Skip to main content

छायाचित्रण स्पर्धा

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २०: उत्सव

या वेळचा स्पर्धेचा विषय आहे "उत्सव". रोजच्या जगण्यात धर्म, प्रांत, परंपरा किंवा इतिहास याप्रमाणे अनेक उत्सव माणूस साजरा करतो.. बरेचदा मला वाटतं उत्सव आपल्याला जगण्याचं बळ आणि आनंद देतात. उत्सव भारतीयच असावा असं काही बंधन नाही. उत्सव तुमच्या दृष्टिकोनातून कसा दिसला हे महत्त्वाचं. त्यातला उल्हास, वेगळेपण, रचना, रंग, उत्फुल्ल आनंद चौकटीत पकडण्याचा प्रयत्न करणारी छायाचित्रं आवडतील..
अनेक प्रांतातले / देशातले उत्सव बघायला आवडतील आणि ते धार्मिकच असावे असं काही नाही..थोडा अधिक पर्याय देऊ शकणारा विषय मांडावा असं वाटलं..

स्पर्धा का इतर?

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १९: स्वयंपाकघर

या वेळचा स्पर्धेचा विषय आहे 'स्वयंपाकघर'. स्वयंपाकघर, तिथल्या वस्तू, विविधरंगी, विविध पोत असणारे मसाले, भाज्या, शिजवलेले, सजवलेले पदार्थ, एकंदरच अन्न या मूलभूत गरजेशी संबंधित गोष्टींचे लाळ गाळू पहाणारे, फक्त डोळ्यांनाच सुखावणारे, किंवा यापेक्षा अधिक काहीतरी सुचवणारे फोटो दिसतील अशी आशा आहे.

अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या फोटो एडिटरमधून कॉंट्रास्ट आणि कलर सॅच्युरेशन वाढवलं, तापमान बदललं तर चित्र खुलून दिसतील. तसंच योग्य प्रमाणात कातरल्याने (क्रॉप केल्याने) मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते. तसा प्रयत्न जरूर करावा.

स्पर्धा का इतर?

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १८: प्लास्टिक

या वेळचा स्पर्धेचा विषय आहे 'प्लास्टिक'. सुमारे शतकापूर्वी जन्माला आलेल्या या पदार्थाने आज आपलं आसमंत व्यापलेलं आहे. बाटल्या, पिशव्या, खुर्च्या, कपडे, आवरणं, पॅकिंग मटेरियल अशा अनेक स्वरूपात आपल्याला ते जागोजागी दिसतं. त्याचे वेगवेगळे रंग, पोत, आकार, पारदर्शकता यामुळे फोटोग्राफीसाठी, विशेषतः अमूर्त फोटोग्राफीसाठी हा अत्यंत लवचिक (प्लास्टिक) विषय आहे. त्याचबरोबर त्याला एक बेगडीपणा, खोटेपणा, आणि पर्यावरणाच्या संदर्भात काहीसा भीतीदायकताही आहे. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या अंगांनी छायाचित्रणाच्या शक्यता यातून उभ्या रहातात.

स्पर्धा का इतर?

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १७: कार्यमग्न

पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे : कार्यमग्न.

या विषयाबद्दलही अधिक काही स्पष्टीकरण/अपेक्षा द्यायची गरज नाही. तसा सोपा विषय म्हणता यावा. अर्थ किती व्यापक असू शकतो हे चित्रांमधूनच पाहू !

------

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:

१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही किंवा स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.

स्पर्धा का इतर?

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १६ : संध्याकाळ

पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे : संध्याकाळ.

या विषयाचबद्दलही अधिक काही स्पष्टीकरण/अपेक्षा द्यायची गरज नाही. तसा सोपा विषय म्हणता यावा. अर्थ किती व्यापक असू शकतो हे चित्रांमधूनच पाहू !

------

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:

१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही किंवा स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.

स्पर्धा का इतर?

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १५ : प्रतिबिंब

पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे : प्रतिबिंब.

.......गेल्या दोन आव्हानांना मिळालेला एकून प्रतिसाद पाहता, प्रोत्साहन देण्यासाठी, यावेळी थोडा सोपा विषय देत आहे.
मला वाटते, या विषयाचे काही स्पष्टीकरण/अपेक्षा द्यायची गरज नाही. कल्पनेला मोकळे सोडून जे गवसेल ते द्यावे.

गेल्या आव्हानात, धनंजय यांनी दर आठवड्याला धागा वर आणणे आणि पाक्षिक आव्हानाचे मासिक आव्हान करणे, हे मुद्दे मांडले होते. यावेळी तरी दोन्हीची गरज भासणार नाही असे वाटते. गरज भासलीच, तर 'ऐसी..' च्या व्यपस्थापकांशी सल्ला मसलत करून आवश्यकतेनुसार बदल केले जातील.

------

स्पर्धा का इतर?

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १४ : युगांतर

पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे : युगांतर.

आठवड्याची सुरुवात रविवारी (का सोमवारी), वर्षाची सुरुवात जानेवारीमध्ये (का पडव्याला), शकाची सुरुवात राजाचा अभिषेकाने (शालिवाहनाच्या का विक्रमाच्या)... सर्व कालमापनांची, युगांची सुरुवात निव्वळ सामाजिक ठरावाने होते. त्याला निसर्गातला पाया वगैरे पुष्कळदा नसतोच. पण तरी समाजाने ठरवले, आणि सर्वांनी मानले, तर ते तथ्य होते. काहीतरी नवे चैतन्य अशा प्रसंगी खरेच सळसळते. जुने काहीतरी संपल्याची हळहळ खरीच वाटते.

स्पर्धा का इतर?

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १३ : विसंगती

पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे : विसंगती.

.......विसंगती आपल्या भोवती सगळीकडे भरून राहिली आहे. विचारांतून आलेली विसंगती, जरासुद्धा डोकं न खाजवता जाणवलेली विसंगती, निसर्गातली, नात्यातली, राजकीय, सामाजिक, आर्थिक, कलेतली, साहित्यातली, अगदी 'कबाब में हड्डी' पासून 'कींचड़ में खिला कमल' पर्यंतची सगळी विसंगती.

स्पर्धा का इतर?

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १२ :नातं

पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे : नातं. नातं म्हणजे फक्त मनुष्यांतलंच किंवा अगदी सजीवांमधीलच असायला हवे असे नाही.

Nile हे आव्हानदाते या धाग्यावर विजेता निवडतील.

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही किंवा स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.

स्पर्धा का इतर?

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ११ : दोन

पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे : दोन

जेव्हा ऋषिकेश आणि आतिवास असे दोन विजेते घोषित झाले तेव्हा नियमाला मुरड घालण्यासारखं होतं खरं.. पण दोघांनी विचार केल्यावर आधीच्या निर्णयात नव्या विषयाची नांदी दिसत होती. 'दोन' हा विषय केवळ जोडी किंवा युती इतकाच सिमीत असायचे बंधन नाहीच. आपापल्या प्रतिभेला आव्हान देऊन 'दोन' या विषयाला न्याय देईल असे कोणतेही छायाचित्र येऊ देत.

अतिवास आणि ऋषिकेश हे दोन आव्हानदाते याचे विजेते निवडतील

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:

स्पर्धा का इतर?