सामाजिक

असॉल्ट आणि सेक्शुअल असॉल्ट - परिप्रेक्ष्य

Taxonomy upgrade extras: 

लैंगिकता फक्त योनी/शिस्नापुरती मर्यादित नसते. -- मास्टर्स आणि जॉन्सन.

'मास्टर्स आणि जॉन्सन' चं म्हणण काय आहे हे लक्षात आलं नाही, थोडं विस्तारून सांगता येईल काय?

स्त्रियांवर होणार्‍या अत्याचारांमधे विनयभंग किंवा लैंगिक गुन्ह्यांमध्ये शारिरीक हिंसाचार हा इतर शारिरीक हिंसाचाराप्रमाणेच असतो, टक लावून पहाणे, शेरेबाजी करण्यामध्ये शारिरीक कृतीचे संकेत असतात त्यामुळे तोही एकप्रकारे हिंसाचारच समजला जावा, पण ह्या संदर्भात लैंगिक भावनेला महत्त्व येण्याचे कारण सांस्कृतिक असावे काय? येथील सदस्य ह्याबद्दल नक्की कसा विचार करतात हे कळावे हा हेतू आहे.

आपण का लिहिता ?

Taxonomy upgrade extras: 

आज आपण अंतर्जालावर लिहितो. पण का लिहतो? हा एक प्रश्न किती दिवसांपासून मनात येतोय. आपण लिहितो त्या मागे काही कारणे असतातच. म्हणून हा प्रश्न.

माझ स्वत:चे म्हणाल तर वयाच्या पन्नासी नंतर अंतर्जालावर आपण लिहू शकतो हे आणि लोक ते वाचतील ही. मी मोडकी-तुटकी का होईना मराठीत लिहायचा निर्णय घेतला. अर्थात लिहिताना पुष्कळ समस्या आल्या पण लिहिणे सुरु ठेवले. माझा लिहिण्याचा उद्देश्य समाजातले आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक सत्य लोकांसमोर ठेवणे.

रॅपो

Taxonomy upgrade extras: 

अ ला ब चे म्हणणे कळत नाही किंवा पटत नाही.

त्याला/तिला काही सांगितलं तरी कळतच नाही,
असं म्हणून ’अ’ ला निकालात काढणे किती सोप्पे?

कितीही तर्कशुद्ध म्हणणे असले तरी
रॅपो नसेल तर स्वीकारले जाणार नाही.

Everyone has preferred channels to accept or assimilate.

रॅपो हा ब नेच निर्माण करायचा असतो!

डेव्हिल्स अॅडव्होकसी - भाड्याचं गर्भाशय आणि भाड्याचे स्नायू

Taxonomy upgrade extras: 

(नवी बाजू 'गर्भाशय आणि मजबूत स्नायू असणारा हा भाड्या नक्की कोण?' असं विचारणार, अशी आपली मी एक प्रेडिक्शन करून ठेवतो.)
अतिशहाणा यांनी इथे डेव्हिल्स अॅडव्होकेटची भूमिका घेतलेली आहे. तीच अधिक खोलवर जाऊन मांडण्याचा माझा प्रयत्न आहे.

स्त्रीमुक्ती चळवळीचा एक मूलभूत सिद्धांत आहे. तो म्हणजे 'पुरुषांनी स्त्रियांचं शोषण केलेलं आहे'. या सिद्धांताच्या समर्थनार्थ काही मुद्दे वारंवार मांडले जातात.
१. स्त्री ही भोगवस्तू आहे, पुरुष हे उपभोक्ते आहेत.

खरच स्त्रिया इतक्या मजेत आहेत?

Taxonomy upgrade extras: 

.नमस्कार.
ह्यावेळी ऐसीवरती अधिक विचारमौक्तिके प्राप्त झालित.
हिंमत , वेळ आणि पेशन्स्/सहनशक्ती असेल त्याने आपापल्या जिम्मेदारीवर प्रतिवाद करावा.
************************अजोंची विधाने सुरु*******************************************************
वेल, जैविकतेच्या बाहेर, सामाजिक परिस्थीतींमुळे स्त्रीया अधिक बुद्धिमान असतात. त्या जास्त समंजस असतात. जास्त भावूक असतात. पुरुषांच्या तुलनेत त्या कमी दुष्ट असतात. पुरुषांसाठी तर त्या दुष्ट नसतातच म्हटले तर चालावे. त्यांना इगो कमी असतो. जनरली पुरुष कचरा करत असतात नि त्या तो सावरत असतात. एकूणात त्यांची मूल्येदेखिल पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असतात.

मूल्यबदल आणि त्याचं मराठी साहित्यात प्रतिबिंब

Taxonomy upgrade extras: 

व्यवस्थापन : मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग २० इथे सुरू झालेली ही चर्चा विषयानुसार वेगळी केली आहे.
---

आभार.
यातील काही गेल्या दशकातील आहेत असे वाटते. यातही जी वाचली नाहियेत ती वाचायचा प्रयत्न असेलच.
------

आपल्या सर्वोच्च अस्मिता काय आहेत?

Taxonomy upgrade extras: 

अस्मितांचे स्वरुप ही एक किचकट बाब आहे. माणसाला अस्मिता का असते? अगदी अनस्मित लोकही जगात असतात का? अस्मिता कशा उत्पन्न होतात? त्या तशाच राहतात कि जीवनप्रवाहात कमी अधिक सौम्य होत राहतात? कशाने? एखाद्याच्या अस्मितेचा त्याच्या प्रत्यक्ष जीवनावर काय परिणाम होतो? माणूस अस्मितेवर घाला घातल्याने का चिडतो? अस्मिता जपण्यासाठी माणसे कोणत्या पातळीला जाऊ शकतात? केवळ माणसांना अस्मिता आहेत म्हणून जगात काय काय चांगले आहे? काय काय वाईट आहे? कोणालाच कोणतीच अस्मिता नसती तर? अस्मिता या (देवाधर्मासारख्या) लोकप्रसिद्ध संकल्पनांच्याच असतात का?

स्त्री भ्रूण हत्या का होत असाव्यात?

Taxonomy upgrade extras: 

स्त्री भ्रूण हत्या हि भारतातली एक समस्या. जगामध्ये स्त्री भ्रूण हत्या होतात कि नाही ह्याची कल्पना नाही. मात्र भारतात हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळते. अशी काय मानसिकता असेल कि वेडगळ कल्पनेपायी लोक आपल्या पोटच्या गोळ्याला निर्दयपणे खुडून टाकत असावेत.

मराठी चित्रपटांची/मालिकांची मुलगा-सून द्वेष्टी मानसिकता !!!

Taxonomy upgrade extras: 

"सून-मुलगा अति नालायक आणि वाईट असतात पण आई-वडील-नणंद-जावई ही माणसे देवापेक्षाही श्रेष्ठ आणि आदर्श माणसं असतात" असा संदेश देणारे मराठी चित्रपट बंद होत आहेत आणि मराठी निर्माते-लेखक-दिग्दर्शक प्रगल्भ होत आहेत असे मला वाटायला लागले असतांनाच मध्यंतरी एक "स्वातंत्र्याची ऐशी तैशी" हा चित्रपट आला आणि वाटलं की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहाणार म्हणजेच मराठी चित्रपट हे सून-मुलगा द्वेष्टेच राहाणार!! असे हे चित्रपट नाण्याच्या केवळ एकाच बाजू साठी बनवले जाणारे चित्रपट असतात. नाण्याला दुसरी बाजू असते हेच मुळी त्यांना मान्य नसतं.

पाने

Subscribe to RSS - सामाजिक