Skip to main content

आर्थिक

बेझॉस, गोयल आणि महंमदाचे पामतेल

पैसे आणता म्हणजे काही उपकार नाही करत!

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

भांडवलशाही हीच एक मोठी समस्या

01 पृथ्वीच्या अस्तित्वाच्या मुळावरच घाव घालणारी भांडवलशाही – मग ती कार्पोरेट भांडवलशाही असो की ग्राहक (consumer) भांडवलशाही की, क्रोनी कॅपिटॅलिझम, वा social, liberal , market economy इत्यादीपैकी कुठलीही असो,- हीच एक फार मोठी समस्या आहे. भांडवलशाहीला जोडलेल्या या विशेषणांना दोष न देता मूळ नामपदाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे त्यामुळे सयुक्तिक ठरू शकेल.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

एमू पालनाचा फसलेला प्रयोग

o1 आजकाल ‘स्टार्टअप’ची हवा आहे. प्रत्येक स्टार्टअपवाल्याला वाटत असते की आपली आयडियाच भन्नाट आहे; आपले उत्पादन नक्कीच हिट होईल;

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

शेअर बाजार

डिस्क्लेमर: या धाग्याचा लेखक अतिशय तिरसट आणि असोशल आहे. या धाग्याचे आणि तदनुषंगाने होणाऱ्या चर्चेचे कोणतेही प्रताधिकार आपल्याकडे असल्याचा दावा लेखक करत नाही. हा धागा आणि त्यापुढील सगळी चर्चा यावरील लेखकाचे प्रतिसाद त्याच्या स्वत:च्या अनुभवातून आणि वेगवेगळे युट्युब व्हिडिओ बघून शेअर बाजारात काय चालते आणि काय चालत नाही हे बघून लिहिलेले आहेत/असतील. ते योग्य आहेत असा लेखकाचा कोणताही दावा नाही. तसेच लेखक सेबी सर्टिफाईड फायनान्शिअल ॲडव्हायसर नाही. त्यामुळे लेखक फक्त स्वत:ची निरीक्षणे मांडणार आहे. त्यावर कितपत विसंबून राहायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

मंदी म्हणजे काय ?

मंदी म्हणजे काय ?
पेप्रात लेख येतात त्यात गेल्या तीन/सहा/बारा महिन्यांतील एखाद्या क्षेत्रातील मागणी किंवा खप यावर आधारित आकड्यांवर मतं मांडलेली असतात. विश्लेषण असते. पण हे सर्व डेटा मिळाल्यावरच शक्य होते. मोठमोठे उद्योगपती मात्र आर्थिक वाटचाली अगोदरच ओळखतात आणि गुंतवणूक काढून घेतात / फिरवतात. त्याचे परिणाम फक्त नंतर चर्चेत येतात.

मला सुचलेले विचार पुढे देत आहे. त्यास आधार वगैरे नाही. बरोबर का चूक माहीत नाही.
तुम्हाला सुचलेले काही आहेत का?

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

बुलेट ट्रेन (भाग ६)

मागील पाच भागात आपण भारतातला ताजमहाल, अमेरिकेतील हूवर धरण, जपानची शिन्कान्सेन, तैवानची बुलेट ट्रेन, श्रीलंकेचा मटाला राजपक्षा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हॉंगकॉंगचा हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या आर्थिक बाजूंचा विचार केला. यातील हूवर धरण, शिन्कान्सेन आणि हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ सोडल्यास इतर प्रकल्प आर्थिक दृष्ट्या आतबट्ट्याचा व्यवहार ठरले आहेत हे देखील पाहिले.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

बुलेट ट्रेन (भाग ५) : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपात मुक्त व्यापाराचे वारे वाहात होते. अॅडम स्मिथने सांगितलेल्या अर्थविषयक अनेक तत्वांपैकी काही काही तत्वे युरोपातील देशांनी स्वीकारायला सुरुवात केली होती. 'देशाची संपत्ती म्हणजे तिथे तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा' हे तत्व मान्य झालेले होते. सरकारने बाजारात पडू नये, केवळ कायदे करावेत आणि राजनैतिक संबंध सांभाळावेत हे तत्व अर्धेमुर्धे पटलेले होते. अर्धेमुर्धे म्हटलं कारण सरकारने बाजारात उतरू नये हे तत्व युरोपातील बहुतेक सरकारे पळत होती पण अॅडम स्मिथचा ज्याला तीव्र विरोध होता टी मक्तेदारी मात्र सरकारी आशीर्वादाने फोफावत होती.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

बुलेट ट्रेन (भाग ४) : तैवान आणि श्रीलंका

बुलेट ट्रेन प्रकल्पात इतर देशांनी आपल्याला फसवले आहे का? की आपणच आपली फसगत करून घेऊन एक पांढरा हत्ती आपल्या पुढील पिढ्यांच्या गळ्यात मारला आहे? जर हा प्रकल्प सुरु झालाच आहे तर मग आता आपण पुढे काय करू शकतो? या प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी वाहतुकीसंबंधीच्या तीन महाकाय प्रकल्पांबद्दल मी काय वाचले आहे ते चौथ्या आणि पाचव्या भागात प्रथम सांगतो आणि मग सहाव्या भागात वरील प्रश्नांची उत्तरे देऊन ही लेखमाला संपवतो.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

बुलेट ट्रेन (भाग ३) शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरो गेज, स्टॅंडर्ड गेज, ब्रॉडगेज

ज्याला जगभरात बुलेट ट्रेन म्हणतात त्याला जपानमध्ये शिन्कान्सेन म्हणतात. शिन्कान्सेन या जपानी शब्दाचा इंग्रजीत शब्दशः अर्थ होतो New Trunk Line. आपण मराठीत त्याला म्हणूया 'नवी रेल्वे लाईन'. यातलं बाकीचं सगळं नंतर बघूया पण 'नवी' या शब्दात जपानमधल्या या प्रकल्पाचे कारण दडले आहे. ही जर नवी रेल्वे लाईन आहे तर जुनी रेल्वे लाईन असणारंच. आणि कुठल्या ना कुठल्या कारणाने जपानी लोकांना नवी रेल्वे लाईन चालू करावीशी वाटले असणार. काय होती ती कारणं? आणि नवी रेल्वे लाईन आल्यावर जपानमधली जुनी रेल्वे लाईन बंद झाली का?

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स