जाणार्‍या अनेक भाषांतील वाहिन्यांमधून एखादी कोरियन वाहिनी निवडून त्यावर त्यावेळी दाखविल्या जाणार्‍या मालिकांचे शक्य तितके भाग बघून टाकणे. कोरियन मालिकांमधल्या पौराणिक मालिका मला विशेष पसंत असतात. या पौराणिक मालिकांचे बहुतेक भाग एखादा राजा, राणी त्यांचा राजमहाल आणि तेथे सतत वावरणारे मंत्री आणि इतर रहस्यमय माणसे, त्यांची कटकारस्थाने आणि तेथे घडणार्‍या अनाकलनीय घटना यांच्याभोवती गुंफलेले असतात व एकंदरीत चांगला टाइमपास होतो.

बातमीचा प्रकार निवडा: 

दिग्विजय सिंह आणि अमृता राय

दिग्विजय सिंह आणि अमृता राय यांचं लफडं चवीनं चघळलं जातंय. अमृतानं आधीच घटस्फोटाची केस फाइल केलेली आहे आणि घटस्फोटानंतर ती व दिग्विजय सिंह लग्न करणार असल्याचं ते दोघंही म्हणताहेत. आता यात जे काही चावटचुवट चघळायचं ते अनेक भिंतींवर भरपूर चघळलं जातंय.
मी बोलतेय तो मुद्दा वेगळा आहे. अमृता ज्याच्यापासून घटस्फोट घेतेय त्या आनंद प्रधान या पत्रकाराचा जीव लोकांनी हैराण करून सोडलाय. त्यानं शांतपणे जी भूमिका आज मांडली आहे, ती मला आवडली. ती इथं शेअर करतेय. लफड्याविषयी नको, या भूमिकेविषयी बोलूया...

बातमीचा प्रकार निवडा: 

पाने

Subscribe to RSS - राजकीय