छायाचित्रण स्पर्धा

छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ५ : 'सात सक्कं त्रेचाळीस' मधील परिच्छेद

याआधीच्या भागात अतिशय कमी एंट्रीज आल्याने त्या भागाचा निकाल न लावता पुढिल भाग द्यायचे ठरवत आहोत. याही भागात कमी इंट्रीज आल्या तरीही आलेल्या इंट्रीजपैकी एक चित्र निवडून निकाल दिला जाईल

या वेळच्या आव्हानासाठी "सात सक्कं त्रेचाळीस" या किरण नगरकर यांच्या पुस्तकातील एक लहानसा उतारा देत आहोतः
--------

स्पर्धा का इतर?: 

छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ४ : 'सुखकर्ता दु:खहर्ता'

तिघाही विजेत्यांच्यावतीने हे आव्हान देत आहे:

या विकांतापासून आपल्याकडे गणरायांचे आगमन होईल. गणेशाची सर्वप्रथम म्हटली जाणारी "सुखकर्ता दु:खहर्ता" ही आरती आपल्याला परिचित आहेच.
ही आरती अनेक गायकांनी आपापल्या आवाजात गायली आहे. अनेक ऐसी अक्षरेकरही आपापल्या आवडत्या/सर्वसाधारणपणे रुळलेल्या चालीतही ती गात असतीलच / गायली / ऐकली असेलच. त्यामुळे त्या आरतीचा ऑडीयो/व्हिडीयो इथे देत नाहियोत. त्या आरतीचे शब्द मात्र पुढे दिले आहेतः

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची।।
सर्वांग सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ता फळाची।।
स्पर्धा का इतर?: 

छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ३ : 'पाहणार्‍याची रोजनिशी' आणि त्या रोजनिशीतला एक क्षण

प्रत्येकाच्या रोजनिशीत असे अनेक क्षण असतात जे सुखाच्या, दुखा:च्या, नैराश्याच्या किंवा उमेदीच्या भावना जागवतात किंवा एखादा क्षण, त्यातले घटक आजुबाजुच्या परिस्थितीबद्दल बरच काही सांगुन जातात आणि आपल्याला ते चटकन भावतं किंवा जाणवतं. ह्या क्षणांची रेंज मोठी आहे, अगदी आपल्या जवळच्या माणसाच्या निरागस हसण्याचा तो क्षण किंवा आपल्या रोजच्या कामाला जाण्याच्या प्रवासातला एखादा भावनेला हात घालणारा क्षण, कोणाला रोजनिशीतलं काय भावेल कोणी सांगावं पण चला आपण सगळे एकमेकांना सांगुयात...

स्पर्धा का इतर?: 

छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग २ : राग

जॉनथन क्लार्क अँड मिस्टर नोरेल या अद्भुत कादंबरी मधे एके ठिकाणी जादू मुळे इंद्रियांचा घोळ होतो: "...by a curious twist of their senses, as if they had tasted a string quartet, or as if they had been deafened by the sight of the colour blue." संगीताची चव लागते, रंगाच्या कानठाळ्या बसतात. ह्या ओळी खूप वर्षांपूर्वी वाचल्या, पण मनात टिकून आहेत. दृश्य माध्यम अन्य इंद्रियांना कसे टिपू शकते?

स्पर्धा का इतर?: 

छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १ : आये कुछ अब्र

अद्याप 'आषाढस्य प्रथम दिवसे'ला काही काळ असला तरी शब्दशः त्याचे ढग 'आखाडी' जमू लागले आहेत.

आपापल्या मनःस्थितीप्रमाणे मग त्यात पर्युत्सुक विकलतेची भावना कुणाला जाणवेल तर कुणाला 'घर माझे चंद्रमौळी'ची संसारी आठवण होईल ('इन बारिशों से दोस्ती अच्छी नहीं फराज, कच्चा तेरा मकान है कुछ तो खयाल कर'). 'पिकांत केसर ओले'च्या शृंगारिक नवेपणापासून ते कृतकृत्य सूर्यास्तापर्यंत ढगांचं रूपक अनेकदा चपखलपणे वापरण्यात आलेलं आहे.

स्पर्धा का इतर?: 

छायाचित्रण पाक्षिक आव्हान ३५ : पर्यटन

आता शाळांना सुट्टी चालू असताना, कुठेतरी भटकून यायचा बेत बहुतेक जण करतात. नंतर पावसाळ्यातसुद्धा भटकंती करणारे खूपजण आहेत. त्या अनुषंगाने, आव्हानाचा विषय ठेवला आहे: पर्यटन

पण इथे थोडा ट्विस्ट देतो. असं समजा की अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्याचे कंत्राट तुम्हाला मिळाले आहे आणि त्यासाठी पर्यटन विभागाबरोबर तुम्हाला मार्केटिंगचे काम करायचे आहे. त्यासाठी कॅलेंडर काढणे, पिक्चर पोस्टकार्ड बनवणे, पेपरात जाहिरात देणे असा एकंदर प्लॅन आहे. तर त्यासाठी छायाचित्रे हवी आहेत. तर मंडळी, करा सुरुवात. (फोटोबरोबर एखादी टॅगलाईन दिलीत तर एकदम दुधात साखर)

स्पर्धा का इतर?: 

छायाचित्रण पाक्षिक आव्हान ३४ : सूर्यास्त

मागील आव्हानाला पुरेसे प्रतिसाद न आल्यामुळे विषय बदलतो आहे .. सुर्योदय आणि सूर्यास्त ह्या नित्यनेमाने घडणार्या घटना .. वर्षानुवर्षे रोज होणार्या .. तरीही प्रत्येक सुर्योदय आणि प्रत्येक सूर्यास्त काही वेगळाच वाटेल इतकी विविधता निसर्ग दाखवून जातो .. तेव्हा ह्या वेळेस असे वेगळे दिसणारे, असणारे किंवा भासणारे, वैविध्यपूर्ण सूर्यास्त चित्रबद्ध करुया ..
मी काढलेले एक छायाचित्रे इथे देत आहे ..
हे छायचित्र शहरातील सूर्यास्ताचे आहे .. उंच इमारतींच्या आड अस्तास जाणारा सूर्य मला समुद्रावरील / sunset point वरील सुर्यास्तापेक्षा थोडासा वेगळा भासला ...

स्पर्धा का इतर?: 

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ३३ : आभूषणे

बदलत्या काळानुरूप स्त्री आणि पुरुषांनी घालायची आभूषणे / दागिने यात प्रचंड बदल झाला आहे. पूर्वी मूलतः सोन्याचांदीत घडवले जाणारे दागिने आता विविध प्रकारच्या मटेरीअल पासून बनवले जातात आणि अशा प्रकारे घडवल्या गेलेल्या दागीन्यात कमालीची विविधता दिसून येते. अशाप्रकारे वैविध्यतेमुळे म्हणा किंवा वैचित्र्यामुळे शोभनीय / दर्शनीय / लक्षणीय झालेली आभूषणे आणि अशी आभूषणे परिधान केलेल्या व्यक्ती या पंधरवड्यासाठी विषय म्हणून देतो आहे. दागिन्यात वैचित्र्य / वैविध्य नसले तरी परिधान करणाऱ्या व्यक्तिविशेषामुळे एकंदर चित्राला काही मजा येत असेल तरी अशी छायाचित्रे टाकायला प्रत्यवाय नाही.

स्पर्धा का इतर?: 

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ३२ : फळे

बहुतेक वेळा छायाचित्रणाची सुरुवात 'फुलांची' चित्रे काढून होते. पण त्याचवेळेला त्या फुलांनंतर येणार्‍या फळांकडे आपले दुर्लक्ष होते. त्या फळांची चित्रे ह्यावेळी पाक्षिक आव्हानात आपल्याला द्यायची आहेत. शिवाय चैत्र महिना, वसंत रुतुची सुरुवात म्हणजे आता अनेक फळे यायला लागतील, त्यांचाच उत्सव साजरा करुया.

नियम
१. सर्वसाधारण परिभाषेप्रमाणे ज्यांना 'फळे' म्हणता येतील अशी फळे असावीत (अनवट चालतील पण उगाच टोमॅटो हे पण एक फळच आहे, असे नको).
२. फळ आहे हे साधारण लक्षात आले पहिजे, अगदीच छोटा, फळाच्या कुठल्यातरी एकाच भागाचा (मॅक्रो) फोटो नको.
३. कृत्रिम (लाकडी, प्लास्टिक) फळे नकोत. फळे खरी हवीत.

स्पर्धा का इतर?: 

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २४: प्रकाश

फोटोग्राफीला "छायाचित्रण" म्हणावे का "प्रकाशचित्रण" याबद्दल अनेकदा संवाद वाचतो. खरंतर, माणसाचे डोळे विविध आकार त्यावर पडणार्‍या प्रकाशापेक्षा, सावल्यांमुळे अधिक ओळखतो. वेगळा पोत, वेगळे रंग, वेगळी दृश्यमानता हे सारे प्रकाशाचेच खेळ!
छायाचित्रण करताना मला सर्वात आव्हानात्मक काय वाटते ते आपल्या चित्रात प्रकाशाला नियंत्रित करणे. त्यातही प्रकाशालाच चित्रीत करायचे असेल - तो प्रकाश हाच चित्राचा विषय करायचा असेल - तर अधिक सृजनात्मक विचार करावा लागेल असे वाटते.

याच विचारातून या वेळच्या आव्हानाचा विषय आहे "प्रकाश".

स्पर्धा का इतर?: 

पाने

Subscribe to RSS - छायाचित्रण स्पर्धा