Skip to main content

गद्य

सिर सलामत तो ...(परदेशकथा)

सिर सलामत तो ...

(** देशाचे नाव देणे हेतुपूर्वक टाळले आहे. )

शाहिद ने विमानातळावरून कराचीच्या विमानात बसल्यावर सर्वप्रथम अल्लाहतालाचे आभार मानले “या खुदा शुकर है तेरा की तूने जिंदा निकाला मुझे इस जहन्नम से! मै शुक्रगुजार हू तेरा!...........”

ललित लेखनाचा प्रकार

विश्वाचे आर्त - भाग १ - काळाचा आवाका

(वैज्ञानिक संकल्पनांवर सरळसोप्या भाषेत भाष्य करण्यासाठी ही लेखमाला सुरू केलेली आहे)

ललित लेखनाचा प्रकार

सत्य कथा - रुपयाचे कांदे वीस पैश्यात

सीपी ते उत्तम नगर, ३५ मिनिटांचा मेट्रो प्रवास. माझ्या जवळ बसलेला एक मेट्रो प्रवासी सहज म्हणाला 'प्याज फिर महंगा हो गया है, सरकार को नतीजा भुगतना पड़ेगा.' 'कोण म्हणतो कांदा महाग झाला' एक पांढरे केस वाला वयस्कर ग्रामीण (चौधरी) उतरला. त्यावर तो प्रवासी म्हणाला, चौधरीजी मालूम है, आज प्याज का भाव ५० रुपया किलो है. कांद्यामुळे सरकार पडते, १९९८ मध्ये दिल्लीत काय घडले होते माहित आहे का?

ललित लेखनाचा प्रकार

आनंदाचा क्षण आणि ....

त्याचा आईचा फोन आला, तू बाप झाला, मुलगी झाली आहे. हि आनंदाची बातमी कळताच तो तडक दिल्लीला निघाला. दुसर्या दिवशी सकाळीच आपल्या नवजात परीला बघायला तो बी एल कपूर हॉस्पिटल वर पोहचला.

ललित लेखनाचा प्रकार

सर्प दंश - दोन लघु कथा

महाराज या विषारी नागाने आपल्या राज्यातल्या अनेक नागरिकांचे प्राण घेतले आहे. सैनिकानी त्याला पकडले आहे. महाराज आज्ञा करावी, विषारी नागाचे काय करायचे. राजाने आज्ञा दिली, यात विचार कसला, ठेचुन टाका त्याला. सैनिकानी तत्काल त्या नागाला ठेचुन ठार केले.

दुसरी कथा:

महाराज या विषारी नागाने आपल्या राज्यातल्या नागरिकांचे प्राण घेतले आहे. सैनिकानी त्याला पकडले आहे. महाराज आज्ञा करावी, विषारी नागाचे काय करायचे. राजाने आपल्या मंत्र्याना या बाबत त्यांच्या सल्ला मागितला.

ललित लेखनाचा प्रकार

आमचा गिनीपिग - अल्फान्चु

डेलावेअर मध्ये घराभोवती खूप झाडी होती, वेलींच्या जाळी अन अनेक प्रकारचे पक्षी होते. या ठीकाणी एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली होती की वसंत ऋतुनंतर मेटींग होऊन पुढे जेव्हा त्या पक्ष्यांची पिल्ले उडायला शिकत तेव्हा खूप पिल्ले तर खालीच पडत. रॉबिनची सुंदर डोळे अन लहानशी भुवई असलेली बाळे, मैनेची बाळे, लालबुंद कार्डिनलांची फिक्कट अजुन रंग भरास न आलेली पिल्ले. त्यां पिल्लांचे चे आई-वडील पिल्लांना उडण्यास गोड आवाजात प्रोत्साहन देत. एकदा तर २ वेगवेगळ्या प्रजातीची पिल्ले एकमेकांपासून केवळ ४ फूट अंतरावर उडावयास शिकत होती. तेव्हा पक्ष्यांचा एक गंमतीशीर धूर्तपणा लक्षात आलेला होता.

ललित लेखनाचा प्रकार

‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’-मी जालावर लेखकू का झालो

दोन-तीन दिवस अगोदर मला माझ्या एका मित्राने प्रश्न विचारला. ‘पटाईतजी सच सच बताओ आपने इंटरनेट पर लिखना क्यों शुरू किया’. त्याने विचारलेल्या प्रश्न ऐकून मी विचारात पडलो. मी अंतर्जालावर लिहिणे का सुरु केले? नकळत समर्थांचे वचन आठवले. समर्थ म्हणतात, ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’. प्रत्येक नश्वर जीवाला अमर व्हावेसे वाटते. मृत्यू लोकात शरीराने कुणीच अमर होऊ शकत नाही. पण कीर्तिरूपाने आपण अमर होऊ शकतो. माझ्या मनात ही अमर होण्याची इच्छा दडलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी काही राजा हरिश्चंद्र नाही, तरी ही मला उमगलेले सत्य मी माझ्या मित्राला सांगितले.....

ललित लेखनाचा प्रकार

तपश्चर्या ऑउटसौर्स – कथा सत्यव्रताची

आजच्या पिढीचे ब्रीद वाक्य, आम्ही आमची अधिकांश कामे ऑउटसौर्स करून घेतो. मोबाईल/ ऑन लाईन वरून सर्व कामे होतात. आम्हाला काहीही करावे लागत नाही. भाजीपाला, किराणा, कपडे, इलेक्ट्रॉनिक समान इत्यादी घरात लागणारे सर्व साहित्य, घरी बसल्या-बसल्या मिळतात. सौप्या भाषेत, आपली कामे दुसर्या कडून करवून घेणे म्हणजे ऑउटसौर्स. जगाला नवीन असली तरी आपल्या देश्यात ऑउटसौर्सची परंपरा फार जुनी आहे. पण ऑउटसौर्सचा कधी कधी काय परिणाम होतो....

ललित लेखनाचा प्रकार

स्वच्छतेचा चष्मा- एक रूपक कथा

सिंहासनावर विराजमान अवंती नरेश विक्रमादित्यचे डोके भडकलेले होते, ते रागाने राजसभेत बसलेल्या सभासदांवर डाफरत होते, आज सकाळी राजवाड्या बाहेर फिरायला गेलो होतो. सहज म्हणून अवंती नगरीचा फेरफटका मारला. नगरात जागो-जागी कचर्याचे ढिगारे आणि घाणीचा उग्र वास पसरलेला होता. कसे राहतात आपले प्रजाजन डुक्करांसारखे या घाणीत, सहन होत नाही मला, आता असे चालणार नाही. काही ही करा मला पुन्हा कधी नगरीत घाण दिसता कामा नये. पण एक लक्ष्यात ठेवा, प्रजेला आर्थिक स्वरूपाचा काही त्रास झाला नाही पाहिजे आणि सरकारी तिजोरीला ही फटका बसला नाही पाहिजे. प्रधानमंत्री म्हणाले असेच होईल महाराज.

ललित लेखनाचा प्रकार