फेब्रुवारी दिनवैशिष्ट्य

फेब्रुवारी

१०
११ १२ १३ १४ १५
१६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९

१ फेब्रुवारी
जन्मदिवस : प्राच्यविद्यापंडित व मराठी कोशसाहित्यकार सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव (१८९४), अभिनेता क्लार्क गेबल (१९०१), लेखक लँग्स्टन ह्यूजेस (१९०२), क्रिकेटपटू जहांगीर खान (१९१०), कवी राजा बढे (१९१२), अभिनेता ए. के. हंगल (१९१७), लेखिका म्यूरिएल स्पार्क (१९१८), भौतिकशास्त्रज्ञ व लेखक फ्रिट्जॉफ काप्रा (१९३९), अभिनेता जॅकी श्राॅफ (१९५८), फूट्बॉलपटू बातिस्तुता (१९६९), क्रिकेटपटू अजय जडेजा (१९७१)
मृत्युदिवस : लेखिका मेरी शेली (१८५१), चित्रकार पिएट माँद्रियान (१९४४), अभिनेता बस्टर कीटन (१९६६), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ वर्नर हायझेनबर्ग (१९७६), नाटककार मो. ग. रांगणेकर (१९९५), नोबेलविजेती कवयित्री विस्वावा त्षिंबोर्स्का (२०१२), गझलकार इलाही जमादार (२०२१)

---
वर्धापनदिन : NFAI - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (१९६४)
१८९९ : अ‍ॅस्पिरिनचा शोध.
१९२३ : जर्मन मार्कचे अभूतपूर्व अवमूल्यन. एका डॉलरची किंमत ४५,५०० मार्क्स. (वर्षभरापूर्वी ती १९२ मार्क्स होती.)
१९७९ : आयातुल्ला खोमेनी यांचे दीर्घ काळच्या हद्दपारीनंतर इराणमध्ये पुनरागमन.
१९९२ : भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अँडरसनला फरारी घोषित केले.
२००२ : पत्रकार डॅनिएल पर्लची अपहरणकर्त्यांकडून निर्घृण हत्या.
२००३ : अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. कल्पना चावलासह सात अंतराळवीर मृत्युमुखी.

२ फेब्रुवारी
जन्मदिवस : लेखक जेम्स जॉईस (१८८२), ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकर (१८८४), स्वातंत्र्यसैनिक, स्वतंत्र भारताच्या मंत्रीमंडळातील पहिल्या महिला मंत्री व विश्व आरोग्य संघटनेच्या पहिला महिला आणि पहिल्या आशियाई अध्यक्षा राजकुमारी अमृत कौर (१८८९), लेखक खुशवंत सिंग (१९१५), सिनेदिग्दर्शिका व्हेरा चितिलोव्हा (१९२९) कवयित्री अरुणा ढेरे (१९५७), गायिका शकिरा (१९७७)
मृत्युदिवस : बालसाहित्यकार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्वर्यू व 'ज्ञानप्रकाश'चे संपादक वा. गो. आपटे (१९३०), विचारवंत बर्ट्रंड रसेल (१९७०), पहिले ज्ञानपीठ विजेते लेखक जी.एस. कुरूप (१९७८), लेखक अ. ‌वा. वर्टी (१९८७), टेनिसपटू फ्रेड पेरी (१९९५)

---

१८८४ : ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित.
१९२२ : जेम्स जॉईसलिखित कादंबरी 'युलिसिस' प्रकाशित.
१९३३ : हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
१९४३ : पाच महिन्यांच्या लढ्यानंतर जर्मन सैन्याचा स्टालिनग्राडमध्ये पराभव.
१९५२ : इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा पहिला विजय.
१९८९ : अफगाणिस्तानमधून शेवटचे सोविएत सैनिक परतले.
१९९० : दक्षिण आफ्रिकेत आफ्रिकन नॅशनल काॅंग्रेसवरची बंदी उठली; वर्णभेद धोरण संपुष्टात.

३ फेब्रुवारी
जन्मदिवस : लेखिका व कलासंग्राहक गर्ट्र्यूड श्टाईन (१८७४), सिनेदिग्दर्शक कार्ल थिओडोर ड्रायर (१८८९), चित्रकार नॉर्मन रॉकवेल (१८९४), वास्तुविशारद अल्व्हार आल्टो (१८९८), तत्त्वज्ञ सिमॉन वेल (१९०९), सिनेनिर्माता व दिग्दर्शक नासिर हुसैन (१९३१), अभिनेत्री वहीदा रेहमान (१९३८), अभिनेत्री दीप्ति नवल (१९५७)
मृत्युदिवस : स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक योहानस गटेनबर्ग (१४६८), गायिका ऊम कलतूम (१९७५), भौतिकशास्त्रज्ञ फ्रँक ओपनहायमर (१९८५), समीक्षक , साहित्यिक, पुणे विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी प्रमुख रा. शं. वाळिंबे (१९८९), सिनेदिग्दर्शक जॉन कासाव्हेटस (१९८९), तबलावादक अल्लारखा (२०००)

---

१७६० : मराठय़ांनी सदाशिवभाऊंच्या नेतृत्वाखाली उदगीरच्या लढाईत निजामाचा पराभव केला.
१८३२ : क्रांतिवीर उमाजी नाईक यांना फाशी देण्यात आले.
१८७० : अमेरिकेच्या संविधानातील १५वा बदल अमलात. मतदानातील वंशभेद संपुष्टात.
१९२५ : भारतातील विजेवर चालणारी पहिली रेल्वेगाडी मुंबई आणि कुर्ला दरम्यान सुरू झाली.
१९२८ : मुंबईत सायमन कमिशनचा निषेध करण्यात आला. चौपाटीवरील निषेध सभेत ५०,००० लोकांनी ‘गो बॅक सायमन’ अशा घोषणा देऊन सायमनचे स्वागत केले.
१९८९ : दक्षिण आफ्रिकेचे अखेरचे श्वेतवर्णी राष्ट्राध्यक्ष पी.डब्ल्यु. बोथांचा राजीनामा.

४ फेब्रुवारी
जन्मदिवस : चित्रकार फरर्नाँ लेजे (१८८१), कोशकार चिं. ग. कर्वे (१८९३), स्त्रीवादी लेखिका बेटी फ्रीडन (१९२१), गायक पं. भीमसेन जोशी (१९२२), नर्तक बिरजू महाराज (१९३८), अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (१९७४)
मृत्युदिवस : भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस (१९७४), अभिनेते मा. भगवान (२००२), स्त्रीवादी लेखिका बेटी फ्रीडन (२००६)

---

विश्व कर्करोग दिन
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - श्रीलंका
वर्धापनदिन - इंटरनेटचा पूर्वसुरी अर्पानेट (१९६९), फेसबुक (२००४)
१६६० : दाभोळ बंदर शिवाजी महाराजांच्या ताब्यात
१६७० : कोंडाणा किल्ला जिंकला; तानाजी मालुसरे धारातीर्थी
१७९४ : फ्रेंच राज्यक्रांती : फ्रान्स आणि फ्रेंच वसाहतींत गुलामगिरी बेकायदेशीर ठरवली गेली.
१८५९ : 'सिनाई बायबल'चा शोध. चौथ्या शतकातले ग्रीकमध्ये लिहिलेले हे बायबल ख्रिस्ती धर्मासाठीचा मूल्यवान ऐतिहासिक ठेवा आहे.
१९३६ : रेडिअमचे कृत्रिमरीत्या उत्पादन. किरणोत्सारी पदार्थाचे असे उत्पादन करण्याचा हा पहिला प्रसंग.
१९४४ : जॉं आनुईलिखित 'अँटिगनी' नाटकाचा प्रथम प्रयोग. ग्रीक मिथकाद्वारे नाझींच्या आक्रमणाला विरोध करणारे हे नाटक पुढे आणीबाणीला विरोध करण्यासाठी डॉ. श्रीराम लागूंनी मराठीत बसवले.
१९४५ : दुसरे महायुद्ध : चर्चिल, रुझवेल्ट व स्टालिनदरम्यान 'याल्टा परिषद' सुरू.

५ फेब्रुवारी
जन्मदिवस : संत साहित्याचे अभ्यासक शं. गो. तुळपुळे (१८९४), अभिनेता अभिषेक बच्चन (१९७६)
मृत्युदिवस : लेखक थॉमस कार्लाईल (१८८१), वारकरी संप्रदायातले विष्णुबुवा जोग (१९२०), बालनाट्य चळवळीच्या अध्वर्यू सुधा करमरकर (२०१८)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - मेक्सिको (संविधान दिन)
१२९४ : अल्लाउद्दिन खिलजीने दौलताबादचा किल्ला घेतला.
१६६५ : मुंबई पोर्तुगीजांकडून इंग्रजांकडे.
१८५२ : सेंट पीटर्सबर्ग येथील जगविख्यात हर्मिटेज कलासंग्रहालय खुले.
१९०९ : बेकेलाईट ह्या पहिल्या कृत्रिमरीत्या उत्पादित प्लास्टिकच्या उत्पादनाची घोषणा.
१९१४ : चार्ली चॅप्लिनचा 'ट्रॅम्प' पडद्यावर प्रथम अवतरला.
१९१९ : चार्ली चॅप्लिन, डग्लस फेअरबँक्स, मेरी पिकफोर्ड व डी.डब्ल्यू. ग्रिफिथ यांनी 'युनायटेड आर्टिस्ट्स' ही चित्रपट वितरण व निर्मिती करणारी सहकारी संस्था स्थापना केली.
१९२० : 'दादा' कलाचळवळीचा उगम.
१९५२ : अश्लील लिखाणाच्या आरोपातून कवी बा . सी . मर्ढेकर मुक्त.
१९५८ : टायबी नावाचा हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने हरवला. अमेरिकेने हरवलेल्या चार आण्विक शस्त्रांपैकी हे एक आहे.
२००३ : अमेरिकन परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल यांनी इराककडे अण्वस्त्रे आहेत असे संयुक्त राष्ट्रसंघाला पटवण्याचा प्रयत्न केला.

६ फेब्रुवारी
जन्मदिवस : गणितज्ञ निकोलस बर्नोली (१६९५), गीतकार प्रदीप (१९१५), अभिनेत्री झ्सा झ्सा गॅबॉर (१९१७), सिनेदिग्दर्शक फ्रान्स्वा त्रूफो (१९३२), गायक व संगीतकार बॉब मार्ली (१९४५)
मृत्युदिवस : चित्रकार ग्युस्ताव्ह क्लिम्ट (१९१८), ज्ञानेश्वरीचे विवेचक, निबंधकार व नाट्यसमीक्षक गणेश कृष्ण आगाशे (१९२७), स्वातंत्र्यसैनिक मोतीलाल नेहरू (१९३१), बडोद्याचे महाराज व समाजसुधारक सयाजीराव गायकवाड (१९३९), सिनेदिग्दर्शक ऋत्विक घटक (१९७६), टेनिसपटू आर्थर अ‍ॅश (१९९३), इतिहास संशोधक शारदा द्विवेदी (२०१२), लता मंगेशकर (२०२२)

---

जागतिक मोबाईल फोनविहीन दिन
१९०० : हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना.
१९१८ : ब्रिटनमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार.
१९३२ : 'प्रभात' फिल्म कंपनीचा आणि पर्यायाने मराठीतील पहिला बोलपट 'अयोध्येचा राजा' मुंबईच्या कृष्ण सिनेमागृहात प्रदर्शित झाला व मराठी बोलपटयुगाला प्रारंभ झाला.
१९३२ : कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात वीणा दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या.
१९५४ : काश्मीरच्या विधानसभेने काश्मीर भारताचा भाग असल्याचे स्वीकारले.
१९५९ : टेक्सस इन्स्ट्रुमेन्ट्सच्या जॅक किल्बीने इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिले पेटंट घेतले.
२००१ : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आणि तंबाखूपासून बनविण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची जाहिरात करण्य़ावर बंदी घालणार्‍या 'तंबाखू उत्पादने' विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
२००२ : अमेरिकेने आंतरराष्ट्रीय न्यायालयातून अंग काढून घेतले.
२००२ : अनेक वर्षांच्या प्रतिबंधानंतर काबूल विद्यापीठावे दरवाजे महिलांसाठी खुले.
२००६ : पाकविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात सचिन तेंडुलकरच्या १४,००० धावा व ३९वे शतक पूर्ण झाले.

७ फेब्रुवारी
जन्मदिवस : लेखक चार्ल्स डिकन्स (१८१२), गणितज्ञ जी. एच. हार्डी (१८७७), नोबेलविजेता लेखक सिन्क्लेअर ल्यूईस (१८८५), चित्रकार व पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाचे संस्थापक नारायण ईरम पुरम (१८९७), क्रांतिकारक मन्मथ नाथ गुप्त (१९०८)
मृत्युदिवस : महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधरस्वामी (१२७५), संगीतज्ञ व संगीतसमीक्षक वामनराव हरी देशपांडे (१९९०)

---

वर्धापनदिन - मोनॉपॉली उर्फ व्यापार डाव हा खेळ (१९३५)
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - ग्रॅनडा
१२७३ : महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधरस्वामी यांनी भारतभ्रमणास सुरुवात केली. चक्रधरस्वामींनी समाजातील विषमतेचा कायम विरोध केला. समकालीन कालखंडाच्या सतत पुढे राहून पुरोगामी दृष्टिकोन बाळगणे, शिष्यांना सोपे लिखाण करायला लावणे या त्यांच्या वेगळेपणाच्या निदर्शक गोष्टी होत.
१७५२ : फ्रान्समधील पहिल्या (दिदेरोच्या) विश्वकोशावर बंदी घालण्याची ख्रिस्ती धर्ममार्तंडांची मागणी.
१८४२ : विरेश्वर उर्फ तात्या छत्रे संचालित 'ज्ञानसिंधु' साप्ताहिकाचा पहिला अंक मुंबईत प्रकाशित.
१८४८ : पुणे नेटिव्ह जनरल लायब्ररीची (सध्याचे 'पुणे नगर वाचन मंदिर') स्थापना. लोकहितवादी या संस्थेचे संस्थापक सदस्य होते.
१८५६ : ईस्ट इंडिया कंपनीने अवधचे नबाब वाजिदअलीशाह यांना सत्ता सोडण्यास भाग पाडले.
१८५६ : मुंबईतील पारशी उद्योजक कावसजी नानाभाई दावर यांनी सुरू केलेल्या कापड गिरणीमध्ये पहिल्यांदाच सूत काढण्यात आले.
१८५७ : 'मादाम बोव्हारी' कादंबरीवरील अनैतिकतेच्या आरोपांतून लेखक ग्युस्ताव्ह फ्लोबेरची निर्दोष सुटका.
१८८४ : कोकणातील वरसई गावचे विष्णुभट गोडसे यांनी १८५७ सालच्या स्वातंत्र्य संग्रामाची स्वत : अनुभवलेली माहिती असलेला 'माझा प्रवास' हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहून पूर्ण केला.
१८९८ : फ्रेंच राष्ट्राध्यक्षांवर ज्यू विद्वेषाचा आरोप करणारे खुले पत्र ("J'accuse") लिहिल्याबद्दल विख्यात लेखक एमिल झोलावर अब्रूनुकसानीचा खटला सुरू.
१९२० : कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीचा 'सैरंध्री' हा मूकपट पुण्याच्या आर्यन सिनेमागृहात प्रदर्शित झाला. स्त्रियांनीच केलेल्या स्त्री भूमिका हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य होते.
१९६२ : अमेरिकेने क्यूबासोबत व्यापारावर बंदी आणली.
१९६४ : 'बीटल्स'चे अमेरिकेत पहिल्यांदा आगमन.
१९७३ : वॉटरगेट प्रकरण - अमेरिकन सिनेटची चौकशी समिती स्थापन.
१९९२ : मास्ट्रिक्ट करारावर सह्या करून १२ देशांतर्फे युरोपियन संघाला अधिकृत मान्यता.
१९९९ : अनिल कुंबळेने पाकिस्तानविरोधात खेळताना एकाच डावात दहा बळी घेतले. जिम लेकरनंतर (१९५६) हे साध्य करणारा तो पहिला गोलंदाज ठरला.

८ फेब्रुवारी
जन्मदिवस : आद्य विज्ञानकाल्पनिकालेखक ज्यूल्स व्हर्न (१८२८), अभिनेता, दिग्दर्शक जॅक लेमन (१९२५), गायिका शोभा गुर्टू (१९२५), गज़लगायक जगजित सिंग (१९४१), क्रिकेटपटू, भारताचा पूर्व कप्तान मोहम्मद अझरूद्दीन (१९६३), अभिनेता जयदीप अहलावत (१९८०)
मृत्युदिवस : नोबेल विजेता अणूशास्त्रज्ञ वाल्टर बोथं (१९५७), इतिहास संशोधक, कवी, कोशकार, शाहिरी वाङगमयाचे संग्राहक यशवंत नरसिंह केळकर (१९९४), कवी निदा फाझली (२०१६), आंतरराष्ट्रीय आरोग्यतज्ज्ञ हान्स रॉसलिंग (२०१७)

---

१८९९ - चापेकर बंधूंनी द्रविड बंधूंवर गोळीबार करून त्यांना ठार केले.
१९३१ - पुरोगामी पाक्षिक 'आत्मोद्धार'चा पहिला अंक प्रकाशित.
१९६३ - मेक्सिको सिटीमधे XHGC-TV या वाहिनीवर जगातला पहिला रंगीत कार्यक्रम प्रसारित.
१९७१ - नासडॅक या पहिल्या इलेक्ट्रॉनिक शेअर बाजाराचा आरंभ.
१९७४ - तीन महिन्यांचा विक्रमी काळ स्कायलॅब या यानात राहून तीन अंतराळवीर पृथ्वीवर परत.
१९९४ - कपिलदेव निखंज याचा कसोटी क्रिकेटमधे सर्वाधिक बळी घेण्याचा नवा विक्रम.
२००५ - इस्रायल आणि पॅलेस्टीनी नेत्यांमधे शांतता करार.

९ फेब्रुवारी
जन्मदिवस : तत्त्वज्ञ, लेखक थॉमस पेन (१७३७), कवी गोविंद तथा गोविंद त्र्यंबक दरेकर (१८७४), नोबेलविजेता जीवशास्त्रज्ञ जॅक मोनॉ (१९१०), नोबेलविजेता लेखक जे. एम. कूट्झी (१९४०), गायिका, अभिनेत्री मिया फॅरो (१९४५)
मृत्युदिवस : भारतीय कामगार चळवळीचे जनक व समाजसुधारक नारायण मेघाजी लोखंडे (१८९७), आयुर्वेदाचार्य पुरुषोत्तम गणेश नानल (१९४४), सिनेदिग्दर्शक, निर्माते व अभिनेते राजा परांजपे (१९७९), मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि जनता पक्षाचे अध्वर्यू एम.सी. छागला (१९८१), अभिनेत्री शोभना समर्थ (२०००), अभिनेत्री नादिरा (२००६)

---

१९०० - टेनिसमधल्या प्रतिष्ठेच्या डेव्हिस कपची सुरुवात.
१९१३ - पृथ्वीचा एक नैसर्गिक उपग्रह उल्कारूपात नष्ट.
१९३३ - 'श्यामची आई'च्या लेखनास सुरुवात.
१९५१ - स्वतंत्र भारतातली पहिली जनगणना सुरू झाली.
१९६९ - 'बोईंग ७४७'चे पहिले चाचणी उड्डाण.
१९७१ - चंद्रावर तिसऱ्या वेळेस माणसाला नेऊन अपोलो-१४ परत पृथ्वीवर.
१९९५ - अंतराळवीरांनी पहिली अंतराळातली वाटचाल (स्पेस वॉक) केली.
२०१३ - अफजल गुरू याला फाशी.
१० फेब्रुवारी
जन्मदिवस : आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेट (१८०३), लेखक बोरिस पास्तरनाक (१८९०), नाटककार बेर्टोल्ट ब्रेश्ट (१८९८), लेखिका, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, बौद्ध धर्म, लोकसंस्कृती व लोकसाहित्याच्या अभ्यासक, विचारस्वातंत्र्याच्या झुंजार पुरस्कर्त्या दुर्गा भागवत (१९१०), चित्रपट कला-दिग्दर्शक बाळ गजबर (१९१४), जलतरणपटू मार्क स्पिट्झ (१९५०)
मृत्युदिवस : तत्त्वज्ञ मोंतेस्किय (१७५५), लेखक अलेक्सांद्र पुश्किन (१८३७), भौतिकशास्त्रज्ञ हाईनरिश (एमिल) लें़झ (१८६५), चित्रकार ओनोरे दोमिए (१८७९), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ रोंटजेन (१९२३), नि:स्पृह पत्रकार, लेखक, ब्राह्मणेतर पक्षाचे आद्य संस्थापक, 'दैनिक प्रभात'चे संपादक वालचंद रामचंद कोठारी (१९७४), विचारवंत आणि लेखक नरहर कुरुंदकर (१९८२), पुण्यातील 'मुक्तांगण' व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनिता अवचट (१९९७), गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर (२००१), कुस्तीगीर अमृता मोहोळ (२००३), पर्यावरणतज्ज्ञ डॉ. रश्मी मयूर (२००४), नाटककार आर्थर मिलर (२००५), अभिनेता रॉय शायडर (२००८)

---

१८१९ : मराठ्यांची एकेकाळची राजधानी असणारा सातारचा किल्ला इंग्रजांनी काबीज केला.
१८४६ : अँग्लो-शीख युद्धाच्या अखेरच्या लढाईत सोबराव येथे शिखांचा पराभव.
१९२६ : मुंबईमध्ये निवडक रस्त्यांवर मोटारबस सुरू करण्याचा निर्णय बेस्ट कंपनीने घेतला.
१९३१ : इंग्रजांनी भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.
१९३८: औरंगाबादमधील आनंद कृष्ण वाघमारे या कार्यकर्त्याने 'मराठवाडा' हे वृत्तपत्र साप्ताहिकाच्या स्वरूपात सुरू केले. निजामाच्या राजवटीत त्यावर बंदी घालण्यात आली. तेव्हा पुण्याहून वेगवेगळ्या अकरा नावांनी प्रकाशित करून ते निजामाच्या संस्थानात पाठविण्यात येऊ लागले.
१९४९ : पुणे विद्यापीठाची स्थापना.
१९५२ : स्वतंत्र भारताच्या इतिहासात लोकशाही पद्धतीने झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर. जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला प्रचंड यश.
१९९६ : महासंगणक 'डीप ब्लू'ने बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हला हरवले.

११ फेब्रुवारी
जन्मदिवस : संशोधक थॉमस अल्वा एडिसन (१८४७), ग्रंथकार, मराठी शुद्धलेखनविषयक चळवळीचे पुरस्कर्ते शं. रा. हातवळणे (१८५०), अभिनेता बर्ट रेनॉल्ड्स (१९३६), लेखिका गौरी देशपांडे (१९४२)
मृत्युदिवस : गणितज्ञ व तत्त्वज्ञ रने देकार्त (१६५०), गांधीवादी कार्यकर्ते आणि बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक जमनालाल बजाज (१९४२), सिनेदिग्दर्शक सर्गेई आयजेनश्टाईन (१९४८), तत्त्वज्ञ व्हिक्टर क्लेम्परर (१९६०), कवयित्री सिल्विआ प्लाथ (१९६३), राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद (१९७७), गीतकार व 'विविधभारती'चे संस्थापक नरेंद्र शर्मा (१९८९), सिनेनिर्माते, लेखक, दिग्दर्शक कमाल अमरोही (१९९३), सामाजिक कार्यकर्त्या विजयाताई लवाटे (२००५), गायिका व्हिटनी ह्यूस्टन (२०१२)

---

१९२२ : इन्शुलिनचा शोध.
१९३३ : म. गांधी यांच्या 'हरिजन वीकली'चा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९३६ : चॅप्लिनचा 'मॉडर्न टाइम्स' चित्रपट प्रदर्शित.
१९३८ : बीबीसीने जगातील पहिला साय-फाय टीव्ही कार्यक्रम दाखवला. 'रोबॉट' हा शब्द ज्यात प्रथम वापरला गेला आहे त्या R.U.R. या चेक नाटकातला तो एक भाग होता.
१९३९ : लीज माईट्नर आणि ऑटो फ्रिश यांचा अणुविखंडनाबद्दल लेख 'नेचर'मध्ये आला.
१९७८ : अ‍ॅरिस्टॉटल, शेक्सपीअर आणि चार्ल्स डिकन्स यांच्या लिखाणावरील बंदी चीनने उठवली.
१९७९ : पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील 'सेल्युलर जेल' राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
१९७९ : इराणी क्रांती - आयातुल्ला खोमेनी यांची इराणवर सत्ता.
१९९० : दक्षिण आफ्रिकेच्या वर्णविरोधी लढ्याचे नेते नेल्सन मंडेला यांची २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर सुटका.
२०११ : दीर्घकालीन सत्तेवर असणारे इजिप्तचे अध्यक्ष होस्नी मुबारक जनक्षोभानंतर पदच्युत.

१२ फेब्रुवारी
जन्मदिवस : पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणवीस (१७४२), भौतिकशास्त्रज्ञ हाईनरिश (एमिल) लें़झ (१८०४), उत्क्रांतिवादाचा जनक चार्ल्स डार्विन (१८०९), गुलामगिरीला विरोध करणारा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन (१८०९), छायाचित्रकार यूजेन अ‍ॅटगेट (१८५७), नर्तिका आना पाव्हलोव्हा (१८८१), चित्रकार मॅक्स बेकमन (१८८४), अभिनेता प्राण (१९२०), सिनेदिग्दर्शक कोस्टा-गाव्हरास (१९३३), लेखिका ज्यूडी ब्लूम (१९३८), लेखक सतीश काळसेकर (१९४३), क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ (१९४९)
मृत्युदिवस : पानिपतानंतरचे मराठेशाहीतील महत्त्वाचे सत्ताधारी महादजी शिंदे (१७९४), तत्त्वज्ञ इमॅन्युएल कांट (१८०४), सिनेदिग्दर्शक त्झिगा व्हर्टोव्ह (१९५४), सिनेदिग्दर्शक जाँ रन्वार (१९७९), लेखक हुलिओ कोर्ताझार (१९८४), कवयित्री पद्मा गोळे (१९९८), कॉमिक स्ट्रिपलेखक चार्ल्स शुल्झ (२०००), अभिनेत्री भक्ती बर्वे (२००१)

---

बाल सैनिक दिन, डार्विन दिन
स्वातंत्र्यदिन : चिली
१९०९ : अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या प्रगतीसाठी झटणारी संस्था National Association for the Advancement of Colored People (NAACP) स्थापन.
१९२८ : सरदार वल्लभाई पटेल यांनी बार्डोलीच्या सत्याग्रहाचा प्रारंभ केला.
१९४१ : पेनिसिलिनचा वापर करून पहिल्या रुग्णाचा उपचार केला गेला.
१९४७ : ख्रिस्तिअन दिओरने आपले पहिले कलेक्शन सादर करून स्त्रियांच्या फॅशनमधला नवा अध्याय सुरू केला.
१९५४ : तंबाखूचा कर्करोगाशी संबंध जोडणारे पहिले संशोधन प्रकाशित.
१९७४ : नोबेलविजेता रशिअन लेखक अलेक्सांद्र सोल्झेनित्सिनला 'गुलाग आर्शिपेलॅगो' पुस्तक लिहिल्याबद्दल अटक आणि हद्दपारी.
१९८९ : इस्लामाबादमध्ये 'सॅटनिक व्हर्सेस'विरोधात निदर्शने व हिंसा.
१९९४ : एडवर्ड मुंकचे 'स्क्रीम' या विख्यात चित्राची चोरी. (मे १९९४मध्ये ते सापडले.)
२००२ : सर्बिअन राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेविचविरोधात युद्धगुन्हे आणि मानवताविरोधी गुन्ह्यांबद्दल आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला सुरू.
२००४ : सॅन फ्रान्सिस्को शहराच्या महापौरांच्या आदेशानुसार समलिंगी जोडप्यांना विवाहनोंदणी करण्यास परवाने मिळू लागले.

१३ फेब्रुवारी
जन्मदिवस : अर्थतज्ज्ञ थॉमस माल्थस (१७६६), लेखक इव्हान क्रिलोव्ह (१७६९), कवयित्री सरोजिनी नायडू (१८७९), इतिहासकार वा. सी. बेंद्रे (१८९४), लेखक जॉर्ज सिमेनाँ (१९०३), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ विलिअम शॉकली (१९०६), कवी फैझ अहमद फैझ (१९११), म्यानमारच्या स्वातंत्र्य चळवळीचे अध्वर्यू आँग सान (१९१५), अभिनेत्री किम नोव्हॅक (१९३३), गायक-संगीतकार पीटर गॅब्रिएल (१९५०), गायक रॉबी विलिअम्स (१९७४), टेनिसपटू सोमदेव देववर्मन (१९८५)
मृत्युदिवस : शिल्पकार बेनव्हन्यूतो चेलिनी (१५७१), चित्रकार याकोपो बासानो (१५९२), संगीतकार रिचर्ड वॅग्नर (१८८३), संस्कृतचे व्यासंगी वा. गो. उर्ध्वरेषे (१९४१), गणितज्ञ एरिक हेके (१९४७), चित्रकार जॉर्ज रुओ (१९५८), गायक अमीर खान (१९७४), सिनेदिग्दर्शक कॉन इचिकावा (२००८), ज्ञानपीठविजेते कवी शहरयार (२०१२)

---

विश्व रेडिओ दिन
१६३३ : गॅलिलिओला चर्चने अटक केली.
१८९५ : ल्यूमिएर बंधूंनी 'सिनेमॅटोग्राफ' या चित्रपटयंत्राचे पेटंट घेतले.
१९१३ : न्यू यॉर्कमधील 'आर्मरी शो'द्वारे आधुनिक कला अमेरिकनांसमोर प्रथम सादर.
१९३१ : दिल्ली अधिकृतरीत्या भारताची राजधानी बनली.
१९४५ : ब्रिटिश व कनेडिअन विमानांनी दोन दिवस ड्रेस्डेनवर मारा करून शहर बेचिराख केले. ३५,००० नागरिक ठार. ख्रिस्ती कलेचा वारसा असलेली अनेक चर्चेस उध्वस्त.
१९७० : 'ब्लॅक साबाथ' गटाने त्याच नावाचा अल्बम प्रकाशित केला. हेवी मेटल संगीतातला हा आद्य अल्बम मानला जातो.
२००८ : ऑस्ट्रेलिआचे पंतप्रधान केव्हिन रुड यांनी गोऱ्यांच्या अत्याचारांविरोधात तेथील मूलनिवासींची माफी मागितली.
२०१० : जर्मन बेकरी, पुणे येथे बाँबस्फोट; १७ ठार, ६० जखमी.

१४ फेब्रुवारी
जन्मदिवस : मुघल सम्राट बाबर (१४८३), कवयित्री संजीवनी मराठे (१९१६), सिनेदिग्दर्शक मासाकी कोबायाशी (१९१६), संस्कृत, जर्मन, पाली व इतर भाषांचे जाणकार व प्राच्यविद्या अभ्यासक म. अ. मेहेंदळे (१९१८), सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया (१९२५), सिनेदिग्दर्शक अलेक्झांडर क्लूगं (१९३२), अभिनेत्री हॅरिएट अँडरसन (१९३२), अभिनेत्री मधुबाला (१९३३)
मृत्युदिवस : विजयनगर साम्राज्याचे संस्थापक असणाऱ्या हरिहर आणि बुक्क या बंधूंपैकी बुक्कराय (१३७८), नागपूरकर भोसले घराण्यातील एक शूर व मुत्सद्दी सेनानी रघुजी भोसले (१७५५), दर्यावर्दी कॅप्टन कूक (१७७९), लेखक पी.जी. वूडहाउस (१९७५), लेखक डिक फ्रान्सिस (२०१०)

---

व्हॅलेंटाईन्स डे.
वर्धापनदिन : IBM (१९२४), यूट्यूब (२००५)
१८७६ : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोन यंत्रणेच्या पेटंटसाठी अर्ज केला.
१८८० : एमिल झोलाची कादंबरी 'नाना' प्रकाशित.
१९१८ : एडगर राइस बरोच्या टारझनवरील पहिला सिनेमा प्रदर्शित झाला.
१९४६ : पहिला संगणक एनियाक युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.
१९७२ : 'ग्रीज' संगीतिकेचा ब्रॉडवेवर पहिला प्रयोग.
१९८५ : भोपाळ गॅस हत्याकांडाच्या चौकशीसाठी नेमलेल्या वैद्यकीय समितीने युनियन कार्बाइडमधून गळलेल्या वायूनेच लोकांचे प्राण गेल्याचा निष्कर्ष काढला.
१९८६ : पहिले कृत्रिम हृदयरोपण.
१९८९ : इराणच्या आयातुल्ला खोमेनीने लेखक सलमान रश्दीविरोधात खुनाचा फतवा काढला.
१९८९ : युनियन कार्बाइड कंपनीने भोपाळ गॅसपीडितांसाठी ४७० मिलियन डॉलरची नुकसानभरपाई जाहीर केली.
२००३ : हान्स ब्लिक्स यांच्या नेतृत्वाखालील तपास समितीने इराकमध्ये अण्वस्त्रे न सापडल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीसमोर जाहीर केले.
२००३ : डॉली या पहिल्या सस्तन क्लोन असलेल्या मेंढीचा मृत्यू.
२००५ : लेबेनॉनचे माजी पंतप्रधान रफिक हरिरी यांची हत्या.
२०१९ : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बसवर पुलवामा, काश्मीर येथे आत्मघातकी दहशतवादी हल्ला; ४६ जवान ठार.

१५ फेब्रुवारी
जन्मदिवस : शास्त्रज्ञ गॅलिलिओ (१५६४), समाजसुधारक जेरेमी बेंथम (१७४८), संगणकशास्त्रज्ञ निकलॉस वर्थ (१९३४), कवी व सामाजिक कार्यकर्ते नामदेव ढसाळ (१९४९)
मृत्युदिवस : कवी मिर्झा गालिब (१८६९), संगीतकार नॅट किंग कोल (१९६५), शास्त्रज्ञ रिचर्ड फाईनमन (१९८८)

---

राष्ट्रीय दिन : ध्वज दिन - कॅनडा
३९९ - सॉक्रेटिसला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
१८७८ : 'मराठी ग्रंथोत्तेजक सभा' ही संस्था लोकहितवादी आणि न्या. रानडे यांनी स्थापन केली.
१९३९ : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला.
१९५४ : जगातील पहिली पोलिओ लस उपलब्ध.
१९८९ : सोव्हिएत सैन्याची अफगाणिस्तानातून माघार.
२००३ : अमेरिकेने इराकवर सुरू केलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ जगभर लाखोंची निदर्शने.
२०११ : लिबियात क्रांतीची सुरुवात.

१६ फेब्रुवारी
जन्मदिवस : थोरले माधवराव पेशवे (१७४५), अभिनेता आय. एस. जोहर (१९२०), सिनेदिग्दर्शक जॉन श्लेसिंजर (१९२६), टेनिसपटू जॉन मॅकेन्रो (१९५९)
मृत्युदिवस : ‘ए ग्रामर ऑफ द मरहट्ट लँग्वेज’ या मराठी व्याकरणाच्या पुस्तकाचे लेखक व्याकरणकार जेम्स रॉबर्ट बॅलेंटाईन (१८६४), भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके (१९४४), भौतिकशास्त्रज्ञ मेघनाद सहा (१९५६)

---

स्वातंत्र्य दिन : लिथुएनिया.
वर्धापनदिन : रेड क्रॉस (१८६३)
१७८५ : पाण्याचे विभाजन करून हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळतात हे लाव्हाझिएने दाखविले.
१९२३ - प्राचीन इजिप्तचा राजा तुतेनखामेनची कबर उघडण्यात आली.
१९५९ : फिडेल कॅस्ट्रोचा क्यूबाचा पंतप्रधान म्हणून शपथविधी.
२००५ : जागतिक तापमानवाढीला आळा घालण्यासाठीचा 'क्योटो करार' अमलात. १४० देशांची करारास मान्यता, पण अमेरिका कराराबाहेर राहिली.

१७ फेब्रुवारी
जन्मदिवस : नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ ऑटो स्टर्न (१८८८), अभिनेता अ‍ॅलन बेट्स (१९३४), बास्केटबॉलपटू मायकेल जॉर्डन (१९६३)
मृत्युदिवस : नाटककार मोलिएर (१६७३), क्रांतिवीर लहुजी साळवे (१८८१), क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके (१८८३), जाझ संगीतकार व पिआनोवादक थेलोनियस मंक (१९८२)

---

राष्ट्रीय दिन /स्वातंत्र्यदिन : कोसोव्हो (२००८)
१६०० : इटालियन धर्मसुधारणावादी विचारवंत जिओर्दानो ब्रूनो यास जिवंत जाळण्यात आले.
१७७६ : एडवर्ड गिबनचे पुस्तक 'The Decline and Fall of the Roman Empire' प्रकाशित.
१८०३ : मुंबईच्या फोर्ट भागात मोठी आग लागली. या आगीचे थैमान दहा दिवस चालले. या अग्निकांडात ४१७ घरे जळून पूर्ण नष्ट झाली.
१८६७ : सुएझ कालव्यातून पहिले जहाज पार झाले.
१८९७ : रुडॉल्फ डिझेल यांनी आपल्या इंजिनाची यशस्वी चाचणी केली.
१९०४ : पुच्चिनीचा ऑपेरा 'मॅडम बटरफ्लाय'चा पहिला प्रयोग.
१९१२ : नाटककार राम गणेश गडकरी यांच्या ‘प्रेमसंन्यास’ या पहिल्या नाटकाचा पहिला प्रयोग रंगभूमीवर झाला.
१९३१ : महात्मा गांधी आणि भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड अर्विन यांची प्रथम भेट.
१९३२ : फ्रिट्झ लँग दिग्दर्शित कल्ट चित्रपट 'एम' प्रदर्शित.
१९३३ : अमेरिकेत दारूबंदी (प्रोहिबिशन) समाप्त.
१९३८ : जॉन बेअर्डने रंगीत टी.व्ही.चे प्रात्यक्षिक दाखवले.
१९३९ : पहिली 'फोक्सवॅगन' लोकांसमोर सादर.
१९५९ : हवामानाचा अभ्यास करण्यासाठीचा पहिला उपग्रह व्हँगार्ड दोन प्रक्षेपित करण्यात आला.
१९७१ : चीन व अमेरिकेत संबंध पुनर्प्रस्थापित करण्यासाठी माओ व हेन्री किसिंजर यांची भेट.
१९९६ : महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हकडून पराभूत.

१८ फेब्रुवारी
जन्मदिवस : आधुनिक बॅटरीमागचं तत्त्व शोधणारा भौतिकशास्त्रज्ञ अलेस्सांद्रो व्होल्टा (१७४५), लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख (१८२३), पत्रकार, कवी किसन फागोजी बनसोड (१८७९), लेखक निकोस काझांत्झाकीस (१८८३), स्वातंत्र्यसैनिक रफी अहमद किडवाई (१८९४), संगीत दिग्दर्शक खय्याम (१९२७), नोबेलविजेती लेखिका टोनी मॉरिसन (१९३१), सिनेदिग्दर्शक मिलोश फॉर्मन (१९३२), अभिनेत्री निम्मी (१९३३), अभिनेत्री नलिनी जयवंत (१९३४), विचारवंत वसंत पळशीकर (१९३६), सिनेदिग्दर्शक इस्त्वान झाबो (१९३८), अभिनेता जॉन ट्रॅव्होल्टा (१९५४), टेनिसपटू एव्हगेनी काफेल्निकोव्ह (१९७४)
मृत्युदिवस : चित्रकार फ्रा अँजेलिको (१४५५), धर्मसुधारक मार्टिन ल्यूथर (१५४६), चित्रकार व शिल्पकार मायकेलँजेलो (१५६५), भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट ओपनहाईमर (१९६७), चित्रकार बाल्थस (२००१), लेखक व सिनेदिग्दर्शक अ‍ॅलन रोब-ग्रिये (२००८)

---

राष्ट्रीय दिन /स्वातंत्र्यदिन : गांबिया
१८८५ : मार्क ट्वेनचे पुस्तक 'हकलबरी फिन' प्रकाशित.
१९११ : 'एअर मेल'ने पत्र पाठवण्याचा पहिला प्रसंग - अलाहाबादहून नैनी येथे विमानाने ६,५०० पत्रे पाठवली गेली.
१९२६ : युकातान (मेक्सिको) येथे माया संस्कृतीतील पाच शहरांचा शोध.
१९३० : प्लुटो ग्रहाचा शोध.
१९४६ : मुंबईत खलाशांचे बंड.
२००७ : 'समझौता एक्स्प्रेस'मध्ये दहशतवादी बाँबस्फोट; ६८ ठार.

१९ फेब्रुवारी
जन्मदिवस : शास्त्रज्ञ निकोलस कोपर्निकस (१४७३), छत्रपती शिवाजी महाराज (१६३०), शिल्पकार कॉन्स्टंटिन ब्रांकुसी (१८७६), चित्रकार गॅब्रिएल म्युंटर (१८७७), लेखक अरविंद गोखले (१९१९)
मृत्युदिवस : विचारवंत व स्वातंत्र्य चळवळीतील नेते गोपाळ कृष्ण गोखले (१९१५), नोबेलविजेता लेखक आंद्रे जिद (१९५१), नोबेलविजेता लेखक नट हॅम्सन (१९५२), चित्रकार ना.श्री. बेंद्रे (१९९२), संगीतकार पंकज मलिक (१९९८), कलाकार व वास्तुविशारद हुंडरट्वास्सर (२०००), 'टू किल अ मॉकिंगबर्ड'ची लेखिका, कादंबरीकार हार्पर ली (२०१६)

---

१८१८ : पेशवाईतील सरदार बापू गोखले यांचे अष्टी येथे इंग्रजांशी लढतीत निधन.
१८७८ : थॉमस अल्वा एडिसनला फोनोग्राफचे पेटंट मिळाले.
१९१८ : सोव्हिएत रशिआमध्ये जमीन, पाणी व इतर नैसर्गिक संसाधनांची खाजगी मालकी रद्दबातल.
१९६२ : नाटककार फ्रीडरिश ड्यूरेनमॅटचे नाटक 'The Physicists: A Comedy in Two Acts' प्रकाशित.
१९६३ : बेट्टी फ्रीडनचं 'फेमिनीन मिस्टीक' पुस्तक प्रकाशित. अमेरिकेतील स्त्रीवादी चळवळीसाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरला.
१९८६ : संगणकीकृत रेल्वे आरक्षण सुविधा दिल्ली रेल्वे स्टेशनामध्ये उपलब्ध.

२० फेब्रुवारी
जन्मदिवस : वास्तुविशारद लुई कान (१९०१), छायाचित्रकार अ‍ॅन्सेल अ‍ॅडम्स (१९०२), अभिनेता सिडनी प्वातिए (१९२७), गिटारिस्ट व गायक कर्ट कोबेन (१९६७)
मृत्युदिवस : अभिनेते, पटकथालेखक व नाट्यविषयक लेखक के. नारायण काळे (१९७४), 'माणूस'चे संपादक, लेखक व तरुण लेखकांची फळी उभारणारे श्री. ग. माजगावकर (१९९७), लेखक हंटर थॉंपसन (२००५), समाजसुधारक व लेखक कॉ. गोविंद पानसरे (२०१५)

---

१८६५ : बॉस्टनमध्ये सुप्रसिद्ध Massachusetts Institute of Technologyची स्थापना.
१८७२ : न्यू यॉर्कमधील सुप्रसिद्ध मेट्रोपोलिटन संग्रहालय (मेट) खुले.
१८७७ : चायकॉव्हस्कीचा बॅले 'स्वान लेक'चा पहिला प्रयोग.
१९०९ : फ्यूचरिस्ट कलाचळवळीचा जाहीरनामा पॅरिसमध्ये प्रकाशित.
१९४७ : भारताचे अखेरचे व्हाइसरॉय म्हणून लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या नियुक्तीची इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये ब्रिटिश पंतप्रधान अ‍ॅटली यांची घोषणा.
१९८० : सोव्हिएत सैन्याने अफगाणिस्तानात केलेल्या आक्रमणाला विरोध म्हणून मॉस्को येथील ऑलिंपिक खेळांवर बहिष्काराची अमेरिकेची घोषणा.
१९८३ : निवडणूकपूर्व हिंसाचारात आसाममध्ये सुमारे १००० मृत.
१९८६ : सोव्हिएत रशिआने 'मिर' हे अंतराळ स्टेशन सुरू केले.
१९८७ : अरुणाचल प्रदेश या स्वतंत्र राज्याची निर्मिती.

२१ फेब्रुवारी
जन्मदिवस : सिनेदिग्दर्शक साशा गित्री (१८८५), गिटारिस्ट आंद्रे सेगोव्हिआ (१८९३), शास्त्रज्ञ शांतिस्वरूप भटनागर (१८९४), कवी सूर्यकांत त्रिपाठी 'निराला' (१८९६), लेखिका अनाईस निन (१९०३), कवी डब्ल्यू. एच. ऑडेन (१९०७), सिनेदिग्दर्शक सॅम पेकिनपा (१९२५), प्राचीन मराठी वाङ्मयाचे संशोधक व अभ्यासक डॉ. वसंत दामोदर कुलकर्णी (१९३१), अभिनेत्री जयश्री गडकर (१९४२), लेखक डेव्हिड फॉस्टर वॉलेस (१९६५)
मृत्युदिवस : तत्त्वज्ञ स्पिनोझा (१६७७), स्वातंत्र्यवीर कित्तूरची राणी चेन्नम्मा (१८२९), चित्रकार ग्युस्ताव्ह कायबोत (१८९४), गायिका झोहराबाई अंबालावाली (१९९०), अभिनेत्री नूतन (१९९१)

---

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
१६३२ : गॅलिलिओचे 'The Dialogue Concerning the Two Chief World Systems' पुस्तक प्रकाशित.
१८०४ : जगातील पहिले वाफेवर चालणारे रेल्वे ईंजिन वेल्समधील कारखान्यात तयार झाले.
१८४२ : जॉन जे. ग्रीनॉने शिवणाच्या मशीनचे पेटंट घेतले.
१८४८ : कार्ल मार्क्सने साम्यवादी जाहीरनामा(कम्युनिस्ट मॅनिफेस्टो) प्रकाशित केला.
१८७८ : न्यू हेवन, कनेक्टिकटमध्ये पहिली टेलिफोन डिरेक्टरी वितरित केली गेली.
१९१६ : पहिल्या महायुद्धातले कुप्रसिद्ध Verdunचे युद्ध सुरू. डिसेंबरपर्यंत चाललेल्या या युद्धात दर महिन्याला सरासरी ७०,००० सैनिक मृत्युमुखी पडले.
१९२५ : 'न्यू यॉर्कर' नियतकालिकाचा पहिला अंक प्रकाशित.
१९३२ : विनोबा भावे यांची 'गीता प्रवचने' धुळय़ाच्या तुरुंगात दर रविवारी सुरू झाली.
१९४७ : एडविन लँडने पोलरॉईड कॅमेऱ्याचे प्रात्यक्षिक दाखवले.
१९५२ : पूर्व पाकिस्तानमध्ये (आताचा बांगलादेश) बंगाली भाषेला अधिकृत दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. चार ठार. या घटनेच्या स्मृतीप्रीत्यर्थ नंतर युनेस्कोने हा दिवस 'मातृभाषा दिन' म्हणून पाळण्यास सुरुवात केली.
१९५३ : फ्रान्सिस क्लार्क व जेम्स डी. वॉट्सन यांनी डी.एन.ए.च्या रेणूची रचना शोधली.
१९६० : क्युबात फिडेल कॅस्ट्रोने सगळ्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण केले.
१९६५ : न्यू यॉर्कमध्ये नेशन ऑफ इस्लामच्या सदस्यांनी कृष्णवर्णीयांचा नेता माल्कम एक्सची हत्या केली.
२०१३ : हैदराबाद येथे बाँबस्फोट; १७ ठार.

२२ फेब्रुवारी
जन्मदिवस : तत्त्वज्ञ आर्थर शॉपेनहॉवर (१७८८), सिनेदिग्दर्शक लुई ब्युन्युएल (१९००)
मृत्युदिवस : शोधक अमेरिगो व्हेस्पुच्ची (१५१२), सम्राट हुमायूं (१५५६), चित्रकार कामिय कोरो (१८७५), भाषातज्ज्ञ विचारवंत फेर्दिनांद सोस्यूर (१९१३), लेखक स्टीफन झ्वाईग (१९४२), कस्तुरबा गांधी (१९४४), चित्रकार ऑस्कर कोकोश्का (१९८०), बहुमाध्यमी कलाकार अँडी वॉरहॉल (१९८७)

---

१७५९ : मद्रासचा वेढा : इंग्रज सैन्यापुढे फ्रेंच सैन्याने माघार घेतली.
१९७४ : पाकिस्तानने बांगलादेशाला राष्ट्र म्हणून अधिकृत मान्यता दिली.
१९९१ : सद्दाम हुसेनने कुवेतमधून आपले सैन्य माघारी घेतले नाही, तर युद्ध करण्याची धमकी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी दिली.
१९९७ : डॉली मेंढीचे क्लोनिंग यशस्वी झाल्याची घोषणा झाली.
२००२ : श्रीलंकेच्या सरकारने तमिळ वाघांशी युद्धबंदीचा करार केला.

२३ फेब्रुवारी
जन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)
मृत्युदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)

---
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई
वर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)
१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.
१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.
१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.
१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.
१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.
१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.
१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.
१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.
१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.
१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.
२०२० - दिल्लीमध्ये दंगली सुरू; ४६ मृत; २००हून अधिक जखमी.

२४ फेब्रुवारी
जन्मदिवस : प्रवासी व बखरकार इब्न बतुता (१३०४), कथाकार ग्रिम बंधूंपैकी विलहेल्म ग्रिम (१७८६), चित्रकार विन्स्लो होमर (१८३६), लेखिका इरेन नेमिरॉव्हस्की (१९०४), सिनेदिग्दर्शक यिरी ट्रिंका (१९१२), गायक तलत मेहमूद (१९२४), चित्रकार रिचर्ड हॅमिल्टन (१९२२), अभिनेता जॉय मुखर्जी (१९३९), विचारवंत गायत्री चक्रवर्ती स्पिव्हाक (१९४२), 'अ‍ॅपल'चा निर्माता स्टीव्ह जॉब्ज (१९५५)
मृत्युदिवस : शास्त्रज्ञ हेन्री कॅव्हेंडिश (१८१०), लेखिका लक्ष्मीबाई टिळक (१९३६), नृत्यांगना रुक्मिणी देवी अरुंडेल (१९८६), अभिनेत्री ललिता पवार (१९९८), 'अमर चित्र कथा'कार अनंत पै (२०११), अभिनेत्री श्रीदेवी (२०१८), सिनेदिग्दर्शक कुमार शहानी (२०२४)

---
जागतिक क्षयरोग दिन.
स्वातंत्र्यदिन : एस्टोनिया
१८८२ : क्षयरोगाच्या जीवाणूंचा शोध लागल्याचे डॉ. रॉबर्ट कॉक यांनी जाहीर केले.
१९०६ : हेन्री बेक्वेरेलला किरणोत्साराच्या आनुषंगिक परिणामांचा शोध लागला.
१९१३ : लंडन-ग्लासगो टेलिफोन लाईन बंद पाडल्यानंतर आणि एका नेत्याघरी बाँबस्फोट केल्यानंतर ब्रिटिश स्त्रीवादी कार्यकर्ती एमिली पॅंंकहर्सटला अटक.
१९३८ : द्युपॉँ कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरूवात केली.
१९४२ : व्हॉइस ऑफ अमेरिकाचे प्रसारण सुरू.
१९६१ : मद्रास इलाख्याचे 'तमिळनाडू' असे नामकरण.
१९७१ : ब्रिटिश राष्ट्रमंडळाच्या (कॉमनवेल्थ) नागरिकांचा ब्रिटनमध्ये रहिवासाचा हक्क नव्या कायद्याद्वारे काढून टाकण्यात आला.
१९८९ : इराणचा सर्वेसर्वा आयातुल्ला खोमेनीने सलमान रश्दीला ठार करण्याबद्दल ३,०००,००० अमेरिकन डॉलरचे बक्षीस जाहीर केले.
२००८ : पन्नास वर्षांच्या सत्तेनंतर फिडेल कॅस्ट्रो क्युबाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त.
२०२२ : रशियाने युक्रेनवर हल्ला केला.

२५ फेब्रुवारी
जन्मदिवस : चित्रकार ओग्युस्त रन्वार (१८४१), ११ खंंडांत 'भारतीय साम्राज्य' लिहिणारे ना. भा. पावगी (१८५४), तत्त्वज्ञ रुडॉल्फ श्टाईनर (१८६१), 'अ‍ॅलिस इन वंडरलॅंड'चा रेखाचित्रकार जॉन टेनिएल (१९१४), लेखक अँथनी बर्जेस (१९१७), क्रिकेटपटू फारुख इंजिनियर (१९३८), 'बीटल' जॉर्ज हॅरिसन (१९४३), अभिनेता डॅनी डेंग्झोपा (१९४८), अभिनेता शाहिद कपूर (१९८१)
मृत्युदिवस : हजरजबाबी बिरबल (१५८६), संतकवी व वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक एकनाथ (१६००), चित्रकार मार्क रॉथ्को (१९७०), लेखक टेनेसी विलिअम्स (१९८३), कवी आणि गीतकार एस.एच. बिहारी (१९८७), 'अभिरुची' मासिकाचे संस्थापक, संपादक व भाषांतरकार आत्माराम उर्फ बाबुराव चित्रे (२००२), अभिनेता अर्लंड जोसेफसन (२०१२)

---

राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : कुवेत
१५१० : पोर्तुगीज व्हाइसरॉय अल्बुकर्क याने पणजीचा किल्ला जिंकला.
१७२८ : थोरल्या बाजीराव पेशव्यांनी पालखेड येथे निजामाचा पराभव करून त्याला मुंगी शेगावचा तह स्वीकारायला भाग पाडले.
१९५६ : सोव्हिएत नेते निकिता क्रुश्चेव्ह यांनी दिवंगत नेता स्टॅलिन याची हुकुमशाही आणि व्यक्तीला देशापेक्षा मोठे करण्याचा कल्ट यांची जाहीर निर्भर्त्सना केली.
१९५९ : दलाई लामा यांनी चीनमधून भारतात येऊन आश्रय घेतला.
१९६४ : कॅशियस क्ले (महंमद अली) विश्व हेवीवेट बॉक्सिंग चॅंपियन बनला.
१९८२ : ब्रिटनमधल्या शाळांत शिक्षा म्हणून मुलांना मारणं हा मानवी हक्कांचा भंग असल्याचा युरोपिअन मानवी हक्क न्यायालयाचा निर्णय.
१९८६ : फिलिपिन्सचा हुकुमशहा मार्कोस अहिंसक क्रांतीद्वारे पदच्युत. कोराझोन अकिनो सत्तेवर.
१९९१ : शीतयुद्धादरम्यान कम्युनिस्ट राष्ट्रांना एकत्र आणणारा वॉर्सॉ करार संपुष्टात.

२६ फेब्रुवारी
जन्मदिवस : नाटककार ख्रिस्तोफर मार्लो (१५६४), लेखक व्हिक्टर ह्युगो (१८०२), चित्रकार ओनोरे दोमिए (१८०८), जीन्सचा निर्माता लीव्हाई-स्ट्राउस (१८२९), लेखक थिओडोर स्टर्जन (१९१८), गायक जॉनी कॅश (१९३२), लेखक मिशेल वेलबेक (१९५६), लेखक व सिनेदिग्दर्शक अतिक राहिमी (१९६२), टेनिसपटू लि ना (१९८२)
मृत्युदिवस : पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी (१८८७), स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (१९६६), गझलगायक पंकज उधास (२०२४)

---

२००४च्या भारतीय पेटंट कायद्याविरोधात जागतिक कृती दिन.
१७९७ : बँक ऑफ इंग्लंडनं पाउंडची पहिली नोट बाजारात आणली.
१८४८ : कार्ल मार्क्स व फ्रीडरिक एंगेल्सलिखित 'कम्युनिस्ट मॅनिफेस्टो' प्रकाशित.
१९०९ : पहिल्या यशस्वी रंगीत सिनेमातंत्राचं लोकांसमोर सादरीकरण.
१९२० : 'द कॅबिनेट ऑफ डॉ. कॅलिगारी' ह्या जर्मन एक्स्प्रेशनिस्ट चित्रपटाचा बर्लिनमध्ये पहिला खेळ.
१९७६ : मराठी साहित्याला मिळालेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांना मिळाला.
१९८० : इजिप्त आणि इस्राएलदरम्यान राजनैतिक संबंध सुरू.
१९९१ : कुवेतमधून इराकी सैन्याची माघार.
१९९३ : न्यू यॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरखाली मोटारीत बाँबस्फोट. ६ ठार. हजाराहून अधिक जखमी.
१९९५ : १७६२पासून कार्यरत असलेली ब्रिटनमधली बेरिंग्ज बँक डेरिव्हेटिव्ह्ज आणि फ्यूचर ट्रेडिंग घोटाळ्यामुळे दिवाळ्यात निघाली.
२००१ : अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवटीने बामियान येथील बुद्धाचे दोन प्रचंड पुतळे धर्मबाह्य ठरवून नष्ट केले.

२७ फेब्रुवारी
जन्मदिवस : कवी हेन्री वॅड्सवर्थ लाँगफेलो (१८०७), वैदिक वाङ्मयाचे अभ्यासक वैजनाथ काशिनाथ राजवाडे (१८६०), नर्तक व नृत्यदिग्दर्शक निजिन्स्की (१८९०), लेखक जॉन स्टाइनबेक (१९०२), भाषाविषयक लेखक शं. रा. हातवळणे (१९०५), लेखक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज (१९१२), अभिनेत्री एलिझाबेथ टेलर (१९३२), हॉकीपटू संदीप सिंग (१९८६)
मृत्युदिवस : क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद (१९३१), नोबेलविजेता डॉक्टर इव्हान पाव्हलॉव्ह (१९३६), लेखक जेम्स जॉइस (१९४१)

---

मराठी भाषा दिन.
स्वातंत्र्यदिन : डॉमिनिकन प्रजासत्ताक.
१८५४ : झाशी संस्थान ईस्ट इंडिया कंपनीने ताब्यात घेतले. गव्हर्नर लॉर्ड डलहौसीने झाशी संस्थानचे प्रमुख राजे गंगाधरराव नेवाळकर यांनी घेतलेला दत्तक नामंजूर केला. याचा धक्का बसून गंगाधररावांचे निधन झाले. राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिशांच्या अन्यायाविरोधात लढण्याचे ठरविले.
१८७९ : सॅकरिनचा शोध.
१९३३ : जर्मनीत संसद (राइशस्टॅग) जळून खाक. नाझींनी या घटनेचा वापर जनतेच्या मनात भीती उत्पन्न करण्यासाठी आणि कम्युनिस्टांवर कटाचा आरोप लादून त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी केला. हजारो कम्युनिस्टांना अटक करून अगदी पहिल्यावहिल्या छळछावण्यांत त्यांची रवानगी केली. तसेच त्या भयाचा गैरफायदा उठवून नागरिकांच्या स्वातंत्र्याला बाधा आणणारे कायदे करून घेतले.
१९९६ : 'पोकेमॉन' गेम बाजारात उपलब्ध.
१९९८ : मुंबईत कांदिवली व विरार रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्बस्फोट. तीन ठार.
२००२ : गुजरातच्या गोधरा रेल्वे स्थानकात साबरमती एक्सप्रेसला आग. ५८ हिंदू यात्रेकरू ठार. हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेचा वापर जनतेच्या मनात भीती / चीड उत्पन्न करण्यासाठी आणि मुसलमानांवर कटाचा आरोप लादण्यासाठी केला. त्यातून उसळलेल्या दंगलींत १०००हून अधिक लोक (प्रामुख्याने मुसलमान) ठार व अनेक बेघर झाले.

२८ फेब्रुवारी
जन्मदिवस : लेखक व विचारवंत मिशेल द मोंतेन्य (१५३३), नोबेलविजेता शास्त्रज्ञ लिनस पॉलिंग (१९०१), कवी स्टीफन स्पेंडर (१९०९), वास्तुविशारद फ्रँक गेहरी (१९२९), क्रिकेटपटू करसन घावरी (१९५१), मेंडोलिनवादक यू. श्रीनिवास (१९६९), टेनिसपटू येलेना यांकोव्हिच (१९८५)
मृत्युदिवस : लेखक हेन्री जेम्स (१९१६), पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद (१९६३)

---

राष्ट्रीय विज्ञान दिन
जागतिक फेसबुकरहित दिन
स्वातंत्र्यदिन : इजिप्त
१९०९ : 'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले' ही कवी गोविंद यांची कविता व अन्य ब्रिटिशविरोधी साहित्य प्रकाशित केल्याबद्दल बाबाराव सावरकर यांना अटक.
१९२८ : डॉ. सी. व्ही. रमण यांनी त्यांचे संशोधन (रामन परिणाम) या दिवशी केले. पुढे त्यांना त्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. भौतिकशास्त्रात नोबेल मिळवणारे ते पहिले आशियाई होते. म्हणून हा दिवस ’राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून पाळला जातो.
१९३३ : नाझी सरकारने जर्मन नागरिकांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणली. बेर्टोल्ट ब्रेश्त आणि हाइनरिश मान हे लेखक देश सोडून गेले.
१९३५ : नायलॉनचा शोध.
१९४८ : ब्रिटिशांची शेवटची सैन्यतुकडी भारत सोडून मायदेशी परतली.
१९८३ : युरोपात लेसर डिस्क आणि काँपॅक्ट डिस्क (सीडी) उपलब्ध.
१९८६ : स्वीडिश पंतप्रधान ओलॉफ पाल्मे यांची हत्या.
२००१ : वर्ल्डकॉम कंपनीने ६००० लोकांना नोकरीवरून काढले. अमेरिकेत आर्थिक मंदीची सुरुवात.
२००२ : गुजरातमध्ये जातीय दंगली. नरोडा पटिया हत्याकांडात ९७ मृत. गुलबर्गा सोसायटीत ६९ मृत.

२९ फेब्रुवारी
जन्मदिवस : कवी बायरन (१६९२), पंतप्रधान मोरारजी देसाई (१८९६), नृत्यांगना रुक्मिणी देवी अरुंडेल (१९०४), चित्रकार बाल्थस (१९०८), राई गायक खालेद (१९६०)
मृत्युदिवस :
---
१९४० : ऑस्कर मिळवणारी हॅटी मॅकडॅनिएल पहिली कृष्णवर्णीय व्यक्ती ठरली.