आजचा दिवस अॅपीयरन्स या विषयावर उन्मळून निघण्याचा दिसतो आहे. असतात असेही स्पेशल दिवस असतात : )
____________
बर्याच वर्षांपूर्वी म्हणजे खूप मागे, एक मराठी कथा वाचनात आलेली होती जिचा सारांश साधारण असा होता-
नायक अन नायिकेत आकर्षण असते व बर्याच महीन्यांच्या डेटींगनंतर दोघांना रात्री कुठेतरी एकांताची संधी लाभते, ताबा रहात नाही व दिवे मालवून दोघे समीप येतात. तो थांबवत असताही, आवेगाने ती त्याच्या सर्वांगावर चुंबने अंकीत करते. कसाबसा तो म्हणतो तुला काही सांगायचे आहे अन दिवा लावतो. दिवा लावल्यावर तिला दिसते की त्याचे शरीर कोडाच्या डागांनी भरले आहे. किळस येऊन तोंडावर हात दाबून ती कशीबशी बेसिनकडे धाव घेते.
या कथेतील गांभीर्य तेव्हा कळण्याचे वय नव्हते. पण आता ती कथा आठवली की फक्त खेद दाटून येतो या विचाराने की आपण सारेजण (कोणीही अपवाद नाही) सौंदर्य, सुरुपतेला किती महत्त्व देतो. आपण किती सुपरफिशिअल आहोत. खिन्न वाटते. आपण रुपास अवास्तव महत्त्व देतो शेवटी कटू सत्यच आहे.
___
ते एक असोच. काही महीन्यांपूर्वी Gynecomastia नावाच्या एका डिसॉर्डरने ल्क्ष वेधले. जरी ही डिसॉर्डर सौम्य प्रकारची असली तरी तीमुळे पेशंटची होणारी सामाजिक कुचंबणा अतिशय तीव्र व मनस्तापदायक असू शकते. पुरषांना स्त्रियांसारखी छातीची गोलाई व उभार निर्माण होण्याची कारणे हार्मोनल किंवा Risperidone सारख्या गोळ्यांचा/औषधाचा साइड इफेक्ट असू शकतो. अगदी अशीच कुचंबणा हातापायावर केस व अप्पर लिप लव (केस) असण्यामुळे मुलींना होते. पण निदान वॅक्सिंग , थ्रेडिंग असे काही कमी वेदनादायक व तात्पुरते उपाय तरी आहेत. दुर्दैवाने Gynecomastia वर उपाय म्हणजे सर्जरी असे वाचनात आले. माझा अभ्यास नाही व अन्य खात्रीशीर उपाय असल्यास माझ्या वाचनात आलेला नाही.
येथेही बरेच लेख व ब्लॉग मिळाले पैकी पुरषांनाही नीटस अॅपीयरन्स करता किंवा पाठदुखी टाळाण्याकरता ब्रेसियर घालण्याची गरज भासू शकते आदि माहीती मिळाली. यातील बर्याच पेशंटची plight वाचून अतिशय वाईट वाटले. पण त्याचबरोबर अनेक समंजस स्त्रियांनी (गर्ल्फ्रेन्ड्स, बायको) त्यांचा केलेला स्वीकार किंबहुना आनंदाने व त्यांच्यावरील प्रेमाने त्यांना दिलेली साथ आदि चांगल्या , सकारात्मक, कौतुकास्पद गोष्टीही वाचावयास मिळाल्या.
अन एवढे होऊनही मनात हीच खंत दाटून आली की माणूस कितीही का पुढे गेला असला तरी मानसिक प्रगल्भतेमध्ये अजून बाल्यावस्थेतच आहे की काय? का आपण किंचीत वेगळ्या व्यक्तीला इतके टोचतो, शब्दांनी, नजरेनी? Why do we put so much emphasis on appearance? का नाही आपण एका व्यक्तीला तिच्या आंतरीक सौंदर्यामध्ये निरखू शकत, appreciate करु शकत? माझ्या मनात अशा शंकांचे काहूर उठते अन ऐसीसारख्या प्रगल्भ, संतुलित फोरमवर मी ते मांडू शकते ही बाब निर्विवाद दिलासादायक आहे.