१. नवीन प्रतिसादांचा 'नवीन' हा टॅग आता लाल रंगात दिसत आहे.
२. दोन्ही बाजूंच्या स्तंभांची रुंदी कमी करून मधली रियल इस्टेट वाढवली आहे.
३. गमभनसारख्या चालणाऱ्या टंकनातला अनुस्वार आता M (capital M) वापरून येत आहे. गमभनच्या नव्या रूपात हायफन टंकता येत आहे.
अजूनही शब्दाच्या शेवटी अकारी व्यंजन असेल आणि त्यापुढे विरामचिन्ह असेल तर पाय मोडका राहतो; तिथे अ किंवा a टंकावा लागत आहे. (ते दुुरुस्त कसं करायचं हे माहीत आहे; पण चाचणी करत असताना त्यातून चिकार बग्ज बाहेर आले, म्हणून ते सध्या बंद ठेवलेलं आहे.)
३. चर्चाविषय प्रकारचे धागे दिसत नव्हते, त्यात त्रुटी होती किंवा प्रतिसाद देता येत नव्हते. तो गोंधळ निस्तरलेला आहे.
४. नवीन - व्यनि सुरू झाले आहेत.
करण्याची कामं -
०. मराठी टंकनाच्या तीन पद्धती आहेत. यात गूगल इनपुट नाही. आहे त्या पद्धतींमध्ये त्रुटी असल्यास कळवा.
उजव्या हाताला 'टंकनसाहाय्य' हे मदतपान आहे. ते बदलून देवनागरी टंकनसाहाय्य करायचं आहे. (याला थोडा वेळ लागेल.) हे काम सुरू आहे. यात मदत करण्यासाठी तयार असल्यास कळवा.
१. व्यनि अजूनही नाहीत. ते लवकरच येतील.
२. अक्षररंग आणि इतर काही बटणं सध्या गायब आहेत.
३. खरडवही, खरडफळा अगदीच जुजबी दिसत आहेत, त्यांची सजावट करणं. (हे करण्यासाठी कोणी मदत करणार असेल तर स्वागत आहे. )
४. आधीच्या रूपात एका पानावर किती प्रतिसाद दिसायचे ते सदस्यांना ठरवता येत होतं. ते श्रेणीच्या मॉड्यूलमधलं फीचर होतं. ते काम माझ्या पेग्रेडच्या बाहेरचं आहे. यासाठी कोणी मदत करणार असेल किंवा मदत करणारे शोधून देणार असतील तर उत्तम.
५. डाव्या बाजूला वर वडापाव मेन्यू असला तर फोन, टॅबलेट आणि कंप्यूटर सगळ्यावरूनच वापरताना सोय होईल. त्यालाही थोडा वेळ लागेल.
यांबद्दल आणि शिवाय आणखी काही सूचना असतील तर लिहा.
---
ऐसी अक्षरे संस्थळ ड्रुपाल ६वर चालतं. ते तंत्रज्ञान थोडं जुनं झाल्यामुळे आता ड्रूपाल ७वर लवकरात लवकर जाणं ऐसीच्या आरोग्यासाठी आणि मोबाईल, टॅबलेटवरून ऐसी वापरणाऱ्यांसाठीही उपयुक्त असेल.
हे काम भावेप्र रविवारी रात्री ९:३० च्या सुमारास सुरू करण्याचा विचार आहे. त्यासाठी ऐसी थोडा वेळ बंद करावं लागेल; साधारण दोन तासांत प्राथमिक काम पूर्ण होईल आणि ऐसी पुन्हा सुरू होईल अशी आशा आहे. दोन तासांत सगळं काम कदाचित पूर्ण होणार नाही; पण संस्थळ सुरू करता येईल. त्याशिवाय काही गोष्टी तात्पुरत्या बंद किंवा बिघडलेल्या असतील; अशी शक्यता आहेच. उपलब्ध टंक (फाँट) चांगला नाही, फारच मोठा आहे, उपयुक्त दुवे योग्य ठिकाणी दिसत नाहीत, अशासारख्या तक्रारीही असू शकतील. त्याबद्दल प्रतिसाद देऊन ही कामं अदितीकडून करवून घ्या.
श्रेणीचं मॉड्यूल सध्या ड्रूपाल ६वरही चालत नाही; त्यासाठी ड्रूपाल ७चा कोडही उपलब्ध नाही. त्यासाठी कोणी मदत करणार असल्यास स्वागत आहेच. अपग्रेडनंतर व्यनिची व्यवस्था कदाचित काही काळ उपलब्ध होणार नाही; जुने व्यनि विदागारात सुरक्षित आहेत; गरज असल्यास किमान त्यांचा बॅकप घेण्याची सोय लवकरच करून देण्यात येईल.
अपग्रेडचं काम अगदीच फसल्यास संस्थळ पूर्ववत केलं जाईल.
तसदीबद्दल क्षमस्व.
(अमुक मोड ऑन) असं त्रिकोणी
(अमुक मोड ऑन) असं त्रिकोणी कंसात लिहिलं तर ते दिसत नाही.
<अमुक मोड ऑन>बरोबर बोलल्लात<
<अमुक मोड ऑन>बरोबर बोलल्लात</अमुक मोड ऑफ>
??
तो less than कंस एचटीएमेल सुरू करतो तसं होऊ नये म्हणून & lt ; जोडून लिहायचे
कसं ते स्क्रीनशॉटमधून दाखवा.
कसं ते स्क्रीनशॉटमधून दाखवा.
इथे पाहा-
इथे पाहा-
१ ) HTML XHTML Entities :http://www.elizabethcastro.com/html/extras/entities.html
२ )HTML Entities :https://www.w3schools.com/html/html_entities.asp
&it अमुक मोड ऑन >
&it अमुक मोड ऑन >
असं लिहून काही होत नाही.
डावा त्रिकोणी कंस अमुक मोड ऑन उजवा त्रिकोणी कंस
असं लिहायचं असेल तर कसं ते स्क्रीनशॉटच्या सहाय्याने दाखवा.
(टीप: मला कोडिंगचा क देखील येत नाही हे लक्षात घेणे)
>> &&it अमुक मोड ऑन > <<
उदा. वर जे दिसतंय ते दिसण्यासाठी मी खालील गोष्टी टंकल्या (त्यातली स्पेस काढून टाका) :
फॉन्टचा आकार थोडासा वाढवता
फॉन्टचा आकार थोडासा वाढवता येईल का? फारच लहान वाटतोय. मोबाईलवर वाचताना त्रास होतोय.
तुमच्या मोबाईलमध्ये सेटिंग
तुमच्या मोबाईलमध्ये सेटिंग करा.
+१
माझ्या फोनमध्ये ठीकठाक दिसतंय. (मला लांबचा चष्मा आहे, पण चष्मा काढूनही फोनमध्ये नीट वाचता येतंय.)
मला कोडिंगचा क देखील येत नाही
मला कोडिंगचा क देखील येत नाही हे लक्षात घेणे
कोडिंग -एचटीएमेल कोडिंग शिकण्याचा उत्तम उपाय म्हणजे कोड कॅापी करणे.
अपग्रेडनंतर उपप्रतिसाद आलेला
अपग्रेडनंतर उपप्रतिसाद आलेला प्रतिसाद संपादित करता येतोय.
चला मनोबाला त्याच्या सर्व
चला मनोबाला त्याच्या सर्व प्रतिसादांचे टिबीकरण करता येइल आता.
उपग्रेडचे काम नेटके होत चालले आहे
संस्थळ नेटके होत चालले आहे.
अपकार : उपकार :: अपग्रेड : उपग्रेड
Marathhi typing
I m not able to type in Marathi . Please let me know , if I need to change any settings or download marathhi keyboard .
कोणता ब्राउजर, मोबाईल की
कोणता ब्राउजर, मोबाईल की डेस्कटॉप, कोणती ऑपरेटिंग सिस्टिम?
Marathi
Mobile iPhone 6 , safari
नेटिव्ह देवनागरी कीबोर्ड
ह्या प्लॅटफॉर्मसाठी बहुतेक तुम्हाला नेटिव्ह देवनागरी कीबोर्ड वापरावा लागेल. फोनची सेटिंग्ज बघून त्यात कीबोर्ड नसेल तर तो इन्स्टॉल करावा लागेल. हिंदी, मराठी आणि हिंदी ट्रान्सलिटरेशन असे नेटिव्ह कीबोर्ड अॅपल स्वत्:च पुरवते. त्यापैकी तुमच्या सोयीचा कीबोर्ड वापरू शकता. अधिक माहिती उदा. इथे मिळेल.
धन्यवाद
दन्यवाद
टंकनसाहाय्य
साधारण गमभनसारखी चालणारी टंकनपद्धत पूर्णपणे गमभनसारखी करणं शक्य नाही. तसं करण्याचा प्रयत्न केल्यास देवनागरी टंकनच बंद पडत आहे. हलन्त+विरामचिन्ह टंकल्यास विरामचिन्हच उमटावं आणि हलन्त गायब व्हावा असं लिहिण्याचा प्रयत्नही असफल झाला.
दीर्घ वेलांटीसाठी कॅपिटल आय - I वापरावा लागेल.
दीर्घ ऊकारासाठी कॅपिटल यू - U वापरावा लागेल.
एक्स वापरून क्ष टंकता येणार नाही, त्यासाठी k+S (के + कॅपिटल एस) वापरावे लागतील.
ज्ञ = j+Y
ङ = G
च = c
छ = ch
लवकरच ऐसी अक्षरेवरचं लेखन मराठी प्रमाणलेखनाच्या जवळपास दिसणारं असेल अशी आशा आहे.
या "गैरसोयीं"बद्दल तक्रार असल्यास मला व्यनि करावा. इंडिक स्क्रिप्ट मॉड्यूलचा दुवा आणि सध्या वापरात असलेल्या सेटिंग्जची फाईल इमेलवरून पाठवण्याची सोय करून देईन.
---
बोलनागरी टंकनात विरामचिन्हं उमटत नव्हती; ती अडचण निस्तरली आहे. 'आ' वगळता अन्य स्वर टंकण्यासाठी बोलनागरीत राईट-आल्ट असा पर्याय आहे. तो पर्याय इथे चालवता येत नाही; त्यामुळे हलन्त (q)+ स्वर (e,i,o,u,E, I,O,U) यातून बोलनागरीत स्वर टंकता येतील. स्वरटंकनासाठी हलन्त+स्वर हे प्रकरण सर्वाधिक अतार्किक वाटल्यामुळे ते वापरलं आहे.
बोलनागरी टंकनातही एक्स चालत नाहीये, म्हणून हलन्त क्यूवर हलवला आहे.
मागे क्यापिटल x = क्ष उमट
मागे क्यापिटल x = क्ष उमटत होतं आता ते पुन्हा बंद पडलंय
च आणि छ साठी हाताला असलेल्ली सवय जायला वेळ लागेल. त्यासाठी यावयात जाणीवपुर्वक मेहनत घ्यायछी फारशी तयारी नाही. लहज ल
Kसाक्षात आलं तर बदल करेन पण चछ्यच्या जागी छ उमटणं हा विद्रोह नसुन केलेले स्वैर नैसर्गिक टंकन आहे असे समजुउन योग्य त्या पद्धतीने वाछायछी सवय कृपया लावुउन घ्यावी! शेवटी नैसर्गिक वृत्तीला पोष्हक वातावरण महत्त्वाछे त्याला मानवीय नैतिकतेत नि नियमांत अडकवुउ नका ;)xअमस्व!
अशाने आपण सतिश राव
अशाने आपण सतिश रावल्यांचे प्रतिसाद वाचतोय असे वाटू शकेल.
ह्म्म हा धोका आहे खरा.
ह्म्म हा धोका आहे खरा. ;)
ऑन सिरीयस नोट, आबा नि बॅट्या सांगताहेत तर वाछायला खरोखर त्रास होत असावा (त्याबद्दल आय माय स्वारी!) त्यामुळे तोवर फारसे प्रतिसाद न लिहिणे सोपे वाटतेय.
आता उरलो फक्त खरडफळ्यापुरता :) तिथे सांभाळुउन घ्या म्हंजे झालं
ऋ - तू मराठवाड्याचा आहेस का
ऋ - तू मराठवाड्याचा आहेस का?
च आणि छ
ही जुनी संवय पटकन जात नाही. त्यांत च चा छ होतोच, शिवाय कुणीतरी शेरा मारल्यापासून, आपली थुंकी उडती आहे, असा भास होतो.
मी पूर्वीपासूनच कॅपिटल आय
मी पूर्वीपासूनच कॅपिटल आय आणि कॅपिटल यू वापरत असल्याने अडचण आली नाही. च आणि छ ची सवय करावी लागेल.
शक्यतो विविध सायटींवर सेम पद्धत असली तर चांगले. पूर्वी उपक्रमावर शेवटचा अ मुद्दाम टंकायला लागत असे. मिपावर लागत नसे. म्हणून शेवटचा अ टंकायची सवय लागली. मसावि निघाला पाहिजे. नाहीतर अडचण होईल.
टंकनपर्याय
सध्या उपलब्ध दोन-तीन टंकनपद्धती कटकटीच्या वाटत असल्या तर काही पर्याय -
संगणकावरून टंकताना बहुतांश
हापीसच्या ल्यापटापवर आमाला (अॅडमिनिस्ट्रेटरची) पावर नाय.
डायव्हर्सिटी
'मला मीटिंगच्या नोट्स माझ्या मातृभाषेत लिहायला आवडतात' असं सांगून आयटीकडून अप्रूव्हल वगैरे घ्यायची काही सोय नाही का? तुमचं हपीस काय डायव्हर्सिटी वैग्रे सेलेब्रेट करत नाही का?
आमचं गणपत वाण्याचं दुकान
आमचं गणपत वाण्याचं दुकान आहे हो...
विचारमग्न तमसेकाठी...
'सिटी'तले वाणीसुद्धा डायवर्सिटी सेलेब्रेटणारे असतीलसं मला वाटलं होतं. तमसेकाठी डायवर्सिटी पैली उरली नाही म्हणता?
विंडोज ७ + गमभन
विंडोज ७ + गमभन पूर्वीप्रमाणे चालण्याची शक्यता कितपत आहे?
भाषा
भाषा इंडीया विंडोजवरती पुष्कळ गमभनप्रमाणे चालतं. अगदी किरकोळ बदल आहेत. मी गेली पाच-सहा वर्षं वापरतोय.
अनुस्वाराला शिफ्ट+6 बटण वापरावं लागतं, जे जरा त्रासाचं होतं. काही ठिकाणी 'एन' टाईप केल्यास आपोआप त्याचा अनुस्वार होतो. पण त्याचीही सवय व्हायला वेळ लागू शकते.
उदाहरणार्थ: मांजर: m+a+a+n+j+a+r, वगैरे.
तसं नाही हो !!
तसं नाही हो !!
ऐसी अक्षरेची अंगभूत सोय म्हणून 'गमभन' पूर्वीप्रमाणे चालणार नाहीये का?
अदरवाइज मी बराहा वापरतो. आणि आत्ता चालतंय तसं गमभन फार त्रास न होता चालतंच आहे.
दुरुस्त्या?
कोणी एका सदस्यांनी पुढाकार घ्यावा आणि काय बदल करायला हवेत याबद्दल मला इमेल (व्यनि नव्हे) करावं. टंकण्यात दुरुस्त्या हव्या आहेत ते माझ्या आकलनानुसार हे आहे -
डबल e चा दीर्घ ईकार.
डबल o चा दीर्घ ऊकार.
Sh = ष (सध्या फक्त कॅपिटल एसचा ष होतोय आणि पुढे एच टंकला की ष्ह होतोय.)
छची भाषा सुरू झाल्ये.
हलन्त+विरामचिन्ह टंकल्यावर फक्त विरामचिन्ह आलं पाहिजे. ते काही चिन्हांच्या बाबतीत चालतंय, पण सगळ्या विरामचिन्हांसाठी हा कोड चालला पाहिजे.
आणखी काही? माझा इमेल पत्ता बऱ्याच लोकांकडे आहेच. मला विकेण्डला थोडा वेळ मिळेल. भारतातल्या शनिवार संध्याकाळपर्यंत मला इमेल करून ठेवा.
अवांतर - उदाहरणादाखल सदस्य निळे यांनी मांजर हा शब्द वापरल्यामुळे त्यांना आजच्या दिवसापुरतं बॅन होण्याचा आनंद दिला जात आहे.
-- मार्जारप्रेमी अदिती
अजूनेक
नुक्ते द्यायचे तर ते फक्त पायमोडक्या अक्षरांना देता येताहेत.
मूळ चौकशीचे कारण
>>ऐसी अक्षरेची अंगभूत सोय म्हणून 'गमभन' पूर्वीप्रमाणे चालणार नाहीये का?
या मूळ चौकशीचे कारण या अडचणींसाठी अनेक पर्याय सुचवले जात होते. हा कीबोर्ड वापरा, तो प्लग इन वापरा वगैरे.
त्यामुळे ड्रुपलचे नवे व्हर्जन आणि गमभनचे व्हर्जन कम्पॅटिबल नाही असे काही असावे असे वाटले. म्हणून चौकशी केली.
१. वेळ नसल्यामुळे दुरुस्तीस विलंब लागेल हे कारण असेल तर ते योग्य + वाजवी आहे.- हरकत नाही होईल दुरुस्त थोड्या काळाने
२. कंपॅटिबिलिटीचा प्रॉब्लेम आहे आणि हे असेच राहणार आहे - हे देखील योग्य + वाजवी कारण आहे - हरकत नाही. नव्या सवयी करून घेऊ. (नवी सवय इतरत्रही चालली तर उत्तम. नाहीतर दोन ठिकाणी वेगळ्या सवयी* वापरू).
*वर्ड इत्यादि अॅप्लिकेशनमध्ये मी बराहा वापरतो. त्याच्या टंकनपद्धती काही बाबतीत वेगळ्या आहेत. उदा ऱ्या टंकण्यासाठी तिथे r + ^ + yaa असं टंकावं लागतं. ज्ञ साठी j~j. ते मी लक्षात ठेवून करतो.
डबल e चा दीर्घ ईकार - मला हा प्रश्न आला नाही. पण ही पहिल्या क्रमांकाची अडचण असू शकेल.
डबल o चा दीर्घ ऊकार - मला हा प्रश्न आला नाही
Sh = ष (सध्या फक्त कॅपिटल एसचा ष होतोय आणि पुढे एच टंकला की ष्ह होतोय.)- ही दुसऱ्या क्रमांकाची अडचण आहे. ही अडचण क्ष मध्ये पण आहे.
छची भाषा सुरू झाल्ये.- माझ्यासाठी ही पहिल्या क्रमांकाची अडचण आहे.
हलन्त+विरामचिन्ह टंकल्यावर फक्त विरामचिन्ह आलं पाहिजे. ते काही चिन्हांच्या बाबतीत चालतंय, पण सगळ्या विरामचिन्हांसाठी हा कोड चालला पाहिजे.- हे कुठे लागते ते कळले नाही.
पापी पेग्रेड का सवाल...
दुरुस्त्या करणं माझ्या पेग्रेडच्या वर आहे म्हणून केवळ मी इतर (तात्पुरते) उपाय सुचवले होते. संस्थळाचं अधिकृत उत्तर म्हणून नव्हे. :-)
माझ्या आकलनानुसार : अपग्रेडनंतर 'गमभन' म्हणून जो पर्याय येतो आहे तो मुळात 'गमभन' नसून देवनागरीसाठीचं एक वेगळंच मॉड्यूल आहे. त्याचा कीमॅप वेगळा आहे, पण तो कस्टमाईज करून 'गमभन'सारखा केलेला आहे. त्यामुळे द्रुपालची नवी आवृत्ती आणि 'गमभन' कंपॅटिबल नाहीत हे खरंच असावं.
आवागमन?
नव्या रुपड्यामध्ये उजव्या बाजूस 'आवागमन (navigation)' असे लिहिले आहे. ह्यातील 'आवागमन' मुळे मी बुचकळ्यात पडलो आहे.
ह्याची कसलीच उपपत्ति लावता येत नाही आणि हा शब्द कोठून कसा आला तेहि कळत नाही. माझ्या मते तेथे 'अवगमन' हा शब्द अधिक सहजतेने बसेल. 'अव्+गम्' - ज्यावरून आपण 'अवगत' असा शब्द नित्य वापरतो - त्याचा मोनिअर विल्यम्समध्ये अर्थ असा दाखविला आहे:
अव/अवागमन
'अवागमन'चा खडा मलाही लागला पण तो अवगमन वापरलेला नाही म्हणून नव्हे तर अवगमन असे योग्य रूप वापरूनही नॅविगेशन हा अर्थ कळणार नाही यामुळे.
वाटाड्या किंवा सुकाणू असे शब्द वापरले तर संवादस्थळावर संचार करण्यासंबंधी आहे इतके तरी निश्चित कळेल असे वाटते.
आवागमन बहुधा एअरपोर्टाव
आवागमन बहुधा एअरपोर्टावर वाचला आहे शब्द.
अंतर्जाल, आंतरजाल
'आवा निघाली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा' ही तुकारामांची ओवी हा कदाचित या मागचा संदर्भ असू शकेल ;). जसं वय होऊनही आवाआजींचं मन प्रपंचात अडकलेलं आहे. पंढरपूरला जावंसं वाटतं, पण घराची माया काही सोडवत नाही; तैसेचि वाचनमात्रमोडमोक्षापेक्षा ऐसीवरल्या वावरमायेचे आहे.
(आवा निघाली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा,
परिसे गे सूनबाई, नको वेचू दूध-दही...)
अ-आ ची अदलाबदल मराठीत
अ-आ ची अदलाबदल मराठीत होत असते, त्यातलाच हा प्रकार म्हणावा लागेल. पारंपरिक ऐवजी पारंपारिक असं म्हणतातच की कैकजण.
भुईकमळ नाव घेता येत नाहीये.
भुईकमळ नाव घेता येत नाहीये. भुई घेता येतय्. :(
म्हणे प्रतिबंधित अक्षर आहे
सेम विथ - स्फटिकदीप :(
सेम विथ पालुपद - :(
नाव नाही बदलता येत म्हणजे मजाच गेली राव.
अरे अरे
तुम्हीच पुर्वी घेऊन बूक करून तर नाही ना ठेवलं पहा बरं जरा! ;-)
=))हाहाहाहांत्येबाकीखरंहां.
=))हाहाहा हां त्ये बाकी खरं हां.
विंडोजमधील स्टॅण्डर्ड फ
विंडोजमधील स्टॅण्डर्ड फंक्शनालिटी- टेक्स्ट सिलेक्ट करून टाइप केले की जुने टेक्स्ट रिप्लेस होणे- अपग्रेडनंतर चालत नाहीये. जुने टेक्स्ट तसेच रहात आहे.
अगदी अगदी ते इतकं
अगदी अगदी ते इतकं फ्रस्ट्रेटिंग आहे :(.
पेग्रेडचा प्रश्न
पेग्रेडच्या पलीकडचा प्रश्न. वेळ होईल तेव्हा कोणालातरी विचारून पाहते. देवनागरीतल्या कोणत्याही टंकनपद्धतीत लिनक्स+फाफॉमध्ये हे चालत नाहीये. रोमन लिपीसाठी ही अडचण येत नाहीये.
अगं नको करुस
अगं नको करुस मी सहज म्हणत होते. तू तुझ्या कामात खूप व्यस्त आहेस ते मला माहीते. खरच अदिती हे काम खरच बॅकबर्नरवर टाक्. डु व्हॉट यु आर सपोझड टू डू.
व्यनि पाठवताना अक्षरे
व्यनि पाठवताना अक्षरे पॉर्ण होत नाही (ऑटोफिल्)
त्यामुळे अनेकांना एकत्र व्यनि पाठवता येत नाहीये :( :(
?
फूडपॉर्न ऐकले होते, दारिद्र्यपॉर्नही ऐकले होते. हे अक्षरेपॉर्ण काय असते ब्वॉ?
हाहाहा
हाहाहा
बाय द वे पाठवयता येतय्. सॉरी अबाऊट द फॉल्स अलार्म्.
हेच का ते श्रेणी-मोड्यूल:
हेच का ते श्रेणी-मोड्यूल:
https://www.drupal.org/project/nodereview
Optional label rating,
worse, bad, good, better, best, great,रोचक, भोचक, टोचक etc.वाव!
हे नव्हतं. पण उद्या थोडा वेळ मिळेल, तेव्हा प्रयोग करून बघेन.
--
हे वापरून पाहिलं, पण ते मोडकं आहे अजूनही. ड्रूपाल ६वर slashcomments वापरात होतं -
म्हणजे???
अजूनही ऱ्याण्डम लोकांना ऱ्याण्डमली 'भडकाऊ' नाही देता येणार??????
:-(
समदुःखी
हो ना!
पण प्रयत्न सुरू ठेवणार.
अदिती
अदिती प्लीज गं सामुहीक व्यनि करता येत नाही.
मला बरेचदा काही जणांना व्यनि करायचा असतो पण असं ग्रुपमध्ये बोलताच येत नाहीये सध्या.
जितना पगार देंगा उतनाइच
जितना पगार देंगा उतनाइच काम होएंगा .....
इमेल वापरा.
सॉरी. टाईम आणि पेग्रेड इल्ला.
नवीन श्रेणीपद्धतीत साइट
नवीन श्रेणीपद्धतीत साइट पुन्हा लोड होत नाही,डेटा जात नाही,वेळ वाचतो --+ १०/१०
मराठी टाइप करणे खूप त्रासदायक झाले आहे.
मी गमभन वापरायचो. ते अपग्रेडनंतर गंडले आहे. मला लॉगइन करताना प्रचंड त्रास झाला. उदय. हा शब्द उदय्. असा टाइप होतो आणि लॉगइन करता येत नाही. (बॅकस्पेस वापरण्याचा प्रयत्न फसला). शेवटी मिपावरून कॉपी-पेस्ट करून लॉगइन करावे लागले.
म्हणजे अपवाद, अपमान, अपराध या
म्हणजे अपवाद, अपमान, अपराध या अर्थी अपग्रेड झालंय म्हणताय.
मदत
'उदय्.' हे टंकताना तुम्ही जुन्या सवयीनं 'y.' असं टंकत असणार. 'y .' (वाय नंतर स्पेस आणि मग पूर्णविराम) असं टंकलं तर ते "य." असं दिसावं.
नाही
वाय नंतर स्पेस आणि मग पूर्णविराम दिला तर "उदय ." असं दिसतं. पाहिजे तर प्रयत्न करून बघा. मी "वाय नंतर बॅकस्पेस आणि मग पूर्णविराम" असा प्रयत्न केला, पण लॉगइन करता येत नाही. आता मराठी टायपिंग खू..प..च क्लिष्ट आणि त्रासदायक झाले आहे.
उदय.
उदय.=> u+d+a+y+a.
उदय. डावीकडचा मराठी गमभन पर्याय.
निळे साहेब, सुचवणुकीबद्दल
निळे साहेब, सुचवणुकीबद्दल धन्यवाद.
लिनक्स + फायरफॉक्स + डावीकडे "Type method = गमभन" वापरून केलेले प्रयत्न:
१. u+d+a+y+[backspace]+[dot] => उदय.
२. u+d+a+y+a+[dot] => उदय.
३. u+d+a+y+[space]+[dot] => उदय .
प्रत्येकवेळी एकच उत्तर:
Sorry, unrecognized username or password. Have you forgotten your password?
मग मिसळपाववरुन: u+d+a+y+[dot] => उदय.
हे कॉपी-पेस्ट करून वापरले ते चालले.
म्हणून ऐसीवर u+d+a+y+[dot] => उदय्.
असे करून पाहिले, ते पण चालले नाही.
ता.क.: उदय. असा आयडी घेण्याचे कारण म्हणजे u+d+a+y => उदय हा आयडी कुणीतरी आधीच घेतला होता, नाहीतर मी तोच घेतला असता.
इंटरेस्टींग.
एक ट्रबल शूटिंग करून पहा.
ऐसीवरती लॉगइन झाल्यावर इथलं गमभन वापरून उदय. लिहा. ते कॉपी करा. लॉग आऊट करा आणि ते पेस्ट करून लॉग इन होता येतं का ते पहा. तुमच्य माहितीवरून, (ज्याअर्थी आपण इथे उदय. सहज लिहू शकत आहोत), इथं लिहलेल्या उदय. आणि तिकडे लिहलेल्या उदय. मध्ये काहीतरी फरक असला पाहीजे. हे जर खरं असेल तर वर लिहलेल्या प्रकारे तुम्हाला लॉग इन होता आलं नाही पाहीजे. जर होता आलं, तर टाईपिंग मिस्टेक शिवाय असे का होत असावे हे मला तरी कळत नाही आहे.
फरक
ऐसीवर व मिसळपाववरच्या गमभन पद्धतींत सारख्याच अक्षरांसाठी वेगळे युनिकोड दिसताहेत.
मिसळपाववर u+d+a+y = उदय, युनिकोड = \u0909\u0926\u092f (उ, द, य ह्या अक्षरांचे युनिकोड)
ऐसीवरती u+d+a+y+a = उदय, युनिकोड = \u0909\u0926\u200c\u092f\u200c
दुसऱ्या उदाहरणात उ, द आणि य ह्या अक्षरांच्या युनिकोडशिवाय \u200c हे युनिकोड कॅरॅक्टर दिसतं आहे. दोन्हीकडे उदय सारखेच दिसत असले, तरी ऐसीवरच्या उदाहरणात दोन अदृश्य 'ZERO WIDTH NON-JOINER' आहेत.
उदय. ह्यांच्या तक्रारीत तथ्य आहे. माझा ऐसीवरची गमभन टंकनप्रणाली वापरून m+i+h+r+a (मिहिर) असे नाव वापरून लॉगिन करण्याचा प्रयत्न सफल झाला नाही.
हम्म- अंधारात खडा
अच्छा. म्हणजे ह्या दोन गमभनत फॉरम्याटिंग फरक आहे तर. बहुतेक, जुना युझरनेम डेटाबेस लॉगिनच्यावेळी वापरला जात असल्याने व्हॅलिडेशन होत नसावं का काय?
मी उजवीकडचं सर्च फक्शन वापरून उदय. हे नाव माझ्या कंप्युटरवरील 'मराठीभाषा' वापरून शोधलं आणि येथील गमभन वापरून शोधलं. पहिल्यावेळेस मला सदस्य उदय. रिझल्ट दिसतो. दुसर्यावेळेस दिसत नाही. यावरून माझी वरील शंका खरी असावी असे वाटते.
मिहीर यांनी प्रॉब्लेम अचूक शोधून काढलेला आहे. कसा सोडवावा याबद्दल विचार करावा लागेल.
strange!
शब्दाच्या मध्ये हे ZWNJ कुठून येतात हे शोधावं लागेल. ऐसीवरच्या गमभनमध्ये ते कुठे घातल्याचं मला आठवत तरी नाहीये.