गद्य

.

ढढढढ

ढढ

ढढण
ढढण
ढढ
ढढण
ढढ
ढढ

ललित लेखनाचा प्रकार: 

कशासाठी पोटासाठी

तर निमित्त झालं गजराचं. समीर माझी टिंगल करण्यासाठी निमित्ताला टेकलेला असतो; नाही मिळालं तर उकरून काढतो. वर म्हणे, “मी तुझी चेष्टा करण्याची चेष्टा करतो. हिंदी चेष्टा गं.” त्याचे जोक्ससुद्धा सडके असतात पण येताजाता माझं सगळं कसं नीटनेटकं, व्यवस्थित असतं यावर तो काहीतरी भंकस जोक मारायचा प्रयत्न करतो. च्यायला, स्वतः जातीचा बेशिस्त. कधी काही वेळेवर करणार नाही. मला खात्री आहे की त्याने आईच्या पोटातही आळसापोटी नऊ महिने नऊ दिवसांपेक्षा जरा जास्त वेळ काढला असणार. आपला बेशिस्तपणा लपवण्यासाठी माझ्या व्यवस्थितपणावर खार खाऊन असतो.

ललित लेखनाचा प्रकार: 

लंगडा भिंगाऱ्या

अंधारायला आलं होतं.
लंगडा भिंगाऱ्या वैरण घेउन आला.
आण्णा नांगरटीला गेला होता .
मंजु भाकऱ्या थापत होती .
लंगडा भिंगाऱ्यानं वैरण कापून गुरांना टाकली .
पोरं पडवीत शाळेतला गृहपाठ करत होती .
वैरण टाकून भिंगाऱ्या दिवसभराचा थकवा काढायला अड्यावर गेला .
दोन गलास रिकामे करुन पुन्हा झोकांड्या खातच घरी आला.
मंजुनं त्याला भाकर कालवण दिलं.
त्यानं ते पडवीत बसून खाल्लं.
भिंगाऱ्या एका पायान लंगडा असला तरी रेड्यासारखं काम करायचा.
चार गुरांचा चारा एका खेपेत आणायचा.
माजघरातील सतरंजी उचलून तो व्हरांड्यात येऊन पसरला.
त्याची नेहमीची गौळत म्हणत तसाच पडून राहिला.
तो गौळणी कुठे शिकला देवजाणे.

ललित लेखनाचा प्रकार: 

सयाना (मांत्रिक इ.) आणि फेसबुक (मिडिया इ.)

(या लेखाचा उद्देश्य घटनेची सत्य/ असत्यता पडताळणे नव्हे तर लोकांच्या मनोवृतीवर प्रकाश टाकण्याचा आहे)

ललित लेखनाचा प्रकार: 

फिरकी

23 मार्च, 1994 रोजी वैद्यकीय तज्ञाने रोनाल्ड चे शरीर पाहिले त्याच्या डोक्यात एक बंदूकीची गोळी आढळली आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असा निष्कर्ष काढला.
नंतर तपासात आढळून आले की रोनाल्डने आत्महत्येच्या इराद्याने दहा मजली इमारतीवरून उडी मारली होती (त्याने एक चिठ्ठीही तशी सोडली होती ) .
तो खाली येत असताना वाटेत 9 मजल्यावर खिडकीतून एका बंदूकीच्या गोळीने त्याच्या डोक्याचा वेध घेतला.
8 मजल्यावर दुरूस्तीसाठी संरक्षण जाळ्या लावण्यात आल्या होत्या,मात्र याची जाणीव कोणालाही न्हवती.
इथे ही हत्या की आत्महत्या हा प्रश्न पडतो.

ललित लेखनाचा प्रकार: 

आणखी एक द्राक्ष

मधुराला भेटायचं असलं म्हणजे मला फार म्हणजे फारच टेन्शन येतं ब्वॉ. मला जितक्या मिनिटांचा उशीर होतो तितक्या अंशांनी तिच्या नजरेच्या तिरकसपणाचा कोन वाढत जातो. आणि मग 'अरे वा, नवीन घड्याळ वाट्टं!' वगैरे खवचट बोलणी सुरू होतात. मला वाटतं तिला असलं काहीतरी बोलून दाखवायला आवडतं. मला खात्री आहे की मनातल्या मनात ती 'समीरला उशीर व्हायला हवा' अशी प्रार्थना करते. आणि उशीर झाला की नक्की कुठचे खरमरीत शब्द वापरायचे याची उजळणी करते. जितका जास्त उशीर तितका तिला शब्दांना धार करायला वेळ मिळतो.

ललित लेखनाचा प्रकार: 

महाभारताचे जीवन सार: (भाग १)

महाभारतात संपूर्ण जीवनाचे सार सामावले आहे. महाभारत कथा जीवनाच्या प्रत्येक विषय आणि अंगाला स्पर्श करते. मी एकेक करून ते आपल्यापुढे मांडत आहे, अर्थात जसे मला ते जाणवले किंवा समजले तसे! - निमिष सोनार - पुणे

ललित लेखनाचा प्रकार: 

विरोध शिवाजी राजेंना आहे, पुरंदरे याना नाही

(एक गैर मराठी माणूस या घटनेकडे कसे पाहतो. हे हि लोकांना कळले पाहिजे. म्हणून हा लेख).

ललित लेखनाचा प्रकार: 

जीवनाची प्रभावी दशसूत्री!!

आपले जीवन हे रोज एकेका दिवसाने आपल्यासमोर येते. थेट मृत्यूपर्यंत!!
म्हणूनच आपला प्रत्येक दिवस सारखाच महत्त्वाचा असतो.
खाली दिलेल्या दहा गोष्टी रोज करा म्हणजे प्रत्येक दिवस सत्कारणी लागू शकेल.
अनेक सकारात्मक विचार, सुविचार आणि पुस्तके वाचून त्यात समान असे काही धागे मी शोधले आणि ते संकलन करून आपल्यापुढे मी मांडतो आहे. त्याने आपल्या सर्वांचा झालाच तर फायदाच होईल, नुकसान काही होणार नाही. त्यामुळे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?

ललित लेखनाचा प्रकार: 

सालं एक द्राक्ष

ऑफ स्पिनसारखा हात फिरवून घड्याळात पाहिलं. डाव्या हातावर बराच मोठा काळा फरांटा उठला होता. घड्याळावर बरेच छोटे ओरखडे आलेले दिसले. "च्यायला! या घड्याळावर ओरखडे उठण्याआधी माझ्या हाताला जखमा का झाल्या नाहीत. हे माझं सगळ्यात आवडतं घड्याळ आहे." मागचं घड्याळ गाडीत मारलं गेलं तेव्हाही मी हेच म्हटलं होतं; स्वतःशीच बोलताना काहीही म्हटलेलं चालतं. कोण बघायला येतंय आपण किती सुसंबद्ध बोलतोय ते! "अगं सुसंबद्धतेचं काय घेऊन बसल्येस, किती वाजले ते कोण पाहणार? तुझा काका?" मी स्वतःला जरा दटावलंच. अजून संध्याकाळच्या शोसाठी तासभर बाकी होता.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य