सध्या काय वाचताय? - भाग ३०
बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते; एखादा दीर्घ लेख आवडतो; वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते; पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्राचा इतिहास (१७०७ ते
महाराष्ट्राचा इतिहास (१७०७ ते १८१८) हे डॉ. वि. गो. खोबरेकर यांनी लिहिलेले आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबै यांनी प्रकाशीत केलेले पुस्तक वाचत आहे. पुस्तकाची पिडिएफ आणि इपब मोफत उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचताना पानोपानी धक्के बसत जातात. शिवाजीनंतरचे मराठी राज्यकर्ते काय लायकीचे होते हे वाचताना मन विषण्ण होते. आजकाल शाहु महान, ताराबाईही महान, आंग्रे महान, पेशवे लै लै महान, संताजी- धनाजी तर काय महानच, शिंदे, होळकर महान वगैरेचा काळ आलाय. यांचे पाय कसे मातीचे होते आणि शिवाजी सोडला तर ध्येय वगैरेशी बाकीच्या राज्यकर्त्यांची बांधीलकी काय दर्जाची होती याचे दर्शन घडते. ॲनार्की वाचताना हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
महाराष्ट्र राज्य सा सं मंडळ
त्या वेबसाईट वरील भारतीय मुसलमान हे वसंत नगरकर आणि माटे, जी टी कुलकर्णी यांनी लिहिलेले पुस्तक पण छान आहे.
डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता
दुवा?
कृपया पुस्तकाच्या e प्रतीचा दुवा पुरवावा.
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
इथे
https://sahitya.marathi.gov.in/%E0%A4%87-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0...
इथे सापडले, क्रमांक ३६८
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना
धन्यवाद!
Thanks!
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
वाह वाह!!! _/\_
वाह वाह!!! _/\_
इ एच कारच "WHAT IS HISTROTY".
ई एच कार च इतिहास म्हणजे काय हे पुस्तक वाचले आहे का? इथे त्यावर चर्चा झाली आहे का? असेल तर वाचायला नसेल तर करायला आवडेल.
(पुस्तकांविषयीच्या चर्चा ह्या धाग्यात होतात म्हणून प्रश्न इथे हलवला आहे. - संपादक)
डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता
‘अव-काळाचे आर्त’ सदरात आज ‘V
‘अव-काळाचे आर्त’ सदरात आज ‘V for Vendetta’विषयी आदूबाळ.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
The Dispossessed: an ambiguous utopia
स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय, खऱ्या अर्थाने स्वतंत्र असणे म्हणजे काय हा माणसासमोरचा बराच जुनाच प्रश्न आहे. गेल्या अनेक शतकांमध्ये ह्या प्रश्नाच्या मुळाशी जाणाऱ्या विचारसरणी उदयास आल्या. ॲनार्किजम किंवा स्वातंत्र्यवादी समाजवाद हा अशा प्रकारच्या एकोणिसाव्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बऱ्यापैकी प्रसिद्ध असलेल्या विचारसरणींचा गट आहे. अराजक म्हटलं की बहुतेक लोकांच्या डोळ्यासमोर गुंडगिरी, तोडफोड, दहशत वगैरे प्रकार येतात, पण सर्व प्रकारच्या केंद्रीय सत्तास्थानांना विरोध करणाऱ्या ह्या विचारसरणीला मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यवाद (लिबर्टेरियनजम) आणि समाजवाद (सोशलिजम) ह्या एकमेकांपासून अतिदूर असणाऱ्या विचारधारा आहेत आणि त्यामुळे स्वातंत्र्यवादी समाजवाद हीच मुळी विरोधाभासी संज्ञा आहे असं अनेकांना वाटू शकतं. थोडं खोलात जाऊन पाहिलं तर (किंवा लिबर्टेरियन शब्दाचा इतिहास पाहिला) तर त्यात फार तथ्य नाही असं दिसतं. हाव आणि परस्परस्पर्धा ह्याऐवजी परस्परमदत ह्या तत्त्वावर आधारित समाजाची मांडणी होऊ शकते का? लोकांनी काम करण्यामागे केवळ बाह्य कारणेच (वरिष्ठांचा दबाव, मालकाचे/बॉसचे आदेश, अर्थार्जनाची गरज) असतात की स्वयंप्रेरणा पुरेशी असू शकते? व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजाप्रती असलेलं उत्तरदायित्व ह्यांचा मेळ कशा प्रकारे घालता येतो? सामूहिकता (collectivism) आणि एकसारखेपणा (conformity) ह्यात फरक असू शकतो का?
ह्या आणि अशा अनेक प्रश्नांचा वेध घेणारी 'द डिस्पझेस्ड: ॲन अँबिग्युअस युटोपिया' ही उर्सुला के. ल ग्विन ह्या अमेरिकन लेखिकेची कादंबरी अलिकडेच ऑडिओबुक स्वरूपात ऐकली. आकाशगंगेतल्या एका ताऱ्याभोवतीच्या ग्रह-उपग्रहाच्या जोडगोळीवर ही गोष्ट घडते. ग्रह हा नैसर्गिकदृष्ट्या अगदी संपन्न, तर त्या तुलनेत उपग्रह हा नैसर्गिक साधनसंपत्ती बरीच कमी असलेला. कथा घडते त्याच्या सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वी ग्रहावरचे काही गरीब कामगार उठाव करतात आणि ग्रहापासून दूर उपग्रहावर आपली ॲनार्किस्ट वसाहत स्थापतात. पुढच्या सात-आठ पिढ्या ग्रहावरील लोक (जी व्यवस्था बऱ्यापैकी आपल्यासारखी आहे) आणि उपग्रहावरील लोक एकमेकांशी अगदी कमी संपर्क साधत स्वतंत्रपणे विकसित होतात. ह्या उपग्रहावरच्या ॲनार्किस्ट समाजातला एक भौतिकशास्त्रज्ञ पुढच्या संशोधनासाठी ग्रहावर जातो हा कथेचा मुख्य भाग. हा ॲनार्किस्ट समाज रंगवताना लेखिकेने खूप मुळापासून विचार केला आहे. प्रेम, दु:ख, अहंभाव, परस्परमदत, स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष संबंध, अशा व्यवस्थेत येऊ शकणारं साचलेपण अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे. अशा तिऱ्हाइताच्या (ग्रहावर गेलेल्या भौतिकशास्त्रज्ञाच्या) दृष्टिकोनातून बघितल्यावर आपण ज्या अनेक गोष्टी खूप विचार न करता गृहित धरलेल्या असतात त्यांतले अंतर्विरोधही समोर येऊ शकतात. हा रंगवलेला युटोपिया गुडी-गुडी स्वप्नरंजनासारखा नसून शीर्षकात म्हटल्याप्रमाणे संदिग्ध आहे ही गोष्ट विशेष आवडली. पुस्तक अवश्य वाचावं अशी शिफारस करेन. पाच तारे.
धन्यवाद
वाचीन/ऐकीन म्हणतो. "द लेफ्ट हँड ऑफ डार्कनेस" ही उर्सुला के. ल ग्विन ह्यांचीच कादंबरी फार वर्षांपूर्वी वाचली होती.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
‘पॅराडाईझ’
‘पॅराडाईझ’ ही अब्दुल रझ्झाक गुर्ना यांची कादंबरी.
https://hindikahani.hindi
https://hindikahani.hindi-kavita.com/HK-Indira-Goswami.php
इन्दिरा गोस्वामी यांची ही 'नीलकंठी ब्रज' कादंबरी वाचली. वृंदावन धाम मध्ये रहाणार्या विधवांचे जीवन किती भयंकर आहे. बाप रे! अंगावरती काटा येतो वाचून. या विधवांची इच्छा आहे की त्यांच्या मरणोपरान्त त्यांचे शास्त्रयुक्त दहन व्हावे त्याकरता त्या पै पै जोडतात. त्यांचे शोषण होते, फसवल्या जातात.
नंतर यासंदर्भात सर्चेस देता, पुढील नियत/अनियतकालिक सापडले.
https://emanjari.com/wp-content/uploads/2019/04/Manjari-12tedi.pdf
नीलकंठी ब्रज वाचताना इतके विदारक वर्णन, अनुभव करु शकले की शेवटी असे वाटले काही जन्म जगून आले. आपण किती सुरक्षित, शेल्टरड जीवन जगत असतो.
शेवटी धर्म, देव याबद्दलही मनात प्रश्न उठू लागतात.
Whole Numbers and Half Truths
आकडे म्हणजे सर्वसत्य नाही. संबंधित विषयाची माहिती घेतल्याशिवाय आकड्यांचा अर्थ लावता येत माही. आकडे गोळा करण्याची चौकट तयार करणाऱ्या संख्याशास्त्री, गोळा करणारी असंख्य माणसं, आणि त्यांतून गोळाबेरीज चित्र मांडणाऱ्या पत्रकार रूक्मिणी एस. अशा सगळ्यांचं जेव्हा आपल्या कामावर प्रेम असतं आणि त्या कष्टांमुळे सामान्य लोकांना फायदा व्हावा असं वाटत असतं, त्यातून हे पुस्तक येतं.
काल लोकसत्तेत आलेला हा परिचयही चांगला आहे, आणि पुस्तकही. जरूर वाचा.
खुस्पट काढलंच पाहिजे. काही आलेखांची मांडणी सुधारायला जागा आहे. (कमीतकमी शाई आणि रंगांमध्ये काढलेले आलेख चांगले समजले जातात.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
Creative Pasts: Historical Memory And Identity In Western India
https://www.amazon.in/Creative-Pasts-Historical-Identity-1700-1960/dp/81... प्राची देशपांडे यांचं 'Creative Pasts: Historical Memory And Identity In Western India 1700-1960' वाचतोय.
डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता
सदर पुस्तक नुकतेच वाचून
सदर पुस्तक नुकतेच वाचून संपवले. बखरींपासून ते आजतागायतचा महाराष्ट्रातील ऐतिहासिक नोंदी ठेवण्याच्या इतिहासाचा उत्तम आढावा घेतलेला आहे. तब्बल २६ पानांच्या तळटीपा आणि २२ पानांची Bibliography वरून लेखिकेने घेतलेल्या परीश्रमाचीही कल्पना येते.
हे पुस्तक फक्त नोंदींपुरतं
हे पुस्तक फक्त नोंदींपुरतं मर्यादित नाही.
डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता
रान - शिवार - गाव
कॉनरॉड रिक्टर यांच्या त्रयीचे जी ए कुलकर्णी यांनी केलेले अनुवाद वाचत आहे. पहिली दोन पुस्तके 'द ट्रीज' आणि 'द फिल्ड्स' अशी आहेत. त्याचे जी एंनी 'रान' आणि 'शिवार' या नावाने अनुवाद केलेले आहेत. ते वाचून झाले. एकाच स्त्रीचे जीवन शिकारी - अन्न गोळा करणार्या जीवनशैलीमध्ये 'रान' या पुस्तकात आहेत. तिचेच जीवन पुढे शेती व्यवस्थेत कसे बदलत जाते हे 'शिवार'मध्ये येते. तिसरे पुस्तक 'गांव' हे आहे, ते आता वाचत आहे.
दोन्ही पुस्तके स्लो बर्निंग प्रकारची असून हळूहळू पकड घेत जातात. जी ए म्हटलं की भाषेचा जी एक खास शैली असते, तिचा प्रत्यय इथे येतोच. १७-१८व्या शतकातील अमेरिकेत गोर्या लोकांच्या वसाहती होत असतानाचे जीवन, त्यातील संघर्ष, रितीभाती यांचे अगदी चित्रदर्शी वर्णन वाचून सध्याच्या अमेरिकेत लोक असे का वागत असावेत, याचा काही प्रमाणात उलगडा होतो. एक चांगला वाचन अनुभव, जरूर वाचा.
नायजेरियातलं साठच्या दशकातलं यादवी युद्ध.
नायजेरियात साठच्या शतकाच्या उत्तरार्धात यादवी युद्ध झालं. स्वातंत्र्यानंतर पूर्वेकडे राहणारे इग्बो (इबो?) लोक विरुद्ध बाकीचे, असंही याचं स्वरूप होतं. तीन वर्षं बायफ्रा नावाचा देश पूर्व नायजेरियात होता. अमेरिका, ब्रिटन, रशिया इत्यादींनी यात नायजेरियाची बाजू घेतली आणि बायफ्रा टिकला नाही. चिमामांडा नगोझी अडेचीई यांनी त्या काळातले संदर्भ वाचून लिहिलेली कादंबरी, Half of a Yellow Sun वाचली.
मध्यमवर्गीय घरात घडणारी ही गोष्ट. ह्या घरात काम करणारा आणि गरीब घरचा, खेडूत, जेमतेम दुसरी पास झालेला उगवु नसुक्का विद्यापीठात शिकवणाऱ्या जोडप्याच्या घरी कामाला येतो. श्रीमंत व्यावसायिकांच्या पोटी जन्माला आलेली आणि आता डाव्या विचारसरणीची झालेली समाजशास्त्रज्ञ ओलान्ना, आणि अशिक्षित आईच्या पोटी जन्माला आलेला पण आता विद्यापीठात गणित शिकवणारा ओडेनिग्बो हे ते जोडपं. ओलान्नाची जुळी बहिण कैनिनी आणि तिचा बॉयफ्रेंड, ब्रिटिश, लेखक रिचर्ड अशा पात्रांची कथनं कादंबरीत आहेत.
एका बाजूला माणसांमधली नाती, संबंध, ताणेबाणे आणि दुसरीकडे दोन जमाती, टोळ्यांमधल्या भांडणांमुळे झालेलं युद्ध, युद्धकाळात बायफ्रन लोकांची उपासमार ही महत्त्वाची पात्रं आहेतच.
यांपलीकडे मला ममव दृष्टिकोनातून दिसलेल्या गोष्टी. नायजेरियन मध्यमवर्गातल्या आणि गरीब घरांतल्याही स्त्रियांना असणारं लैंगिक स्वातंत्र्य. ह्या स्त्रिया लग्न करतात किंवा करत नाहीत. लग्न न करताही ह्या स्त्रिया पुरुषांबरोबर झोपतात; त्यांना मुलं होतात; आणि त्याबद्दल बहुतेक कुणी तरुण, मध्यमवयीन लोकांना काही आक्षेप नसावा असं वाटतं. मध्यंतरी मी शांता गोखल्यांचं मेम्वार वाचलं. त्या शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेल्या, आणि ह्या कादंबरीतल्या जुळ्या बहिणी, ओलान्ना आणि कैनिनी, साधारण त्याच वयाच्या, त्याही इंग्लंडमध्ये शिकलेल्या आहेत.
कादंबरीची सुरुवात १९६०च्या दशकाच्या सुरुवातीला होते तेव्हा ओलान्नानं ओडेनिग्बोशी लग्न केलेलं नाही. यादवी युद्ध सुरू होतं आणि त्यांना आपलं नसुक्काचं राहतं घर सोडून पळावं लागतं. पुढचं घरही सोडून त्याच गावात एका खोलीत राहण्याची वेळ येते. तोवर ओलान्नानं खूप हिंसा बघून झाली असते; स्वतःच्या घरच्या लोकांची मृत शरीरं बघितलेली असतात; त्यानंतर डिप्रेशनमधून ती बाहेर येते. आणि त्यानंतर ती लग्नाला होकार देते.
कैनिनीनं कादंबरीच्या शेवटापर्यंत रिचर्डशी लग्न केलेलं नाही. बायफ्रा देश तयार झाला तोवर रिचर्ड इग्बो बोलायला शिकलेला असतो. त्याला त्याच्या गोरेपणातून मिळणाऱ्या मानसन्मानाची जाणीव असतेच. बायफ्रा तयार होतो तेव्हा तो स्वतःला बायफ्रन समजायला लागतो. यादवी युद्ध सुरू झाल्यावर काही काळानं बायफ्राच्या बाजूनं तो पाश्चात्त्य वर्तमानपत्रांसाठी लेखनही करतो; यात त्याच्या गोरा असण्याचा फायदा होईल हे गणित त्यात सगळ्यांनाच मान्य असतं. कधी वेळ पडेल तेव्हा बायफ्रा आणि इग्बो लोकांच्या बाजूनं बोलताना तो कैनिनीचा उल्लेख आपली बायको किंवा फियान्से आहे असाही करतो.
कैनिनी सुरुवातीला थंड आणि व्यवहारी, काहीशी दुष्ट वाटावी अशी दाखवली आहे. युद्ध सुरू होतं तेव्हा ती त्यातून चिकार पैसाही कमावते. नंतर तिला बायफ्रन लोकांची होणारी उपासमार समजते, दिसायला लागते. आणि ती आपली सगळी शक्ती, वेळ, ओळखीपाळखी, सगळंच वापरून निर्वासितांना जमेल तितकी मदत करते. कादंबरीच्या शेवटाकडे, युद्ध संपत यायला लागतं; कैनिनीकडेही फार काही राहिलेलं नाही. ती व्यापारासाठी नायजेरियात जाते आणि परत येत नाही. (ज्यांच्यात असा बदल होतो, कोरडेपणा सोडून माणूसकी दाखवायला लागतात, अशी पात्रं बऱ्याच ललित लेखनांमध्ये मरतात, गायब होतात, वगैरे. You cannot go back home.)
रिचर्ड लेखक असतो. युद्धाच्या आधी तो नायजेरियात येतो तेव्हा त्याला तिथल्या संस्कृतीबद्दल कादंबरी लिहिण्याची इच्छा असते. आधीच्या दोन कादंबऱ्या काही कारणानं बारगळतात. युद्धकाळात तो नवी कादंबरी लिहायला सुरुवात करतो - The world was silent when we were dying.
कादंबरीच्या शेवटी रिचर्डला आपलं उपरेपण लक्षात येतं. आणि उगवूनं लिहायला सुरुवात केलेली आहे - Life in a country - असं शीर्षक असेल असं तो रिचर्डला सांगतो.
(या कादंबरीवर नायजेरियन-ब्रिटिश सिनेमाही बनवलेला आहे. तो मी बघितलेला नाही.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
‘टोळ्यां’च्या सहअस्तित्वाची कथा!
‘टोळ्यां’च्या सहअस्तित्वाची कथा!
बॅटमन यांनी लिहिलेले डॉ. सुमित गुहा यांच्या पुस्तकाचे परीक्षण माहितीपूर्ण आहे.
या करारांची भाषा अर्थातच इंग्रजी/मराठी असावी. टोळी प्रमुखाला समजा आजूबाजूच्या भाषा समजत असल्या तरी लिहिता वाचता येण्याची शक्यता कमी वाटते. आणि टोळी समुहाची गणसंख्या साधारण किती असावी? (ब्रिटीशांपूर्वी आणि मराठ्यांच्या काळात). कारण ब्रिटिश समाजप्रमुखाला पेंशन देत असतील तर टोळीची 'बार्गेनिंग पावर' चांगलीच असायला हवी.
माझं शरीर, माझा हक्क?
अदिती यांचा लेख. या लेखातल्या विचारांशी/भावनेशी सहमत.
हा निर्णय आल्यावर दुसर्या दिवशी वॉलस्ट्रीटच्या संपादकीय मंडळाने थोडा वेगळा मुद्दा मांडला. तांत्रिक दृष्ट्या कदाचित तो चुकीचा नाही. त्यांनी १९७३ मध्ये वेगळं मत मांडणार्या न्यायाधिशांचा मुद्दा उचलून धरला आहे.
पण त्यांनी रिपब्लिकनांची तळी उचलेली नाही. नेशनवाईड बॅनची मागणी करणार्यांना रिपब्लिकनांना त्यांनी दांभिक म्हटले आहे. त्यांच्या मते आता वादविवाद कोर्टाकडून राजकीय विचारधारांच्या कक्षेत येईल.
थोडक्यात, त्यांच्या मते, असे वादविवाद न्यायालयाच्या माध्यमातून न सोडवता जुन्या पद्धतीने मतपरिवर्तनातून सुटले पाहिजेत. पण प्रॉब्लेम हाच आहे. हे 'टॉलरेबल कन्सेन्सस' शोधणार कसं? खास करून जेव्हा एखाद्या सामाजिक प्रश्नाचे इतके ध्रुवीकरण झाल्यावर. हे म्हणजे १८६० च्या यादवीसारखेच आहे. गुलामगिरी ठेवायची की नाही यावर कॉमन ग्राउंड कसे शोधणार? पण कदाचित असे म्हणणे असावे की, तेव्हाही लिबरलमधले काही, गुलामांना मुक्त करण्यासाठी भले सहमत असले तरी समानतेचे हक्क देण्यास तयार नव्हते. पुढची कैक दशकं गेली. पुढच्या पिढीतल्या लोकांना/नेत्यांना नवा संघर्ष करावा लागला. तेव्हा कुठे आजची अमेरिका आपणास दिसते. थोडक्यात, असे मतपरिवर्तन होण्यास कैक दशकांचा कालावधी जातो.
Exile at Home- Final Encounte
Exile at Home
Ashish Nandy
the final encounter
The politics of the assassination of Gandhi
आशिष नंदिनी त्यांच्या Exiled at Home या पुस्तकात गांधीजींच्या खुनावर “the final encounter” नावाचा लेख लिहीलाय,त्यात त्यांनी हा खून कुठल्या व्यापक पार्श्वभूमीवर झाला हे एका वेगळ्या आणि मोठ्या कॅनव्हासवर उलगडून सांगितलं आहे. हा लेख निव्वळ इतिहास या विषयापेक्षा समाज ,परंपरेने घडवलेले तत्कालीन समाजमन. खुनाला कारणीभूत असणारे भौतिक आणि जाणीव नेणिवेच्या पातळीवरचे वेगवेगळे घटक यांची मांडणी करतो.
नंदी लेखाची सुरुवातच मुळी ‘हा खून हा खुन्याने आणि बळीने एकत्र सहलेखन केलेले स्टेटमेंट होते’ अशी करतात. कुठलाच खून हा मारणारा मारणारा यांच जॉईंट व्हेंचर असते .खुनी अगदी मतिमंद किंवा मनोरुग्ण असला तरी त्याच्या त्या अवस्थेत हि तो अधिक व्यापक अशा ऐतिहासिक आणि मानसिक शक्तींना रेप्रेझेन्ट करत असतो .त्या शक्तीच त्याला त्याच्या सावजाशी कनेक्ट करतात. गांधी आणि त्यांचे मारेकरी यांच्याशिवाय गांधींच्या संरक्षक अश्या पोलीस आणि गुप्तहेर संस्था ,नोकरशाही आणि राजकारणी यांच्या जाणीव किंवा नेणिवेच्या पातळीवरून चाललेल्या मनोव्यापारांचा हि वाट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण हे सगळे घटक जुळून कसे आले ,याच उत्तर गांधींनी राजकारणात काय घडवून आणले, गांधीजींनी समाज बदलला म्हणजे नक्की काय बदलले ते किती गाभ्यापासून बदलायची ताकद त्यांच्यात होती,याच्या पृथःकरणात आहे असं म्हणून नंदी तिकडे वळतात

भारतात चालत आलेल्या पारंपरिक सत्ताश्रेणी आणि वसाहतवादाटून जन्मल्आधुनिकतावादी ,पाश्चिमाळलेला मध्यमवर्गीय सुधारकवर्ग ती सटताश्रेणी कायम ठेवून स्वतःला शोषितांचे कैवारी म्हणवणातें राजकारण करत होता.त्यात हा वर्ग केंद्र आणि बाकी समाज हा परिघावर अशी हायरार्की जपली जात होतीच. ह्या पार्श्वभूमीवर गांधीजींनी भारतातील पारंपरिक सत्ता व्यवस्था आणि त्याच वसाहतवादातून इवोल्व होणारे आधुनिक रूप ह्यांना दोन मूलभूत हादरे दिले.
1) पारंपरिक वर्ण श्रेणी आणि वसाहतवादातून झालेल्या आधुनिक पाश्चात्य विचार यांच्या संकरातून तयार झालेला हा एलिट क्लास परंपरेने sanction केलेले (reason डॉमिनंट राजकारण समाजकारण करणार आणि त्याआडून सत्ता श्रेणी अधिक वसाहतवाद अधिक घट्ट होतील, हे जाणून पाहिलं काय केलं असेल तर राजकारणाचे De-Intellectualization. याचा अर्थ गांधीजी intellectuals च्या विरोधी होते असे नाही पण आपल्या वर्ण परंपरेत निखळ विचार चिंतन हे कृतीपेक्षा जास्त अग्रक्रम टिकवून आहे त्याला धर्माची अधिमान्यताहि आहे (असा नंदींचा दावा आहे)
हि व्यवस्था केंद्राकडून परिघाकडे सरकावण्यासाठी De - INTELLECTUALISATION चा भाग म्हणून गांधींनी ग्ग्रामीण अब्राह्मणी अक्षत्रिय व्यवस्थेतील अनेक RITUALS आर्थिक आणि सामाजिक जीवनपद्धती ह्या हिंदुधर्माचा अधिक ठळक गाभाच आहे असे सांगत हा वर्ग केंद्राकडे आणण्याची धडपड सुरु केली ब्रह्मन् क्षत्रिय व्यवस्थेत असलेल्या INTELECTUALISM च्या ऐवजी परिघावरील जनसमुदायांची व्यापक चळवळ, उत्स्फूर्तता, ङोई MASS MOBILISATION याना केंद्रस्थानी आणले
◦
2)पारंपरिक क्षत्रिय व्यवस्थेत असलेल्या भारतीय समाजातल्या रचनेत चालत आलेली मॅस्क्युलनीटी आणि फेमिनिटी यांच्या संकल्पनातच मूलभूत धक्के दिले (अजूनही मारेकऱ्यांचे वैचारिक वंशज मूठभर मिशा, खरा मर्द वगैरे गोष्टी कवटाळून आहेत ) त्यांनी स्त्रीत्व हे केंद्रस्थानी आणायचा प्रयत्न केला आणि पारंपरिक वर्णव्यवस्थेत क्षत्रियत्व आणि पौरुषत्वाशी जुळलेल्या गोष्टी परिघावर ढकलायचा प्रयत्न केला. त्यांच्यालेखी पुरुषाने आपल्या पुरुषपणाच्या चौकटीत स्त्रीत्वाचे काही घटक सामावून घेणे यात, पौरुषाच्या बाता मारण्यापेक्षा अधिक, तप अधिक साफल्य आहे असे असावे. इथे मूळ लेखात नसलेल्या एका गोष्टीची मला आठवण झाली ती म्हणजे त्यांची नात मनुबेन पोरकी झाल्यावर 'मी तुझा बाप नव्हे तर आई होण्याचा प्रयत्न करेन' असं त्यांनी तिला सांगितलं होत. त्यांच्यालेखी हि सर्वोच्च साधना होती (गांधीजींच्या सावरकरवादी विरोधकांनी 'गांधींनी हिंदूंना स्त्रैण केले' असा आरोप वारंवार केला आहे. हेही इथे लक्षात ठेवावे )
या सगळ्यातून त्यांनी जय पराजय जीत जेते यांचे पारंपरिक अर्थच बदलून टाकले. या सर्व पारंपरिक कल्पनांना आणि वसाहतवादी(विज्ञान, बुद्धिवाद, उपयुक्ततावादी ) कल्पनांना कवटाळून बसलेल्या त्यांच्या हत्याऱ्या गटाला या साऱ्याच आघाड्यांवर हे थोपवावे कसे हे समजेनासे झाले.
◦ आपण समजतो तस गांधीजींनी फक्त बहुजन समाजाला भौतिक दृष्ट्या फ्रंटवर आणलं म्हणूनच नव्हे तर परंपरावाद्यांच्या भावनिक विश्वाला पण त्यांनी सुरुंग लावले हे समजावून घेतल्याशिवाय त्यांचा खून समजणे अवघड आहे
◦ त्यांनी सातत्याने केंद्र आणि परीघ यांची व्याख्या बदलायची धडपड केली
बाकी तपशील पुस्तकातच वाचणे इष्ट आणि आनंदाचे आहे
डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता
हिजाब या विषयावर फार
हिजाब या विषयावर फार चर्वितचर्वण झाले आहे. सुप्रीम कोर्टात असलेली केस आता मोठ्या न्यायपिठाकडे वर्ग झालेली आहे. या विषयावर इंडियन एक्स्प्रेसमध्ये आलेला खालील लेख फार मननीय आहे.
https://indianexpress.com/article/opinion/columns/supreme-court-verdict-...
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
The Elephant Whisperer
आफ्रिकेतील जंगली हत्तींच्या कळपाबरोबर राहिलेल्याचे अनुभव-- The Elephant Whisperer सध्या वाचत आहे. खूप चांगले पुस्तक आहे.
चीपर बाय डझन या पुस्तकाचा
चीपर बाय डझन या पुस्तकाचा पुढचा भाग बेलीज ऑन देअर टोज.
चीपर बाय डझन हे पुस्तक परिचीत आहे पण त्याचा पुढचा भाग आहे हेच बरेचजणाना माहीत नाही.
पुस्तक फार जुने आहे. मात्र ते कुठेच उपलब्ध नव्हते.
गेल्याच आठवड्यात मिळाले
माझ्या आगामी पुस्तकाविषयी
१.माझे ‘पाळण्याच न दिसलेले पाय’ हे आत्मकथनपर पुस्तक पुण्याच्या ‘मनोविकास प्रकाशन’तर्फे प्रकाशित होत आहे.
२. पुस्तकाची पृष्ठसंख्या २५० असून किंमत ४३० रुपये आहे.
३. सध्या हे पुस्तक प्रकाशनपूर्व २५ टक्के सवलतीच्या दराने उपलब्ध आहे. सवलत मूल्य ३२२ रुपये आहे व टपालखर्च ७० रुपये आहे. ज्यांना हे पुस्तक सवलतीच्या दरात घ्यायचे असेल ते ‘मनोविकास’च्या 8888550837 या मोबाईल नंबरवर गूगल-पे च्या माध्यमातून पैसे पाठवू शकतात. (रु. ३२२ + रु. ७० असे एकूण ३९२ रुपये एका प्रतीसाठी पाठवावे लागतील.)
४. गूगल-पे ने पैसे पाठविल्यावर त्याच मोबाईल नंबरवर पैसे पाठविणार्या नाव, पुस्तकाचे नाव व पुस्तक ज्या पत्त्यावर पाठवायचे तो संपूर्ण पत्ता असा मजकूर व्हॉट्सअॅपवर पाठवावा.
५. या प्रमाणे पैसे पाठविले व व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठविला की पुस्तक टपालाने पाठविले जाईल.
६. धन्यवाद.
पाळण्याच?
.
आलोक - आसाराम लोमटे
नुकतेच आसाराम लोमटे यांचे आलोक हे कथासंग्रह असलेले पुस्तक वाचले. २०१० ला प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला २०१६ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. वृत्तपत्रात छापून येणार्या ग्रामिण वा निमशहरी भागातल्या बातम्यांच्या वास्तवाचा धागा पकडून (लेखक पत्रकार आहेत) त्याभोवती कलात्मकतेने रचलेल्या मोजून सहा कथा या पुस्तकात आहेत. या कथातर आवडल्याच पण पुस्तकाच्या शेवटी असलेल्या परिशिष्ट (लिहिण्यामागची 'भूमि'का) मध्ये लेखकाने एकंदर साहित्य, लेखक, स्वतःच्या लेखन कलेच्या सृजनशीलतेविषयी आणि काही कथांच्या मागच्या अनुभवावर जे मनोगत लिहिले आहे ते खूप आवडले.
या परिशिष्टचा सारांश मांडण्याचा प्रयत्न करतो. काळ आणि भवताल याचा प्रभाव लेखकावर आणि साहित्यावर पडत असतो. साहित्यामध्ये वास्तवाचे प्रतिबिंब किती हा नेहमीच चर्चिला जाणारा विषय. आजचे वास्तवही तितकेच संभ्रमित करणारे आहे. उदा. महानगरात धुमाकूळ घालणारी गाणी अगदी खेडेगावातली तरुणाई सुद्धा कानठळ्या बसेपर्यंत सार्वजनिक उत्सवात वाजवून उन्माद संचारल्यासारखी नाचणार. तरुणांचे टोळके कायम हाताशी हवे म्हणून या सगळ्या उत्सवाचा खर्च एखादा नेता करणार. झालेला खर्च तो काळाबाजार करणार्यांकंडून वसूल करणार जेणे करून त्यांच्या चोरवाटा मोकळ्या. नाचणार्या तरुणांना त्याचे भान नाही असेही म्हणता येत नाही. तेच "अखंड हरिनाम सप्ताह" चा प्रायोजक वाळूमाफिया असणार. इकडे गावात अखंड हरिनामात आणि तिकडे अखंड वाळूउपसा. त्यामुळे गावचे रस्ते खराब झालेले. बाळंतीणीला तालुक्याच्या गावी न्यावे तर वाटेतच प्रसुती व्हायची भीती. अशा अनेक बाबी एकात एक घुसलेल्या. काळाच्या पटलावर अनेक घटना घडत असतात, पण लेखक काही खेळाच्या समालोचकासारखा ती घटना त्याच्या-त्या-वेळेला टिपत नसतो. एखादी घटना घडून जाते आणि त्यानंतर लेखक त्याची आकलनक्षमता, संवेदनशीलता आणि तल्लख नजरेने त्या घटनेच्या नोंदी मनःपटलावर घेत असतो. घडून गेलेल्या घटनेविषयी नेमके कुठले तपशील वा कुठला मुद्दा वाचकांपर्यंत प्रकर्षाने पोहोचवायचा आहे हे सुद्धा लेखकच ठरवत असतो. वास्तवाचा हा धागा पकडून मग लेखक त्या भोवती काल्पनिक कथा रचत असतो. त्यात रुपकांची पेरणी करत असतो. कथेच्या गतीनुसार वातावरण निर्मिती करत असतो. आणि इथे त्याचा नेमका कस लागतो. एकतर घडून गेलेल्या घटनेच्या सगळ्याच बाबी लेखकाला कळतीलच असे नाही. केवळ कर्जामुळे शेतकर्याने आत्महत्त्या केली का? व्यक्तीच्या मनोव्यापारा पर्यंत लेखकाला पोहोचावे लागते. त्यामुळे त्या घटनेसंदर्भात लेखकाचे आकलन काय झाले आहे हे महत्त्वाचे. शहरी वाचकांच्या मनोरंजनासाठी आतापर्यंत ग्रामीण कथा म्हणजे किस्से आणि इरसाल गोष्टी (असलेल्या नसलेल्या भानगडी) हे समीकरण ठरून गेले होते. पण आसाराम यांची पिढी ही "भेगाळलेला, चिरफाळलेला, चिंध्या झालेला गाव" पाहणारी आहे. त्यामुळे प्रचलित "ग्रामिण कथा" या संज्ञेशी त्यांचे कूळ जुळत नाही. ते म्हणतात, "मी ग्रामीण कथा लिहीत नाही. आजचे जे अस्वस्थ करणारे, बोचणारे, अंगावर येणारे वर्तमान आहे तेच गोष्टींच्या रुपाने मांडतो. त्या लिहिण्याचा परिसर ग्रामीण असेल पण या कथा माणसांच्या, त्यांच्या जगण्याच्या आहेत.... व्यवस्थेत कायम पराभूताचे जगणे वाट्याला आलेल्या माणसाचे बोट सूटू नये यासाठीची धडपड लिहिण्याच्या माध्यमातून चाललेली असते."
फारच आवडते पुस्तक आहे हे.
फारच आवडते पुस्तक आहे हे. सहाही कथा आणि चिंतनशील लोमटेंचे मनोगत हृद्य आहे.
मला यतली ओझं ही कथा सर्वात जास्त आवडते. अगदी गलबलून येतं ती वाचताना. मी लोमटेंचा प्रचंड मोठा फॅन आहे. त्यांचे लोकसत्तेतील लेखमालिका 'धुळपेर' अशीच भावलेली.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
खुंदळण
@पुंबा
खुंदळण ही कथा सुद्धा वेगळी वाटली आणि चालू घडामोडीत चपखल बसेल अशीच आहे. साम-दाम-दंड भेद या नात्याने दुसर्या पार्टीचे कार्यकर्ते, नेते आपल्या पार्टीत घेतले की, विरोधकांची कशी "खुंदळण" करता येते याची ही गाव पातळीवरची कथा आहे.
https://indianexpress.com
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
https://www.newyorker.com
त्यावरून मग इ एम फॉर्स्टरची याच नावाची कथा शोधताना हा लेख मिळाला. यात रेफरन्स मिळाल्याने फिलिप रॉथ्ची एक्झिट घोस्ट ही कादंबरी शोधून वाचणे आले.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
२०२२ मध्ये अमेझॉन वरून ऑर्डर
२०२२ मध्ये अमेझॉन वरून ऑर्डर केलेली पुस्तके
सर्वात आवडलेले क्रमांक ६
सध्या उशिराने वाचतोय क्रमांक ५
1. Goa a daughter’s story
2. Bad Blood : Secrets and lies in a silicon valley start up
3. गावकुसाबाहेरचा ख्रिस्ती समाज
4. Pity the nation : Lebanon
5. The great war for civilization : The conquest of middle east
6. The warmth of other suns
7. Roots: The saga of an American family
8. Henry Morton Stanley: Emergence of the pearl of Africa
9. क्रुसाभोवतीचा ख्रिस्ती समाज
10. Too late to turn back : Barbara and Graham Green in Liberia
11. Dark Safari: The life behind the legend of Henry Morton Stanley
12. Maximum city : Bombay lost and found
13. Caste
14. Decoding the Pandemic
झाडे आणि जंगले
The Hidden Life of Trees - या नावाची बरीच पुस्तके असतील पण Peter Wohlleben यांचं पुस्तक (इंग्रजी भाषांतर) वाचण्यात आलं. युरोपिअन थंड प्रदेशांतील झाडे आणि जंगलांची माहिती. कशी,किती वाढतात. मित्र कोण शत्रू कोण. शहरातील झाडे आणि जंगलातील यातील सुखी कोण वगैरे.
लोकसंख्या वृद्धीदर
बर्याचदा असे होते की, एका पुस्तकातल्या एखाद्या मुद्द्याचे गांभिर्य आपल्याला दुसरे पुस्तक वाचताना उमजते. अलिकडे हरारीची २१ लेसन्स... आणि होमो डेअस ही दोनही पुस्तके (खास करून चॅट जीपीटी नंतर) वाचली. त्यातला दुष्काळ, साथीचे रोग, युद्ध या अलिकडच्या दशकात बिलकूल आव्हानात्मक वाटत नसलेल्या बाबी काही शतकांपूर्वी किती आव्हानात्मक होत्या हा हरारीचा मुद्दा मला खूप चांगल्या पद्धतीने थॉमस पिकेटीचे कॅपिटलिझम इन २१स्ट सेन्च्युरी वाचताना उमजला.
१७०० च्या सुरुवातीला असलेली ६०० मिलिअन लोकसंख्या (उपलब्ध सर्वोत्तम अंदाजानुसार) २०१० च्या आसपास म्हणजे ३०० वर्षांनी ७ बिलिअन म्हणजेच जवळजवळ १० पट झाली. हा वृद्धीदर तसा बघायला गेला तर ०.८% दसादशे आहे. पिकेटीच्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे वैश्विक अर्थगती आणि लोकसंख्यावाढ ही नेहमीच १% पेक्षा खाली राहिली आहे. कारण आकडेवारीनुसार १% पेक्षा अधिक लोकसंख्या वाढ शक्य नाही. कारण जरी ०.८% वृद्धीदर पकडला तर इसवी सनाच्या सुरुवातीला लोकसंख्या काही हजारांमध्ये असायला हवी. पण ते शक्य नाही. एकट्या रोमन मध्येच काही मिलिअन लोकसंख्या असावी. मग हा वृद्धीदर एवढा छोटा का असावा? उलट पूर्वीच्या काळात भरपूर अपत्य जन्माला घातली जायची. म्हणजेच दुष्काळ, वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयीचा अभाव (साबण इ.चा वापर नसणे), साथीचे रोग, युद्धे यामुळे बर्याच लोकांचा बळी जात असला पाहिजे.
"कंपाउंडींग मॅजिक" (चक्रवाढीची जादू) हा गुंतवणुकदरांना नवीन नाही. पण त्यातही दृष्टी फारफार तर दषकापुरती मर्यादीत असते. शतकांपलिकडे मी तरी कधीच विचार केला नाही. त्यामुळे ०.८% वृद्धीदरामुळे ३०० वर्षात १० पट लोकसंख्या होते सुरुवातीला अविश्वसनीय वाटले. याच गतीने पुढल्या ३०० वर्षांनी जगाची लोकसंख्या आणि एकंदर जग कसे असेल याची कल्पना पण करता येत नाही.
मुद्द्याचे गांभिर्य आपल्याला दुसरे पुस्तक वाचताना उमजते.
हो ना.
ती दोन्हीं पुस्तके वाचली आहेत. पण सामान्य वाचक हा इकनॉमिक्सच्या अभ्यासुं इतका विचार करत नाही.
देशकालपरत्वे
याचे अनेक शास्त्रीय अहवाल मान्यवर संस्थांनी केलेले आहेत. देश जसजसे प्रगत, भांडवलवादी होतात आणि बायकांना काम (म्हणजे इंडस्ट्रियल) करावे लागते, तसतशी लोकसंख्यावाढ मंदावते. जपानवर तर विचित्र पाळी आली आहे.
आता तर माझ्या मते आपल्याला पुढच्या ३० वर्षातदेखील जग कसे असेल हे सुद्धा नीट कल्पता येत नाही.
आज फ्लॅट स्क्रीन टीव्ही, स्मार्टफोन सगळीकडे आहेत. खूप नावाजललेल्या भविष्यवेधी चित्रपटांनादेखील तीस चाळीस वर्षांपूर्वी हे भविष्य नीट दाखवता आले नाही. सीआरटी मॉनिटर जवळ जवळ नामशेष झालेले आहेत.
तरीही मला हे १९७० चे पुस्तक सुचवावेसे वाटते. फ्युचर शॉक.
https://en.wikipedia.org/wiki/Future_Shock
आता जे काही घडतंय याची एक संगती लागू शकेल.
अर्थात हे व्हॅल्यू इन्वेस्टरांत लोकप्रिय पुस्तक आहे. वाचले नसेल तर एक ट्राय मारा मग
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
.
सुचविलेल्या पुस्तकासाठी धन्यवाद.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/sampadkiya/features/earth-human-relations-peter...
हा परिचय वाचून पुस्तक वाचावेसे वाटत आहे.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
द क्लिफ्टन क्रॉनिकल्स/ खंड तिसरा- 'बेस्ट केप्ट सिक्रेट'
द क्लिफ्टन क्रॉनिकल्स..., ह्या दोन ब्रिटिश परिवारांना केंद्रस्थानी ठेवून, लिहिलेल्या विस्तृत कादंबरी मालिकेतील, तिसरा खंड 'बेस्ट केप्ट सिक्रेट' (Best Kept ecret). पूर्ण झाला.
लेखक-जेफ्री आर्चर, मराठी अनुवाद : लीना सोहोनी यांनी केला आहे.
रवींद्र दत्तात्रय तेलंग
अर्थशास्त्राचा इतिहास
अॅडम स्मिथला तीनशे वर्षे होऊन गेली. डॉ. अजित रानडेंनी लोकसत्ता मध्ये काही दिवसांपूर्वी अॅडम स्मिथवर हा लेख लिहिला होता.
अॅडम स्मिथ पासून बेन बर्नांकी पर्यंत अर्थशास्त्रात कुठले प्रवाह कधी कसे येत गेले त्याचा इतिहास समजून घेण्यासाठी गेल्या काही महिन्यात ३ पुस्तके वाचली/ऐकली.
१. दि बिग थ्री इन इकॉनॉमिस- अॅडम स्मिथ, कार्ल मार्क्स, जॉन मेनार्ड केन्स - लेखक : मार्क स्काउझेन
या पुस्तकात या तीनही अर्थतज्ञांच्या त्यांनी मांडलेल्या विचारांव्यतिरिक्त त्यांच्या जीवनातले इतर प्रसंगही/माहिती सांगितली आहे त्यामुळे ते थोडे रंजक पण आहे. उदा. अॅडम स्मिथच्या काळात अॅडम स्मिथ हे नाव खूपच कॉमन होते. अॅडम स्मिथच्या वडिलांचे नावही "अॅडम स्मिथ" होते. इतकेच काय तर त्याचा सांभाळ करणार्या व्यक्तीचे नाव, तसेच एका चुलत भावाचे नावही "अॅडम स्मिथ" होते. तर केन्स तरुणाईच्या काळात तो गे असण्याचे आरोप होत होते. अॅडम स्मिथने "वेल्थ ऑफ द नेशन्स" हे पुस्तक लिहून आधुनिक अर्थशास्त्राची पायाभरणी केली. वडील आणि स्वतः अॅडम स्मिथ सुरुवातीच्या काळात स्कॉटलंडच्या एका बंदरावर कस्टम अधिकारी म्हणून काम करत होते जेथे आयात निर्यात होणार्या वस्तूंवर लागलेले कर गोळा करण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्या काळात राष्ट्राच्या संपत्तीमध्ये जमिनीव्यतिरिक्त केवळ'सोने आणि चांदी' यालाच अनन्यसाधारण महत्त्व होते. त्यामुळे वसाहतवादी मानसिकतेच्या लोकांचा इतर देशातून (लुटून का होईना) सोने आणण्यावर जास्त भर होता. आणि आपल्या देशातून सोने इतरत्र जाऊ नये याची खबरदारी घेतली जात असे. त्यावर कर लादला जात असे. अॅडम स्मिथने ह्या पारंपरिक विचारांना छेद देताना "आपल्यापुढे येणार्या जेवणाच्या ताटाचे" उदाहरण देऊन, भांडवलशाहीच्या मार्गातून निर्माण होणार्या उत्पादनातून आणि त्याच्या वापरातूनच देशाची संपत्ती निर्माण होत असते हा विचार पुढे आणला. त्याच्या "वेल्थ ऑफ नेशन्स" मध्ये "अदृश्य हात" हा उल्लेख मोजक्याच ठिकाणी आला असला तरी अॅडम स्मिथ ओळखला जातो तो या "अदृश्य हातासाठी". "अर्थार्जनाच्या दृष्टीने" वैयक्तिक स्वार्थाचा पाठपुरवठा करणार्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रयत्नांना साद देऊन "अदृश्य हात" पूर्ण समाजाच्या हिताचे काम करत असतो. भांडवलशाही, मुक्त बाजारपेठ/लेसे-फेअर् -व्यापारावर बंधने वा हस्तक्षेप नसलेली- व्यवस्था असली तर हा अदृश्य हात त्याचे काम आपोआप करतो त्यासाठी सरकारने/व्यवस्थेने काही करण्याची गरज नाही. अशी अॅडम स्मिथची मांडणी होती. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धाच्या या काळात आधुनिक भांडवलशाही आणि यांत्रिकीकरणाला नुकतीच सुरुवात झाली होती. अॅडम स्मिथच्या या विचारांना छेद देण्याचा प्रयत्न डेव्हिड रिकार्डो (जो स्मिथचाच शिष्य होता) आणि कार्ल मार्क्स (ज्यावर रिकार्डोचा प्रभाव होता) यांनी त्यानंतर शंभर एक वर्षांनी केला. भांडवलशाही अर्थव्यवस्थेतल्या त्रुटी मांडताना, समाजाची विभागणी मजूर (प्रोलेटरीएट)आणि हुजुर (बर्जवाझी) अशी होते आणि वर्गसंघर्षाची भीती निर्माण होते अशी टोकाची भूमिका मांडली गेली. अर्थात एकोणविसाव्या शतकातला तो काळही तसाच मजुरांच्या शोषणाचा होता. तरीही मुक्त बाजारपेठ आणि भांडवलशाहीचे विचार टिकून राहिले.अॅडम स्मिथच्या पारंपरिक (क्लासिकल) अर्थशास्त्राच्या गडाला थोडाफार धक्का देण्याचे काम केले ते जॉन मेनार्ड केन्सने आणि अर्थात ग्रेट डिप्रेशनमुळे लांबलेल्या महामंदीने. अॅडम्सच्या विचारांच्या एक पाऊल पुढे जाऊन केन्सने सरकारी हस्तक्षेपाची - खास करून जेव्हा अर्थव्यवस्था 'पूर्ण रोजगार' (फुल एम्प्लॉएमेंट) या समतोल बिंदूवर (इक्विलिब्रियम) नसते तेव्हा "अदृश्य हातावर" अवलंबून न राहता सरकारने हस्तक्षेप -सरकारने खर्च करून (गव्हरमेंट स्पेंडीग्ज / डेफिसिट्स स्पेंडीग्ज)- अर्थव्यवस्थेचा गाडा पुढे हाकला पाहिजे. हा विचार पुढे आणला. मंदीच्या काळात क्लासिकल इकॉनॉमिनुसार काहीच करायची गरज नाही. अदृश्य हात आपोआप सगळे व्यवस्थित करेल. तर निओ क्लासिकल वाले मॉनेटरी पॉलिसिजचे समर्थन करतात तर केन्स्झिअन्स फिस्कल पॉलिसिजचे. लेखकाने शेवटच्या पाठात दावा केला आहे की, अॅडम स्मिथच या तिघांत ग्रेटेस्ट आहे आणि सरकारी हस्तक्षेपापेक्षा (फिस्कल पॉलिसीज पेक्षा), सार्वभौम सेंट्रल बँकेच्या माध्यमातून मॉनिटरी पॉलिसिज राबवणे जास्त चांगले हा निओ क्लासिकलच्या विचारांचा पुरस्कार केला आहे. पण त्याच बरोबर केन्स्झिअन आणि मार्क्सचची थिअरी अगदी टाकाउ नाही असे मोघम म्हटले आहे.
२. अ लिटल हिस्टरी ऑफ इकॉनॉमिक्स - लेखकः निआल किश्तैनी
या पुस्तकात गेल्या ३००-४०० वर्षात कुठल्या कुठल्या अर्थतज्ञांनी (खास करून नोबेल पुरस्कार मिळालेल्या) अर्थशास्त्रात कसे कसे भर टाकले याचा इतिहास लेखकाने मांडला आहे. अर्थशास्त्र जस जसे दुसर्या महायुद्धानंतर विकसित होत गेले तसे तसे वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी वेगवेगळे विचार यात आणले. उदा. यात आपल्याला अमर्त्य सेन भेटतात. दुष्काळाच्या आणि फाळणीनंतरच्या दंगलीच्या झळा फार जवळून पाहिलेल्या असल्याने त्यांचे ते विचार त्यांच्या प्रबंधात दिसून येतात. डॅनिअल कानमन सारख्या लोकांनी बिहेविअरल इकॉनॉमिक्स ला अजून समृद्ध कसे बनविले त्याची माहितीही या पुस्तकात येते. अलिकडच्या काळातला पिकेटीही यात भेटतो. ज्याने उत्पन्न आणि संपत्ती या दोहोंमध्ये गेल्या २० वर्षात अगदी अमेरिका, युरोपसारख्या भांडवलशाही देशात सुद्धा समाजामध्ये दरी निर्माण होत आहे हा विचार पुढे आणला. जोपर्यंत रिटर्न्स ऑन कॅपिटल (आर) इकॉनॉमिक ग्रोथ रेट (जी) पेक्षा मोठा आहे तो पर्यंत ही दरी शक्यतो अधिकाअधिक रुंदावतच जाईल असे त्याचे भाकीत आहे. कॅपिटल इन २१स्ट सेंच्युरी या पुस्तकावर स्वतंत्रपणे लिहिण्याजोगे आहे. एकंदर, अ लिटल हिस्टरी ऑफ इकॉनॉमिक्स या पुस्तकाने कुठली भूमिका न घेता, फक्त मोजकी माहिती, (ज्यात फारसा वादविवाद होणार नाही) जशी आहे तशी दिली आहे. हे पुस्तक विचारांना फारसे चालना देत नाही तरीही अर्थशास्त्राचा एक विशाल पट समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयोगी पडते.
३. इकॉनॉमिक्स दी युसर्स गाईड - लेखक: हा-जुन-चँग
साउथ कोरिअन इकॉनॉमिस्टचे हे पुस्तक मात्र वेगळे वाटले. अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या विचार धारेत वा दोन परस्पर विरोधी थिअरीमध्ये कशा पद्धतीने विचार केला जातो यावर भर देवून लेखकाने हे मांडायचा प्रयत्न केला आहे की, अर्थशास्त्रातली कुठलीही विचारधारा वा कुठलीही थिअरी अगदीच टाकावू किंवा सर्वोत्तम अशी नाही. प्रत्येकीचे फायदे तोटे आहेत. उदा. जगातली कुठलीही अर्थव्यवस्था ही १००% कॅपिटलिस्ट (भांडवलशाही) वा १००% मार्कसिस्ट/कम्युनिस्ट नाही. अगदी अमेरिका पण नाही. आणि फार कमी वेळात विकसित झालेली सिंगापूरचीही नाही. या पुस्तकाने भांडवलशाहीची दुसरी बाजू दाखवली आहे. उदा. वसाहतवाद हा कॅपिटलिस्ट ग्रीडचा परमोच्च बिंदू आहे. ज्यात अगदी अॅडम स्मिथच्या क्लासिकल थिअरीला मानणारे अर्थतज्ञ अमेरिकेतल्या गुलामिविरुद्ध वा वसाहतवाद लादला गेलेल्या देशांच्या पिळवणूकीवर चकार शब्द काढत नव्हते. त्यावर उतारा म्हणून मार्क्सची थिअरी पुढे येते. प्रगत देश मुक्त अर्थव्यवस्थाचे आज भले पुरस्कार करत असले तरी त्यांनी घोड्याच्या नालेपासून, कृषी उत्पन्नापर्यंतच्या इंडस्ट्रीला त्या काळात टॅरिफ लाऊन प्रोटेक्शन दिले. लेखकाच्या मते, प्रोटेक्शनिस्ट थिअरीनुसार नव्याने उभारत असलेल्या इंडस्ट्रीला (इन्फांट इंडस्ट्रीला) थोडा फार फायदा मिळतो. नंतर जागतीक बाजारपेठेत तगून राहण्याइतप इंडस्ट्री सक्षम झाल्यानंतर खुल्या बाजारपेठेचे स्वागत करणे इष्ट. दीर्घ काळ प्रोटेक्शन शेवटी मारकच ठरते. क्लासिकल/निओ क्लासिकल ज्या मध्ये सेंट्रल गव्हरमेंट/केंद्रिय नियंत्रणा यांची लुडबुड जितकी कमी तितके चांगले. सगळे काही मार्केटवर सोडायचे (डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल). याउलट मार्क्ससिस्ट थिअरी नुसार सगळे कंट्रोल एक केंद्री असलेले चांगले. या दोनातला योग्य तो समतोल साधला गेला पाहिजे असे लेखक म्हणतो. केन्सिअन थिअरी/निओ क्लासिकल थिअरी नुसार सेंट्रल बँकेचे सार्वभौम असणे याला खूप महत्त्व आहे. त्यात सरकारची लुडबूड जितकी कमी तेवढे चांगले. थोडक्यात हे पुस्तक कॅपिटलिस्ट, कम्युनिस्ट, सोशलिस्ट, प्रोटेक्शनिस्ट, मुक्त बाजारपेठ (फ्री मार्केट), क्लासिकल, निओ क्लासिकल, केन्झिअन, ऑस्ट्रीअन (भांडवलशाहीवर जवळजवळ आंधळी श्रद्धा) या वेगवेळ्या द्वंदातले टोकाचे विचार थोडे बोथट वा सौम्य करण्यास मदत करते.
River of Smoke
सध्या River Of Smoke वाचतो आहे. तेही भारी आहे
डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता
Ibis triology
भारी आहे
-ताराबाई
टिप टिप चांदणी
Ibis triology - यातलं हे
Ibis triology - यातलं हे दुसरं पुस्तक मीही वाचतो आहे. पहिलं आवडलं. आता त्याच विषयावरचं म्हणजे अफुचा व्यापार (दुरून करणारी अमेरिका) यावर नवीनsmoke and ashes (Feb 2023).
खरे तर ऐकते आहे..
मराठी बोलकी पुस्तके ऐकण्याचा प्रयत्न करते आहे...
द. मा. मिरासदार यांच्या "चकाट्या" या कथासंग्रहातील "शिवाजीचे हस्ताक्षर" ही कथा ऐकली.
कथेच्या बालनायकावर इतिहासाचे शिक्षक आणि इतिहास संशोधन करणारे पिताश्री यांच्या वादात काय परिस्थिती ओढवते याचे मजेशीर वर्णन आहे.
कथा सुरू होते तेव्हा गुरूजी इतिहासाच्या उत्तरपत्रिका देत असतात. वर्गातील विद्यार्थ्यांची ऐतिहासिक उत्तरे वाचून दाखवतात.
एकाने लिहिले शिवाजी महाराज पुण्यात शनिवार वाड्यात रहात होते. गुरूजी रागाउन विचारतात तर तो म्हणतो नाही बहुतेक जिजामाता बागेजवळ रहात होते.
कथेच्या बालनायकाची परिस्थिती जरा बरी असते, त्याची बरीचशी उत्तरे बरोबर असतात पण त्याने लिहिले असते शिवाजीला लिहिता वाचता येत नव्हते. गुरूजी विचारतात असे का लिहिले? तर तो म्हणतो पुरावा नाही म्हणून. गुरूजी म्हणतात पुरावा म्हणजे काय पाहिजे? त्याला वडिलांचे काम आठवत असते. तो सांगतो पुरावा म्हणजे खूप जुनी, पिवळी पडलेली आणि फाटकी कागदपत्रे. गुरूजी म्हणतात पुरावा आहे.. आणि कोटाच्या खिशात काहीतरी शोधू लागतात. बालनायकाला वाटते गुरूजी किती महान? पुरावे त्यांच्या खिशात आहेत पण नाही .. खिशातून ते काढतात तपकीरीची डबी आणि खेकसतात.. वडिलांना सांग तुम्ही काहीही म्हणले तरी शिवाजीला लिहिता वाचता येत होते. .. आणि मग असेच वादावादीचे मजेशीर प्रसंग घडत रहातात.
ऐकताना मजा वाटली.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
चांगला धागा
चांगला धागा
जेम्स एक होमलेस व ड्रग अ
जेम्स एक होमलेस व ड्रग अॅडिक्ट मनुष्य आहे. त्याला एकदा हे बोक्याचे खूप देखणे पिल्लू सापडते. हा टॉमकॅट - बॉब जेम्सचे म्हणजे लेखकाचे भावविश्व संपूर्ण व्यापून दशांगुळे उरतो. या माणसाचे संपूर्ण आयुष्य बदलवुन टाकतो. या बोक्यावरची त्याची माया, त्याला नव्याने झालेली जबाबदारीची जाणिव इतकं सुरेख वर्णन आहे. मग आपल्या मुलांची आपण आजारपणात करतो तशी त्याची आजारपणात, तो शुश्रुषा करतो. तो म्हणजे लेखक स्वतः व्यसनमुक्त कसा होतो, त्यात बॉबची कशी अप्रत्यक्ष मदत होते - ते ही वाचण्यासारखे आहे.
.
बरं हा लेखक यु के चा असल्याने इतके छान वाक्प्रचार आपल्याला सापडतात. माय मदर हॅड इची फीट (आई कोठेही एका ठिकाणी स्थिर स्थावर होत नसे), वोल्फिंग डाउन फुड, बीईंग अंडरवेदर, आयसिंग ऑन केक - असे आपण माहीत असलेले पण सहसा न वापरणारे वाक्प्रचार येतात. ही यु के च्या लोकांची खासियत. बॉबला कचरा धुंडाळायची सवय असते तर लेखक गंमतीने म्हणतो - बॉब वॉज अ स्ट्रीट कॅट. यु कॅन टेक कॅट आऊट ऑफ स्ट्रीट बट यु कॅनॉट टेक स्ट्रीट आऊट ऑफ कॅट इंग्रजी भाषा वाघिणीचं दूध म्हणतात ती मूळात ब्रिटिशर्स्चीच तेव्हा त्यांचे इंग्रजी नक्कीच मस्त असते.
.
मुख्य म्हणजे, आपण सामान्य लोकं, होमलेस लोकांना कसे वागवतात. कसे वागवतो, तुच्छ लेखतो, अक्षरक्षः डिह्युमनटाईझ करतो. व्हर्बल अॅब्युझ, हाडतुड करणे हे तर सर्रास होते. त्यामुळे हे लोक कोडगे तर होतातच पण त्यांची संपूर्ण आयडेंटीटी, व्यक्तीमत्व पार चिरडून जाते, दे आर नोबडी, एक पोकळी आहे ते लोक म्हणजे - ब्लॅक होल. त्यांना काम करण्याची इच्छा असून कोणीही काम देतही नाही पण "गेट अ जॉब यु स्कम" वगैरे अपमान त्यांच्यावर भिरकावण्यात आपण पुढे असतो.
.
आणि अशा पिचलेल्या, ड्रग अॅडीक्ट जेम्सला हा बोका, त्याचे प्रेम किती किती मदत करते, कसेकसे त्याला खोल गर्तेतून बाहेर काढते. इन फॅक्ट त्याची हेरॉइनची सवय/व्यसन कसे सुटते, त्याची ही एक ट्रायम्फन्ट कहाणी आहे. विलक्षण आहे.
आपल्याला खूप खूप भूक असते आणि त्या काळात काही मिळत नाही तेव्हा एक भाकरीचा तुकडाही आपल्याला कसे बळ देतो, कसा नरीशींग (पौष्टिक) ठरतो तसा हा लेखक याला ना प्रेम, माया ना स्वाभिमान, ना 'स्व' ची जाणिव पण बॉबचे प्रेम त्याच्याकरता किती उभारी देणारे ठरते त्याची ही नितांत सुंदर कहाणी आहे.
आणि हा बॉब तर इतका देखणा आहे. अतिशय गोड बोका आहे. खाली फोटोत पहाच.
काईगो हिगाशिनो या जपानी लेखकाची कादंबरी "मॅलिस"
काईगो हिगाशिनो या जपानी लेखकाची सर्वात गाजलेली कादंबरी म्हणजे "डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स". ती २०१६च्या आसपास वाचलेली होती. हिगाशिनोचीच "मॅलिस" या शीर्षकाची आणखी एक मर्डर मिस्ट्री नुकतीच वाचण्याचा योग आला.
सस्पेन्स कादंबरी प्रकारामधे जे उपप्रकार असतात त्यामधे "पैचान कोन" हा एक जसा प्रकार तसा "आधी केले मग सांगितले" हा दुसरा प्रकार. "डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स" कादंबरी दुसर्या प्रकारातली. जो गुन्हा होतो तो कुणी कसा केला ते यात गुलदस्त्यात ठेवलेलं नाही. त्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हेगाराने चिरेबंदी काम केल्याने, तपास करणार्यांना किती कठीण जातं आणि गुन्हेगाराच्या तोडीच्या बुद्धीमत्तेचाच कुणीतरी तपासकामात आल्यावर तपास कसा लागायला लागतो - आणि तरीही गुन्हा सिद्ध करणं हे अशक्यप्राय कसं ठरत जातं असं याचं स्वरूप.
गुन्ह्यामधे वेगवेगळ्या कारणांनी गुंतलेल्या व्यक्तींची गणित आणि इतर शास्त्रांच्या संदर्भातली संभाषणं हा "डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स"मधला सर्वाधिक आकर्षक भाग मला वाटला. P=NP या गणिती समस्येबद्दल मी ऐकलं होतं. त्याच्याबद्दलचं विवेचन हे कथानकाच्या समस्येशी आणून जोडणं हा भाग जमला आहे. गुन्ह्यांचं "वॉटरटाईट" वाटेल असं स्वरूप, त्यामागची "प्रतिभा", आणि शेवटी गुन्ह्याचा पुरता छडा गुन्हेगाराच्या स्वतःच्या काही समीकरणांमुळे लागणं - थोडक्यात गुन्ह्याच्या तपासाचा कंट्रोल जवळपास पूर्णपणे गुन्हेगाराच्या जवळ असणं हे मती गुंगवून ठेवणारं. वरील बाबींमुळे मला प्रिय असलेल्या "ब्रेकिंग बॅड" या सिरियलची थोडी आठवण मला झाली होती.
व्यक्तीरेखांच्या मनातल्या आणि चेहर्यावर दिसणार्या भावनांच्या चित्रणामधे "मिनिमालिझम" जाणवला. गुन्हेगार हा जरी थंड डोक्याने - परंतु अचूक प्रकारे - काम करत असला आणि म्हणून त्याचा सर्व आविर्भाव भावनारहित असला, तरीही बाकी बहुतांश पात्रांच्या मनातल्या भावनांच्या चित्रणाच्या जवळजवळ अभावामुळे मला हा जपानी संस्कृतीचाच एक भाग असावा किंवा कसे अशी शंका आली. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
"डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स" वाचल्यानंतर मी "दृष्यम" हा गाजलेला सिनेमा (हिंदीतून) पाहिला होता आणि तो सुद्धा आवडला ह्यात शंका नाही. सिनेमा बनवताना कादंबरीमधे आलेल्या विविध शास्त्रीय/गणिती कल्पनांबद्दलच्या विवेचनाला अर्थातच फाटा दिलेला आहे पण (अजिबात न जमलेली आणि अनावश्यक असलेली गाणी वगळतां) "दृष्यम" हा सिनेमा एक्दम स्मार्ट सिनेमा आहे आणि कादंबरीच्या मूळ कल्पनेला घेऊन, त्याला सिनेमात बसवताना आणि भारतीय संदर्भात ते सर्व चितारताना जे रसायन केले होते ते "जमले" होते खरे.
तर ह्या लेखकाची आधीची कादंब्री लईच्च आवडल्याने आणि त्यावरचा सुपरहिट्ट सिनेमाही खूप एंजॉय केल्याने त्याच माणसाची "मॅलिस" ही कादंबरी वाचली.
हाताची पाची बोटे सारखी नसतात त्यानुसार एकाच लेखकाच्या सर्व कादंबऱ्या आवडणं अशक्य. "मॅलिस" मला "डिव्होशन"इतकी आवडलेली नाही - किंवा तितक्या, डोक्याला झिणझिण्या येतील ह्या रीतीने ती चिरेबंदी बांधकाम केल्यासारखी नाहीये असं म्हणतो. (दोन्हीचा अर्थ एकच. "शोले" जमला म्हणून "शान" हिट होईल अशी ग्यारंटी नसते तसंच कायसंसं.)
आता "डिव्होशन" वाचून सात वर्षं होऊन गेली तरी इतपत आठवतंय की त्यामधल्या वेगवेगळ्या शास्त्रीय/गणिती संकल्पनांच्या विवेचनाने मजा आलेली होती. तसलं काही "मॅलिस"मधे नाहीये. पण अर्थात हे फारच दुय्यम-तिय्यम महत्त्वाचं आहे. माझा प्रॉब्लेम असा झाला की "मॅलिस"मधल्या गुन्ह्याची अपरिहार्यता आणि त्याचा उलगडा होत असताना जे दुवे मिळत जातात त्यामधला पक्केपणा माझ्यामते जमलेला नाहीये.
"डिव्होशन" आणि "मॅलिस" मधली साम्यं शोधायलाच गेलो तर बऱ्यापैकी. एकतर दोन्ही मर्डर मिस्ट्र्या. आणि दोन्हीमधे खून कोणी केला हे वाचकाला कळण्याकरता अगदी अखेरीपर्यंत थांबावं लागत नाही.
"डिव्होशन"मधे खून का केला, कुणी केला हे कळल्यानंतर तो नेमका कसा काय मॅनेज केला आणि पोलिसांना कुणी केला याची जवळजवळ खात्री पटूनही नेमके पुरावे मिळत कसे नाहीत आणि गुन्हेगाराची "ॲलिबाय" - म्हणजे खून झाला तेव्हा गुन्हेगार कुठे होता ते - त्याची बरोब्बर सगळी मांडणी "एअरटाईट" कशी असते हे आलेलं आहे. आणि ते फारच जमलेलं आहे. (अनेक जणांनी मूळ कादंबरी नाही वाचली तरी "दृष्यम" प्रचंड पॉप्युलर झाल्याने बहुतांश लोकांना हे नीट कळलेलं आहे.)
"डिव्होशन"मधे नकली "ॲलिबाय" अगदी हुबेहूब निर्माण करणं ही बाब पूर्ण कादंबरीच्या केंद्रस्थानी लेखकाने आणलेली आहे. "मॅलिस"मधे त्याची जागा "मोटिव्ह"ने म्हणजे गुन्ह्याच्या नेमक्या हेतूने घेतलेली आहे. म्हणजे कादंबरीच्या मध्यापर्यंत पोलिसांना खुनी कोण ते मिळाला आहे आणि गुन्हेगाराने अत्यंत काळजीपूर्वक निर्माण केलेली नकली "ॲलिबाय" सुद्धा खरी नसून पितळी आहे हे पोलिस अधिकारी दाखवून देतो. इतकंच नव्हे तर अपराधी आपला गुन्हा मान्यही करतो. मात्र इतकं करून गुन्हा करण्यामागचं नेमकं कारण अधिकाऱ्याला मिळत नाही आणि ते शोधण्यामधे कादंबरीचा उरलेला सुमारे चाळीस पन्नास टक्के भाग खर्ची पडतो.
माझ्यामते एकतर केवळ गुन्ह्याचा नेमका हेतू काय हे सिद्ध करण्याकरता गुन्हेगार आणि पोलिस अधिकाऱ्याने बुद्धीबळासारख्या एकमेकांच्या चाली-प्रतिचाली योजणे आणि त्या चालींना मात करत राहाणे हे पुरेसे परिणामकारक नाही. दुसरं असं की गुन्हेगाराने ज्या विशिष्ट पद्धतीने गुन्हा केला तो तसा करता आला कारण तो जमाना स्मार्ट फोन्स , फास्ट इंटरनेट, सोशल मिडियाचा नव्हता. मुद्दाम त्याकरता, कादम्बरी १९९६ साली घडते हे दाखवलं आहे. मात्र खून केल्यानंतर तो लपवण्याकरता मात्र १९९६ सालीच प्रचलित असलेली टेक्नॉलॉजी वापरलेली आहे.
२०१५-१६ च्या सुमारास प्रकाशित झालेल्या कादंबरीला, गुन्ह्यामागच्या सर्वात महत्त्वाच्या दुव्याकरता टॅक्नॉलॉजी वापरायची आहे मात्र पुरेशी प्रगत टेक्नॉलॉजी अस्तित्त्वात नव्हती (नाहीतर गुन्हा घडूच शकला नसता) हे दाखवण्याकरता ओढून ताणून १९९६ सालाइतपत मागे जावं लागतं....
तर मित्रांनो, "मॅलिस" तशी वाचनीय कादंबरी आहे. पण "डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स" जमली तशी अजिबात जमलेली नाहीये.
"शोले" जमला होता. "शान" अँटिक्लायमॅक्टिक वाटला. तसंच हे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
बरंय. गुन्हा उकल प्रकार
बरंय. गुन्हा उकल प्रकार ज्यांना आवडतो त्यांच्यासाठी कादंबरी आवडेल. पण काही तांत्रिक बाजूकडे लेखकाने लक्ष न दिल्यास कादंबरी फुसकी होऊ शकते. खून होण्यामागे जी कारणे असतात त्यात (मोटिव) मुख्य म्हणजे यात कुणाला आर्थिक/भावनिक फायदा होणार आहे याचा शोध पोलीस घेतात. कधी कधी फार हुशार गुन्हेगार चांगली वेळ येईपर्यंत थांबतात. मृत व्यक्तीचं कुणाशी बिनसलं की कामाला लागतात. मग खून झाल्यावर संशय त्या नवीन विरोधी व्यकतीभोवती घोंघावतो. मारल्याचे एक मानसिक समाधान हा गुन्हेगार मिळवतो इतकंच.
एकाच वेळी एकाच विषयावरची दोन
एकाच वेळी एकाच विषयावरची दोन पुस्तके वाचतोय. अमेरिकन डीप साऊथ.
लेखकांचा उद्देश अमेरिकन डीप साऊथ समजून घेणे.
दोन्ही लेखक तसे या दक्षिणी राज्यांशी प्रत्यक्ष थेट राहून परिचय नसलेले.
थरो बोस्टनजवळच्या मेडफर्डमधे वाढलेला, जग हिंडलेला आणि नायपॉल त्रिनिदादमधे बालपण घालवून इंग्लंडमधे स्थायिक झालेला.
पॉल थरोनी लिहिलेलं ' Deep South' २०१० नंतर अमेरिकेच्या दक्षिणेकडच्या 'त्या' राज्यांमध्ये एका वर्षाच्या चार सीझन्समधे स्वतः गाडी चालवत केलेल्या प्रवासाबद्दल,त्या भागांमधील चीप मोटेल्समधे राहून काळ्या,गोऱ्या लोकांना भेटून त्यांच्याशी गप्पा मारून लिहिलेले.
आणि व्ही एस नायपॉलने १९८०च्या दशकात लिहिलेले 'A turn in the south'. प्रतिथयश लेखक करतात त्याप्रमाणे अर्थातच विमानाने इकडे तिकडे जाऊन रिट्झ कार्लटन प्रकारच्या हॉटेलांमध्ये राहून काही काळी कुटुंबे, काळे नेते यांना भेटून, चर्चा, मुलाखती इत्यादी. (हे पूर्ण वाचून झाले नाहीये अजून)
पॉल थरोचे पुस्तक वाचताना त्रास होतो.त्यात आधी घडलेल्या विदारक घटनांना स्पर्श केलेला आहे. तसेच त्या भागातील सध्याची विविध कारणांनी झालेली फारशी चांगली नसलेली अवस्था,attitudes यांचे थेट वर्णन आहे.
नायपॉलचे पुस्तक वाचताना हा असा त्रास नाही. एक म्हणजे त्याची भाषा, बांधीव लेखनकौशल्य, दुसरे तो ज्या लोकांना भेटला त्या लोकांचा सामाजिक दर्जा आणि तिसरे तो काळ ( म्हणजे सिव्हिल राईट्स मुव्हमेंट यशस्वी (!) झाल्याला पंधरा वीस वर्षांच्या आतला,आणि अमेरिकेतून इंडस्ट्री चीन भारत व इतर देशांमध्ये एक्स्पोर्ट होण्यापूर्वीचा
थरोच्या पुस्तकातील डीप साऊथमधील गरीब गोऱ्यांचे वर्णन आणि प्रश्न वाचले की (उगाचच) सध्या सुरु असलेल्या मराठा आंदोलनाशी ( रिझर्व्हेशन वगळता ) साधर्म्य जाणवत राहते.
दुर्वर्तनाचा वेध
नुकतेच हे सुबोध जावडेकरांच्या लेखांचा संग्रह असलेले पुस्तक वाचले. त्यांत, माणुस अमुक एक प्रकारचा का व कसा असतो यावर फारच छान शास्त्रीय विवेचन वाचायला मिळते. माणुस खोटं का बोलतो, तो परोपकारी का असतो, स्वार्थी का असतो वगैरे मानवी स्वभावाचे अनेक पैलु, त्यावेळी मेंदुतल्या संबंधित भागांमध्ये होणाऱ्या घडामोडींवर प्रकाश टाकून दाखवले आहेत. जरुर वाचण्यासारखे आहे.
आउटलीव्ह - डॉ. पीटर आटीया
आउटलीव्ह - डॉ. पीटर आटीया
डॉ. शंतनू अभ्यंकर, राहून बनसोडे यांचे अचानक जाणे चटका लावून जाणारे होते. दोघांचेही वय हे निश्चितच जाण्याजोगे नव्हते. काही महिन्यांपूर्वी बुकरायण मध्ये आउटलीव्ह ह्या पुस्तकाचे परीक्षण आले होते. (https://www.loksatta.com/sampadkiya/columns/bookmark-outlive-the-science...). हे पुस्तक अजूनही न्यूयॉर्क टाईम्सच्या बेस्ट सेलर मध्ये आहे. मी ऑडीयो बुक प्रथम ऐकले तेव्हा ते संग्रही असण्याजोगे वाटले. त्यामुळे पुस्तक रुपात पुन्हा एकदा वाचतोय.
कॅन्सरच्या बाबतीत लेखकाचे मत असे आहे की, वयाच्या चाळीस-पन्नाशी नंतर कॅन्सर निदान करणार्या चाचण्या ठराविक कालावधीने करणे उत्तम. (उदा. डॉ. शंतनू यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये लिहिलेली टेस्ट, वा इतर) याला विरोधही आहे. कारण यात एक धोका असा आहे की, कॅन्सर नसणे आणि कॅन्सर आहे असे निदान होणे. हाही धोका आहेच की, कॅन्सर आहे पण एखादं चाचणीतून तो नाही असे कळणे. त्यामुळे कुठल्याही एकाच चाचणीवर अवलंबून राहू नये. पण यामुळे खर्च वाढू शकतो. जो एखाद्याला अनावश्यक वाटेल.
लेखक मेडीसीन ३.० चा आग्रही आहे (ज्याने मेडिकल पेशा खेरीज फायनान्शिअल रिस्क मॅनेजमेंटच्याही पेशात काम केले आहे), मेडीसीन २.० मध्ये कुठल्यातरी लक्षणानंतर निदानाच्या चाचण्या केल्या जातात तर मेडीकल ३.० मध्ये तुम्ही प्रोअॅक्टीव्ह असता. उदा. न जाणार्या तापाची लक्षणे दिसल्यावर डॉ. शंतनूंनी ती टेस्ट केली त्यानंतर कॅन्सरचे निदान झाले. पण जर का कॅन्सर अगदी प्राथमिक टप्प्यात असताना निदान झाले असते तर कदाचित उपचार करणे शक्यही झाले असते. कॅन्सरच्या बाबतीत लेखकाचे मत हेच आहे की, जितक्या लवकर कॅन्सर शोधला जाईल तितके उपचार यशस्वी होण्याची शक्यता अधिक. उशीर निदान झालेल्या कॅन्सरवरचे उपचार रोग्याला फारफार तर ७-८ वर्षाचे वाढीव आयुष्य देतात. फार क्वचित रोगी त्यातून पूर्ण बरा होतो. भविष्यात कॅन्सरवरच्या उपचाराबाबत खास करून इम्युनोथेरपीवर (जेनेटीकली मॉडीफाईड इम्यूनीटी जी कॅन्सरपेशी नष्ट करू शकतील) लेखक आशावादी आहे. (या उपचार पद्धतीवर लेखकाची गुंतवणूक आहे)
हृदयविकाराच्या बाबतीत लेखकाने केवळ एलडीएल कोलेस्ट्रॉल आयसोलेशन मध्ये न पहाता एपोबी आणि ट्रायग्लिसराईड्स च्या चाचण्या करण्यावर भर दिला आहे. तर न्यूरोडिजनरेटीव्ह (अल्झायमर ते पार्किन्सन) आजारांवर एपोइ-३ च्या काही चाचण्या त्याने सुचविल्या आहेत. कॅन्सरवर निदान उपचार आहेत पण अल्झायमर वर तर बिलकूल नाहीत. (पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा अल्झायमर वर औषध नव्हते. पण अल्झायमरवरही आता औषध आले आहे अशी बातमी बीबीसीवर होती.)
पण या सगळ्या रोगांचे मूळ हे पेशीच्या चयापचयाचे कार्य बिघडल्यामुळे होतात. आणि ते मुख्यत्वे बिघडते, आवश्यकतेपेक्षा अधिक कॅलरीज त्यातही सॅच्युरेटेड फॅट्स युक्त आहार घेण्यामुळे. पेशीच्या चयापचयाचे हे कार्य एकदा बिघडले की हृदयरोग, कॅन्सर, अल्झायमर इ. होण्याची शक्यता वाढत जाते आणि एकतर आयुष्यमान (lifespan) तरी कमी होते वा शरीराची कार्यक्षमता (healthspan) तरी घसरणीला लागते. माणसे जगतात पण ती औषधांवर.
यावर रामबाण उपाय आहे. तो म्हणजे संतुलित आहार, व्यायाम, पुरेशी सलग झोप, आणि भावनांचे योग्य संतुलन आणि काही सप्लिमेंट्स.
संतुलित आहार: यात प्रोटीन हे मुख्य आहेच त्याला पर्याय नाही. पण योग्य तेवढेच कार्बस आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स सुद्धा उपयोगी आहेत. (नट्स, अॅव्होकॅडो, ऑलिव्ह ऑइल अनसॅच्युरेटेड फॅट्स साठी चांगले पर्याय आहेत). आणि शक्यतो जितके टाळता येतील तितके सॅच्युरेटेड आणि ट्रान्सफॅट्स टाळणे हृदयासाठी उत्तम. बर्याच प्रक्रिया केलेल्या अन्नात (बाजारात मिळणारे प्रोसेसड पॅकेज फूड) मध्ये हे असतात. आणि एक, जेवणातल्या कोलेस्ट्रॉलचा आणि शरिरातल्या कोलेस्ट्रॉलचा काहीही संबंध नाही. डायेटची वर्गवारी त्याने ३ प्रकारात केली आहे. कॅलरी रिस्ट्रीक्शन (किती खाता? अक्षरशः मोजून मापून कॅलरीज आहार घेणे. मला हा पर्यार जास्त सूट होतो), डाएट रिस्ट्रीक्शन (काय खाता? वा काय खाणे टाळता) आणि टाईम रिस्ट्रीक्शन (कधी खाता?).
व्यायामः यात त्याने ३ गोष्टी सांगितल्या आहेत. १) हृदयाच्या कार्यक्षमतेसाठी खास करून अकाली हृदयरोगाचे विकार टाळण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी ३ तास झोन टू ट्रेनिंग (सायकल चालवणे, धावणे, चालणे इ.) गरजेचे आहे. यात तुम्ही फारसे लगेचच दमत नाही. पण चालताना वा धावताना तुम्ही सहज संवादही साधू शकत नाही. कधी कधी व्हीओटू मॅक्स म्हणजे हृदयाची सर्वात जास्त क्षमता वाढविण्यावरही भर द्यावा. उदा. वेगाने धावणे ज्यात तुम्ही लवकर थकता. २) अमेरिकेतले बरेचसे वृद्ध उतारवयात तोल जाऊन पडतात आणि अंथरूण धरतात. त्यामुळे रेझिस्टन्स ट्रेनिंग, स्टेबिलिटी ट्रेनींग आणि ग्रीप ट्रेनिंग यालाही महत्त्व आहे. लिन मास साठी-सत्तरी नंतर वेगाने कमी होत जाते. जसे बँक बॅलन्स उतार वयात उपयोगी पडतो तसेच लीन मासही उपयोगी पडते त्यामुळे रेझिस्टन्स ट्रेनिंग खूपच महत्त्वाचे आहे. रेझिस्टन्स ट्रेनिंग म्हणजे (सिक्स पॅक अॅब, डोलेशोले वा मॉडेलसारखी फिगर नव्हे जो माझा गैरसमज होता) तर कमीत कमी तुमच्या वजना इतपत वजन घेऊन चालण्याची क्षमता असली पाहिजे. स्टेबिलीटीसाठी त्याने काही श्वसनाचे आणि योगा मधल्या कॅट-काऊ पोश्चर वर भर दिला आहे.
झोप ही म्हत्वाची आहे खास करून सलग ८ तास झोप. जी माझीही कमीच आहे. खास करून डीप स्लीप.
मानसिक दृष्ट्या खचलेल्या व्यक्तीला १०० व्या वर्षात वा शेवटच्या दशकातले तुझे गोल्स काय असतील हे विचारून काही फायदा नसतो. त्यामुळे मानसिक, भावनिक दृष्ट्या आनंदी असणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.
लेखकाने एक लेख रेपामायसीनवर लिहिला आहे. तो वाचून मला वाटले हे जणू काही आधुनिक "अमृत" असावे. त्यावर अजूनही रँडमाईज्ड कंट्रोल ट्रायल्स चालू आहेत (आणि यातही लेखकाची गुंतवणूक आहे) आणि त्याच्या उपयुक्ततेबद्धल तो आशावादी आहे.
मराठी भाषेला आज अभिजात भाषेचा
मराठी भाषेला आज अभिजात भाषेचा दर्जा मिळाला!
अभिनंदन!
अकराव्या शतकाच्या पूर्वार्धात लिहिला गेलेला ज्योतिपरत्नमाला हा मराठीतील पहिला ग्रंथ होय, असे मत राजवाड्यांनी व्यक्त केले पण त्याची भाषा उत्तरकालीन वाटते. सन ११८८ मध्ये लिहिला गेलेला⇨मुकुंदराजांचा विवेकसिंधु हा मराठीतील पहिला ग्रंथ, असे एक मत आहे पण...
निर्विवाद पुराव्यानेच बोलावयाचे असेल, तर सु. १२७८ मध्ये⇨म्हाइंभट्टांनी (मृ.सु. १३००) संकलित केलेले लीळाचरित्र हा मराठीतील पहिला ग्रंथ म्हणता येईल. हा गद्य आहे हा त्याचा एक विशेष आहे.
>>>त्या पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधर आणि संघटक नागदेवाचार्य यांनी आपल्या पंथाच्या अनुयायांनी सर्वत्र मराठीचाच वापर केला पाहिजे, असा आग्रह धरला होता..>>
https://vishwakosh.marathi.gov.in/40923/
>>>त्या पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधर आणि संघटक नागदेवाचार्य यांनी आपल्या पंथाच्या अनुयायांनी सर्वत्र मराठीचाच वापर केला पाहिजे, असा आग्रह धरला होता..>> म्हणजे तेव्हापासून ...
Button Button. Uncanny
Button Button. Uncanny Stories.
Richard Matheson.
ह्या पुस्तकातील “Button Button.” ही कथा वाचण्याचा योग आला. ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखक लिहीतो “ह्या कथेची कल्पना मला माझ्या पत्नीकडून मिळाली. ती मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना वर्गात एका प्रयोगाची चर्चा झाली. समजा तुम्हाला जर कोणी आवाहन केले कि न्यू यॉर्कच्या ब्रॉडवे वरून तुम्ही नग्न अवस्थेत चालत गेलात तर जगात शांतता नांदेल. तुम्ही हे आव्हान स्वीकाराल?”
“बटन बटन” ह्या कथेचा थोडक्यात गोषवारा असा आहे. मिस्टर आणि मिसेस लुईस ह्याना एक पार्सल पोस्टाने येते. पार्सलचया आत काचेच्या घुमटात एक पुश बटन असते. आणि एका लिफाफ्यात संदेश असतो.
“मिस्टर स्ट्यूअर्ड रात्री आठ वाजता आपल्याला भेटतील.”
रात्री खरच त्याना भेटायला एक माणूस- मिस्टर स्ट्यूअर्ड- येतो. लुईस दांपत्या त्याला सेल्समन समजतात आणि त्याला हाकलायचा प्रयत्न करतात.
पण तो त्याना मोहात पाडेल अशी ऑफर देतो. ऑफर अशी असते कि त्यांनी ते बटन दाबले की जगात कुठेतरी एका माणसाचा मृत्यू होईल. त्यांना माहित नसलेल्या कुणा एका अज्ञात व्यक्तीचा. त्याच्या बदल्यात त्यांना ५०००० डॉलर्स मिळतील.
त्यावरून नवरा बायकोंमध्ये वाद होतात. पत्नीचे म्हणणे असते कि बटन दाबावे. नाही तरी जगात कित्येक लोक मरत आहेत. आपण बटन दाबले नाही तरी मृत्यू व्हायचे काही थांबणार नाहीये. ज्यांचा मृत्यू होईल त्याची नि आपली ना ओळख ना देख. जगात भुकेले, रोगराईने ग्रस्त, दुर्दैवी जीव आहेत. मरेल त्यातला एक. सुटेल बिचारा.”
नवऱ्याच्यामते बटन दाबणे म्हणजे खून करण्या सारखे आहे, अनैतिक आहे. तो ह्याला राजी नसतो.
खर तर त्यांना पैशाची गरज नसते. पण जेव्हा संधी चालून येते तेव्हा त्या स्त्रीला पैशाचे मोल पटते. त्यांची अपुरी स्पप्ने साकार करण्याची संधी आयती समोर आली असते.
शेवटी नवरा कामावर गेला असताना ती बटन दाबते. काय झाले? काही नाही. सो सिम्पल!
पुढे काय होते?
तुम्हाला ही कथा नेटवर मिळेल अवश्य वाचा.
आता पूर्ण कथा संग्रह मिळवून वाचतो. काही खास मिळाले तर इथे लिहीन.
...
गोष्ट (तेवढी एकच) जालावर इथे उपलब्ध आहे.
तूर्तास वरवर चाळली. सवडीने नंतर फुरसतीने पूर्ण वाचेन. मात्र, नेहमीच्या वाईट सवयीप्रमाणे, शेवटी काय होते, ते अगोदर वाचले; 'पंचलाइन' (?) रोचक आहे, नक्कीच!
बाकी,
"स्टेवार्ड"?????? ("स्ट्यूअर्ड"/"स्टूअर्ड" नव्हे काय?)
(अर्थात, "न्यूअर्क"/"नूअर्क"लाही "नेवार्क" म्हणून संबोधणारे महाभाग महाराष्ट्रजनांत सापडतातच, म्हणा! मात्र, "मुंबई"ला "बॉम्बे" म्हटले, तर रस्त्यात गाठून हाणतील!)
असो चालायचेच.
अरेरे. माझे चुकलेच की. आमच्या
अरेरे. माझे चुकलेच की. आमच्या पुण्यात नूमवि नावाची शाळा आहे.तिथे शिक्षण झाल्यामुळे असेल. तरी मी नेहमी उच्चार आधी बघून घेतोच. आता नेट वर बघून संपादन करेन.
कित्येक दिवस मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. पण तुम्ही रागवाल म्हणून धैर्य होत नाही. आज नाही, पुन्हा केव्हातरी.
संपादन केले आहे हो.
https://archive.org/details/buttonbuttonunca0000math
इथे संपूर्ण पुस्तक वाचायला मिळेल. मेम्बर व्हा आणि वाचा.
वामकुक्षी
नबांनी लिंक दिलेले अत्र्यांचे वामकुक्षी वाचले. मोजून सात कथा आहेत पण प्रत्येक कथेत १९४५-१९५५ या दरम्यानच्या काळाचे संदर्भ मिळतात. पहिली कथा "पाठीवरचे वळ" खूपच आवडली. अगदी आजच्या काळातही लागू पडेल अशी कथा आहे. रेल्वेच्या डब्याएवजी आजची कथा कदाचित सोशल मिडियावर घडेल इतकेच. "कावळे संमेलन", "मास्तर आणि पोलिस" मधून त्यावेळच्या लोकांच्या उत्पन्नाची आणि खर्चाची कल्पना येते. त्या काळातल्या वर्तमानपत्रांचे संदर्भ मिळतात. "काळ आणि कादंबरी" ही कथा अत्रे स्पेशल आहे असे म्हणू शकतो. त्यांनी कादंबरी लेखकांना (खास करून ना. सि. फडक्यांना त्यांच्या "अखेरचे बंड" या कादंबरीवरून) शिंगावर घेतले आहे असे वाटले. तात्कालिन संदर्भ कदाचित असावेत या कथेत. शेवटची कथा "समुद्राची देणगी" चांगली रंगवली आहे पण फारच काल्पनिक वाटली. तरीही त्या काळातले बरेच संदर्भ या निमित्ताने कळले. गुगलकृपेने डिटमर दिवे म्हणजे काय ते कळले. रामदास बोटीचेही संदर्भ या निमित्ताने शोधले. मंटोच्या कथातूनही या काळातल्या मुंबईचे आणि पाकिस्तानाचे संदर्भ मिळतात. मंटोच्या कथा अश्लील नाहीत पण नागडं वास्तव सांगणार्या आहेत त्यामुळे त्या सगळ्यांनाच आवडतील असे नाही.
.
मीही जवळपास सगळ्या कथा वाचल्या. मला त्यातले बरेच संदर्भ लागले माहीत पण तरीही कथा आवडल्या. शेवटची अगदीच सेंटी आहे. पण निसर्गाचं वर्णन फार सुंदर केलं आहे. या कथा वाचत असताना एकीकडे मिरासदारीही वाचत आहे. त्यातले काही संदर्भ वाचून हे आजच्या काळात कुणी लिहिलं तर लोक त्यावर आक्षेप घेतील असं वाटलं. एका कथेत १०-१२ वर्षांची मुलं एका खड्ड्यात उतरून विड्या ओढतात. ती कथा इतकी मजेदार आहे पण आजच्या काळात.ती लहान मुलांना वाचायला दिली तर केवढा गहजब होईल असा विचार करून मजा वाटली. ते पुस्तक लहान मुलांचं नाही पण ते लहान मुलांना (कुमार गटातल्या) आवडेल असं आहे.
जेन एअर
काल उलगडवून दाखविणार्या कादंबर्या वाचायला आवडतात. गेल्या महिन्यात मी शार्लेट ब्रॉन्टेची जेन एअर ही प्रसिद्ध कादंबरी वाचून संपवली. गतकाळाचे धागेदोरे शोधणार्यांना ही कादंबरी आवडू शकेल.
शार्लेटने साधारण तिच्या वीशीत असताना ही कादंबरी लिहिलेली आहे. कादंबरीतले काही प्रसंग तिच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवरून रंगविलेले आहेत. त्यामुळे कादंबरीचा काळ हा माझ्या मते जवळ जवळ १८२५-१८३५ च्या आसपास असायला हवा. पण कादंबरी वाचण्यासाठी मदत म्हणून बनविलेल्या या वेबसाईटवरून (https://jane-eyre.guidesite.co.uk/timeline) तो काळ साधारण १८०० च्या आसपासची असावा असेही म्हणता येते. एकंदर कादंबरी वाचताना एकोणवीसाव्या शतकाच्या पूर्वाधातला हा काळ खूप चांगला उभा राहतो.
त्याकाळात स्त्रियांना कादंबरी प्रकाशित करण्यास संघर्ष करावा लागत होता. जेन ऑस्टीनच्या कादंबर्यांच्या प्रकाशनाचा काळही साधारण १८१०-१८२० आहे. पण जेन ऑस्टीन तेव्हा ४०च्या उंबरठ्यावर होती आणि तिने कादंबरी प्रकाशित करण्याची आर्थिक जोखिम स्वतः घेतली. ब्राँटे भगिनींनी नावं बदलून कादंबरी प्रकाशित केली होती.
कादंबरीवर बरेच चित्रपट आणि सिरिज आलेल्या आहेत. मी २०११ चा चित्रपटही पाहिला. तोही आवडला. पण नेहमीप्रमाणे कादंबरीतल्या सगळ्याच घटनांना तो न्याय देत नाही.
वाचताना एक प्रश्न भुंग्यासारखा त्रास देत होता. त्या काळात रात्रीच्या जेवणाच्या आणि सपरच्या नेमक्या वेळा काय असव्यात. जालावर शोधताना ही वेबसाईट सापडली https://www.foodtimeline.org/foodfaq7.html . एकंदर मध्य युगापासून ते औद्योगिकरणाला सुरुवात झाल्यावर वा महिला मोठ्या प्रमाणावर "वर्क फोर्स" मध्ये आल्यावर जेवणाच्या वेळा या युरोपात बदलत गेल्या आहेत हे समजले.
१९व्या शतकाच्या पूर्वाधात ५०-६० मैल प्रवास करताना दिवस जात होता (अर्थात हिवाळ्यातला). चार घोडे लावलेली घोडागाडी सार्वजनिक प्रवासासाठी वापरली जात होती. वाटेत जेवणासाठी थांबण्याच्या सोयी होत्या. या सगळ्याचे सुरेख वर्णन यात येते. इंग्लंड मधल्या निराधार, अनाथ मुलांचे आयुष्य किती कष्टप्रद होते याची झलकही या कादंबरीत वाचायला मिळते. साथीच्या रोगामध्ये (बहुतेक टिबी) अनाथाश्रमातली/बोर्डींग स्कूलमधील मूले त्या काळात दगावत होती. ब्राँटे भगिनींची भावंडही अशीच दगावली होती.एकंदर समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन संकुचित असावा त्या काळात, कादंबरीतले मुख्य पात्र त्यावर आपल्या भावना मोकळ्या करताना दिसते.
अनाथ जेनला दूरच्या नातेवाईकाकडून (काका) वारस म्हणून २०,००० पौंड मिळतात. २०,००० पौंड ही त्याकाळात नक्कीच मोठी रक्कम होती. जेन ती इतर चुलत भावडांमध्ये वाटते, प्रत्येकी ५,००० पौंड. ही रक्कमही आयुष्यभर कुणाची चाकरी करण्याची गरज पडणार नाही इतपत मोठी आहे. कारण वर्षाकाठी ३० पौंड पगार मिळतोय.
भारताचे संदर्भ: त्याकाळातली सामान्य ब्रिटीश लोकांच्या नजरेत भारत कसा होता? ते भारतीयांबद्धल काय विचार करत असतील हे सुद्धा या कादंबरीतून कळते. संदर्भासाठी, ब्रिटिशांचा अंमल बंगालप्रांतात सुरू झाल्यावर सुरुवातीला विल्यम जोन्सने कालिदासाच्या शाकुंतलचे इंग्रजीत भाषांतर (१७८९) करून घेतले होते. आणि १७९५ मध्ये बंगालात राज्य करण्याची स्ट्रॅटेजी म्हणून मनुस्मृतीचे भाषांतर केले होते. त्यामुळे एकंदर भारताबद्धल/हिंदूंबद्धल/त्यांच्या संस्कृतीबद्धल/श्रद्धांबद्धल तत्कालिन सामान्य ब्रिटीश लोकांच्या मनात जे काही भाव असावेत ते या निवडक भाषांतरीत साहित्य आणि इतर सांगोवांगी गप्पागोष्टीमधून झाले असण्याची दाट शक्यता आहे. आणि याचे प्रतिबिंब या कादंबरीत उमटलेले दिसते. या कादंबरीत आपल्याला ब्रह्मदेवाचा, जगन्नाथाचा संदर्भ दिसतो. कादंबरीतील खलनायकी पात्रांच्या तोंडी (मि. ब्रॉकलहर्स्ट) भारतीयांना ख्रिश्चियानिटी शिकविण्याचा उल्लेख येतो. ब्रह्मदेव / जगन्नाथाची प्रार्थना करणारे (जेन प्रमाणे) हे परमेश्वराचे भरकटलेले कोकरू आहेत इ. असे संवाद येतात. त्यामुळे भारतीयांना योग्य तो रस्ता दाखविण्यासाठी सिंट जोन सारखी मंडळी संसाराची राख रांगोळी करून इतक्यादूर "चर्चचा" उपदेश देण्यासाठी भारतात यायला तयार असतात. त्यासाठी हिंदी शिकण्याचीही तयारी ठेवतात.
एकंदर दोनही बहिणींच्या कादंबर्या तत्कालिन संदर्भ लक्षात घेता ह्या विद्रोही स्वरुपाच्या आहेत. एमिलीची वुदरींग हाईट ही टोकाचे मानवी नातेसंबंध, प्रेम, सूड इ. भावनांचे रासवट, दांडगट चित्र रेखाटणारी कादंबरी आहे (जी नक्कीच जेन ऑस्टीनच्या कादंबर्यांपेक्षा वेगळी आहे). तर शार्लेटच्या जेन एअर या कादंबरीतही विद्रोह दिसून येतो. प्रेमकथातील नायिका वीशीतली तरुणी तर नायक चाळीशी पार केलेला मध्यमवयीन गृहस्त, एकंदर स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोनावर जेनच्या तोंडी घातलेली वाक्य, जेनचा एकंदर स्वतःचा स्वाभिमान जपणं इ. बाबीवरून त्याकाळातली ही विद्रोही म्हणावी अशी कादंबरी आहे.