बाह्य रुप-बाह्य सौंदर्याला दिले जाणारे अवास्तव महत्त्व

आजचा दिवस अ‍ॅपीयरन्स या विषयावर उन्मळून निघण्याचा दिसतो आहे. असतात असेही स्पेशल दिवस असतात : )
____________
बर्‍याच वर्षांपूर्वी म्हणजे खूप मागे, एक मराठी कथा वाचनात आलेली होती जिचा सारांश साधारण असा होता-

नायक अन नायिकेत आकर्षण असते व बर्‍याच महीन्यांच्या डेटींगनंतर दोघांना रात्री कुठेतरी एकांताची संधी लाभते, ताबा रहात नाही व दिवे मालवून दोघे समीप येतात. तो थांबवत असताही, आवेगाने ती त्याच्या सर्वांगावर चुंबने अंकीत करते. कसाबसा तो म्हणतो तुला काही सांगायचे आहे अन दिवा लावतो. दिवा लावल्यावर तिला दिसते की त्याचे शरीर कोडाच्या डागांनी भरले आहे. किळस येऊन तोंडावर हात दाबून ती कशीबशी बेसिनकडे धाव घेते.

या कथेतील गांभीर्य तेव्हा कळण्याचे वय नव्हते. पण आता ती कथा आठवली की फक्त खेद दाटून येतो या विचाराने की आपण सारेजण (कोणीही अपवाद नाही) सौंदर्य, सुरुपतेला किती महत्त्व देतो. आपण किती सुपरफिशिअल आहोत. खिन्न वाटते. आपण रुपास अवास्तव महत्त्व देतो शेवटी कटू सत्यच आहे.
___

ते एक असोच. काही महीन्यांपूर्वी Gynecomastia नावाच्या एका डिसॉर्डरने ल्क्ष वेधले. जरी ही डिसॉर्डर सौम्य प्रकारची असली तरी तीमुळे पेशंटची होणारी सामाजिक कुचंबणा अतिशय तीव्र व मनस्तापदायक असू शकते. पुरषांना स्त्रियांसारखी छातीची गोलाई व उभार निर्माण होण्याची कारणे हार्मोनल किंवा Risperidone सारख्या गोळ्यांचा/औषधाचा साइड इफेक्ट असू शकतो. अगदी अशीच कुचंबणा हातापायावर केस व अप्पर लिप लव (केस) असण्यामुळे मुलींना होते. पण निदान वॅक्सिंग , थ्रेडिंग असे काही कमी वेदनादायक व तात्पुरते उपाय तरी आहेत. दुर्दैवाने Gynecomastia वर उपाय म्हणजे सर्जरी असे वाचनात आले. माझा अभ्यास नाही व अन्य खात्रीशीर उपाय असल्यास माझ्या वाचनात आलेला नाही.

येथेही बरेच लेख व ब्लॉग मिळाले पैकी पुरषांनाही नीटस अ‍ॅपीयरन्स करता किंवा पाठदुखी टाळाण्याकरता ब्रेसियर घालण्याची गरज भासू शकते आदि माहीती मिळाली. यातील बर्‍याच पेशंटची plight वाचून अतिशय वाईट वाटले. पण त्याचबरोबर अनेक समंजस स्त्रियांनी (गर्ल्फ्रेन्ड्स, बायको) त्यांचा केलेला स्वीकार किंबहुना आनंदाने व त्यांच्यावरील प्रेमाने त्यांना दिलेली साथ आदि चांगल्या , सकारात्मक, कौतुकास्पद गोष्टीही वाचावयास मिळाल्या.

अन एवढे होऊनही मनात हीच खंत दाटून आली की माणूस कितीही का पुढे गेला असला तरी मानसिक प्रगल्भतेमध्ये अजून बाल्यावस्थेतच आहे की काय? का आपण किंचीत वेगळ्या व्यक्तीला इतके टोचतो, शब्दांनी, नजरेनी? Why do we put so much emphasis on appearance? का नाही आपण एका व्यक्तीला तिच्या आंतरीक सौंदर्यामध्ये निरखू शकत, appreciate करु शकत? माझ्या मनात अशा शंकांचे काहूर उठते अन ऐसीसारख्या प्रगल्भ, संतुलित फोरमवर मी ते मांडू शकते ही बाब निर्विवाद दिलासादायक आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

माणूस हा एक "पृष्ठवंशीय सस्तन प्राणी" आहे..... दॅट्स ऑल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एखाद्या व्यक्तीचे आंतरिक सौंदर्य जाणून प्रशंसा करणे हा एक भाग झाला. पण केवळ त्या निकषावर त्याचा जोडीदार म्ह्णून स्वीकार करणे हा वेगळा भाग. आपल्याला अनुरुप जोडीदार शोधताना एखाद्या व्यक्तिला कुठलेही व्यंग नसणारी व्यक्ती ही कधी कधी नापसंत ठरते- तसच हे ही घडत असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाह्य रुप-बाह्य सौंदर्याला दिले जाणारे (अवास्तव ???) महत्त्व हे सुपरफिशियल च का आहे ? हे प्रचंड मानसिक प्रगल्भता असलेले का व कसे नाही ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही प्रमाणात गब्बरशी सहमत. 'का रे भुललासी वरलिया रंगा' हे जरी खरे असले तरी काही ठिकाणी बाह्य रुप देखील तितकेच महत्वाचे आणि जाणुनबुजून राखलेले असते, असावे. उदा. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असे म्हणतात. खुपदा एखाद्या व्यक्तीच्या प्रथम दर्शनाने पडलेला प्रभाव कायमस्वरूपी तसाच राहण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत काही जण जर मुद्दाम बाह्यरुपावर भर देत असतील तर त्यात फारसे काही गैर आहे असे वाटत नाही. मी गेली १७-१८ वर्षे विपणन क्षेत्रात आहे. आमच्या क्षेत्रात तर बाह्य रुपाला खुप महत्व असते. समोरच्या व्यक्तीला कन्व्हिन्स करण्यासाठी आपला 'लुक'देखील तितकाच महत्वाचा ठरतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विपणन म्हणजे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मार्केटिंग

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाह्य रुप-बाह्य सौंदर्याला दिले जाणारे (अवास्तव ???) महत्त्व हे सुपरफिशियल च का आहे ? हे प्रचंड मानसिक प्रगल्भता असलेले का व कसे नाही ?

गब्बर, माझे म्हणणे इतकेच आहे की "इव्होल्युशन" जरी वरलिया रंगा भुलण्याचे झाले असले तरी ते आदर्शच आहे असे नव्हे कारण त्यामुळे अनेक स्टर्लिंग आत्मिक्/आंतरीक गुण झाकोळून जातात. मानवी मेंदू संपूर्ण कपॅसिटीच्या काही लहान ट्क्के च काम करतो असे ऐकले आहे. त्यामुळे असेल पण सारासार व ओव्हरॉल गुण व रुप याचा ताळमेळ बसविण्यात तो कमी पडतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बर, माझे म्हणणे इतकेच आहे की "इव्होल्युशन" जरी वरलिया रंगा भुलण्याचे झाले असले तरी ते आदर्शच आहे असे नव्हे कारण त्यामुळे अनेक स्टर्लिंग आत्मिक्/आंतरीक गुण झाकोळून जातात.

आदर्श हा प्रकार नेमका काय असतो हा प्रश्न विचारून-विचारून गुळगुळीत झालेला आहे. पहा विचार करून

आता याच आदर्शपणाच्या संकल्पनेकडे दुसर्‍या अँगल ने पण जवळपास तोच विचार मांडतो. Bounded rationality ही मानसशास्त्री मंडळींनी उचलून धरलेली संकल्पना आहे. तिची व्याख्या - People are intendedly rational but limitedly so. म्हंजे अतिसुलभ शब्दात - लोकांना परफेक्ट रॅशनल असायला/वागायला हवे असते पण करू शकत नाहीत. कारण एका वेळी डझनभर (अप्रकट) गुणांकडे लक्ष देणे म्हंजे लॉस ऑफ फोकस. त्यावेळी त्याक्षणी तो गुण प्रकर्षाने दिसतो व जाणवतो व आवडतो/नावडतो वगैरे.

-----

दुसर्‍या बाजूने पहायचे झाले तर - You work hard making independent films for fourteen years and you get voted "best breasts".

याच लेखातून साभार - We live in an age of specialization. Nothing is left whole. Everything is sliced and diced into its consituent parts. People are bisected, dissected, vivisected. Even the lovely Scarlett Johansson.

-----

परंतु समस्या ही आहे की बाईंची तक्रार अनाठायी आहे. हे स्टेटमेंट देण्याआधीच बाईंना किमान चार पाच वेगवेगळी अ‍ॅवॉर्ड्स (अभिनयासाठी) मिळालेली आहे. त्यामुळे - "What about my brain?" she asks. "What about my heart? What about my kidneys and my gallbladder?" - आरडाओरडा उगीचच आपण फार मोठी विचारवंत अभिनेत्री असण्याचा आव आणण्याव्यक्तीरिक्त दुसरे काही सिद्ध करीत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आरडाओरडा उगीचच आपण फार मोठी विचारवंत अभिनेत्री असण्याचा आव आणण्याव्यक्तीरिक्त दुसरे काही सिद्ध करीत नाही.

असेलही तिला स्वतःला अधिल मीटी रोल्स किंवा गंभीर रोलस करता स्वतःला विचारवंत म्हणून सेल करायचे असेलही.

कारण एका वेळी डझनभर (अप्रकट) गुणांकडे लक्ष देणे म्हंजे लॉस ऑफ फोकस. त्यावेळी त्याक्षणी तो गुण प्रकर्षाने दिसतो व जाणवतो व आवडतो/नावडतो वगैरे.

हा मुद्दा आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कशाचे आकर्षण वाटावे याला जसे नियमांत बांधता येणार नाही तसेच कशाचे वाटू नये यालाही
आपले आकर्षण व/वा किळस कशाप्रकारे (कोणत्या शब्दांत, कृतीने) व्यक्त केली जाते त्यातून त्या त्या व्यक्तीची मॅच्युरीटी, जडणघडण दिसते.

बाकी अल्पसंख्यांची दु:खे/खंत आपण प्रत्येक जणच अनुभवत असतो. कोणत्या ना कोणत्या कसोटीवर आपणही अल्पसंख्यच असतो. आपण बहुसंख्यांसारखे/बहुसंख्यांतले असताना आपल्या त्या भावनेला आठवले तरी पुष्कळ असते. बहुसंख्यांमध्ये सारख्या असणार्‍या गोष्टी 'नॉर्मल' म्हणणे टाळले की सामान्यांपेक्षा वेगळ्या गोष्टीला 'अ‍ॅब्नॉर्मल' म्हणावे लागत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे तुमच्या सारख्या विचार करणार्‍या लोकांना समजतं हो. पण सर्वसामान्य पब्लिकचा कल वेगळेपणाला वाईट ठरवण्याचा आणि वाळीत टाकण्याचाच असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद अतिशय आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>आपले आकर्षण व/वा किळस कशाप्रकारे (कोणत्या शब्दांत, कृतीने) व्यक्त केली जाते त्यातून त्या त्या व्यक्तीची मॅच्युरीटी, जडणघडण दिसते.

वेल.... परक्या व्यक्तीबाबत हे मॅच्युअर (aka पॉलिटिकली करेक्ट) वागणे नहमीच शक्य असेल. पण ज्याच्याबरोबर कायम सहवासात रहायचे आहे त्याच्याबरोबर कायम असे मुखवटा वापरून कसे वागता येईल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मस्त मुद्दा! पण अल्पसंख्य आहोत की बहुसंख्य आहोत हे पाहायचं की आपल्याला आवडलंय की नावडलंय या भावनेशी प्रामाणिक राहायचं?
नैसर्गिक वागण्यापुढे सारासार विचाराचा बळी द्यायचा की उद्या आपल्यावर कोणतीही वेळ येऊ शकते म्हणून आत्ताचा क्षण गहाण टाकायचा?
बरं आपणही काही बाबतीत अल्पसंख्य असतो असा विचार समजा केला आणि सगळ्यांना सन्मान द्यायचा म्हटलं तर गे लोकांपासून इन्सेस्ट लोकांना वेगळं कशाच्या जोरावर काढायचं? किंवा मेकडं खाणार्‍या, भरल्या ट्रेनमध्ये पादणार्‍या लोकांना कोणत्या तर्कावर नावं ठेवायची?
हे बहुसंख्य-अल्पसंख्याचं लॉजिक संपून हाडातून येणारी घृणा प्रत्येकाची नेमकी कधी सुरु होते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ननि, २ व्यक्तींच्या कन्सेन्ट नंतर होतो तो हेल्दी सेक्स.
त्या (मी केलेल्या) व्याख्येनुसार इन्सेस्ट हे घृणास्पदच.
गे असणे हे नॉर्मल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इनसेस्ट देखील दोन व्यक्तींच्या परस्पर संमतीतुन होउ शकतो.
तसा झाला तरी तो घृणास्पद च मानाल का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे इन्सेस्ट नाही का मी समजत होते चाइल्ड अ‍ॅब्युझ Sad
मला तर इन्सेस्ट अतिशय डेरोगेटरी वाटतो बुवा. माझी लिमिट आली लिबरेशनमध्ये Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नॉर्मल म्हणजे नैसर्गिक की समाजमान्य म्हणायचे आहे तुम्हाला?
गे असणे हे नॉर्मल म्हणत असाल, तर पुढील प्रकारचे संभोग नैसर्गिक दॄष्टीने नॉर्मलच आहेत की.
१. एक पुरुष आणि एक स्त्री (Heterosexual)
२. दोन पुरुष (Homosexuality)
३. दोन स्त्रिया (Homosexuality)
४. एक पुरुष, अनेक स्त्रिया (Polygyny)
५. एक स्त्री, अनेक पुरुष (Polyandry)
६. अनेक पुरुष, अनेक स्त्रिया यांचे एकमेकांशी लैंगिक संबंध (Bisexuality)
७. कुटुंबात/जवळच्या नातेवाईकांत लैंगिक संबंध (incest)
८. Cousin marriage
९. प्राण्यांबरोबर लैंगिक संबंध (Zoophilia)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नॉर्मल म्हणजे मॉरल म्हणायचय Sad
झुफिलिया व इन्सेस्ट हॉरिबल आहेत अन इमॉरल वाटतात Sad
बाकी मॉरल वाटताहेत. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

६. अनेक पुरुष, अनेक स्त्रिया यांचे एकमेकांशी लैंगिक संबंध (Bisexuality)

एखाद्या व्यक्तीला स्त्री व पुरुष या दोघांप्रती असलेले लैंगिक आकर्षण ही (Bisexuality) ची जास्त योग्य व्याख्या वाटते. A bisexual person may not necessarily have simultaneous multiple partners.

Whether simultaneous or successive is the key factor in #4, #5, #6.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इनसेस्ट संबंध फार कमी लोक ठेवतात. म्हणुन त्यांना अ‍ॅबनॉर्मल म्हणण योग्य नाही.
बहुसंख्य देव इनसेस्ट संबधात नव्हते एखाद दुसरा ब्रह्मा होता म्हणुन त्याच फुलपाखरु चिन्ह उडवुन आयमीन ( दडपुन टाकण्यात) लावण्यात आल इति दुर्गा भागवत.
पण त्याला तस अ‍ॅबनॉर्मल कोणी म्हणत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुरषांनाही नीटस अ‍ॅपीयरन्स करता किंवा पाठदुखी टाळाण्याकरता ब्रेसियर घालण्याची गरज भासू शकते

हे वाचून साइन्फेल्ड नावाच्या एका सिरियलच्या एका भागाची आठवण झाली. या प्रकाराला 'ब्रो' असं संबोधलं आहे त्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हे माहीत नव्हते. माझ्या स्वतःच्या धाग्यामुळे माहीतीपूर्ण अशी श्रेणी देऊ शकत नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो विनोद म्हणून वापरलाय तो शब्द त्या सिरियल मध्ये Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ओके.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धागा वाचल्यावर मला देखील त्याच एपिसोडची आठवण झाली. द ब्रो, ऑल्सो नोन अ‍ॅज द मॅन्सिअर! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणूनच आमच्या बाजूची दोन विंग्रजाळळेली कार्टी एकमेकांना पाहून 'वॉस्स्प ब्रो ?' असे विचारतात. अरे लब्बाडांनो, कळाले बर का तुमचे गुपित ! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्व सामान्य पुरुष आकर्षक पेकिंग पाहून वस्तु (?) विकत घेतो. आता आकर्षक पेकिंग मधली वस्तु'कबाड' निघाली कि आयुष्यभर आपल्या चुकीचे खापर त्या वस्तु वर फोडीत आयुष्य जगतो. दुसरी कडे स्त्री (?) 'कबाड' माल असेल तरी ही त्याचा कसा वापर करता येईल हाच विचार करत/ किंबुह्ना आपलेच नशीब फुटके म्हणत आयुष्य कंठीत राहते. (इति भारतीय जीवन शैली)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पेकिंग आकर्षक असण्याचा आणि वस्तू विकत घेण्याचा संबंध रोचक आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नवी-बाजू-एस्क प्रतिसाद...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

Why do we put so much emphasis on appearance? का नाही आपण एका व्यक्तीला तिच्या आंतरीक सौंदर्यामध्ये निरखू शकत, appreciate करु शकत? >>>>

ह्यात काय चुक आहे? ज्या ठीकाणी शाररीक संबंध आहेत तिथे शाररीक दिसण्याला महत्व असणारच. तुम्ही वर्णन केलेली समस्या असलेला पुरुष मला नाही चालणार, त्यात चुक काय आहे?

आधी पासुन रिलेशन मधे असेल आणि मग नंतर अशी काही व्याधी झाली तर वेगळी गोष्ट आहे.

ज्या कामासाठी कमीतकमी १३० IQ असावा अशी अपेक्षा असेल, तर तिथे ७० IQ ची व्यक्ती कशी चालेल? तसेच शरीराबद्दल पण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाह्य रूपाला चित्रपट नाट्य सृष्टित फारच महत्त्व आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याबद्दल मजेशीर लेख वाचला.
The Looks You’re Born With and the Looks You’re Given

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जोडीदारांकरिता बाजारात ग्राहक मोठ्या संख्येत आहेत. मागणीच्या मानाने बाह्य रूप-सौंदर्य असलेले लोक बाजारात कमी आहेत. शिवाय आखूडशिंगी (बाह्यसौंदर्य असले) म्हणजे बहुदुधी (आतून गुणी) असेलच असे नाही.

त्यामुळे ग्राहकाने मूल्य ठरवताना पुनर्विचार करावा. हा सौहार्द्याचा सल्ला पुष्कळदा योग्य असतो. परंतु हलक्याफुलक्या प्रेमपटात नायक आणि नायिका सुस्वरूप असल्यास तिकिटविक्री अधिक होते.
---
पौगंडावस्थेतील पुंस्तनवाढीला "वेळ जाऊ देणे" किंवा "शस्त्रक्रिया" हे दोन उपाय आहेत. बरोबर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माननीय ब्लॉगर यॉनिंग डॉग उर्फ जृंभणश्वान यांच्या एका थोर पोस्टमधील थोडा भाग इथे देण्याचा मोह आवरत नाही (संपूर्ण मूळ पोस्ट इथे वाचता येईल).

***

राजपुत्र आता आजूबाजूला कुठे आश्रम दिसतो का ते पाहू लागला, पण कुठेही आश्रमाचे चिह्न नव्हते, की कुणा मनुष्याची चाहूल नव्हती. त्याच्या कानांनी वेगळाच आवाज टिपला. गोड आवाज होता तो, पण पक्ष्यांचा निश्चितच नव्हता. सरोवराच्या शांत निळ्या पाण्यात अरंख्य जलतरंग उमटले... व एक आकृती प्रकटली. धृमणाने त्या ललनेकडे पाहिले. आधीच त्याला ह्या प्रदेशाचे सौंदर्य सहन होत नव्हते, त्यात ही आता. साक्षात सौंदर्यच त्याच्यासमोर उभे होते. केशरी, पिवळ्या फुलांचा माळा घालून श्वेत वस्त्र ल्यालेले सौंदर्य!

आपसूकच तो म्हणाला,

"ओह...फक!" (धृमणाला भावना अनावर झाल्या, की तो विचित्र अगम्य भाषेत काहीतरी बरळू लागे.)

सावरून तो म्हणाला, "सादर वंदन... आपण कुठल्या देवी? क्षमा करा, मी ओळखले नाही."

मंजुळ आवाजात खळखळून हसत ती युवती म्हणाली,

"राजकुमार, मी कोणी देवी नाही. धर्वणआश्रमात प्रवेश करण्याआधी मी प्रत्येकाची परीक्षा घेते. यात उत्तीर्ण होणाऱ्यांनाच आश्रमात प्रवेश मिळतो."
कसली परीक्षा आता, हे धृमणाच्या मुद्रेवरचे भाव वाचून ती म्हणाली, "राजकुमार, मी तुम्हांला तीन प्रश्न विचारीन. त्यातल्या दोन प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे दिलीत, तरच तुम्हांला धर्वण ऋषींचे दर्शन लाभेल. लक्षात घ्या कुमार, बरोबर किंवा चूक उत्तराची अपेक्षा नाही. तुमच्या अंतर्मनातील प्रामाणिक उत्तर द्याल, तरच तुम्हांला प्रवेश मिळेल."

धृमणाने विचार केला, हे बरं आहे राव. कटकट नाही. नाहीतर काही जणांना जाम अवघड कसोट्या द्याव्या लागतात. आपण आपले मनात येईल ते सांगायचे. वा. धर्वण चांगला आहे बुवा माणूस. विचार थांबवून तो म्हणाला,

"विचारा प्रश्न."

हलकेच हसत ती युवती म्हणाली, "विचारते, पण अजून एक. कृपया मला समजेल अशा शुद्ध भाषेत उत्तर द्या. मगाशी काहीतरी अगम्यच..." धृमणाने हसत मान डोलावली व मनातल्या मनात इष्टदेवतेचे स्मरण केले.

"पहिला प्रश्न, जीवनात सर्वांत वाईट व्यसन कोणते?"

धृमण आत्मविश्वासाने बोलू लागला, "मद्य, वारांगना, द्यूत अथवा तत्सम व्यसने धरतीच्या कानाकोपऱ्यात पसरली आहेत व ती स्वाभाविकपणे वाईटच आहेत. परंतु माझ्या मते जीवनात सर्वात वाईट व्यसन अध्यात्माचे, आपले काम सोडून अविरत भक्तिमाहात्म्य आळवण्याचे.

जेव्हा मनुष्य विवेक विसरून कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करतो, तेव्हा ते व्यसन म्हणून गणले जाते. प्रत्येक व्यसनाने मनुष्य कर्तव्यच्युत होतोच. मद्य वा द्यूत या प्रकारच्या व्यसनांनी पोखरलेल्या मनुष्याला जाणीव असते, की तो वाममार्गाला लागला आहे; परंतु अध्यात्माचे व्यसन भल्याभल्यांना कर्तव्याचा विसर पाडते. ह्या व्यसनाने आजवर भूतलावर अनेक राज्ये, साम्राज्ये लय पावली आहेत.

कर्म करून ईश्वरसाधना करणाऱ्या सजीवासारखा पुण्यवान जीव नाही आणि ऐहिक कर्तव्ये टाळून, भक्तीचा अतिरेक करूनही स्वत:स पुण्यवान समजणाऱ्यासारखा दुर्दैवी जीव नाही.

ते सर्वात वाईट याकरिता, कारण ज्याला हे व्यसन जडले आहे तो मनुष्य स्वत:स व्यसनी तर समजत नाहीच; पण समाजही अध्यात्माच्या व्यसनाला व्यसन समजत नाही. इतर प्रकारच्या व्यसनी लोकांना समज देण्यात येते, त्यांची हेटाळणी होते परंतु अध्यात्मापायी आपले कर्तव्य टाकून पळालेल्या लोकांचे समाज गुणगान गातो.
साक्षात भगवंतांनी कर्माचे महत्व विषद करून अर्जुनास युद्धास भाग पाडले. भगवंतांचा कर्माचा उपदेश अंगी बाणविताना यश, अपयश प्राप्त करणाऱ्यांच्या कर्माची व वर्तणुकीची विश्लेषणे होतात. तर केवळ त्या उपदेशाचे निर्हेतुक पाठ करून उपदेश करणाऱ्यांवर अविमृष्य श्रद्धा ठेवली जाते!

जर बाह्य साधनांनी क्षणभर मन निर्विकार करून आनंद शोधणाऱ्यांचा तिरस्कार केला जातो, तर अनंत काळाच्या सुखाच्या अनुभूतीच्या मागे लागणारे, मोक्षासाठी सर्व विधित कर्तव्ये विसरून झटणारेसुद्धा तीव्र तिरस्कारास पात्र नाहीत का?

देवी, अध्यात्माचे व्यसन वैयक्तिक पातळीवर क्षती तर पोहोचवतेच, शिवाय ते पूर्ण समाजपतनासही कारणीभूत ठरते,"

धृमणाने क्षणभर श्वास घेतला व म्हणाला, "देवी, क्षमा असावी, उत्तर योग्य असेल वा अयोग्य. प्रामाणिक उत्तर द्यायचे आहे, म्हणून मी हे उत्तर दिले. राजर्षी, धर्वण व या धरेच्या भल्यासाठी झटणाऱ्या असंख्य कर्मयोगी ऋषिगणांच्या प्रति मला अतीव आदर आहे."

धृमणाने असे म्हटल्यावर युवतीची गंभीर मुद्रा बदलली व ती म्हणाली, "कुमार, पुढच्या वेळी थोडक्यात उत्तर दिले तरी चालेल."

"दुसरा प्रश्न, सौंदर्य श्रेष्ठ का बुद्धिमत्ता?"

धृमण पूर्वीच्याच आत्मविश्वासाने बोलू लागला, "दोन्ही समसमान हे साहजिक उत्तर आहे. किंबहुना बुद्धिमत्तेला नेहमीच श्रेष्ठ समजले जाते. पण देवी, माझ्या मते, सौंदर्य हेच बुद्धिमत्तेपेक्षा श्रेष्ठ आहे. एखाद्या व्यक्तीला परिश्रमाने ज्ञान ग्रहण करता येते, पण सौंदर्य आणि बुद्धिमत्ता ईश्वरदत्तच असते. दोन्हीही धारण करणाऱ्यांना ते मिळविण्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाहीत. बुद्धिमत्ता मरेपर्यंत सोबत असते, तर सौंदर्य हे केवळ तारुण्यात. या कारणाने सौंदर्याला नेहमीच हिणवले जाते व बुद्धिमान लोकांना आदर दिला जातो. ह्याच अन्यायामुळे माझा कल सौंदर्याकडे आहे. त्यामुळे आयुष्यभर आपल्या पुंजीतले केवळ अंश पुरवणाऱ्या बुद्धिमत्तेपेक्षा तारुण्यात आपले सर्वस्व उधळून देणारे सौंदर्यच श्रेष्ठ."

युवती किंचित संभ्रमित झाली होती. धृमणाचे विचार मनापासून न पटल्याचे तिच्या चर्येवर स्पष्ट दिसत होते. पण निमिषार्धातच पूर्ववत स्मित देवून ती म्हणाली,
"राजपुत्र धृमण, आपली उत्तरे प्रामाणिक आहेत व तुम्हांला धर्वणाश्रमात आदराने प्रवेश मिळेल. तिसरा प्रश्न विचारण्याची आवश्यकता नाही, परंतु आपली इच्छा असल्यास मी तो विचारीन."

धृमण त्वरेने म्हणाला, "नको नको देवी, शक्यतो काम टाळणे व तरीही मिळालेच तर मनापासून करणे असा माझा स्वभाव आहे. तेव्हा आपण लवकरात लवकर गुरुजींकडे जाऊन गंध घेऊ. मंडळी खोळंबली आहेत घरी."

त्याच्या या बालिश उत्तरावर खळखळून हसत युवती म्हणाली, "राजकुमार, प्रामाणिकपणे उत्तरे द्यायची कसोटी संपली आता. मला आता धवलिका म्हणा आणि चला लवकर आश्रमाकडे. बाबा वाट पाहत असतील."

ती पाण्यातून पूर्णपणे बाहेर आली. आपला हात पुढे करून म्हणाली, "डोळे मिटून माझा हात धरा."

धृमणाच्या मनात आले, हात तर पकडीन गं बाई, पण जातेस कुठे? पुढे पाणी, मागे काळी भिंत आणि भुयार. त्याला असे विचारात थांबलेले पाहून धवलिका म्हणाली,
"काळजी करू नका, मी सुखरूप आश्रमात घेऊन जाईन तुम्हांला."

धृमणाने तिचा हात धरला व डोळे मिटले. डोळे उघडले, तेव्हा तो एका स्वच्छ कुटीत होता. पुढे सरोवर तसेच होते, तर मागे काळ्या भिंतीच्या इथे लांबलचक काळीभोर जमीन होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हे विवादास्पद आहे- बुध्दीमत्ता ही वयासोबत र्‍हास पावते. ३२ ते ३९ हे वय "पीक इंटेलिजन्स" चे असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उतारा आवडला. आता संपूर्ण पोस्ट व ब्लॉग वाचणे आले Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0