Skip to main content

थॉट एक्सपेरीमेंट

खयालोमे
तो सगळा आठवडा आमच्या कुटुंबाला चांगला गेला होता. माझे आणि बायकोचं एकदाही भांडण झाले नव्हते. ती सात दिवस दररोज भेंडीची भाजी करत होती. भेंडी म्हटलं कि माझ्या अंगावर हे भेंडी एवढे काटे येतात पण ह्या आठवड्यात नाही. ताकातली भेंडी, भेंडी आणि ताक, भेंडीतले ताक, ताक भेंडी रस्सा, भेंडी दो ताक, भेडीया भेंडी, क्रश्ड लेडीज फिंगर ऑ बटरमिल्क असे भेंडीचे विविध प्रकार खाऊन अंतरात्मा तृप्त झाला होता. मी चवीने खातोय बघून बायकोही नवीन नवीन प्रकार शोधून काढत होती. छोट्या चंकी मंकीचा समजूतदारपणा तर वाखाणण्यासारखा होता. सात दिवसात एकदाही त्याने भोकाड पसरलेले नाही. का चॉकलेटसाठी हट्ट केला नव्हता.

ललित लेखनाचा प्रकार

पुढारलेल्या समाजांतील आर्थिक दुर्बलांसाठीचे आरक्षण ठरले वैध घटनादुरुस्तीवर सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब

अनुसूचित जाती,अ्नुसूचित जमाती आणि शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेले वर्ग वगळून राहिलेल्या पुढारलेल्या समाजवर्गांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी सरकारी नोकºया तसेच शैक्षणिक प्रवेशांमध्ये १० टक्क्यांपर्यंत आरक्षण ठेवण्याची तरतूद करणारी मोदी सरकारने केलेली १०३ वी घटनादुरुस्ती वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला.
जानेवारी २०१९ मध्ये करण्यात आलेल्या या घटनादुरुस्तीवर न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ३ विरुद्ध २ अशा बहुमताने घटनात्मक वैधतेची मोहर उठविली.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

न्यायाच्या नावाखाली मुंबई दंगलग्रस्तांची सुप्रीम कोर्टाकडून २१ वर्षांनी घोर थट्टा!

कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कर्तव्यात महाराष्ट्र सरकारने कसूर केल्याने मुंबईत डिसेंबर १९९२ व जानेवारी १९९३ मध्ये भीषण सांप्रदायिक दंगली झाल्या. त्यामुळे भयमुक्त वातावरणात सन्मानाने व निर्धोकपणे जीवन जगण्याच्या नागरिकांच्या मुलभूत हक्काची पायमल्ली झाली. परिणामी त्या दंगलींमुळे बाधित झालेले सरकारकडून भरपाई मिळण्यास पात्र ठरतात, असा निवाडा आता त्या भयावह घटनांनंतर तीन दशकांनी करून सर्वोच्च न्यायालयाने एकीकडे दंगलग्रस्तांची घोर थट्टा केली आहे तर दुसरीकडे स्वत:चेही हंसे करून घेतले आहे.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

दोन बाजू, चार हाथ लांब : नाणं आणि नेणिवा

एकीकडे अक्षरे मेळवूनि , पैजा जिंकल्या
सगळ्यांना खुले स्थळ दिले,येऊ दे सगळे
बोला, लिहा काय वाट्टेल ते! आम्ही आहोत
छापू आपण पटणारे, न पटणारे !सगळे!

दुसरीकडे केली कंपूबाजी, दिली कामे
भाई बंधूंना, रोटी-बेटी, शेटजी-भटजींचा
केला नेक्सस, देतो ऍक्सेस फक्त काहींना !

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २४

एकोणिसाव्या शतकात सिंचन, शेती आणि दळणवळण यात काय बदल झाला याचा विचार या भागात करू.

Roman à clef , झिरझिरीत पडदा, "कलेचे कातडे", गॉसिप, नॉस्टाल्जिया इत्यादिवगैरे अंकलटाईप्स गोष्टी

सरत असलेल्या वर्षांबरोबर "अनेक पुस्तकं वाचायची राहून जात आहेत" या जाणीवेचं रूपांतर "आपलं  फारसं काहीच वाचून होणार नाहीये" अशात व्हायला लागतं. अशा नव्याने झालेल्या जाणीवेकरता  #राहूनगेलेलीपुस्तकं असा हॅशटॅग चालवावा असा एक विचार डोकावून जातो.

...तर निमित्त आनंद यादव यांच्या "कलेचे कातडे" नावाच्या कादंबरीचं. काही आठवड्यांपूर्वी हे पुस्तक एका मित्राकडे पाहिलं ते वाचायला आणलं. काही दिवसांपूर्वी वाचायला घेतलं.

बातमीचा प्रकार निवडा

एका झूमकॉलची गोष्ट

अंक दिवाळी सुन्न फटाका
लेख लेखणी सुरसुर पिचक्या
जेमेतेमसे करिती यत्न
गोळा झाला क्षुल्लक कचरा

तशात कोणी येरु आला
जबरा काही सांगे सगळ्यां!
Trash टेस्टचा खूबपसारा
रा रा रा रा लेखच सारा.

दिधले कोणे कौतुकशब्द
वावा!मस्त!
Wow just

झाले, टोळा येणे केले
नेमे जैसे संध्यालागण
फुरफुरले ते कुठेकुठेशी
शब्दांमधुनी कठोर भाकड

येरु खवळे-
पाजी सगळे!!
म्हणे एकटा विरुद्ध सगळे!
म्हणे कसले असले बगळे
मीच हंस अन इतर कावळे.

कितीक होते वाचक प्रेक्षक
पहात-वाचत-ऐकत-हासत

उरले उरात काही..

"तुला माहित नसलेली एक गोष्ट तुला सांगतो, प्लीज ऐकून घेशील.."
"तुझ्या कपाळावरच्या बारीक आठ्या, हनुवटीवरचा आत जाऊन बसलेला सुंदर खोलगट भाग, मानेचा जरासा झोक, ओठांची ताणाने होणारी थरथर आणि संपूर्ण चेहऱ्यावर धुंदी अशीच राहणार असेल तर मी तुझ्या कितीही गोष्टी ऐकायला तयार आहे.."
"गंमत करू नकोस..ऐक, ऐक ना, माझं लग्न ठरलं आहे!"
"ओह! ही मला माहीती नसलेली गोष्ट आहे का, असंय का?"
"होय‌‌..हीच गोष्ट सांगायला मी भेटलो आहे आज.."
"तू पहिल्यांदा मला भेटलास, त्याच दिवशी ही गोष्ट मला समजली होती, फक्त ती गोष्ट कधी ऐकायला मिळणार याचीच मी वाट पाहत होतो!"

ललित लेखनाचा प्रकार

खूप कचरा आहे

मागे श्याम मनोहर म्हणालेत 'खूप लोक आहेत'. तसाच खूप कचराही आहे. पण ट्रॅशबद्दल 'ऐसी अक्षरे'मध्ये लिखाण मागवताना काल्पनिक नावामागे लपणाऱ्या संपादकीय फळीने फार दूर बघायलाच नको होते. त्यांच्या 'संघा'तच अनेक ट्रॅश बोलणारे आहेत. कुणीही इतर काय लिहिणार? ना उजवे, ना डावे, ना करडे, ना मऊ! छे हो कसलं काय, गरीब गाय आणि पोटात काय, तू काहून करते मग हाय हाय. मग हाय काय अन नाय काय, सब कूच येकुन येकच हाय, नाय काय आन होय काय ? ते 'मुळशी पॅटर्न'मधला राहुल म्हणाला तसे थेट 'प्लास्टिक आहेत'. तेव्हा ते कुठल्याही फिसलपट्टीवरून उडी मारतात, कुठेही विक्षिप्तपणा दाखवतात. मनाला येईल तिथे ट्रोलिंग करतात.