सध्या काय वाचताय? - भाग ३०
बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते; एखादा दीर्घ लेख आवडतो; वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते; पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्राचा इतिहास (१७०७ ते
महाराष्ट्राचा इतिहास (१७०७ ते १८१८) हे डॉ. वि. गो. खोबरेकर यांनी लिहिलेले आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबै यांनी प्रकाशीत केलेले पुस्तक वाचत आहे. पुस्तकाची पिडिएफ आणि इपब मोफत उपलब्ध आहे. हे पुस्तक वाचताना पानोपानी धक्के बसत जातात. शिवाजीनंतरचे मराठी राज्यकर्ते काय लायकीचे होते हे वाचताना मन विषण्ण होते. आजकाल शाहु महान, ताराबाईही महान, आंग्रे महान, पेशवे लै लै महान, संताजी- धनाजी तर काय महानच, शिंदे, होळकर महान वगैरेचा काळ आलाय. यांचे पाय कसे मातीचे होते आणि शिवाजी सोडला तर ध्येय वगैरेशी बाकीच्या राज्यकर्त्यांची बांधीलकी काय दर्जाची होती याचे दर्शन घडते. ॲनार्की वाचताना हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
महाराष्ट्र राज्य सा सं मंडळ
त्या वेबसाईट वरील भारतीय मुसलमान हे वसंत नगरकर आणि माटे, जी टी कुलकर्णी यांनी लिहिलेले पुस्तक पण छान आहे.
डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता
दुवा?
कृपया पुस्तकाच्या e प्रतीचा दुवा पुरवावा.
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
इथे
https://sahitya.marathi.gov.in/%E0%A4%87-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0...
इथे सापडले, क्रमांक ३६८
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना
धन्यवाद!
Thanks!
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
वाह वाह!!! _/\_
वाह वाह!!! _/\_
इ एच कारच "WHAT IS HISTROTY".
ई एच कार च इतिहास म्हणजे काय हे पुस्तक वाचले आहे का? इथे त्यावर चर्चा झाली आहे का? असेल तर वाचायला नसेल तर करायला आवडेल.
(पुस्तकांविषयीच्या चर्चा ह्या धाग्यात होतात म्हणून प्रश्न इथे हलवला आहे. - संपादक)
डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता
‘अव-काळाचे आर्त’ सदरात आज ‘V
‘अव-काळाचे आर्त’ सदरात आज ‘V for Vendetta’विषयी आदूबाळ.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
The Dispossessed: an ambiguous utopia
स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय, खऱ्या अर्थाने स्वतंत्र असणे म्हणजे काय हा माणसासमोरचा बराच जुनाच प्रश्न आहे. गेल्या अनेक शतकांमध्ये ह्या प्रश्नाच्या मुळाशी जाणाऱ्या विचारसरणी उदयास आल्या. ॲनार्किजम किंवा स्वातंत्र्यवादी समाजवाद हा अशा प्रकारच्या एकोणिसाव्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बऱ्यापैकी प्रसिद्ध असलेल्या विचारसरणींचा गट आहे. अराजक म्हटलं की बहुतेक लोकांच्या डोळ्यासमोर गुंडगिरी, तोडफोड, दहशत वगैरे प्रकार येतात, पण सर्व प्रकारच्या केंद्रीय सत्तास्थानांना विरोध करणाऱ्या ह्या विचारसरणीला मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यवाद (लिबर्टेरियनजम) आणि समाजवाद (सोशलिजम) ह्या एकमेकांपासून अतिदूर असणाऱ्या विचारधारा आहेत आणि त्यामुळे स्वातंत्र्यवादी समाजवाद हीच मुळी विरोधाभासी संज्ञा आहे असं अनेकांना वाटू शकतं. थोडं खोलात जाऊन पाहिलं तर (किंवा लिबर्टेरियन शब्दाचा इतिहास पाहिला) तर त्यात फार तथ्य नाही असं दिसतं. हाव आणि परस्परस्पर्धा ह्याऐवजी परस्परमदत ह्या तत्त्वावर आधारित समाजाची मांडणी होऊ शकते का? लोकांनी काम करण्यामागे केवळ बाह्य कारणेच (वरिष्ठांचा दबाव, मालकाचे/बॉसचे आदेश, अर्थार्जनाची गरज) असतात की स्वयंप्रेरणा पुरेशी असू शकते? व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजाप्रती असलेलं उत्तरदायित्व ह्यांचा मेळ कशा प्रकारे घालता येतो? सामूहिकता (collectivism) आणि एकसारखेपणा (conformity) ह्यात फरक असू शकतो का?
ह्या आणि अशा अनेक प्रश्नांचा वेध घेणारी 'द डिस्पझेस्ड: ॲन अँबिग्युअस युटोपिया' ही उर्सुला के. ल ग्विन ह्या अमेरिकन लेखिकेची कादंबरी अलिकडेच ऑडिओबुक स्वरूपात ऐकली. आकाशगंगेतल्या एका ताऱ्याभोवतीच्या ग्रह-उपग्रहाच्या जोडगोळीवर ही गोष्ट घडते. ग्रह हा नैसर्गिकदृष्ट्या अगदी संपन्न, तर त्या तुलनेत उपग्रह हा नैसर्गिक साधनसंपत्ती बरीच कमी असलेला. कथा घडते त्याच्या सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वी ग्रहावरचे काही गरीब कामगार उठाव करतात आणि ग्रहापासून दूर उपग्रहावर आपली ॲनार्किस्ट वसाहत स्थापतात. पुढच्या सात-आठ पिढ्या ग्रहावरील लोक (जी व्यवस्था बऱ्यापैकी आपल्यासारखी आहे) आणि उपग्रहावरील लोक एकमेकांशी अगदी कमी संपर्क साधत स्वतंत्रपणे विकसित होतात. ह्या उपग्रहावरच्या ॲनार्किस्ट समाजातला एक भौतिकशास्त्रज्ञ पुढच्या संशोधनासाठी ग्रहावर जातो हा कथेचा मुख्य भाग. हा ॲनार्किस्ट समाज रंगवताना लेखिकेने खूप मुळापासून विचार केला आहे. प्रेम, दु:ख, अहंभाव, परस्परमदत, स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष संबंध, अशा व्यवस्थेत येऊ शकणारं साचलेपण अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे. अशा तिऱ्हाइताच्या (ग्रहावर गेलेल्या भौतिकशास्त्रज्ञाच्या) दृष्टिकोनातून बघितल्यावर आपण ज्या अनेक गोष्टी खूप विचार न करता गृहित धरलेल्या असतात त्यांतले अंतर्विरोधही समोर येऊ शकतात. हा रंगवलेला युटोपिया गुडी-गुडी स्वप्नरंजनासारखा नसून शीर्षकात म्हटल्याप्रमाणे संदिग्ध आहे ही गोष्ट विशेष आवडली. पुस्तक अवश्य वाचावं अशी शिफारस करेन. पाच तारे.
धन्यवाद
वाचीन/ऐकीन म्हणतो. "द लेफ्ट हँड ऑफ डार्कनेस" ही उर्सुला के. ल ग्विन ह्यांचीच कादंबरी फार वर्षांपूर्वी वाचली होती.
==================
जगातला सगळ्यात भारी टाईम पास!!
‘पॅराडाईझ’
‘पॅराडाईझ’ ही अब्दुल रझ्झाक गुर्ना यांची कादंबरी.
https://hindikahani.hindi
https://hindikahani.hindi-kavita.com/HK-Indira-Goswami.php
इन्दिरा गोस्वामी यांची ही 'नीलकंठी ब्रज' कादंबरी वाचली. वृंदावन धाम मध्ये रहाणार्या विधवांचे जीवन किती भयंकर आहे. बाप रे! अंगावरती काटा येतो वाचून. या विधवांची इच्छा आहे की त्यांच्या मरणोपरान्त त्यांचे शास्त्रयुक्त दहन व्हावे त्याकरता त्या पै पै जोडतात. त्यांचे शोषण होते, फसवल्या जातात.
नंतर यासंदर्भात सर्चेस देता, पुढील नियत/अनियतकालिक सापडले.
https://emanjari.com/wp-content/uploads/2019/04/Manjari-12tedi.pdf
नीलकंठी ब्रज वाचताना इतके विदारक वर्णन, अनुभव करु शकले की शेवटी असे वाटले काही जन्म जगून आले. आपण किती सुरक्षित, शेल्टरड जीवन जगत असतो.
शेवटी धर्म, देव याबद्दलही मनात प्रश्न उठू लागतात.
Whole Numbers and Half Truths
आकडे म्हणजे सर्वसत्य नाही. संबंधित विषयाची माहिती घेतल्याशिवाय आकड्यांचा अर्थ लावता येत माही. आकडे गोळा करण्याची चौकट तयार करणाऱ्या संख्याशास्त्री, गोळा करणारी असंख्य माणसं, आणि त्यांतून गोळाबेरीज चित्र मांडणाऱ्या पत्रकार रूक्मिणी एस. अशा सगळ्यांचं जेव्हा आपल्या कामावर प्रेम असतं आणि त्या कष्टांमुळे सामान्य लोकांना फायदा व्हावा असं वाटत असतं, त्यातून हे पुस्तक येतं.
काल लोकसत्तेत आलेला हा परिचयही चांगला आहे, आणि पुस्तकही. जरूर वाचा.
खुस्पट काढलंच पाहिजे. काही आलेखांची मांडणी सुधारायला जागा आहे. (कमीतकमी शाई आणि रंगांमध्ये काढलेले आलेख चांगले समजले जातात.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
Creative Pasts: Historical Memory And Identity In Western India
https://www.amazon.in/Creative-Pasts-Historical-Identity-1700-1960/dp/81... प्राची देशपांडे यांचं 'Creative Pasts: Historical Memory And Identity In Western India 1700-1960' वाचतोय.
डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता
सदर पुस्तक नुकतेच वाचून
सदर पुस्तक नुकतेच वाचून संपवले. बखरींपासून ते आजतागायतचा महाराष्ट्रातील ऐतिहासिक नोंदी ठेवण्याच्या इतिहासाचा उत्तम आढावा घेतलेला आहे. तब्बल २६ पानांच्या तळटीपा आणि २२ पानांची Bibliography वरून लेखिकेने घेतलेल्या परीश्रमाचीही कल्पना येते.
रान - शिवार - गाव
कॉनरॉड रिक्टर यांच्या त्रयीचे जी ए कुलकर्णी यांनी केलेले अनुवाद वाचत आहे. पहिली दोन पुस्तके 'द ट्रीज' आणि 'द फिल्ड्स' अशी आहेत. त्याचे जी एंनी 'रान' आणि 'शिवार' या नावाने अनुवाद केलेले आहेत. ते वाचून झाले. एकाच स्त्रीचे जीवन शिकारी - अन्न गोळा करणार्या जीवनशैलीमध्ये 'रान' या पुस्तकात आहेत. तिचेच जीवन पुढे शेती व्यवस्थेत कसे बदलत जाते हे 'शिवार'मध्ये येते. तिसरे पुस्तक 'गांव' हे आहे, ते आता वाचत आहे.
दोन्ही पुस्तके स्लो बर्निंग प्रकारची असून हळूहळू पकड घेत जातात. जी ए म्हटलं की भाषेचा जी एक खास शैली असते, तिचा प्रत्यय इथे येतोच. १७-१८व्या शतकातील अमेरिकेत गोर्या लोकांच्या वसाहती होत असतानाचे जीवन, त्यातील संघर्ष, रितीभाती यांचे अगदी चित्रदर्शी वर्णन वाचून सध्याच्या अमेरिकेत लोक असे का वागत असावेत, याचा काही प्रमाणात उलगडा होतो. एक चांगला वाचन अनुभव, जरूर वाचा.
नायजेरियातलं साठच्या दशकातलं यादवी युद्ध.
नायजेरियात साठच्या शतकाच्या उत्तरार्धात यादवी युद्ध झालं. स्वातंत्र्यानंतर पूर्वेकडे राहणारे इग्बो (इबो?) लोक विरुद्ध बाकीचे, असंही याचं स्वरूप होतं. तीन वर्षं बायफ्रा नावाचा देश पूर्व नायजेरियात होता. अमेरिका, ब्रिटन, रशिया इत्यादींनी यात नायजेरियाची बाजू घेतली आणि बायफ्रा टिकला नाही. चिमामांडा नगोझी अडेचीई यांनी त्या काळातले संदर्भ वाचून लिहिलेली कादंबरी, Half of a Yellow Sun वाचली.
मध्यमवर्गीय घरात घडणारी ही गोष्ट. ह्या घरात काम करणारा आणि गरीब घरचा, खेडूत, जेमतेम दुसरी पास झालेला उगवु नसुक्का विद्यापीठात शिकवणाऱ्या जोडप्याच्या घरी कामाला येतो. श्रीमंत व्यावसायिकांच्या पोटी जन्माला आलेली आणि आता डाव्या विचारसरणीची झालेली समाजशास्त्रज्ञ ओलान्ना, आणि अशिक्षित आईच्या पोटी जन्माला आलेला पण आता विद्यापीठात गणित शिकवणारा ओडेनिग्बो हे ते जोडपं. ओलान्नाची जुळी बहिण कैनिनी आणि तिचा बॉयफ्रेंड, ब्रिटिश, लेखक रिचर्ड अशा पात्रांची कथनं कादंबरीत आहेत.
एका बाजूला माणसांमधली नाती, संबंध, ताणेबाणे आणि दुसरीकडे दोन जमाती, टोळ्यांमधल्या भांडणांमुळे झालेलं युद्ध, युद्धकाळात बायफ्रन लोकांची उपासमार ही महत्त्वाची पात्रं आहेतच.
यांपलीकडे मला ममव दृष्टिकोनातून दिसलेल्या गोष्टी. नायजेरियन मध्यमवर्गातल्या आणि गरीब घरांतल्याही स्त्रियांना असणारं लैंगिक स्वातंत्र्य. ह्या स्त्रिया लग्न करतात किंवा करत नाहीत. लग्न न करताही ह्या स्त्रिया पुरुषांबरोबर झोपतात; त्यांना मुलं होतात; आणि त्याबद्दल बहुतेक कुणी तरुण, मध्यमवयीन लोकांना काही आक्षेप नसावा असं वाटतं. मध्यंतरी मी शांता गोखल्यांचं मेम्वार वाचलं. त्या शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेल्या, आणि ह्या कादंबरीतल्या जुळ्या बहिणी, ओलान्ना आणि कैनिनी, साधारण त्याच वयाच्या, त्याही इंग्लंडमध्ये शिकलेल्या आहेत.
कादंबरीची सुरुवात १९६०च्या दशकाच्या सुरुवातीला होते तेव्हा ओलान्नानं ओडेनिग्बोशी लग्न केलेलं नाही. यादवी युद्ध सुरू होतं आणि त्यांना आपलं नसुक्काचं राहतं घर सोडून पळावं लागतं. पुढचं घरही सोडून त्याच गावात एका खोलीत राहण्याची वेळ येते. तोवर ओलान्नानं खूप हिंसा बघून झाली असते; स्वतःच्या घरच्या लोकांची मृत शरीरं बघितलेली असतात; त्यानंतर डिप्रेशनमधून ती बाहेर येते. आणि त्यानंतर ती लग्नाला होकार देते.
कैनिनीनं कादंबरीच्या शेवटापर्यंत रिचर्डशी लग्न केलेलं नाही. बायफ्रा देश तयार झाला तोवर रिचर्ड इग्बो बोलायला शिकलेला असतो. त्याला त्याच्या गोरेपणातून मिळणाऱ्या मानसन्मानाची जाणीव असतेच. बायफ्रा तयार होतो तेव्हा तो स्वतःला बायफ्रन समजायला लागतो. यादवी युद्ध सुरू झाल्यावर काही काळानं बायफ्राच्या बाजूनं तो पाश्चात्त्य वर्तमानपत्रांसाठी लेखनही करतो; यात त्याच्या गोरा असण्याचा फायदा होईल हे गणित त्यात सगळ्यांनाच मान्य असतं. कधी वेळ पडेल तेव्हा बायफ्रा आणि इग्बो लोकांच्या बाजूनं बोलताना तो कैनिनीचा उल्लेख आपली बायको किंवा फियान्से आहे असाही करतो.
कैनिनी सुरुवातीला थंड आणि व्यवहारी, काहीशी दुष्ट वाटावी अशी दाखवली आहे. युद्ध सुरू होतं तेव्हा ती त्यातून चिकार पैसाही कमावते. नंतर तिला बायफ्रन लोकांची होणारी उपासमार समजते, दिसायला लागते. आणि ती आपली सगळी शक्ती, वेळ, ओळखीपाळखी, सगळंच वापरून निर्वासितांना जमेल तितकी मदत करते. कादंबरीच्या शेवटाकडे, युद्ध संपत यायला लागतं; कैनिनीकडेही फार काही राहिलेलं नाही. ती व्यापारासाठी नायजेरियात जाते आणि परत येत नाही. (ज्यांच्यात असा बदल होतो, कोरडेपणा सोडून माणूसकी दाखवायला लागतात, अशी पात्रं बऱ्याच ललित लेखनांमध्ये मरतात, गायब होतात, वगैरे. You cannot go back home.)
रिचर्ड लेखक असतो. युद्धाच्या आधी तो नायजेरियात येतो तेव्हा त्याला तिथल्या संस्कृतीबद्दल कादंबरी लिहिण्याची इच्छा असते. आधीच्या दोन कादंबऱ्या काही कारणानं बारगळतात. युद्धकाळात तो नवी कादंबरी लिहायला सुरुवात करतो - The world was silent when we were dying.
कादंबरीच्या शेवटी रिचर्डला आपलं उपरेपण लक्षात येतं. आणि उगवूनं लिहायला सुरुवात केलेली आहे - Life in a country - असं शीर्षक असेल असं तो रिचर्डला सांगतो.
(या कादंबरीवर नायजेरियन-ब्रिटिश सिनेमाही बनवलेला आहे. तो मी बघितलेला नाही.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
‘टोळ्यां’च्या सहअस्तित्वाची कथा!
‘टोळ्यां’च्या सहअस्तित्वाची कथा!
बॅटमन यांनी लिहिलेले डॉ. सुमित गुहा यांच्या पुस्तकाचे परीक्षण माहितीपूर्ण आहे.
या करारांची भाषा अर्थातच इंग्रजी/मराठी असावी. टोळी प्रमुखाला समजा आजूबाजूच्या भाषा समजत असल्या तरी लिहिता वाचता येण्याची शक्यता कमी वाटते. आणि टोळी समुहाची गणसंख्या साधारण किती असावी? (ब्रिटीशांपूर्वी आणि मराठ्यांच्या काळात). कारण ब्रिटिश समाजप्रमुखाला पेंशन देत असतील तर टोळीची 'बार्गेनिंग पावर' चांगलीच असायला हवी.
माझं शरीर, माझा हक्क?
अदिती यांचा लेख. या लेखातल्या विचारांशी/भावनेशी सहमत.
हा निर्णय आल्यावर दुसर्या दिवशी वॉलस्ट्रीटच्या संपादकीय मंडळाने थोडा वेगळा मुद्दा मांडला. तांत्रिक दृष्ट्या कदाचित तो चुकीचा नाही. त्यांनी १९७३ मध्ये वेगळं मत मांडणार्या न्यायाधिशांचा मुद्दा उचलून धरला आहे.
पण त्यांनी रिपब्लिकनांची तळी उचलेली नाही. नेशनवाईड बॅनची मागणी करणार्यांना रिपब्लिकनांना त्यांनी दांभिक म्हटले आहे. त्यांच्या मते आता वादविवाद कोर्टाकडून राजकीय विचारधारांच्या कक्षेत येईल.
थोडक्यात, त्यांच्या मते, असे वादविवाद न्यायालयाच्या माध्यमातून न सोडवता जुन्या पद्धतीने मतपरिवर्तनातून सुटले पाहिजेत. पण प्रॉब्लेम हाच आहे. हे 'टॉलरेबल कन्सेन्सस' शोधणार कसं? खास करून जेव्हा एखाद्या सामाजिक प्रश्नाचे इतके ध्रुवीकरण झाल्यावर. हे म्हणजे १८६० च्या यादवीसारखेच आहे. गुलामगिरी ठेवायची की नाही यावर कॉमन ग्राउंड कसे शोधणार? पण कदाचित असे म्हणणे असावे की, तेव्हाही लिबरलमधले काही, गुलामांना मुक्त करण्यासाठी भले सहमत असले तरी समानतेचे हक्क देण्यास तयार नव्हते. पुढची कैक दशकं गेली. पुढच्या पिढीतल्या लोकांना/नेत्यांना नवा संघर्ष करावा लागला. तेव्हा कुठे आजची अमेरिका आपणास दिसते. थोडक्यात, असे मतपरिवर्तन होण्यास कैक दशकांचा कालावधी जातो.