अपग्रेडबद्दल
१. नवीन प्रतिसादांचा 'नवीन' हा टॅग आता लाल रंगात दिसत आहे.
२. दोन्ही बाजूंच्या स्तंभांची रुंदी कमी करून मधली रियल इस्टेट वाढवली आहे.
३. गमभनसारख्या चालणाऱ्या टंकनातला अनुस्वार आता M (capital M) वापरून येत आहे. गमभनच्या नव्या रूपात हायफन टंकता येत आहे.
अजूनही शब्दाच्या शेवटी अकारी व्यंजन असेल आणि त्यापुढे विरामचिन्ह असेल तर पाय मोडका राहतो; तिथे अ किंवा a टंकावा लागत आहे. (ते दुुरुस्त कसं करायचं हे माहीत आहे; पण चाचणी करत असताना त्यातून चिकार बग्ज बाहेर आले, म्हणून ते सध्या बंद ठेवलेलं आहे.)
३. चर्चाविषय प्रकारचे धागे दिसत नव्हते, त्यात त्रुटी होती किंवा प्रतिसाद देता येत नव्हते. तो गोंधळ निस्तरलेला आहे.
४. नवीन - व्यनि सुरू झाले आहेत.
करण्याची कामं -
०. मराठी टंकनाच्या तीन पद्धती आहेत. यात गूगल इनपुट नाही. आहे त्या पद्धतींमध्ये त्रुटी असल्यास कळवा.
उजव्या हाताला 'टंकनसाहाय्य' हे मदतपान आहे. ते बदलून देवनागरी टंकनसाहाय्य करायचं आहे. (याला थोडा वेळ लागेल.) हे काम सुरू आहे. यात मदत करण्यासाठी तयार असल्यास कळवा.
१. व्यनि अजूनही नाहीत. ते लवकरच येतील.
२. अक्षररंग आणि इतर काही बटणं सध्या गायब आहेत.
३. खरडवही, खरडफळा अगदीच जुजबी दिसत आहेत, त्यांची सजावट करणं. (हे करण्यासाठी कोणी मदत करणार असेल तर स्वागत आहे. )
४. आधीच्या रूपात एका पानावर किती प्रतिसाद दिसायचे ते सदस्यांना ठरवता येत होतं. ते श्रेणीच्या मॉड्यूलमधलं फीचर होतं. ते काम माझ्या पेग्रेडच्या बाहेरचं आहे. यासाठी कोणी मदत करणार असेल किंवा मदत करणारे शोधून देणार असतील तर उत्तम.
५. डाव्या बाजूला वर वडापाव मेन्यू असला तर फोन, टॅबलेट आणि कंप्यूटर सगळ्यावरूनच वापरताना सोय होईल. त्यालाही थोडा वेळ लागेल.
यांबद्दल आणि शिवाय आणखी काही सूचना असतील तर लिहा.
---
ऐसी अक्षरे संस्थळ ड्रुपाल ६वर चालतं. ते तंत्रज्ञान थोडं जुनं झाल्यामुळे आता ड्रूपाल ७वर लवकरात लवकर जाणं ऐसीच्या आरोग्यासाठी आणि मोबाईल, टॅबलेटवरून ऐसी वापरणाऱ्यांसाठीही उपयुक्त असेल.
हे काम भावेप्र रविवारी रात्री ९:३० च्या सुमारास सुरू करण्याचा विचार आहे. त्यासाठी ऐसी थोडा वेळ बंद करावं लागेल; साधारण दोन तासांत प्राथमिक काम पूर्ण होईल आणि ऐसी पुन्हा सुरू होईल अशी आशा आहे. दोन तासांत सगळं काम कदाचित पूर्ण होणार नाही; पण संस्थळ सुरू करता येईल. त्याशिवाय काही गोष्टी तात्पुरत्या बंद किंवा बिघडलेल्या असतील; अशी शक्यता आहेच. उपलब्ध टंक (फाँट) चांगला नाही, फारच मोठा आहे, उपयुक्त दुवे योग्य ठिकाणी दिसत नाहीत, अशासारख्या तक्रारीही असू शकतील. त्याबद्दल प्रतिसाद देऊन ही कामं अदितीकडून करवून घ्या.
श्रेणीचं मॉड्यूल सध्या ड्रूपाल ६वरही चालत नाही; त्यासाठी ड्रूपाल ७चा कोडही उपलब्ध नाही. त्यासाठी कोणी मदत करणार असल्यास स्वागत आहेच. अपग्रेडनंतर व्यनिची व्यवस्था कदाचित काही काळ उपलब्ध होणार नाही; जुने व्यनि विदागारात सुरक्षित आहेत; गरज असल्यास किमान त्यांचा बॅकप घेण्याची सोय लवकरच करून देण्यात येईल.
अपग्रेडचं काम अगदीच फसल्यास संस्थळ पूर्ववत केलं जाईल.
तसदीबद्दल क्षमस्व.
अपग्रेडबद्दल.
अपग्रेडचं मुख्य काम झालेलं आहे. ज्या काही तक्रारी, उणिवा, त्रुटी दिसत आहेत, त्यांची नोंद इथेच करा.
देवनागरी टंकन सुरू आहे, पण त्यात अजून सुधारणा करण्याची गरज आहे, याची कल्पना आहे. तमिळ टंकनासाठी मदत असा दुवा दिसत आहे, तो बदलून देवनागरी टंकनासाठी मदत, असा करायचा आहे. मॅक+सफारी यात देवनागरी टंकनासाठी अडचण येत होती, असं कानावर आलं आहे. ते दुरुस्त करायला वेळ लागेल.
चर्चाविषय प्रकारचे धागे लॉगिन करून दिसत नाहीयेत, पण लॉगाऊट करून दिसत आहेत.
फोन, टॅबलेटवरून ऐसी वापरताना अडचणी येत असतील तर त्या मुद्दाम लिहा.
Please do not give a
Please do not give a subcomment-
(1) Unable to view "New comment" on "Naveen Pratikriya" tab
(2) Scrapbook shows a disabled option selected (As expected) yet issue - it is not disabled.
(4) On common scrapbook (KHAFA), there is no separator between 2 scraps. Unable to make out where "PRATIGAMI" ends & "PUROGAMI" starts =))
)5) VYANI facility unavailable
बोर्डावर धाग्यासमोर १०
बोर्डावर धाग्यासमोर १० प्रतिसाद २ नवीन असे दिसते तिथे २ वर क्लिक केल्यावर आपण नवीन आलेल्या प्रतिसादावर जात नाही.
शब्दाच्या शेवटी अक्षर पूर्ण करण्यासाठी 'ए' टMकावा लागतो. उपक्रमच्या जुन्या व्हर्जनमध्ये हा प्रॉब्लेम होता. शब्द टMकताना तसे दिसते. स्पेस मारली की ठीक होते.
क्यापिटल एम ने अनुस्वार येत नाही.
'x' टाइप केल्यास क्ष येत नाही.
काय सांगु बापटMण्णा,
काय सांगु बापटMण्णा, दुभगलेले मन म्हणजे काही सोप्पी गोष्ट नाही. मनाच्या एका भागाचे दुसऱ्या भागाला काही कळत नाही. तुम्ही वाचले असेल ना की एक मन खुन करते पण दुसऱ्या मनाला कळत नाही.
फार कन्फुजन आहे. डोक्यात फार केऑस असतो. ऐसी वर वेगवेगळे आयडी असल्यामुळे थोडे सोप्पे जाते मॅनेज करायला.
मनोबाच्या सर्व प्रश्नाची उत्तरे माझ्याकडे असतात्, पण मनोबाला ती उत्तरे मनातल्या मनात मला विचारता येत नाहीत्, म्हणुन तो ऐसीवर विचारतो, मी त्याला व्यनीत उत्तर देते.
एक झाड दोन पक्षी अशी अवस्था.
Real Estate
नवीन रुपड्यामध्ये डाव्या आणि उजव्या बाजूस सुरुवातीच्या काही ओळी झाल्या की केवळ शुभ्र स्पेसच आहे. मधला मुख्य मजकूर अरुंद उभ्या पट्टीत कसाबसा बसला आहे. त्यामुळे धागे पाहण्यासाठी बरेच खालपर्यंत जावे लागते. जुने रुपडे ह्या बाबतीत अधिक चांगले user-friendly होते.
डाव्या बाजूचे दिनवैशिष्टय आदि उचलून पुन: पहिल्यासारखे उजव्या बाजूस टाकावे असे सुचवेन. ह्यामुळे पडद्यावरील मर्यादित जागेचा उपयोग आणखी सुधारेल.
वडापावसदृश चिन्ह येण्यासाठी
वडापावसदृश चिन्ह येण्यासाठी वेळ लागेल. तोवर दोन्ही बाजूंना स्तंभ नसण्याबद्दल आग्रह आहे असं दिसतंय, तसं करणं सोपं आहे. पण या रचनेवर प्रेम करू नकाच कारण अजून प्रयोग सुरू आहेत. काही गोष्टी मोडलेल्या आहेत. आहे ते आणखी चांगलं, पण आहे तसंच डिसेंट ठेवून काही करता येईल का, याचा शोध सुरू (करायचा) आहे.
---
१. सुरुवातीला गमभनसदृश टंकन नॉर्मल करायचा प्रयत्न करते.
२. चर्चाविषय प्रकारात सुरू केलेले सगळेच धागे लॉगिन करून दिसत नाहीयेत. हा प्रश्न महत्त्वाचा आहेच ते काम यादीत दुसरं.
गेल्या वेळेप्रमाणेच, या वेळेसही श्रवणनं मदत केल्यामुळे हा प्रश्न सुटला आहे. देवनागरी टंकनाचं काम उद्या सुरू करेन. त्यात फार अडचणी येणार नाहीत अशी आशा आहे.
(माझ्या प्रतिसादाला उपप्रतिसाद येऊनही मला हा प्रतिसाद संपादित करता आला. सगळ्यांनाच हे करता येत असावं.)
कष्ट!
१. मोडके पाय फक्त स्पेस दिले तरच रिपेअर होतात्, , . ? ! ह्या चिन्हांनी नाही.
२. ई आणि ऊ साठी ee आणि oo ची इतकी सवय झालीये की कंटाळा येतो दरवेळी चुका सुधारायला. तेच ch - च, chh-छ बाबत.
३. ज्ञ गमभन मध्ये कसा लिहायचा?
थोडक्यात, जुन्याच गमभनची प्रचंड सवय झालीये. ती सुटेपर्यंत हाल आहेत हाल्.
अडचण.
व्यनिच्या मॉड्यूलला एक ठरावीक डेटाबेस-SQL-टेबल हवं आहे. ते जुन्या डेटाबेसमध्ये, मॉड्यूलमध्ये नव्हतं. ते रिकामं टेबल बनवून मॉड्यूल सुरू करण्याचा पहिला प्रयत्न काल फसला. एका संगणक-अभियंता मित्राला शंका विचारली आहे; त्याला आज काम करायला वेळ मिळाला तर दोन दिवसांत व्यनि सुरू होतील. तोवर जीमेल, व्हॉट्सअॅप, फेसबुक, याहू, यांच्या सर्व्हरांचा एकांत कमी करून पाहा.
---
गमभनसारखी टंकनपद्धत दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे. माझ्या काही व्यक्तिगत कारणांमुळे घाईघाईत अपग्रेड करायला लागत आहे. तमिळ टायपिंगचा उजव्या बाजूचा दुवा देवनागरी करण्याचं कामही सुरू आहे. फावल्या वेळात कोणी त्यात मदत करून देत असेल तर कृपया कळवा.
--
शुचे, मी सध्या बऱ्याच कामात बुडाल्यामुळे जेवायला पुरेसा वेळ मिळत नाहीये; पण व्यायाम नेहमीसारखाच सुरू आहे. त्यामुळे (खरं तर, हवा फारच सुंदर झाल्यामुळे) माझं भसाभस वजन कमी होत आहे.
माझं भसाभस वजन कमी होत आहे.
माझं भसाभस वजन कमी होत आहे.
Wow. I am growing fatter day by day!!! :(
Today it's a FRUSTRATING day since morning. Woke up on wrong side of bed.
Shoot!!!! Shoot shoot!!!
I want to shoot someone (& I know precisely who ) =))
____
Take your time Adit. I was just venting out my frustration. Take your time. :)
_______________
प्रतिक्रियेची जागा
१) प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी जी जागा उपलब्ध आहे ती फारच लहान असल्यामुळे ३-४ ओळींहून मोठा प्रतिसाद झाला तर खालीवर स्क्रोलिंग फार करावे लागते.
२) ज्ञानसारख्या शब्दातील 'ज्ञ' कसा उमटवायचा? ज्~ज आणि द्न्य हे दोन्ही ज्ञात प्रकार वापरून पाहिले पण जमले नाही. (येथील ज्ञ copy-pasted आहे.)
ज्ञ
युनिकोडमध्ये ज्ञ = ज + ् + ञ
स्पेलिंग = j+Y+a
काही जुने शॉर्टकट किंवा विशेषतः जोडाक्षरांचे रस्ते बदलावे लागत आहेत. उदाहरणार्थ ज्ञ. x = क्ष हे करण्याचा प्रयत्न करत्ये, पण ते चालत नाहीये. च आणि छ साठी जास्तीचा एच टंकावा लागू नये म्हणून च = c आणि छ = ch असं केलं आहे. पण त्याचा उपद्रव अधिक असेल ते बदलून पाहते.
गमभनसदृश टंकनात आणखी काय चालत नाहीये याची नोंद केल्यास ते सुधारणं सोपं होईल. (मी गेली चारेक वर्षं गमभन वापरलेलं नाही, त्यामुळे मला ते लक्षात येत नाही.)
--
१) प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी जी जागा उपलब्ध आहे ती फारच लहान असल्यामुळे ३-४ ओळींहून मोठा प्रतिसाद झाला तर खालीवर स्क्रोलिंग फार करावे लागते.
यात अडचण अशी आहे की डाव्या-उजव्या बाजूचे रकाने फोनमधून ऐसी उघडताना स्क्रीनच्या सगळ्यात खाली जातात. एकच रकाना असेल तर फोनमध्ये बरीच मोकळी जागा खाली राहते. तसं होऊ नये म्हणून दोन्ही बाजूंचे रकाने ठेवलेले आहेत.
याला पर्याय म्हणून डाव्या-उजव्या बाजूंना पिस्ता रंगाची मोकळी जागा आहे, ती कमी करून पाहते.
टेस्टिंग:
टेस्टिंग:
ज्ञ (पास :) )
x (नापास)
च आणि छ साठी जास्तीचा एच टंकावा लागू नये म्हणून च = c आणि छ = ch असं केलं आहे. पण त्याचा उपद्रव अधिक असेल ते बदलून पाहते.
मला त्याछा उपद्रव अधिक आहे. बहुमत घेऊन बदलावे (तोवर मी त्याछा लिहिलं तर ते त्याचा असे वाछावे)
बाकी दृश्य ऐसी कसेही दिसो (कसे दिसावे) ते लो प्रायॉरीटीवर घ्यावे - ते सवयीने होईल ठिक.
टंकनाछ्या तक्रारी दूर झाल्या की मग पुन्हा घरछ्यासारखं वाटेल. तिथे नवी सवय लाऊन घेणं कष्ह्टप्रद आहे.
देवनागरी टंकन
ऐसीवर आता देवनागरी टंकनासाठी जे मॉड्यूल आहे ते गमभन नाही, 'इंडिक स्क्रिप्ट' नावाचं मॉड्यूल आहे. दोन्ही मॉड्यूलांचं आतलं काम निराळ्या पद्धतींनी चालतं. इंडिक स्क्रिप्टमध्ये थोडे बदल करून ते गमभनसारखं चालेल, असे करून त्याला 'गमभन-सदृश' बनवलं जात आहे.
हे करताना टंकनकष्ट कमी करण्याचा प्रयत्न म्हणून c = च (जादाचा एच टंकावा लागू नये), अशी रचना केली होती; जनतेच्या मागणीनुसार ते बदलण्याचं काम लवकरच होईल. 'ज्ञ'साठी d+n+y हाच्च शॉर्टकट हवा असेल तर तो करण्याचा प्रयत्न करता येईल; मिसळपाववर जुना शॉर्टकट चालतो, कारण तिथे गमभनचं जुनं मॉड्यूल अपग्रेड करून घेतलं गेलं. पण ते अपग्रेडेड मॉड्यूल पब्लिकली, सगळ्यांसाठी उपलब्ध नाही. शिवाय गमभनमध्ये बोलनागरी आणि इनस्क्रिप्ट टंकन करणाऱ्या (अल्पसंख्य) लोकांचीही सोय होत नाही. या दोन्ही कारणांमुळे गमभनच्या अपग्रेडचा विचारही केला नाही. (मला ते मॉड्यूल अपग्रेड करता येत नाही, हा मुद्दा आहेच.)
गमभन वापरणाऱ्या आळशी आणि शूरवीर सदस्यांसाठी बोलनागरी असा दुसरा पर्याय आहे. त्यासाठी टंकनसाहाय्य तयार करण्याची गरज आहे; पण गमभनमध्ये टंकताना सगळीकडे 'अ' टंकावा लागतो, तो बोलनागरीत करावा लागत नाही. वेळ मिळाला की बोलनागरी वापरून कमी किया वापराव्या लागतात का गमभन वापरून आणि एफिशियन्सी किती हे मोजणारा प्रोग्रॅमही लिहिण्याचा माझा विचार आहे. पण बोलनागरी वापरून टंकनकष्ट कमी होतात, असा प्राथमिक अंदाज आहे.
गब्बर, त्या वारुणीच्या नावाचा उच्चार 'पिनो न्वार' असा आहे. पण सध्या वारुणी पाठवू नकोस. गेले बरेच महिने उजव्या हातावर अॅलर्जी आलेली आहे; ती आता कुठे बरी व्हायला सुरुवात होत्ये. अॅलर्जीमुळे जिभेचे आंबटशौक पुरवता येत नाहीयेत.
आय आय कॅप्टन. वी विल कीप द
आय आय कॅप्टन. वी विल कीप द फोर्सेस अॅट बे.