Skip to main content

थोडा थोडा

सुपारीबाज टपोरीने खंडणीसाठी कपाळावर टेकविलेला
निष्ठुर घोडा
घोडेबाजारात निष्ठेची झूल आडसाली बदलण्यात निर्ढावलेला
संधिसाधू घोडा
जितांनी केलेल्या जेत्यांच्या जयजयकारात गुदमरलेला
अश्वमेधी घोडा
बुद्धिबळाच्या कृष्णधवल अवकाशात अवघडलेला
अडिचक्या चालीचा घोडा
गर्निकाच्या युध्दविकल चौकटीत पिकासोने कोंडलेला
टाहो फोडणारा घोडा
व्याधविद्ध मृगनक्षत्राच्या झगमगत्या चौकटीत दडलेला
तेजोमेघी घोडा
बहुरूपी घोडा
समजू लागलाय
थोडा
थोडा

chat gpt-3 .

गेल्या आठवड्यात chat gpt-3 चा बराच बोलबाला होतो आहे.
हा ए.आय निबंध लिहितो, कोडिंग करतो, कविता लिहितो, साध्या बातम्यासुद्धा नीट देतो वगैरे वगैरे पासून तो चड्डी घालायला मदत करतो, न जाळता कुकरमधे भात लावतो, खाता येईल असा उपमा बनवतो - इथपर्यंत वाट्टेल त्या अफवा पसरताहेत.

तेव्हा नक्की काय चालू आहे? chat gpt-3 ची उत्क्रांती खरंच धोकादायक वेगाने होते आहे का?
त्यामुळे कुठले जॉब धोक्यात येतील (३-५ वर्षांत)
कुठले जॉब खंप्लीट निकामी ठरतील?
पुढल्या काळात मग काय कौशल्य आत्मसात करावी?

अशा प्रश्नांची उत्तरं मला तरी माहिती नाहीत पण हवी आहेत.

पडघम

अनाम तार्‍याच्या गर्भीचे
ऊर्जा वादळ लवथवणारे
उधळून देते विस्फोटातून
विकीरणाचे पिसाट वारे

दुबळी दुर्बिण अधांतरातून
अनंतात डोकावून बघते
सर्वव्यापी, निर्लेप, अनादि
स्थळकाळाचे चित्र रेखिते

आतशबाजी अवकाशातील
निरभ्रातुनी मला खुणविते
भव्यत्वाचे क्षुद्रत्वाशी
अबोध नाते अधोरेखिते

अज्ञाताचा अदम्य रेटा
परतविण्याचे प्रयत्न माझे
थिटेच ठरती, रोमरोमी मग
कुतूहलाचा पडघम वाजे

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २८

स्वातंत्र्याची चळवळ ही पूर्ण राजकीय घटना होती. गांधींनी सर्व समाजाला चळवळीत आणले. स्वदेशी वस्तूंचा वापर, आयात केलेल्या वस्तूंवर बहिष्कार, सूतकताई, खादीचा वापर, सत्याग्रह, प्रभात फेऱ्या, असहकार अशी अनेक आयुधे त्यांनी सामान्य माणसाच्या हातात दिली. त्यानंतर स्वातंत्र्यलढा तीव्रतेने लढला गेला.

सममित आकृतींचा शोध - भाग ३

तीन मितींच्या अवकाशातच थांबून राहणे गणितज्ञांना रुचत नाही. चार किंवा उच्चतर मितींच्या विश्वातील सुसम आकृती शोधू पाहिल्या तर गणिती जगतातील एक अद्भुत असमतोल सापडतो.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

मराठी ग्रंथव्यवहार आणि तंत्रनिरक्षरता

Taxonomy upgrade extras

जगभरातल्या इतर भाषांत प्रकाशन व्यवसायाला जे तंत्रज्ञान आणि ज्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत, त्याच मराठी प्रकाशन व्यवसायालाही उपलब्ध होऊ शकतात. मराठी साहित्यव्यवहार पुरेसा भविष्याभिमुख आहे का?

दहीवडा आणि पॅराबोला

"काय रे, खात का नाहीयेस? दहीवडा चांगला नाहीये का आज?"

"नाही रे. चांगला आहे."

"मग काय झालं? तुला माहीतीये ना, एखादा मानव दहीवडा खात नसेल तर दोन शक्यता आहेत. एकतर तो हळूहळू मानवाचा आदिमानव बनतोय, किंवा त्याला प्रेमरोग झालाय."

"गप भेंजो. गोलमालमधले डायलाॅग बास कर आता."

"ओके ओके. पण झालं काय?"

"अरे आज निकिताला भेटायला जायचा विचार करत होतो; पण कोणतरी म्हणालं की ती आत्ताच पॅराबोलाला घेऊन स्पामधे गेलीय."

"पॅराबोला?"

"अरे निकिताच्या डाॅगीचं नाव आहे पॅराबोला. त्याला घेऊन डाॅग स्पामधे गेलीय. अख्खी सकाळ तिथेच असेल म्हणे."

भारत जोडो यात्रा

"नफरत छोडो भारत जोडो" म्हणत रागा उर्फ पप्पू उर्फ राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या पदयात्रेला चांगल्यापैकी प्रतिसाद मिळत असावा असं चित्र सध्या वर्तमानपत्र आणि सोशल मीडिया निर्माण करत आहेत. विशेषतः राहुलने महाराष्ट्रात आल्यानंतर सावरकरांवर भाष्य करून जाणीवपूर्वक आरोप-प्रत्यारोप सत्र चालू केलं असा मतप्रवाह आहे. त्यामागे मोदी मीडियाला यात्रेची दखल घेणं भाग पडावं असा हेतू होता आणि तो साध्य झाला असं काँग्रेस समर्थक, हितचिंतक आणि सध्याच्या राजवटीमुळे निराश झालेले लोक सांगत आहेत. त्याहीपुढे जाऊन एक भाबडा आशावाद सोशल मीडियावर दिसतो आहे.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २७

राष्ट्राची घडणप्रक्रिया कधीच संपत नाही. कारण विघटनकारी प्रक्रिया सतत चालू असतात.

सममित आकृतींचा शोध - भाग २

दोन मितींच्या प्रतलावर, म्हणजे कागदावर, पूर्णतः सममित अशा वेगवेगळ्या आकाराच्या अनंत चित्राकृती काढता येतात. तीन मितींच्या अवकाशात पूर्णतः सममित अशा किती घनाकृती बनवता येतात?

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स