गद्य

त्यानंतर असे झाले असेल तर...(प्रसंग १)

आजकाल गर्दीच्या ठिकाणी कशामुळे कुणाचा पारा चढेल याचा भरवसा देता येत नाही. माझ्यासोबत किंवा माझ्या समोर घडलेले काही प्रसंग मी सांगतो तुम्हाला.

एक प्रसंग याच ऑक्टोबर महिन्यात घडलेला. पुण्यात विमान नगर मार्गे एयर पोर्ट रोडने कल्याणीनगरला कॅब मध्ये जातांना सिम्बियोसिस च्या थोडे पुढे एका चौकात अभूतपूर्व ट्राफिक जाम झाला होता. चालकाच्या समोर असलेल्या काचेतून समोर दिसलेल्या प्रसंगाचं मला जे आकलन झालं त्यानुसार मी हे लिहित आहे. कदाचीत त्या प्रसंगाला अजून दुसरी तिसरी बाजू असू शकेल ती मला माहिती नाही. असो.

ललित लेखनाचा प्रकार: 

प्रेरणादायी प्रकाश!!

सूर्य उगवतो आणि मावळतो. दिवसा सूर्य प्रकाशमान असताना पृथ्वीवरील सगळेजण त्याचा फायदा घेतात. मावळताना एकटा सूर्य मावळतो. सगळे जग सूर्याबरोबर मावळत नाही. रात्री सूर्य नसतो म्हणून त्याला काहीजण दूषणे लावतात तर काहीजण दिवसभर प्रकाश दिल्याबद्दल रात्री सूर्याचे आभार मानून झोपी जातात. यश हे उगवत्या सूर्यासारखे तर अपयश हे मावळत्या सूर्यासारखे असते....

ललित लेखनाचा प्रकार: 

जन्मजन्मांतरीचं नातं

फोन वाजला. आज गजर खूप लवकर वाजतोय का काय? स्नूझ होईना. चारूता? ही का फोन करत्ये? “चारूता, मी आणि शेरखान काल रात्री एकत्र डँन्स केला. तो मला फिरायला घेऊन जाणारे म्हणाला. कोकिळादिदीला आवडलेलं नाहीये आमचं नातं. पण तिला विचारतंय कोण! … काय? तू काहीच्या काही बोलत्येस. मी ठेवते फोन. झोप येत्ये खूप.”

---

ललित लेखनाचा प्रकार: 

टप्पा

दर थोड्या वर्षांनी असा एक टप्पा येतो, जेव्हा पुस्तकं, माहिती, माणसं, घटना आणि आपण यांच्यातले संबंध एखाद्या गजबजलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यासारखे किंवा सकाळी साडेनवाच्या सुमारास वाहणार्‍या दादर स्टेशनमधल्या मिडल ब्रिजसारखे असतात. चहू बाजूंनी अंगावर गोष्टी आदळत असतात. आपण दोन्ही हातांनी, पायांनी, डोळ्यांनी, तोंडानं, कानांनी, मेंदूनं - सगळ्या शरीरामनासकट - गोष्टी परतवत-स्वीकारत-शोषत-परावर्तित करत असतो. बाहेरून पाहणार्‍याची नजर एखाद्या पाश्चात्त्य जगातल्या निरीक्षकानं भारतीय केऑसकडे पाहावी तशी. 'इट रिअली फंक्शन्स!' अशा आश्चर्यासह विस्फारलेली. वरकरणी दिसणार्‍या बेशिस्तीनं भांबावलेली.

ललित लेखनाचा प्रकार: 

झेन कविता

खरं तर "The Graduate" सिनेमा, पहाटे उठून पहायलाच नको होता. आता दिवसभर डोक्यात रहाणार शिवाय तरुण "Dustin Hoffman" आठवत रहाणार. सिनेमा चांगला होता प्रश्नच नाही. एका सुंदर मध्यमवयीन स्त्रीने, तिचा मुलगा शोभेल अशा तरुण मुलाला seduce करणे - त्याचं भांबावलेपण, क्षीण विरोध आणि त्या पार्श्वभूमीवरचा तिचा आत्मविश्वास, क्वचित जरब आणि हुकूमत - तिनेच त्याला भरीस पाडणं - त्याचं ते पहीलं निळ्या निळ्या पाण्यात पोहण्याचं साहस - निव्वळ intense आणि काव्यमय.
.

ललित लेखनाचा प्रकार: 

लग्न - एक नसतं लचांड

मधुरा एरवी तशी ठीकठाक असते, पण एखादी गोष्ट डोक्यात घेतली की तिला ती सहजपणे काढून टाकता येत नाही. त्यात तिला जर कशाचा सात्विक संताप आलेला असेल तर तिचं डोकं प्रेशर कूकरसारखं होतं. धुमसत्या वाफेचं प्रेशर वाढत जातं. मग मधूनच एकदम शिटी वाजल्यासारखा आवाज लागतो. अशा तीनचार शिट्ट्या झाल्या की तिच्या नकळत गॅस बंद करून सगळी वाफ शांतपणे काढून टाकावी लागते. वेळेतच हे नाही केलं तर कधी स्फोट होईल ते सांगता येत नाही.

गेली काही मिनिटं लग्नं म्हणजे कशी बोअर, वैताग असतात याबद्दल वाफ फुरफुरत होती.
"पण आईने मला न विचारत हो म्हटलंच कसं? तेही मी साडी नेसून येईन असं कबूल केलं!" एक शिटी वाजली.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाऊस - वेगवेगळे रंग

संध्याकाळी ऑफिस मधून बाहेर पडलो. राजीव चौक मेट्रो स्टेशनच्या दिशेने चालू लागलो. भुरका-भुरका पाऊस पडत होता. भुरक्या पाऊसाचे एक चांगले आहे, आपल्याला पाऊसात भिजण्याचा आनंदहि मिळतो आणि आपण जास्त ओले चिंबहि होत नाही. नजरे समोर एक अंधुक आकृती दिसू लागली. असेच एकदा तिच्या सोबत एका संध्याकाळी भुरका-भुरका पाऊसाचा आनंद घेत नेहरू पार्कच्या हिरवळीवर फिरत होतो.... पण तो पाऊस.... केंव्हाच हवेत विरून गेला.. किर्रर्र बाईक थांबण्याचा आवाज, मी हादरलोच.. अंकलजी कहाँ खोये हो, कम से कम रास्ता तो देख कर पार किया करो. सॉरी, मी पुटपुटलो. हायसं वाटल.

ललित लेखनाचा प्रकार: 

तीनशेचौदा लग्नांची पकाऊ गोष्ट

"हा रंग चांगला दिसेल तुला." आईने तांबडा-हिरवा-निळा अशा तिन्ही मूलभूत रंगांबद्दल हेच विधान केलेलं बघून तिसऱ्या साडीला माझा धीर सुटला. गोरं म्हणजे सुंदर आणि गोऱ्या लोकांनी कोणतेही रंग ल्याले तरी ते छानच दिसतात अशी टिपिकल भारतीय सौंदर्यदृष्टी मी लहानपणापासून ऐकत आले होते.

"आई, आता प्लीज तुझं दृश्यकलाज्ञान मला देऊ नकोस. तुझ्या ब्लाऊजपैकी जो मला फार बोंगळ होणार नाही ती साडी मी नेसेन. आणि तू म्हणत्येस म्हणून निषेधाची काळी फीत बांधणार नाही. पण ही चर्चा थांबव आता." हिची 'चाय पे चर्चा' सुरू झाली की मला धडकी भरते. एक पंतप्रधान काय कमी आहेत का?

ललित लेखनाचा प्रकार: 

एकेकांच्या 'सकाळी'

ललित-
सकाळची कोवळी किरणे हळुचकन अंगाला चिटकली.
नयनरम्य स्वप्नांचे बाण इंद्रधनुष्य ऊधळत गेले.
किलकिल्या डोळ्यांना खिडकीबाहेरची हिरवाई खुणावत होती.
ऊफाळत्या चहाचा कप घेऊन सौभाग्यवती बाजुलाच ऊभी होती.
टक्क जागा झालो.

ग्राम्य-
रामाधरमाच्या पाऱ्याला आंग घाम्याजलं हुतं.
उनाचं कवुडसं डोळ्यावर आलं.
मक्याची कणसं छटायला खळ्यावर जावं लागणार.
जाउंदी तिच्यायला, बारक्या हाईच की.
कांभरून घीउन तसचं झुपलु.
तसं म्हातारं खेकसलं.
ताडदिशी ऊठलू.

वैताग-
अंग कसं ठणकत होत.
पाठीचा खुबा पण जडावला होता.
हि किरणं कशी काय आली आत.
साली सकाळ पण लवकरचं झालीय.
आता ही अंबाबाई डोकं खाणार.

ललित लेखनाचा प्रकार: 

डाएटगिरीचा रेड कोड

मधुराकडे असलेल्या 'चक्रम माणसांशी कसे वागावे' या पुस्तकात लिहिलेलं होतं म्हणून की काय कोण जाणे, अचानक तिने वजन कमी करण्याचा इरादा जाहीर केला. आता ती काही जाडी वगैरे बिलकुल नाही. बारीकच आहे. पण तिचा आरसा बहुतेक जत्रेतल्या आरशांसारखा आहे. त्यात बघितलं की आपण सगळीकडून फुगलेलो आहोत असं तिला वाटत राहातं. मग झटका आल्यासारखं ती व्यायाम, डाएट वगैरेच्या मागे लागते. एरवी मी त्याबद्दल काही फारसा विचार केला नसता, पण ती जेव्हा म्हणाली "परवाच्या पार्टीसाठी काकूंकडून त्यातलेच काहीतरी पदार्थ बनवून घेता येतील." तेव्हा मात्र माझ्या काळजात चर्र झालं. मी काही बोललो नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य