अपग्रेडबद्दल
१. नवीन प्रतिसादांचा 'नवीन' हा टॅग आता लाल रंगात दिसत आहे.
२. दोन्ही बाजूंच्या स्तंभांची रुंदी कमी करून मधली रियल इस्टेट वाढवली आहे.
३. गमभनसारख्या चालणाऱ्या टंकनातला अनुस्वार आता M (capital M) वापरून येत आहे. गमभनच्या नव्या रूपात हायफन टंकता येत आहे.
अजूनही शब्दाच्या शेवटी अकारी व्यंजन असेल आणि त्यापुढे विरामचिन्ह असेल तर पाय मोडका राहतो; तिथे अ किंवा a टंकावा लागत आहे. (ते दुुरुस्त कसं करायचं हे माहीत आहे; पण चाचणी करत असताना त्यातून चिकार बग्ज बाहेर आले, म्हणून ते सध्या बंद ठेवलेलं आहे.)
३. चर्चाविषय प्रकारचे धागे दिसत नव्हते, त्यात त्रुटी होती किंवा प्रतिसाद देता येत नव्हते. तो गोंधळ निस्तरलेला आहे.
४. नवीन - व्यनि सुरू झाले आहेत.
करण्याची कामं -
०. मराठी टंकनाच्या तीन पद्धती आहेत. यात गूगल इनपुट नाही. आहे त्या पद्धतींमध्ये त्रुटी असल्यास कळवा.
उजव्या हाताला 'टंकनसाहाय्य' हे मदतपान आहे. ते बदलून देवनागरी टंकनसाहाय्य करायचं आहे. (याला थोडा वेळ लागेल.) हे काम सुरू आहे. यात मदत करण्यासाठी तयार असल्यास कळवा.
१. व्यनि अजूनही नाहीत. ते लवकरच येतील.
२. अक्षररंग आणि इतर काही बटणं सध्या गायब आहेत.
३. खरडवही, खरडफळा अगदीच जुजबी दिसत आहेत, त्यांची सजावट करणं. (हे करण्यासाठी कोणी मदत करणार असेल तर स्वागत आहे. )
४. आधीच्या रूपात एका पानावर किती प्रतिसाद दिसायचे ते सदस्यांना ठरवता येत होतं. ते श्रेणीच्या मॉड्यूलमधलं फीचर होतं. ते काम माझ्या पेग्रेडच्या बाहेरचं आहे. यासाठी कोणी मदत करणार असेल किंवा मदत करणारे शोधून देणार असतील तर उत्तम.
५. डाव्या बाजूला वर वडापाव मेन्यू असला तर फोन, टॅबलेट आणि कंप्यूटर सगळ्यावरूनच वापरताना सोय होईल. त्यालाही थोडा वेळ लागेल.
यांबद्दल आणि शिवाय आणखी काही सूचना असतील तर लिहा.
---
ऐसी अक्षरे संस्थळ ड्रुपाल ६वर चालतं. ते तंत्रज्ञान थोडं जुनं झाल्यामुळे आता ड्रूपाल ७वर लवकरात लवकर जाणं ऐसीच्या आरोग्यासाठी आणि मोबाईल, टॅबलेटवरून ऐसी वापरणाऱ्यांसाठीही उपयुक्त असेल.
हे काम भावेप्र रविवारी रात्री ९:३० च्या सुमारास सुरू करण्याचा विचार आहे. त्यासाठी ऐसी थोडा वेळ बंद करावं लागेल; साधारण दोन तासांत प्राथमिक काम पूर्ण होईल आणि ऐसी पुन्हा सुरू होईल अशी आशा आहे. दोन तासांत सगळं काम कदाचित पूर्ण होणार नाही; पण संस्थळ सुरू करता येईल. त्याशिवाय काही गोष्टी तात्पुरत्या बंद किंवा बिघडलेल्या असतील; अशी शक्यता आहेच. उपलब्ध टंक (फाँट) चांगला नाही, फारच मोठा आहे, उपयुक्त दुवे योग्य ठिकाणी दिसत नाहीत, अशासारख्या तक्रारीही असू शकतील. त्याबद्दल प्रतिसाद देऊन ही कामं अदितीकडून करवून घ्या.
श्रेणीचं मॉड्यूल सध्या ड्रूपाल ६वरही चालत नाही; त्यासाठी ड्रूपाल ७चा कोडही उपलब्ध नाही. त्यासाठी कोणी मदत करणार असल्यास स्वागत आहेच. अपग्रेडनंतर व्यनिची व्यवस्था कदाचित काही काळ उपलब्ध होणार नाही; जुने व्यनि विदागारात सुरक्षित आहेत; गरज असल्यास किमान त्यांचा बॅकप घेण्याची सोय लवकरच करून देण्यात येईल.
अपग्रेडचं काम अगदीच फसल्यास संस्थळ पूर्ववत केलं जाईल.
तसदीबद्दल क्षमस्व.
प्रतिक्रिया
आय आय कॅप्टन. वी विल कीप द
आय आय कॅप्टन. वी विल कीप द फोर्सेस अॅट बे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
Damn the torpedoes. Full
Damn the torpedoes. Full Speed Ahead.
.
Hard to starboard...
आधीच त्रास.
या अपग्रेडची पूर्वतयारी म्हणून आधीच वरच्या पट्टीतल्या आणि उजव्या स्तंभातल्या लिंकांच्या जागांची अदलाबदली करत आहे. दोन दिवस (मला नावं ठेवत) गैरसोय सहन करावी ही विनंती.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पट्टीचे उजवे
फार फरक पडेलसं वाटत नाही. तसंही उजवा स्तंभ आणि वरची पट्टी हे समीकरण अलीकडे हमखास झालंय
वेडा इसम!
अपग्रेडनंतर निळोबाच्या आधी तुला ब्लाॅक केला पाहिजे. ओसीडी आहे तुला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कोणत्याही परिस्थितीत ऐसी
कोणत्याही परिस्थितीत ऐसी सोडून जाणार नाही,उगाचच तक्रारींचा पाढा वाचणार नाही.नव्या बोटीत बसण्यास उत्सुक.
#२००९ मध्ये हरवलेले चांद्रयान-१ नासाच्या ७० मिटर दुर्बिणीने शोधले आहे.
ऐसीला पुन्हा एकदा
ऐसीला पुन्हा एकदा तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्कृष्ट मराठी चर्चास्थळ बनण्यासाठी शुभेच्छा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अपग्रेडबद्दल.
अपग्रेडचं मुख्य काम झालेलं आहे. ज्या काही तक्रारी, उणिवा, त्रुटी दिसत आहेत, त्यांची नोंद इथेच करा.
देवनागरी टंकन सुरू आहे, पण त्यात अजून सुधारणा करण्याची गरज आहे, याची कल्पना आहे. तमिळ टंकनासाठी मदत असा दुवा दिसत आहे, तो बदलून देवनागरी टंकनासाठी मदत, असा करायचा आहे. मॅक+सफारी यात देवनागरी टंकनासाठी अडचण येत होती, असं कानावर आलं आहे. ते दुरुस्त करायला वेळ लागेल.
चर्चाविषय प्रकारचे धागे लॉगिन करून दिसत नाहीयेत, पण लॉगाऊट करून दिसत आहेत.
फोन, टॅबलेटवरून ऐसी वापरताना अडचणी येत असतील तर त्या मुद्दाम लिहा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मराठी देवनागरी कीबोर्डावरूनच
मराठी देवनागरी कीबोर्डावरूनच लिहायची सवय असल्याने आणि फोनातच सोय असल्याने ( विंडोज) कधीच अडचण येत नाही.
ऐसीचे नवीन रुपडे छान आहे.
अदिती , ऐसी टीम धन्यवाद.
+1
पेस्टल रंगातील सुंदर, डिसेन्ट रुपडे आवडले.
काय हे!
गो तू टेस्टर आहेस ना! मग चुका काढून दे की. ते सगळं काम झालं की चानचान म्हणायला चिकार वेळ मिळेल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
Please do not give a
Please do not give a subcomment-
(1) Unable to view "New comment" on "Naveen Pratikriya" tab
(2) Scrapbook shows a disabled option selected (As expected) yet issue - it is not disabled.
(4) On common scrapbook (KHAFA), there is no separator between 2 scraps. Unable to make out where "PRATIGAMI" ends & "PUROGAMI" starts
)5) VYANI facility unavailable
हायफन
साधे हायफन टैपायचे झाले तरी टैप मेथड देवनागरीवरून रोमनात हलवावी लागते - एका क्यारेक्टरपुरती.
Mac + Safari
Mac + Safari - गमभन चाचणी यशस्वी.
बोलनागरी चाचणी यशस्वी.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
google keyboard milel ka?
google keyboard milel ka? aani "register" vr click kela ki error yet aahe.
बोर्डावर धाग्यासमोर १०
बोर्डावर धाग्यासमोर १० प्रतिसाद २ नवीन असे दिसते तिथे २ वर क्लिक केल्यावर आपण नवीन आलेल्या प्रतिसादावर जात नाही.
शब्दाच्या शेवटी अक्षर पूर्ण करण्यासाठी 'ए' टMकावा लागतो. उपक्रमच्या जुन्या व्हर्जनमध्ये हा प्रॉब्लेम होता.शब्द टMकताना तसे दिसते. स्पेस मारली की ठीक होते.क्यापिटल एम ने अनुस्वार येत नाही.
'x' टाइप केल्यास क्ष येत नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
नवीन प्रतिक्रियांवरचा नवीन हा
नवीन प्रतिक्रियांवरचा नवीन हा टॅग लाल रंगात नाही दिसते.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
दिसतिय मस्त साइट्. मराठी टाइप
दिसतिय मस्त साइट्. मराठी टाइप पण करता येतय्.
व्यनि गायब झालेत्, आता मी
व्यनि गायब झालेत्, आता मी मनोबाशी कसे बोलणार्?
टेलीपथी ट्राय करू शकता .
टेलीपथी ट्राय करू शकता . शेवटी काय एकच व्यक्ती , मेंदूच्या या भागातून त्याभागात संदेश पोचवणे ... फार अवघड नसावे ..
Aai gga!! =))
Aai gga!!
अनमनधपका
अना म्हणे होय । मनाशी संवाद। आपुलाचि वाद । आपणासि।।
काय सांगु बापटMण्णा,
काय सांगु बापटMण्णा, दुभगलेले मन म्हणजे काही सोप्पी गोष्ट नाही. मनाच्या एका भागाचे दुसऱ्या भागाला काही कळत नाही. तुम्ही वाचले असेल ना की एक मन खुन करते पण दुसऱ्या मनाला कळत नाही.
फार कन्फुजन आहे. डोक्यात फार केऑस असतो. ऐसी वर वेगवेगळे आयडी असल्यामुळे थोडे सोप्पे जाते मॅनेज करायला.
मनोबाच्या सर्व प्रश्नाची उत्तरे माझ्याकडे असतात्, पण मनोबाला ती उत्तरे मनातल्या मनात मला विचारता येत नाहीत्, म्हणुन तो ऐसीवर विचारतो, मी त्याला व्यनीत उत्तर देते.
एक झाड दोन पक्षी अशी अवस्था.
मनोबाच्याच वर्गात शाळेत
मनोबाच्याच वर्गात शाळेत/कॅालेजात अनुराव असाव्यात असा दाट संशय आहे.
उजवा स्तंभ
पानाच्या दोन्ही बाजूंच्या स्तंभांमु़ळे मुख्य लेखाची 'रियल इस्टेट' कमी झाली आहे. उजवा स्तंभ उडवावा अथवा रुंदी कमी करावी.
गमभन वापरून मला अनुस्वार देता येत नाही आहे. M टाईप होतेय. (लिनक्स + फायरफॉक्स )
(पंचम?)
उत्तम सूचना!
छाणे नवीन लुक :)
छाणे नवीन लुक
पण गमभन नीट नै चालते
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
विदागार
विदागार हा शब्द आवडल्या गेलेला आहे. क्रोधागार सारखा वाटतो. याच धर्तीवर
खरडागार, वाचनखुणागार, श्रेणीगार... असे शब्द पाडण्याचा विचार व्हावा.
ही बातमी समजली का १४१ न
ही बातमी समजली का १४१ नMबरचा धागा उघडत नाही
The website encountered an unexpected error. Please try again later.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
Real Estate
नवीन रुपड्यामध्ये डाव्या आणि उजव्या बाजूस सुरुवातीच्या काही ओळी झाल्या की केवळ शुभ्र स्पेसच आहे. मधला मुख्य मजकूर अरुंद उभ्या पट्टीत कसाबसा बसला आहे. त्यामुळे धागे पाहण्यासाठी बरेच खालपर्यंत जावे लागते. जुने रुपडे ह्या बाबतीत अधिक चांगले user-friendly होते.
डाव्या बाजूचे दिनवैशिष्टय आदि उचलून पुन: पहिल्यासारखे उजव्या बाजूस टाकावे असे सुचवेन. ह्यामुळे पडद्यावरील मर्यादित जागेचा उपयोग आणखी सुधारेल.
त्या डाव्या उजव्या कॉलमना ते
त्या डाव्या उजव्या कॉलमना ते वडापावसद्ऱुश (सद्ऱुश हा शब्द किती भयानक दिसतोय...) चिन्ह आणून लपवता येईल का?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
वडापावसदृश चिन्ह येण्यासाठी
वडापावसदृश चिन्ह येण्यासाठी वेळ लागेल. तोवर दोन्ही बाजूंना स्तंभ नसण्याबद्दल आग्रह आहे असं दिसतंय, तसं करणं सोपं आहे. पण या रचनेवर प्रेम करू नकाच कारण अजून प्रयोग सुरू आहेत. काही गोष्टी मोडलेल्या आहेत. आहे ते आणखी चांगलं, पण आहे तसंच डिसेंट ठेवून काही करता येईल का, याचा शोध सुरू (करायचा) आहे.
---
१. सुरुवातीला गमभनसदृश टंकन नॉर्मल करायचा प्रयत्न करते.
२. चर्चाविषय प्रकारात सुरू केलेले सगळेच धागे लॉगिन करून दिसत नाहीयेत. हा प्रश्न महत्त्वाचा आहेच ते काम यादीत दुसरं.गेल्या वेळेप्रमाणेच, या वेळेसही श्रवणनं मदत केल्यामुळे हा प्रश्न सुटला आहे. देवनागरी टंकनाचं काम उद्या सुरू करेन. त्यात फार अडचणी येणार नाहीत अशी आशा आहे.
(माझ्या प्रतिसादाला उपप्रतिसाद येऊनही मला हा प्रतिसाद संपादित करता आला. सगळ्यांनाच हे करता येत असावं.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
वडापावसदृश चिन्ह
he kaay aasate?
Burger Menu
Burger Menu
.
अरारारारारा
अरारारारारा
अॅन्डृ लुमिसचा ई व्हय. आम्हाला बर्गर बिर्गर माहीत नै.
एका धाग्यावर १००० प्रतिक्रिया
एका धाग्यावर १००० प्रतिक्रिया वालM सेटिMग गायब आहे का? अनुस्वार नाही देता येते नव्या गमभनमध्ये.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
गमभनमध्ये अनुस्वार
गमभनमध्ये अनुस्वार देता न आल्यामुळे अस्वस्थ होणाऱ्या ऐसीकरांसाठी तात्पुरता उपाय : Type method नावाच्या पेटीमध्ये उजवीकडे Keyboard नावाचा दुवा आहे तो उघडला तर कीबोर्ड लेआउट उघडतो. त्यातला अनुस्वार निवडून अनुस्वार देता येतो आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बाजूचे कोलम छोटे करता येतील
बाजूचे कोलम छोटे करता येतील का? मेन धागा/प्रतिसाद एरिआ फार लहान दिसतो आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
कष्ट!
१. मोडके पाय फक्त स्पेस दिले तरच रिपेअर होतात्, , . ? ! ह्या चिन्हांनी नाही.
२. ई आणि ऊ साठी ee आणि oo ची इतकी सवय झालीये की कंटाळा येतो दरवेळी चुका सुधारायला. तेच ch - च, chh-छ बाबत.
३. ज्ञ गमभन मध्ये कसा लिहायचा?
थोडक्यात, जुन्याच गमभनची प्रचंड सवय झालीये. ती सुटेपर्यंत हाल आहेत हाल्.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
WHEN IS VYANI FACILITY
WHEN IS VYANI FACILITY STARTING?????
I can't even complain/nag/discuss/ask/talk private things.
This is FRUSTRATING!!!!!!!!!!
___
आऊट लेट नसल्याने मी फार चिप्स खातेय. मला अजुन जाडं केल्याचं पाप अदितीच्या माथी
अडचण.
व्यनिच्या मॉड्यूलला एक ठरावीक डेटाबेस-SQL-टेबल हवं आहे. ते जुन्या डेटाबेसमध्ये, मॉड्यूलमध्ये नव्हतं. ते रिकामं टेबल बनवून मॉड्यूल सुरू करण्याचा पहिला प्रयत्न काल फसला. एका संगणक-अभियंता मित्राला शंका विचारली आहे; त्याला आज काम करायला वेळ मिळाला तर दोन दिवसांत व्यनि सुरू होतील. तोवर जीमेल, व्हॉट्सअॅप, फेसबुक, याहू, यांच्या सर्व्हरांचा एकांत कमी करून पाहा.
---
गमभनसारखी टंकनपद्धत दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे. माझ्या काही व्यक्तिगत कारणांमुळे घाईघाईत अपग्रेड करायला लागत आहे. तमिळ टायपिंगचा उजव्या बाजूचा दुवा देवनागरी करण्याचं कामही सुरू आहे. फावल्या वेळात कोणी त्यात मदत करून देत असेल तर कृपया कळवा.
--
शुचे, मी सध्या बऱ्याच कामात बुडाल्यामुळे जेवायला पुरेसा वेळ मिळत नाहीये; पण व्यायाम नेहमीसारखाच सुरू आहे. त्यामुळे (खरं तर, हवा फारच सुंदर झाल्यामुळे) माझं भसाभस वजन कमी होत आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
माझं भसाभस वजन कमी होत आहे.
Wow. I am growing fatter day by day!!!
Today it's a FRUSTRATING day since morning. Woke up on wrong side of bed.
Shoot!!!! Shoot shoot!!!
I want to shoot someone (& I know precisely who )
____
Take your time Adit. I was just venting out my frustration. Take your time.
_______________
Le enfant terrible.
मी नेहमीच अनॉयिंग असते. असो. इथे फारच विषयांतर झालं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
Blame it on A***le desktop
Blame it on A***le desktop camera that turned on automatically (A meeting being ON) showed me my picture this morning. I looked so UGGGG!!
See without a VYANI I have to discuss such gory details here in public
.
hahaha. Enough of avantar.
१. खरडवहीतून दुसऱ्या
१. खरडवहीतून दुसऱ्या सदस्याच्या नावावर क्लिक केल्यावर थेट खरडवहीत न जाता त्या सदस्याच्या खात्यात जात आहे.
२. डाव्या कॉलममधला 'ऐशा रसां ऐसे रसिक' भाग उजव्या कॉलममध्ये हलवता येईल काय? फोनवरून पाहताना पानाच्या तळाशी डावा कॉलम खूप मोठा व उजवा लहान असे दिसते आहे.
खालून हळूच डोकावणारा कळफलक...
...एकदा लॉगिन केल्यावर येऊ लागतो. लॉगिन करण्यापूर्वी येत नाही. लॉगिन करायची पंचाईत होते. तूर्तास माझाच एक जुना प्रतिसाद शोधून काढून त्यातून सदस्यनाम कॉपीपेस्ट करून लॉगिन केले.
पाहा बुवा.
Type method
आता लॉगिन करताना Type method निवडता येते आहे. पासवर्ड टंकताना बदलण्याची काळजी घ्यावी.
लोक दरवेळेला युजरनेम/पासवर्ड
लोक दरवेळेला युजरनेम/पासवर्ड टाईप करतात का? ब्राउजरमध्ये सेव्ह का नाही करून ठेवत?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मी अनेकदा वेगवेगळी मशीन्स
मी अनेकदा वेगवेगळी मशीन्स/ब्राउझर्स वापरत असतो. शिवाय विकांताला लॉगिनच होत नाही. पासवर्ड सोमवारपर्यंत रहात नाही
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पासवर्ड सोमवारपर्यंत रहात
म्हंजी?? दर आठवड्याला बदलतो पा.व.?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
सेशन
पासवर्ड ब्राउझरमध्ये सेव्ह केलेला नसला तरी ऐसीवर कुकीद्वारे साठवला जातो, पण दोन दिवस वापरला गेला नाही तर सेशन इन्व्हॅलिड होतो.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
प्रतिक्रियेची जागा
१) प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी जी जागा उपलब्ध आहे ती फारच लहान असल्यामुळे ३-४ ओळींहून मोठा प्रतिसाद झाला तर खालीवर स्क्रोलिंग फार करावे लागते.
२) ज्ञानसारख्या शब्दातील 'ज्ञ' कसा उमटवायचा? ज्~ज आणि द्न्य हे दोन्ही ज्ञात प्रकार वापरून पाहिले पण जमले नाही. (येथील ज्ञ copy-pasted आहे.)
ज्ञ - एक लांबची युक्ती
ज्+ञ = ज्ञ
पैकी ञ हा पानाच्या डावीकडे खालच्या कोपऱ्यात Type Method मधल्या Keyboard मधील 'ञ'वर क्लिक करून मिळवला आहे. गंमत म्हणजे या कळफलकात ज्ञ, क्ष दिसले नाहीत.
ही युनिकोड आधारित टंकनपद्धत
ही युनिकोड आधारित टंकनपद्धत आहे. त्यात क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षरं असल्यामुळे त्या कळफलकात ते नाहीत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ज्ञ
युनिकोडमध्ये ज्ञ = ज + ् + ञ
स्पेलिंग = j+Y+a
काही जुने शॉर्टकट किंवा विशेषतः जोडाक्षरांचे रस्ते बदलावे लागत आहेत. उदाहरणार्थ ज्ञ. x = क्ष हे करण्याचा प्रयत्न करत्ये, पण ते चालत नाहीये. च आणि छ साठी जास्तीचा एच टंकावा लागू नये म्हणून च = c आणि छ = ch असं केलं आहे. पण त्याचा उपद्रव अधिक असेल ते बदलून पाहते.
गमभनसदृश टंकनात आणखी काय चालत नाहीये याची नोंद केल्यास ते सुधारणं सोपं होईल. (मी गेली चारेक वर्षं गमभन वापरलेलं नाही, त्यामुळे मला ते लक्षात येत नाही.)
--
यात अडचण अशी आहे की डाव्या-उजव्या बाजूचे रकाने फोनमधून ऐसी उघडताना स्क्रीनच्या सगळ्यात खाली जातात. एकच रकाना असेल तर फोनमध्ये बरीच मोकळी जागा खाली राहते. तसं होऊ नये म्हणून दोन्ही बाजूंचे रकाने ठेवलेले आहेत.
याला पर्याय म्हणून डाव्या-उजव्या बाजूंना पिस्ता रंगाची मोकळी जागा आहे, ती कमी करून पाहते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ज आणि न मिळून द्न्य बनत असे.
ज आणि न मिळून द्न्य बनत असे. आता तसे बनत नाही (गमभन + विंडोज ७)
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ज्ञ
ज्ञ. ज + ञ. ज + न नव्हे.
थत्त्यांनी दिलेलं गमभनचं
थत्त्यांनी दिलेलं गमभनचं स्पेलिंग आहे. आताही हवं असेल तर करून पाहते.
दीर्घ ईकार आणि ऊकारांची काय स्पेलिंग हवी आहेत? कॅपिटल e आणि i वापरून लिहिता येत आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मी नेहमी क्यापिटल ई (अॅ) आणि
मी नेहमी क्यापिटल ई (अॅ) आणि क्यापिटल आय (दीर्घ ईकार) आणि क्यापिटल यू (दीर्घ उकार) वापरत आलो आहे.
मिसळपाववर द्न्य लिहूनही चालतो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
टेस्टिंग:
टेस्टिंग:
ज्ञ (पास )
x (नापास)
मला त्याछा उपद्रव अधिक आहे. बहुमत घेऊन बदलावे (तोवर मी त्याछा लिहिलं तर ते त्याचा असे वाछावे)
बाकी दृश्य ऐसी कसेही दिसो (कसे दिसावे) ते लो प्रायॉरीटीवर घ्यावे - ते सवयीने होईल ठिक.
टंकनाछ्या तक्रारी दूर झाल्या की मग पुन्हा घरछ्यासारखं वाटेल. तिथे नवी सवय लाऊन घेणं कष्ह्टप्रद आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
छुकलेल्या छछेए छाछेगिरेए
छुकलेल्या छछेए छाछेगिरेए छालवोओन घेतलेए जानारछ नाहेए. आम्हाला छुछकारोओ नकाछ.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
छपला घ्या आणि छालुउ पडा.
यातला विनोद आणि संदेश दोन्ही समजून घेतला.
आता मिसळपावच्या जुन्या मालकांचे शब्द, 'आबा'री भाषेत - छपला घ्या आणि छालुउ पडा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
खरडफळ्याचा टवका उडालाय.
आधीच्या त्या हृदयविदारक व्यंगचित्राच्या ऐवजी एचटीएमएल कोड दिसतो आहे.
कॅपिटल G ङ करता येईल का? सध्या G आणि Y दोन्हीही ञच आहेत.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
'चरटजी (आचरट) निदान केलाय की.
'चरटजी (आचरट) निदान केलाय की.
च्यामारी
पाहिलंच नाही.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
मूळ कोड
ते निदान उपयुक्त नाही. जुनाच कोड कॉपी झाला तरीही प्रतिमा दिसत नाहीत. सध्या खरडफळ्यावरच्या खरडींमध्ये प्रतिमा दिसत आहेत, यावर मी समाधान मानत्ये. त्या मॉड्यूलचा PHP code बदलून देणारे कोणी आहेत का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
G आणि Y दोन्ही टाईप केलं तरी
G आणि Y दोन्ही टाईप केलं तरी ञ ञ च उमटतंय टाईप मेथड गमभनमध्ये. ते एक जरा बदलून घ्या.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
व्यनि सुरू झाले आहेत.
आभार व्यक्त करण्यासाठी मालकीणबाईंना एक पिनो न्युआर ची बाटली देण्यात यावी असा ठराव मांडतो.
तुम्ही लोकांनी फक्त "मम" म्हणा. मी बाटली पाठवतो मालकीणबाईंना.
देवनागरी टंकन
ऐसीवर आता देवनागरी टंकनासाठी जे मॉड्यूल आहे ते गमभन नाही, 'इंडिक स्क्रिप्ट' नावाचं मॉड्यूल आहे. दोन्ही मॉड्यूलांचं आतलं काम निराळ्या पद्धतींनी चालतं. इंडिक स्क्रिप्टमध्ये थोडे बदल करून ते गमभनसारखं चालेल, असे करून त्याला 'गमभन-सदृश' बनवलं जात आहे.
हे करताना टंकनकष्ट कमी करण्याचा प्रयत्न म्हणून c = च (जादाचा एच टंकावा लागू नये), अशी रचना केली होती; जनतेच्या मागणीनुसार ते बदलण्याचं काम लवकरच होईल. 'ज्ञ'साठी d+n+y हाच्च शॉर्टकट हवा असेल तर तो करण्याचा प्रयत्न करता येईल; मिसळपाववर जुना शॉर्टकट चालतो, कारण तिथे गमभनचं जुनं मॉड्यूल अपग्रेड करून घेतलं गेलं. पण ते अपग्रेडेड मॉड्यूल पब्लिकली, सगळ्यांसाठी उपलब्ध नाही. शिवाय गमभनमध्ये बोलनागरी आणि इनस्क्रिप्ट टंकन करणाऱ्या (अल्पसंख्य) लोकांचीही सोय होत नाही. या दोन्ही कारणांमुळे गमभनच्या अपग्रेडचा विचारही केला नाही. (मला ते मॉड्यूल अपग्रेड करता येत नाही, हा मुद्दा आहेच.)
गमभन वापरणाऱ्या आळशी आणि शूरवीर सदस्यांसाठी बोलनागरी असा दुसरा पर्याय आहे. त्यासाठी टंकनसाहाय्य तयार करण्याची गरज आहे; पण गमभनमध्ये टंकताना सगळीकडे 'अ' टंकावा लागतो, तो बोलनागरीत करावा लागत नाही. वेळ मिळाला की बोलनागरी वापरून कमी किया वापराव्या लागतात का गमभन वापरून आणि एफिशियन्सी किती हे मोजणारा प्रोग्रॅमही लिहिण्याचा माझा विचार आहे. पण बोलनागरी वापरून टंकनकष्ट कमी होतात, असा प्राथमिक अंदाज आहे.
गब्बर, त्या वारुणीच्या नावाचा उच्चार 'पिनो न्वार' असा आहे. पण सध्या वारुणी पाठवू नकोस. गेले बरेच महिने उजव्या हातावर अॅलर्जी आलेली आहे; ती आता कुठे बरी व्हायला सुरुवात होत्ये. अॅलर्जीमुळे जिभेचे आंबटशौक पुरवता येत नाहीयेत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पाने