अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
=========
धर्माचे भवितव्य बिकट ___ डॅनियल डेनेट्ट
डॅनियल डेनेट हे धर्माचे दिग्गज टीकाकार.
गोवंशहत्याबंदीचा सरकारचा
गोवंशहत्याबंदीचा सरकारचा निर्णय वैध - उच्च न्यायालयाचा अंतरिम निकाल
आता महाराष्ट्रातील बैल आनंदी होतील!
बैलांचे विकल्प वाढले म्हणून ?
बैलांचे विकल्प वाढले म्हणून ?
नाही जीव वाचला म्हणून! हेटरो
नाही जीव वाचला म्हणून!
हेटरो बैलांचे विकल्प वाढलेले नाहीत. गो हत्याबंदी खूप पुर्वीपासून आहे.
आता महाराष्ट्रातील बैल आनंदी
आणि गाढवं दु:ख पावतील.
महाराष्ट्रात गाढवांची कत्तल
महाराष्ट्रात गाढवांची कत्तल होते?! असेल बॉ! आपल्याला काय उद्गीरकडच्या पद्धती ठाव नाहित ;) (ह.घ्यालच)
महाराष्ट्रातले बैल कायदे
महाराष्ट्रातले बैल कायदे वैगेरे वाचून आपल्या भावना प्रकट करत असतील तर गाढवे सुद्धा कोणत्या पाळीव प्राण्यावर काय न्याय्-अन्याय होत आहे हे पाहून सुख-दु:ख सोहळे साजरे करत असतीलच असं म्हणायचं होतं.
आनंदी आनंद
बैलाचा हो...!!!
ते अरुण जोशीन्नाच माहित.
हो, संपर्कात आहे तुमच्या
हो, संपर्कात आहे तुमच्या बाबांच्या. कळवेन नेहमीप्रमाणे.
डॅनिएल डेनेट हा माझा आवडता
डॅनिएल डेनेट हा माझा आवडता फिलॉसॉफर. त्याचा लेख आणि तोही अशा अनवट विषयावर वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये आलेला पाहून आनंद झाला.
धर्माचा 'स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स' गेली अनेक दशकं कमी होत गेलेला आहे. आणि लेखात दिलेलं कारण पटण्यासारखं आहे. ज्या काळात सर्वच जनता अनेक दुःखांनी गांजलेली होती त्या काळात धर्माचा प्रभाव मोठा असणं साहजिकच होतं. जवळपास प्रत्येक मनुष्याचं एकतरी मूल दगावत असे, दुष्काळात लक्षावधी लोक मरत, साथीच्या रोगांनी दशलक्षांनी माणसं जात, त्या काळात कुठल्यातरी अज्ञात शक्तीचा आधार घ्यावासा वाटणं साहजिकच आहे. कारण या सगळ्यावर कसलाच ताबा नव्हता. आता बव्हंशी आहे. आणि ताबा आल्यावर लोक देवाची आज्ञा वगैरे धुडकावून स्वतःला हवं तेच करतात. बायबलमध्ये म्हटलेलं आहे 'As for you, be fruitful and increase in number; multiply on the earth and increase upon it.' पण याकडे नुसतं दुर्लक्षच नाही, तर त्या आज्ञेच्या विरोधात जाऊन जगभरात सगळ्यांनीच फर्टिलिटी रेट कमी केलेले दिसतात.
अमेरिकेत समृद्धीकरणाची प्रक्रिया शंभरेक वर्षांपूर्वीच सुरू झाली. सुमारे तीनचार दशकांपूर्वी समृद्धी आहे, आणि तरीही देवावर विश्वास आहे अशी परिस्थिती होती. याचं कारण म्हणजे त्या काळात जगणारे लोक हे खूपच आधीच्या काळात जगणाऱ्या लोकांची अपत्यं होती, आणि त्यांच्यावरचे संस्कार टिकून होते. जसजशा पिढ्या उलटत जातात तसा हा जुना पीळही उलगडत जातो. तेच चित्र आत्ता दिसतं आहे. चर्चमध्ये येणारी लोकसंख्या दरवर्षी रोडावते, आणि तिचं सरासरी वय सातत्याने वाढतं. याचा अर्थ स्पष्ट आहे - सुमारे पन्नास वर्षांपूर्वी जन्मलेली ही पिढी चर्चमध्ये मोठ्या प्रमाणावर जाणारांपैकी शेवटची आहे. नवीन पोरं आत शिरत नाहीत. गंमत म्हणजे चर्चगोअर्स किंवा गॉडफीअरींग लोकांची संख्या कमी झाली तरीही अनाचार वाढलेला नाही. उलट गुन्हेगारी, बलात्कार, खून कमीच होत आहेत.
अमेरिकेत २५% लोक मानसिक रुग्ण
अमेरिकेत २५% लोक मानसिक रुग्ण असायचं कारण काय असावं?
अवेअरनेस! - अनेक कारणांपैकी
अवेअरनेस! - अनेक कारणांपैकी एक कारण.
भारतात याच गोष्टी भूत/ बाबा/बुवा यांच्यामाथी सोपविल्या जातात.
तसं तर हे फारच हास्यास्पद
तसं तर हे फारच हास्यास्पद उत्तर आहे, पण तरीही ते खरं मानलं तर तो अवेअरनेस आवश्यक आहे का मग?
मी सायकिअॅट्रीस्ट ला विचारलं
मी सायकिअॅट्रीस्ट ला विचारलं होतं हेच की भारतात रुग्ण कमी का. तिचं उत्तर अन स्वानुभव (माझा) हाच आहे की तिथेही मानसिक आजार आहेत पण निदान करायला लोक कचरतात & They keep making each other's lives HELL including their own.
हे अजूनच हास्यास्पद उत्तर
हे अजूनच हास्यास्पद उत्तर आहे, तेव्हा विराम.
अगदी अगदी तुम्हाला हेच ऐकायचय
अगदी अगदी तुम्हाला हेच ऐकायचय की नाही नाही भारतात धार्मिकतेमुळे , मानसिक आजार फार कमी आहेत. जे तुम्हाला ऐकायचय ते ऐकलं नाही की "हास्यास्पद" - खंडन काही नाही =))
यु आर फनी.
शुचि ताई, भारतात मानसिक आजार
शुचि ताई, भारतात मानसिक आजार दुरुस्त करायला लोक घाबरतात म्हणण्यामागे काय लॉजिक आहे? (भारतात शब्द महत्त्वाचा आहे. जगात सर्वत्र जितका स्टिग्मा आहे त्यापेक्षा भारतात जास्त आहे असं का वाटतं या अर्थाने.) मानसिक आजार हजारो वर्षांपासून आहेत. आयुर्वेदात पण उल्लेख, उपचार आहेत.
================================================================================================================
मी एक सिद्धांत मांडतो. धार्मिकता टोटल दंभ आहे. पण धार्मिक स्वभावामुळे (धार्मिक माणसाचे बरे) मानसिक स्वास्थ्य उत्तम राहू शकते.
कै प्रोब्लेम का असं म्हणण्यात? हे खोटेही असू शकेल, पण अशा लायनीनी विचारच करायचा नाही ही जाद्दगी आहे.
मी एक सिद्धांत मांडतो.
हे पूर्ण खरे आहे. सायकिअॅट्रीस्टचेही असेच म्हणणे आहे. (अर्थात एका सायकिअॅट्रीस्टचं मत = सत्य विधान अशी दगडावरची रेघ आहे असे मी म्हणत नाही पण या विधानास पुष्टी देणारे काही लेख वाचलेले आहेत.)
_____
+१
औदासिन्य, उन्माद, ऐकाहीक ज्वर (बहुतेक मानसिक असावे) वगैरे
>>पण धार्मिक स्वभावामुळे
>>पण धार्मिक स्वभावामुळे (धार्मिक माणसाचे बरे) मानसिक स्वास्थ्य उत्तम राहू शकते.
कै प्रोब्लेम का असं म्हणण्यात? हे खोटेही असू शकेल, पण अशा लायनीनी विचारच करायचा नाही ही जाद्दगी* आहे.
+१. दारू आणि गांजा पिणार्यांचं पण मानसिक स्वास्थ्य "त्यावेळी" उत्तम असतं. धार्मिक नशेचा फायदा असा की ती नशा ट्वेण्टीफोर बाय सेव्हन आणि बारा महिने बत्तीस काळ राहते.
*इथे ज्यादती म्हणायचं असावं असं वाटतं.
अमेरिकेत २५% लोक मानसिक रुग्ण
मला या प्रश्नाचा संदर्भ कळला नाही. लेखात दिलेली कारणपरंपरा अशी 'जेव्हा माणसाच्या आयुष्यातली दुःखं कमी होतात, तेव्हा त्याला देवाची गरज कमी कमी भासत जाते'. मला हा युक्तिवाद पटतो. आणि त्यासाठी मी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या दुःखांची उदाहरणं दिलेली आहेत. ती निश्चितच गेल्या शतकात कमी झालेली आहेत. या प्रश्नातून तुम्हाला नक्की काय स्वरूपाचा आक्षेप घ्यायचा आहे ते कळत नाही. लेखाच्या युक्तिवादाला या प्रश्नाने धक्का पोचतो असं तुम्हाला म्हणायचं आहे का?
सुख आणि देव
कमी स्पष्टीकरणाबद्दल क्षमस्व.
आपलं दोघांचं खालिलपैकी बर्याच मुद्द्यांवर एकमत होईल.
१. अमेरिकेत साथीचे रोग नाहीत.
२. लेकरे अकारण मरत नाहीत.
३. श्रीमंती आहे.
म्हणून अमेरिकेत दु:ख कमी असायला हवं.
पण विदा उलटं सांगतो. सुखी लोकांना मानसिक रोग नसायला (कमी असायला) पाहिजेत ना?
आता आपली यावरही सहमती आहे कि
४. भारत अमेरिकेपेक्षा बराच गरीब आहे.
मग भारताचं क्राईम रेकॉर्ड त्यांच्यापेक्षा फारच वाईट असायला हवं.
पण आहे उलटं. सगळ्याच (म्हणजे जवळपास सगळ्याच) निकषांवर भारत त्यांच्यापेक्षा बरा आहे.
http://www.nationmaster.com/country-info/compare/India/United-States/Cr…
तसं आपलं म्हणणं एकदम लॉजिकल आहे, जिथे सधनता, रोगमुक्ती, इ इ आहे तिथे सुख जास्त असायला हवं. मला असं म्हणायचं आहे कि हे असूनही सुख लागत नसेल तर त्याची कारणमिमांसा 'लाईफ फिलॉसॉफी काय आहे' यावर करता येईल काय? ईश्वरावर श्रद्धा असल्यावर जास्त विचार करावा लागत नाही, सगळं तो पाहून घेईल म्हणून आरामात झोपता येतं. ती फॅसिलिटी नास्तिकाला नसते. त्याची परिणिती (अॅक्च्यूअल स्थिती सुख भोगायला जास्त पूरक असून पण) जास्त दु:खात होत नसावी काय?
Is it too early to renounce God even for Americans? असं म्हणायचं होतं. प्रश्न पोचला असेल अशी आशा.
१. भारतात पोलिसांकडे तक्रार
१. भारतात पोलिसांकडे तक्रार नोंदवायला जाण्यात केली जाणारी टाळाटाळ, पोलिसांबद्दल असणारा अविश्वास (हा आता अमेरिकेतही वाढताना दिसतोय, "चलो बाल्टीमोर") वगैरेंचा विचार या आकडेवारीत केल्याचं दिसत नाही. बलात्कार या (नेहेमीच्या यशस्वी) गुन्ह्याबद्दल गुन्हे नोंदवताना होणारी टाळाटाळ किती याची काही कल्पना नाही. अशा परिस्थितीत निव्वळ आकडे देऊन काय सिद्ध होतं?
२. सुखाच्या अभावामुळे मानसिक विकार होतात हा गैरसमज आहे.
३. अमेरिकन लोक बहुसंख्येने अश्रद्ध आहेत हे म्हणणंही आकड्यांच्या आणि आजूबाजूला दिसणाऱ्या परिस्थितीच्या विपरीतच.
तुम्हाला भारताबद्दलचा डाटा
तुम्हाला भारताबद्दलचा डाटा मान्यच नसेल तर घासकडवींची अख्खी "भारतीय प्रगतीची लेखमाला" रद्दीत काढा ना. ती देखिल भारतीय डाटा वापरून केलेली आहे. आणि आपणांस पोलिसांत होणारी टाळाटाळ, इ इ बद्दल कल्पना असेलच तर देशाची, राज्याची, जिल्ह्याची प्रगती किती "दाखवायची आहे" आणि त्याचा "सर्वे काय करायचा आहे" याबद्दलचं प्रेशर ठाऊक आहे ना प्रशासकीय अधिकार्यांवर किती असतं ते? शेवटी हेच्च आकडे वापरून निवडणूका गाजवायच्या असतात हो राजकारण्यांना.
==================================================
तर भारत सरकारवर (म्हणजे विद्यावर) विश्वास ठेवायचा असेल तर प्रगतीपुरता मर्यादित आणि गुन्ह्यांसाठी नाही हे मंजे ...छ्या!!!
तर भारत सरकारवर (म्हणजे
हा हा हा, हे एक "ठ्ठोऽऽऽ!!!" पात्र विधान आहे खरंच!!!!
नैतर काय! भारत सरकारच्या
नैतर काय! भारत सरकारच्या अॅनिमल ह्जबंडरी मंत्रालयाचा विदा वापरून घासकडवी अख्ख्या भारताला घटाघटा तूप पाजवून राहिले. मग त्याच भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचा पोलिसांचा विदा पण खरा माना ना. शेवटी पर्फॉर्मन्स प्रेशर दोन्ही खात्याच्या अधिकार्यांना समान आहे!!!
सुखाच्या अभावामुळे मानसिक
अगदी अगदी. मानसिक आजारांमुळे सुखाची वाट लागते उलट.
___
+१
http://www.nimh.nih.gov/healt
http://www.nimh.nih.gov/health/statistics/prevalence/use-of-mental-heal…
प्रगत देशात मानसिक रुग्णांच्या इलाजाचं प्रमाण इतकं कमी का असावं?
=============================================================================================
http://www.nimh.nih.gov/health/statistics/prevalence/any-mental-illness…
आणि त्या मानानं जास्त धार्मिक असलेल्या आशियायी (ओरिजिनच्या) लोकांत मानसिक आजारांचं प्रमाण अर्ध आहे.
अज्ञात शक्ती
साथीचे रोग आणि ईश्वर या संकल्पनेचा उद्गम यांची टाईमलाईन मिसमॅच होते आहे. एका खंडातले लोक दुसरीकडे जाऊ लागले तेव्हा साथीचे रोग आले. देव बर्याच पूर्वीची कल्पना आहे. शिवाय जिथे प्राचीन काळात अत्यंत वाईट नैसर्गिक परिस्थिती होती तिथले लोक अजिबात अस्तिक नव्हते. उदा. मंगोलिया, सायबेरिया.
शिवाय बुद्धा, (आणि/वा) जैनांच्या काळात सगळी पोरे जिवंत राहत? पर कॅपिटा जीडीपी आजच्या पेक्षा जास्त होता? साथी नसत? मग का म्हणे यांनी 'अज्ञात शक्ती' नाकारली? सगळ्या भारतदेशाने नाकारली नै का? का? पश्चिमेत सोफिस्ट?
धार्मिकांनी अनेक अधार्मिकांचा, देव नाकारणारांचा छळ केला असे दाखले मस्त मिरवले जातात. मग हे नाकारणारे लोक त्या काळात 'सर्व लेकरे प्रसवणारे', 'साथीनी न मरणारे', आणि 'प्रचंड श्रीमंत' असेच होते कि काय?
अजो - तुम्ही तुमच्या मुळ्
अजो - तुम्ही तुमच्या मुळ् रंगात परतलात हो.
हे पहा, मी प्रतिगामी विचार
हे पहा, मी प्रतिगामी विचार थेट सिद्ध करणारे प्रतिसाद लिहित असे. मी ते आता अजिबात करत नैयय. पण पुरोगामी कोरिलेशन्स कशी आहेत त्यांवर प्रश्न करणे चूक नाही. उलट विवेकाने, प्रश्न विचारून, पडताळून, इ इ विचार स्वीकारणे हीच पुरोगाम्यांची खरी परंपरा आहे. मी तेच करत आहे. सहबंधुंनी मांडलेलं लॉजिक बरोबर आहे का असा केवळ प्रश्न आहे, ते नाहीच, नसावं असे दुस्ष्ट विचार नाहीत हो माझ्या मनात!!!
तुमचा युक्तिवाद अजूनही समजत
तुमचा युक्तिवाद अजूनही समजत नाहीये. मी अनेक उदाहरणं देऊन 'हो, हे लेखातल्या कारणपरंपरेशी मिळतंजुळतं आहे.' असं म्हटलेलं आहे. अमुक असंच का झालं, तमुक तसंच का झालं याचे प्रश्न मला विचारून नक्की काय फायदा? कदाचित तुमच्या मते दुःखं कमी झालेली नाहीयेत. कदाचित लेखकाची कारणपरंपरा चुकलेली आहे असं तुम्हाला म्हणायचं असेल. (कोणाचं म्हणणं अमुकतमुक असेल असा तर्क करत युक्तिवाद करायला मला आवडत नाही खरं तर.) तसं म्हणायलाही हरकत नाही. पण मग धर्माचा प्रभाव कमी का होतो आहे? याचं उत्तर द्यायचं राहातंच. तुम्हाला दुसरं काही सुचतं आहे का?
राघा मला वाटतं अजो म्हणतायत
राघा मला वाटतं अजो म्हणतायत -
(१) अतिशय दु:ख => अस्तिकता
(२) समृद्धी + कमी दु:ख => नास्तिकता
ही २ समीकरणे चूकीची आहेत.
(१) ला अपवाद = सायबेरीया व मंगोलिया, बुद्ध व जैन धर्म, ज्यांचा छळ झाला ते लोक (जे अलोट दु:ख असतानाही नास्तिक होते)
____________
विज्ञान - हे एक कारण असावं.
पूर्वी नेटीव्ह अमेरीकन घ्या भारतीय घ्या चंद्र/सूर्य, निसर्गास, देव मानत
पण विज्ञानाने ती श्रद्धाच धुडकावून लावली.
असेच विज्ञानाने अनेक कार्यकारणभाव दाखवून दिले.
ही २ समीकरणे चूकीची
धन्यवाद. संक्षेपात मांडल्याबद्दल.
धर्माचा र्हास
आपण जे जेनेरिक निष्कर्ष काढले आहेत त्याला विसंगत वास्तवे तुमच्यासमोर आणत आहे. उदा. आपण म्हणालात सुख वाढले कि अज्ञात शक्तीची गरज लागत नाही. मग मी विचारतोय कि अज्ञात शक्ती नसतेच असा विचार भारतात १००% (अंदाजे)बळावला होता (बुद्धाचा काळ म्हणा, जैनाचा म्हणा) तेव्हा आपण उल्लेखलेली वा तत्सम दु:खे नष्ट झाली होती काय? अत्यंत लॉजिकल प्रश्न आहे.
दु:खे कमी झालीत या बेसिसवरच मी मते मांडत आहे.
धर्माचा प्रभाव का कमी होत आहे हा प्रश्न अत्यंत रास्त आहे. रोचक सुद्धा आहे.
१. आपण म्हणता तसं याचं कोरिलेशन प्रगतीशी असू शकतं.
२. याचं कोरिलेशन विज्ञानाशी असू शकतं
३. धर्माचा प्रभाव कमी होत आहे ही मिथ्या धारणा असू शकते. म्हणजे आजचे शिक्षण, शासन, प्रशासन, सरकार, परराष्ट्रव्यवहार, संविधान, न्यायपालिका, निवडणूका, कंपन्या, बाजार, अर्थकारण, रोज उदयांस येत असलेली नवनविन तत्त्वज्ञाने, राष्ट्रवाद, आर्थिक तत्त्वज्ञाने, पर्यावरण, मॅनर्स, भाषा, कपडे, इ इ क्षेत्रांत ज्या आधुनिक रुढ पद्धती आहेत आणि नविन येताहेत त्यांत अनेक प्रकारचा गाढवपणा (देखिल) आहे. या सगळ्या मूर्खपणाचे अधिकृत नाव धर्म नसल्याकारणाने आपल्याला धर्माचा र्हास होतो आहे असा भास होऊ शकत असतो.
४. धर्म पाळायला एक संख्याबल लागतं. (म्हणजे दोन पिढ्यांनी माझ्या घरात कोणालाच मराठीचे एक अक्षर येणार नाही याची खात्री आहे तसे). संपर्क लागतो. विपरित गोष्टींचं दर्शन झालं तर पगडा पूर्ववत आणायला ज्येष्ठ लागतात. आज स्थलांतर प्रचंड आहे. पण नव्या जागी जो संमिश्र मूर्खपणा चालू होतो त्याला धर्म म्हणायचं नाही असा दंडक असल्यानं धर्म लुप्त होतोय असं वाटू शकतं.
५. अतिशिक्षितांत आणि अतिउत्साहितांत प्रश्नचिन्ह केवळ धार्मिक तत्त्वज्ञानावर उभे करायचे आणि शास्त्रज्ञ म्हणतील ती पूर्व दिशा म्हणायचे असा प्रकार चालू आहे. पर्यायी तत्त्वज्ञानावर प्रश्नचिन्ह मारायचेच नाही अशी मानसिकता असल्याने लोक अधार्मिक बनत असावेत.
६. धर्म मरावेत, बदनाम व्हावेत, लढावेत अशी बर्याच हुशार आणि दुष्ट लोकांची इच्छा असू शकते. प्रत्येक खापर धर्मावर फुटल्यामुळे प्रत्येक जण अशा बदनाम गोष्तीपासून दूर राहू पाहत आहे.
७. आपण देव मानत नाही इतके म्हटले तरी लोक आय क्यू फार हाय आहे असे मानतात. केवल स्वतःच्या बुद्ध्इमत्तेच्या इगोसाठी लोक अधार्मिक होतात. धार्मिक लोक मूर्ख असतात आणि सगळे महान आअणि अतिबुद्धीमान लोक अधार्मिक असतात असे इंप्रेशन देण्यात अधार्मिक यशस्वी झालेले आहेत.
८. स्वतःस अज्ञातवादी म्हणणारे सर्वाधिक आहेत. त्यांच्या तुलनेत नास्तिक कमी आहेत. या लोकांना अकारण नास्तिकांत पकडल्याने धर्म कमी होत आहे असे वाटते.
९. सारे वैज्ञानिक जगतही सायंटिफिक डॉग्माजचे बळी आहे.
१०. ज्याला त्याज्य धर्म म्हणायचे आहे त्यातले घटक हळूहळू बदलत असतात. धर्म डायनामिक गोष्ट आहे. आजचे हिंदू, मुस्लिम, इ इ धर्म जाऊन वेगळ्या नावाचे धर्म येतील, त्यांचे आधार, स्वरुप, लोक एकत्र जुडण्याचे प्रकार, श्रद्धा, कृती इ इ वेगळे असतील. पण एकूणात मूर्खपणा तितकाच असेल (मंजे असू शकतो.). हे जे नवधर्म आहेत ते आपण मोजत नाहियेत म्हणून धर्म कमी होत आहे असे वाटत असू शकते.
११. प्रत्येक माणसाला पुरेसा वेळ मिळाला, त्याने आवश्यक तितके चिंतन केले, मग ईश्वर व धर्मविषयक मत बनवले, पुढे ते दृढ बनत गेले तर त्याला काही म्हणता येईल. आज जमाना खूप घाईत आहे. घाईत मत कुठेही जाऊ शकते.
१२. सेक्यूलरीझम आणि सहिष्णूता म्हणजे आपला धर्म सोडून देणे असा देखिल अर्थ बरेच लोक घेतात. उदा. ऑफिसात मला धर्म नसेल तर हळूहळू घरून देखिल जातो.
१३. धर्माचं दृश्य रुप मूर्खपणाचं आहे हे लोकांना फार झपाट्यानं कळत आहे. ती अर्थहिनता लागलीच धर्मातली आस्था कमी करण्यास मदत करते. परंतु सामान्य लोकांना धर्माचा खरा इंसेंटीव मानवी मूल्यांचा arbitrarily accepted स्रोत आहे हे उमगत नाही.
७. आपण देव मानत नाही इतके
काय सांगता? फारच डोकेबाज बुवा हे अधार्मिक लोक! चांगली युक्ती काढलीय. :-)
अधार्मिक लोक सामान्य लोकांची
अधार्मिक लोक सामान्य लोकांची बुद्धी भ्रष्ट करून त्यांचे शोषण करू शकत असतात असा विचार मनी यायला एक प्रकारचं ओरियंटेशन लागतं, एक प्रकारचं निरीक्षण लागतं. तशा निष्कर्षाप्रती येणं असोच, तसं ओरियन्टेशन देखिल स्वतःस बुद्धीप्रामाण्यवादी, विवेकी म्हणवणार्या माणसांत विकसित होणार नाही याची चोख काळजी अधार्मिकांनी घेतली आहे. फारच डोकेबाज आहेत. इंडीड.
धर्माचा प्रभाव कमी होत आहे ही
हे बरोबर नाही. रेग्युलर चर्चगोअर्सची संख्या कमी होत आहे हे सत्य आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये हे दिसून आलेलं आहे.





त्यातही तरुण मंडळींचं प्रमाण कमी होत आहे.
बरोबर. लेखाचा मुद्दा तोच आहे. जे पूर्वी धार्मिक संस्था करत त्यासाठी लोक सेक्युलर व्यवस्थांकडे वळत आहेत. (मानसिक आजारांविषयी तुम्ही जी आकडेवारी दिलेली आहे तीसुद्धा कदाचित याचंच द्योतक असेल. कन्फेशनला जाणारे लोक कदाचित सायकॉलॉजिस्ट्सकडे वळले असतील)
बाकीची कारणं फारच तकलादू, ओढूनताणून आणलेली वाटतात. गंभीर कारणं देण्यापेक्षा त्यातल्या मूर्ख, गाढव वगैरे शब्दांमुळे अकारण कोरडे ओढण्याचा हेतू जाणवतो. त्यापेक्षा माणूस घायकुतीला आला की देवाला शरण जातो, आणि आजकाल माणसं कमी वेळा घायकुतीला येतात हे कारण जास्त पटतं. आपलं मूल मरणं, आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू बघावा लागणं, दारिद्र्याने किंवा दुष्काळाने अन्नान्न होणं - या गोष्टींमुळे माणूस असहाय होतो आणि देवाचा धावा करतो. या गोष्टी गेल्या शतकात कमी झाल्या आहेत. तद्वतच देवावर अवलंबून राहाणं कमी झालं आहे. या युक्तिवादात नक्की काय चूक आहे हे तुम्ही सांगितलेलंच नाही.
धर्माचा 'स्फिअर ऑफ
हा अभ्यास म्हणा, निष्कर्ष म्हणा जिथे आस्तिकता धर्माचा पाया आहे अशा अब्राहमिक धर्मांबद्दल अधिक जोरकस विधान शक्य असले तरी अन्य धर्मियांबद्दल हे विधान करायचे असल्यास कितीतरी अधिक विदा व अभ्यास मिळवणे गरजेचे आहे. सध्या वरील विधान केवळ अब्राहमिक - त्यातही ख्रिश्चन व ज्यूंबद्दल नक्कीच खरे असावे असे वाटते. इतर धर्मियांबद्दल हे विधान सत्य असेल/नसेल पण ते तितक्याच ठामपणे करायला पुरेसा विदा नाही.
हिंदु धर्म घेतल्यास 'धार्मिकता' हा फारच 'मोजण्यास कठीण' असा विषय आहे. इथे आस्तिकता हा धर्माचा आधार नाही. एखादा पूर्ण नास्तिक सुद्धा हिंदु असु शकतो इतकेच नाही तर त्याच्यासाठी देव दर्शनाला न जाणे हे अत्यंत 'धार्मिक' कृत्य झाले. अशावेळी नास्तिक हिंदूमध्ये वाढ झाली असेल व देवळात जाण्याचे प्रमाण त्याच प्रमाणात घटले असेल तर धार्मिकतेत घट झाली असे म्हणता येणार नाही.
हिंदूच जाऊ दे, एकुणच आशियायी व आफ्रिकन धर्मांबद्दल "धार्मिकता" मोजण्यासाठी धर्मस्थळाला जाणे, प्रार्थना करणे यापेक्षा अधिक निकष अपेक्षित आहेत.
---
अब्राहमिक धर्मांपैकी मुसलमान धर्मियांची धार्मिकता कमी होतेय असा अभ्यास आहे काय? किमान प्रगत देशांत तरी? आणि त्याचे निकष काय आहेत? हे ही समजून घ्यायला आवडेल.
--
तेव्हा काही ठराविक धर्मियांच्या अभ्यासावरून फक्त त्या धर्मियांबद्दल वरील विधान ठामपणे करता यावे. धर्माचा प्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स कमी होतोय अशा सर्वंकष विधानाला अधिक विदा आवश्यक आहे.
+१_+
मार्मिक दिल्या गेली आहे. तुम्ही कुठल्याही हिंदूला पकडून विचारा. खूप थोडे लोक 'मी मंदिरात जात नाही' असे सांगतील. आणि चर्चात जाण्याप्रमाणेच मंदिरात जाणे हाच केवळ धार्मिकतेचा निकष मानायचा तर हिंदू धर्माचा प्रभाव कमी होणे वगैरे अवघडच दिसते.
अतिप्रचंड मार्मिक. पण असे
अतिप्रचंड मार्मिक. पण असे म्हटल्यावर "अमेरिकेचा विदा भारतालाही लागू होणार नाही कशावरून" छाप नेहमीची अर्ग्युमेंटे येणार म्हणून गप्प राहिलो इतकंच. नॉन ख्रिश्चन आणि नॉन युरो-अमेरिकन विदा दाखवा आणि बोला, मग मानू.
Cut off from all sides,
Cut off from all sides, villagers at quake epicentre face slow death
-------
French Muslim girl banned from class for wearing long skirt
स्कूल सरकारी असेल तर हे अनुचित आहे.
La Journée de la jupe
'स्कर्ट दिवस' (La Journée de la jupe) असंच नाव असणाऱ्या चित्रपटाची आठवण झाली. हाच विषय, हीच चर्चा आणि अगदी तपशीलातही एवढं साधर्म्य. चित्रपटात स्कर्ट घालणारीच हिंसेचा, ताकदीचा दुरुपयोग करते एवढा फरक मात्र दिसतोय.
फ्रेंच लोक, स्वतःला जगाला
फ्रेंच लोक, स्वतःला जगाला अंधारयुगातून बाहेर काढणारे, अतिपुरोगामी, इ इ म्हणून जगाला मूर्खात काढण्यात आजवर यशस्वी झालेले आहेत. वास्तवात साले भारतीयांपेक्षा मागास आहेत. पगडी काय बॅन, बुरखा काय बॅन,... नेहमी अन्य धर्मीयांना हिणवणार. आणि चार्लिच्या घटनेनंतर इस्लामवरचे हल्ले मेडियात येण्यापासून देखिल सरकार दाबत आहे कि काय वाटते.
फ्रेंच लोक आफ्रिकेतील माजी
फ्रेंच लोक आफ्रिकेतील माजी कॉलनीज़ कडून कलोनियल टॅक्स आजही वसूल करत असल्याची बातमी वाचली होती मध्ये. आणि असले दुटप्पी हरामखोर जगाला अक्कल शिकवताहेत लेकाचे.
तुका म्हणे ऐशा नरा, मोजूनि माराव्या पैजारा!