सध्या काय वाचताय? - भाग ३०
बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते; एखादा दीर्घ लेख आवडतो; वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते; पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्राचा इतिहास (१७०७ ते
महाराष्ट्राचा इतिहास (१७०७ ते १८१८) हे डॉ. वि. गो. खोबरेकर यांनी लिहिलेले आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबै यांनी प्रकाशीत केलेले पुस्तक वाचत आहे. पुस्तकाची पिडिएफ आणि इपब मोफत उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचताना पानोपानी धक्के बसत जातात. शिवाजीनंतरचे मराठी राज्यकर्ते काय लायकीचे होते हे वाचताना मन विषण्ण होते. आजकाल शाहु महान, ताराबाईही महान, आंग्रे महान, पेशवे लै लै महान, संताजी- धनाजी तर काय महानच, शिंदे, होळकर महान वगैरेचा काळ आलाय. यांचे पाय कसे मातीचे होते आणि शिवाजी सोडला तर ध्येय वगैरेशी बाकीच्या राज्यकर्त्यांची बांधीलकी काय दर्जाची होती याचे दर्शन घडते. ॲनार्की वाचताना हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
महाराष्ट्र राज्य सा सं मंडळ
त्या वेबसाईट वरील भारतीय मुसलमान हे वसंत नगरकर आणि माटे, जी टी कुलकर्णी यांनी लिहिलेले पुस्तक पण छान आहे.
डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता
दुवा?
कृपया पुस्तकाच्या e प्रतीचा दुवा पुरवावा.
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
इथे
https://sahitya.marathi.gov.in/%E0%A4%87-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0...
इथे सापडले, क्रमांक ३६८
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना
धन्यवाद!
Thanks!
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
वाह वाह!!! _/\_
वाह वाह!!! _/\_
इ एच कारच "WHAT IS HISTROTY".
ई एच कार च इतिहास म्हणजे काय हे पुस्तक वाचले आहे का? इथे त्यावर चर्चा झाली आहे का? असेल तर वाचायला नसेल तर करायला आवडेल.
(पुस्तकांविषयीच्या चर्चा ह्या धाग्यात होतात म्हणून प्रश्न इथे हलवला आहे. - संपादक)
डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता
‘अव-काळाचे आर्त’ सदरात आज ‘V
‘अव-काळाचे आर्त’ सदरात आज ‘V for Vendetta’विषयी आदूबाळ.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
The Dispossessed: an ambiguous utopia
स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय, खऱ्या अर्थाने स्वतंत्र असणे म्हणजे काय हा माणसासमोरचा बराच जुनाच प्रश्न आहे. गेल्या अनेक शतकांमध्ये ह्या प्रश्नाच्या मुळाशी जाणाऱ्या विचारसरणी उदयास आल्या. ॲनार्किजम किंवा स्वातंत्र्यवादी समाजवाद हा अशा प्रकारच्या एकोणिसाव्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बऱ्यापैकी प्रसिद्ध असलेल्या विचारसरणींचा गट आहे. अराजक म्हटलं की बहुतेक लोकांच्या डोळ्यासमोर गुंडगिरी, तोडफोड, दहशत वगैरे प्रकार येतात, पण सर्व प्रकारच्या केंद्रीय सत्तास्थानांना विरोध करणाऱ्या ह्या विचारसरणीला मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यवाद (लिबर्टेरियनजम) आणि समाजवाद (सोशलिजम) ह्या एकमेकांपासून अतिदूर असणाऱ्या विचारधारा आहेत आणि त्यामुळे स्वातंत्र्यवादी समाजवाद हीच मुळी विरोधाभासी संज्ञा आहे असं अनेकांना वाटू शकतं. थोडं खोलात जाऊन पाहिलं तर (किंवा लिबर्टेरियन शब्दाचा इतिहास पाहिला) तर त्यात फार तथ्य नाही असं दिसतं. हाव आणि परस्परस्पर्धा ह्याऐवजी परस्परमदत ह्या तत्त्वावर आधारित समाजाची मांडणी होऊ शकते का? लोकांनी काम करण्यामागे केवळ बाह्य कारणेच (वरिष्ठांचा दबाव, मालकाचे/बॉसचे आदेश, अर्थार्जनाची गरज) असतात की स्वयंप्रेरणा पुरेशी असू शकते? व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजाप्रती असलेलं उत्तरदायित्व ह्यांचा मेळ कशा प्रकारे घालता येतो? सामूहिकता (collectivism) आणि एकसारखेपणा (conformity) ह्यात फरक असू शकतो का?
ह्या आणि अशा अनेक प्रश्नांचा वेध घेणारी 'द डिस्पझेस्ड: ॲन अँबिग्युअस युटोपिया' ही उर्सुला के. ल ग्विन ह्या अमेरिकन लेखिकेची कादंबरी अलिकडेच ऑडिओबुक स्वरूपात ऐकली. आकाशगंगेतल्या एका ताऱ्याभोवतीच्या ग्रह-उपग्रहाच्या जोडगोळीवर ही गोष्ट घडते. ग्रह हा नैसर्गिकदृष्ट्या अगदी संपन्न, तर त्या तुलनेत उपग्रह हा नैसर्गिक साधनसंपत्ती बरीच कमी असलेला. कथा घडते त्याच्या सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वी ग्रहावरचे काही गरीब कामगार उठाव करतात आणि ग्रहापासून दूर उपग्रहावर आपली ॲनार्किस्ट वसाहत स्थापतात. पुढच्या सात-आठ पिढ्या ग्रहावरील लोक (जी व्यवस्था बऱ्यापैकी आपल्यासारखी आहे) आणि उपग्रहावरील लोक एकमेकांशी अगदी कमी संपर्क साधत स्वतंत्रपणे विकसित होतात. ह्या उपग्रहावरच्या ॲनार्किस्ट समाजातला एक भौतिकशास्त्रज्ञ पुढच्या संशोधनासाठी ग्रहावर जातो हा कथेचा मुख्य भाग. हा ॲनार्किस्ट समाज रंगवताना लेखिकेने खूप मुळापासून विचार केला आहे. प्रेम, दु:ख, अहंभाव, परस्परमदत, स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष संबंध, अशा व्यवस्थेत येऊ शकणारं साचलेपण अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे. अशा तिऱ्हाइताच्या (ग्रहावर गेलेल्या भौतिकशास्त्रज्ञाच्या) दृष्टिकोनातून बघितल्यावर आपण ज्या अनेक गोष्टी खूप विचार न करता गृहित धरलेल्या असतात त्यांतले अंतर्विरोधही समोर येऊ शकतात. हा रंगवलेला युटोपिया गुडी-गुडी स्वप्नरंजनासारखा नसून शीर्षकात म्हटल्याप्रमाणे संदिग्ध आहे ही गोष्ट विशेष आवडली. पुस्तक अवश्य वाचावं अशी शिफारस करेन. पाच तारे.
धन्यवाद
वाचीन/ऐकीन म्हणतो. "द लेफ्ट हँड ऑफ डार्कनेस" ही उर्सुला के. ल ग्विन ह्यांचीच कादंबरी फार वर्षांपूर्वी वाचली होती.
==================
जगातला सगळ्यात भारी टाईम पास!!
‘पॅराडाईझ’
‘पॅराडाईझ’ ही अब्दुल रझ्झाक गुर्ना यांची कादंबरी.
https://hindikahani.hindi
https://hindikahani.hindi-kavita.com/HK-Indira-Goswami.php
इन्दिरा गोस्वामी यांची ही 'नीलकंठी ब्रज' कादंबरी वाचली. वृंदावन धाम मध्ये रहाणार्या विधवांचे जीवन किती भयंकर आहे. बाप रे! अंगावरती काटा येतो वाचून. या विधवांची इच्छा आहे की त्यांच्या मरणोपरान्त त्यांचे शास्त्रयुक्त दहन व्हावे त्याकरता त्या पै पै जोडतात. त्यांचे शोषण होते, फसवल्या जातात.
नंतर यासंदर्भात सर्चेस देता, पुढील नियत/अनियतकालिक सापडले.
https://emanjari.com/wp-content/uploads/2019/04/Manjari-12tedi.pdf
नीलकंठी ब्रज वाचताना इतके विदारक वर्णन, अनुभव करु शकले की शेवटी असे वाटले काही जन्म जगून आले. आपण किती सुरक्षित, शेल्टरड जीवन जगत असतो.
शेवटी धर्म, देव याबद्दलही मनात प्रश्न उठू लागतात.
Whole Numbers and Half Truths
आकडे म्हणजे सर्वसत्य नाही. संबंधित विषयाची माहिती घेतल्याशिवाय आकड्यांचा अर्थ लावता येत माही. आकडे गोळा करण्याची चौकट तयार करणाऱ्या संख्याशास्त्री, गोळा करणारी असंख्य माणसं, आणि त्यांतून गोळाबेरीज चित्र मांडणाऱ्या पत्रकार रूक्मिणी एस. अशा सगळ्यांचं जेव्हा आपल्या कामावर प्रेम असतं आणि त्या कष्टांमुळे सामान्य लोकांना फायदा व्हावा असं वाटत असतं, त्यातून हे पुस्तक येतं.
काल लोकसत्तेत आलेला हा परिचयही चांगला आहे, आणि पुस्तकही. जरूर वाचा.
खुस्पट काढलंच पाहिजे. काही आलेखांची मांडणी सुधारायला जागा आहे. (कमीतकमी शाई आणि रंगांमध्ये काढलेले आलेख चांगले समजले जातात.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.