अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
=========
Merger with CPI on cards: CPI(M) General Secretary Sitaram Yechury
The merger of Communist Party of India (Marxist) and Communist Party of India will certainly happen in future though there is no time-frame for it, CPI(M) leader Sitaram Yechury said here on Sunday after being elected as the party’s new general secretary.
हा भाजपा इफेक्ट आहे की नाही ?? मार्क्सवाद्यांची (CPI(M)) पीछेहाट झालेली आहे हे सोमनाथदाच म्हणतायत म्हणून बरं आहे (त्यांची करातांबरोबर दुष्मनी आहे हे माहीती आहे...). पण म्हणून CPI बरोबर मर्जर करायची गरज का आहे ? आत्ता पार्टी (CPI(M)) बळकट करणे गरजेचे आहे हे ठीक आहे पण पार्टी (CPI(M)) बळकट झाल्यावर CPI बरोबर मर्जर ची गरज का भासेल ??
आजपासून सुमारे १ वर्षाने पश्चिम बंगाल मधल्या विधानसभा निवडणूका आहेत.