अपग्रेडबद्दल
१. नवीन प्रतिसादांचा 'नवीन' हा टॅग आता लाल रंगात दिसत आहे.
२. दोन्ही बाजूंच्या स्तंभांची रुंदी कमी करून मधली रियल इस्टेट वाढवली आहे.
३. गमभनसारख्या चालणाऱ्या टंकनातला अनुस्वार आता M (capital M) वापरून येत आहे. गमभनच्या नव्या रूपात हायफन टंकता येत आहे.
अजूनही शब्दाच्या शेवटी अकारी व्यंजन असेल आणि त्यापुढे विरामचिन्ह असेल तर पाय मोडका राहतो; तिथे अ किंवा a टंकावा लागत आहे. (ते दुुरुस्त कसं करायचं हे माहीत आहे; पण चाचणी करत असताना त्यातून चिकार बग्ज बाहेर आले, म्हणून ते सध्या बंद ठेवलेलं आहे.)
३. चर्चाविषय प्रकारचे धागे दिसत नव्हते, त्यात त्रुटी होती किंवा प्रतिसाद देता येत नव्हते. तो गोंधळ निस्तरलेला आहे.
४. नवीन - व्यनि सुरू झाले आहेत.
करण्याची कामं -
०. मराठी टंकनाच्या तीन पद्धती आहेत. यात गूगल इनपुट नाही. आहे त्या पद्धतींमध्ये त्रुटी असल्यास कळवा.
उजव्या हाताला 'टंकनसाहाय्य' हे मदतपान आहे. ते बदलून देवनागरी टंकनसाहाय्य करायचं आहे. (याला थोडा वेळ लागेल.) हे काम सुरू आहे. यात मदत करण्यासाठी तयार असल्यास कळवा.
१. व्यनि अजूनही नाहीत. ते लवकरच येतील.
२. अक्षररंग आणि इतर काही बटणं सध्या गायब आहेत.
३. खरडवही, खरडफळा अगदीच जुजबी दिसत आहेत, त्यांची सजावट करणं. (हे करण्यासाठी कोणी मदत करणार असेल तर स्वागत आहे. )
४. आधीच्या रूपात एका पानावर किती प्रतिसाद दिसायचे ते सदस्यांना ठरवता येत होतं. ते श्रेणीच्या मॉड्यूलमधलं फीचर होतं. ते काम माझ्या पेग्रेडच्या बाहेरचं आहे. यासाठी कोणी मदत करणार असेल किंवा मदत करणारे शोधून देणार असतील तर उत्तम.
५. डाव्या बाजूला वर वडापाव मेन्यू असला तर फोन, टॅबलेट आणि कंप्यूटर सगळ्यावरूनच वापरताना सोय होईल. त्यालाही थोडा वेळ लागेल.
यांबद्दल आणि शिवाय आणखी काही सूचना असतील तर लिहा.
---
ऐसी अक्षरे संस्थळ ड्रुपाल ६वर चालतं. ते तंत्रज्ञान थोडं जुनं झाल्यामुळे आता ड्रूपाल ७वर लवकरात लवकर जाणं ऐसीच्या आरोग्यासाठी आणि मोबाईल, टॅबलेटवरून ऐसी वापरणाऱ्यांसाठीही उपयुक्त असेल.
हे काम भावेप्र रविवारी रात्री ९:३० च्या सुमारास सुरू करण्याचा विचार आहे. त्यासाठी ऐसी थोडा वेळ बंद करावं लागेल; साधारण दोन तासांत प्राथमिक काम पूर्ण होईल आणि ऐसी पुन्हा सुरू होईल अशी आशा आहे. दोन तासांत सगळं काम कदाचित पूर्ण होणार नाही; पण संस्थळ सुरू करता येईल. त्याशिवाय काही गोष्टी तात्पुरत्या बंद किंवा बिघडलेल्या असतील; अशी शक्यता आहेच. उपलब्ध टंक (फाँट) चांगला नाही, फारच मोठा आहे, उपयुक्त दुवे योग्य ठिकाणी दिसत नाहीत, अशासारख्या तक्रारीही असू शकतील. त्याबद्दल प्रतिसाद देऊन ही कामं अदितीकडून करवून घ्या.
श्रेणीचं मॉड्यूल सध्या ड्रूपाल ६वरही चालत नाही; त्यासाठी ड्रूपाल ७चा कोडही उपलब्ध नाही. त्यासाठी कोणी मदत करणार असल्यास स्वागत आहेच. अपग्रेडनंतर व्यनिची व्यवस्था कदाचित काही काळ उपलब्ध होणार नाही; जुने व्यनि विदागारात सुरक्षित आहेत; गरज असल्यास किमान त्यांचा बॅकप घेण्याची सोय लवकरच करून देण्यात येईल.
अपग्रेडचं काम अगदीच फसल्यास संस्थळ पूर्ववत केलं जाईल.
तसदीबद्दल क्षमस्व.
प्रतिक्रिया
तू दिलेल्या गिटहब कोडच्या
तू दिलेल्या गिटहब कोडच्या २१२व्या ओळीत '\u094Da' : '\u200C' असं आहे. ' \u094D' (हलंत) + 'a' = '\u200C' (ZWNJ) इथून हे ZWNJ येताहेत असं वाटतंय. हलंत+a ह्या कॉंबिनेशनसाठी कोणतेच युनिकोड चिन्ह असता कामा नये.
थ्यँक्स
हा प्रकार विसरलेच होते. त्यासाठी काही उपाय सुचतो का ते पाहते.
किंवा एकदा लॉगिन करून सदस्यनाम बदलणं असा पर्याय सदस्यांना करावा लागेल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
होय, होय. चहा घेणार?
u + d + a + y +(backspace) असं टंकलं तर माझ्याकडे उदय अशी अक्षरं उमटली. नाईलनं सांगितल्याप्रमाणे u + d + a + y + a असं केल्यावरही उदय अशी अक्षरं उमटली. त्यापुढे पूर्णविराम टंकला जाईल.
व्यंजनासमोर पूर्णविराम टंकल्यावर हलन्त घालवण्याचा प्रयत्न केला होता. त्यात क+पूर्णविराम टंकल्यावर क+नुक्ता असं छापलं जात होतं. ज या व्यंजनाच्या बाबतीतही तेच झालं. म्हणून तो कोड काढला आहे. कोणाला त्यासाठी काही मदत करायची असल्यास हा कोड पाहा.
आबा,
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हे, मार्मिक, रोचक,
हे, मार्मिक, रोचक, माहितीपूर्ण कसे सिलेक्ट करायचे? मोबाईल वरून होत नाहीए.
लॉग इन
लॉग इन चा प्रॉब्लेम मला पण येत आहे. माझ्या जुन्या (कंपनीच्या) लॅपटॉपवर पासवर्ड सेव्ह केलेला होता. तो जाऊन नव्या कंपनीचा आला तर त्यात माझा पासवर्ड चालत नाही. दर वेळी नव्या संकेताक्षरासाठी विनंती क्करावी लागते. नवा पासवर्ड बहुधा सेव्हच होत नाही. तसे करूनच लॉग इन करतो. त्यात नवी कंपनी दुष्ट असल्याने पर्सनल मेलवर बंदी आहे. त्यामुळे नव्या संकेताक्षराची विनंती कार्यालयीन वेळेत करता येत नाही.
त्यामुळे कार्यालयात वाचनमात्र रहावे लागते.
पण घरच्या लॅपटॉपवरूनही नवा पासवर्ड सेट होत नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
टाइप मेथड देवनागरी अस
टाइप मेथड देवनागरी असल्यामुळे हे होत नाही ना? म्हणजे पासवर्ड रोमन लिपीत टाइप होतोय असं तुम्हाला वाटतंय, पण तो देवनागरीत होतोय?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
नसावे. म्हणजे मोबाईलव
नसावे. म्हणजे मोबाईलवरूनही करून पाहिले. मोबाइलवर गमभन चालत नाही. म्हणजे यूजर नेम सुद्धा इंग्लिशच येते. तिथे मराठी कीबोर्ड वापरून यूजरनेम आणि इंग्लिश कीबोर्ड वापरून पासवर्ड टाकला तरी ते चालले नाही. नवा पासवर्ड सेव्ह होत नसावा.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आत्ता मिसळपावच्या प्र
आत्ता मिसळपावच्या प्रतिसाद खिडकीमध्ये यूजरनेम टाइप केले आणि ते कॉपी करून इथे लॉग इन केल्यावर व्यवस्थित लॉग इन झाले.
त्या अर्थी The way username is saved in old database and the way it is now typed in current window do not to match हेच कारण असावे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
लॉगिन प्रॉब्लेम
देवनागरीतले सदस्यनाम टंकून येण्याची नोंद करता येत नाही. 'फरगॉटन पासवर्ड्?' चा संदेश सारखा येतो. तीनवेळा इमेलवरून संकेताक्षर बदलून येण्याची नोंद केली. आज कळले की इंग्रजीतले पर्यायी सदस्यनाम वापरुनच येनों करता येते.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
टंकन साहाय्य
'आवागमन'खाली 'टंकन साहाय्य' म्हणून दुवा सर्वांना दिसतो आहे का? तिथे गमभन आणि बोलनागरी ह्या दोन्ही टंकनपद्धतींचे कळनकाशे (कीमॅप) दिले आहेत. अद्याप काम चालू आहे, पण संदर्भ म्हणून वापरता येतील.
हो दिसतोय. धन्यवाद. एक प्रश्न...
अनुस्वार टाइप होत नाही नीट. या तक्त्यात सुद्धा गमभन साठी M हेच दिलंय. पण घ्या, बघा काय झालं. हे परत एकदा !!
एका मिनीटात अज्ञान दूर करता आलं तर बघा. मोडलं असलं, दुरूस्त करायला हवं असलं तर, जाउंद्या, त्याशिवाय काही अडत नाहीये. ....एक मिनीट, 'जाउंद्या' टाईप करता येतंय. आंबा / खांब / टांगलंय / अंबिका / मलखांब ........छ्या जाउंद्या. अजिबात मोडलंय असंही नाहीये. माझीच अनुस्वारांची खोड कमी करता आली तर बघतो
आणि त्या ँ साठी काय वापरायचं? बोलनागरी साठी ~ दिलंय पण ते ईथे चालत नाहीये. ईथे पण तेच - फार कमी वेळा याचा वापर होतो. पण आपली एक त्रुटी दिसली म्हणून दाखवली ईतकंच.
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
पाने