Skip to main content

ऍक्टर्सच्या लहानपणचे व्हिडीओ (ऊर्फ फालतू क्लिकबेट) (ऊर्फ मर्यादित कल्पनाशक्ती)

डिसेंबरमधली स्टोरी. नाताळच्या आसपासची.

मह्या आणि मी नेटफ्लिक्सवर कोणतीतरी फिल्म बघत होतो. कोणाच्यातरी डोळ्यांसमोर अख्खं आयुष्य तरळतं असा सीन होता. अगदी बालपणापासून वगैरे.

"भेंजो हा लहान पोरगा वेगळा आहे. त्या अॅक्टरच्या लहानपणचा नाहीये तो व्हिडिओ!" मह्या एकदम बोलला. "त्या अॅक्टरला जन्मखूण आहे बघ डाव्या कोपरावर. पोराला नाहीये तशी खूण." फिल्म रिवाईंड करत मह्या डिटेल्स दाखवू लागला.

ललित लेखनाचा प्रकार

'विज्ञानाचे बिनरहस्य' - भाग ३

केपलर १६३०मध्ये मरण पावला. आयझॅक न्यूटन १६४२मध्ये जन्मला. मानवाच्या इतिहासातला सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक कोण, असा प्रश्न काही वर्षांपूर्वी जगातल्या थोर वैज्ञानिकांना विचारण्यात आला होता. त्यात न्यूटन पहिला आणि आईनस्टाईन दुसरा आला होता. तर, त्या आयझॅक न्यूटनने ग्रहांच्या सूर्याभोवतीच्या कक्षांचं रहस्य उलगडलं. त्या रहस्याचं नाव अर्थात गुरुत्वाकर्षण. अवकाशातील कोणत्याही दोन वस्तू एकमेकींना आकर्षित करतात आणि ते आकर्षण त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या सम प्रमाणात असतं; तर त्या वस्तूंमधल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं. हा न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम.

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७

तर आता ट्रान्सपोर्ट लायसन्स:

बेसिकली ट्रान्सपोर्ट लायसन्स असेल तरच तुम्ही टूरिस्ट (पिवळी नंबर प्लेट) गाडी चालवू शकता.

टॅक्सीसाठी हे नेसेसरी असलं तरी सफिशियंट नसतं. त्यासाठी तुम्हाला बॅजही लागतो.

पण ह्या लायसन्सवर तुम्ही ओला-उबर चालवूच शकता.

आता ह्याची प्रोसेस थोडी ग्रे आहे.

हे लायसन्स तुम्हाला ड्रायव्हिंग स्कूलमार्फतच काढावं लागतं.

(असं मला सांगण्यात आलं.)

मग एका शुक्रवारी ड्रायव्हिंग स्कूलचे हुसेनभाई छान गोल टोपीत नमाज वगैरे पढून सुरमा वगैरे लावून मला आर. टी. ओ. ला घेऊन गेले आणि मी ड्रायव्हिंगची टेस्ट दिली.

ललित लेखनाचा प्रकार

मिसळ आपलं लौ आहे!

Taxonomy upgrade extras

शक्यतो खायप्यायच्या ठिकाणचे रिव्ह्यूज् मी लिहित नसते. म्हणजे आपल्या प्रत्येकाचे टेस्ट बड्स निराळे त्यामुळं मला जे लै भारी वाटेल ते जगाला लै भारी वाटेलच किंवा वाटलंच पाहीजे असं नाही (खरंतर तेच लैच भारीच असतंयच यात शंका नाहीच *cool* ) पण आज लिहायचं कारणपण खास आहे. मिसळ आपलं लौ आहे. जन्म गेला कोल्हापूरात मिसळ आवडत नाही असं तर होणं शक्य नाही. कोल्हापूरात जन्मल्या जन्मल्या पोरं डोळे उघडतात ते पातळभाजीच्या खमंग वासानंच (अतीशयोक्ती आहे माहिताय पण प्यार मै इन्सान को इतनी मुभा तो देनीच पडती हय (कंसात कंस घालून स्वतःला आवरा म्हणतेय) ). तर खूप दिवस झाले चांगली मिसळ खायला मिळाली नव्हती.

विज्ञानाचे बिनरहस्य - भाग १

२०१८ सालच्या 'अक्षर' दिवाळी अंकात मी एक लेख लिहिला. लेखाचं नाव होतं, 'विज्ञानाचे बिनरहस्य'. त्या लेखाचा हा पहिला भाग. पुढचे एक एक करून इथे देईन.

ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम

लॅम्बर्टचे शंक्वाकृती प्रक्षेपण

मी पाचवीत किंवा सहावीत होतो तेव्हा आईने मला एक अॅटलास आणून दिला. शाळेच्या अभ्यासाला पूरक म्हणून. दुसरं म्हणजे, भारतातील राज्यांचं लाकडी जिगसाॅ पझल माझ्या वर्गातल्या काही मुलांकडे होतं आणि ते बघून मीदेखील मागत होतो. त्याऐवजी अॅटलास जास्त उपयुक्त ठरेल असं आईबाबांना वाटलं. (आणि ते खरंच होतं.)

भूगोलाच्या पाठ्यपुस्तकात तिसरीत मुंबई, चौथीत महाराष्ट्र, पाचवीत भारत अशा चढत्या भाजणीने जगाच्या नकाशापर्यंत आमची मजल पोहोचली होती. पण हे नकाशे बहुतांशी फक्त राजकीय सीमारेषा दाखवणारे काळेपांढरे, ढोबळ नकाशे होते. त्या तुलनेत, हा अॅटलास म्हणजे पर्वणीच होता.

ललित लेखनाचा प्रकार

रामतीर्थकरबाई आणि बाबा?

तुम्हांला रामतीर्थकर बाई माहीत असतीलच. "भा करी करता आली च पाहिजे"वाल्या?

त्यांचं म्हणणं आहे, त्यांना आई म्हणायचं. आईचं म्हणणं नाकारता येत नाही, म्हणून आई. ठीक आहे, आई म्हणू! ज्यांचं दूध पितो त्या सगळ्या आया, असं म्हणण्याची आपली भारतीय संस्कृती आहे. भारतीय संस्कृती, माझं ठाण्यातलं बालपण आणि पुलंचा जोक एकत्र करायचं तर 'गोकुळ'च्या दुधाच्या पिशवीलाही आई म्हणावं लागेल. तुम्हाला पटवून देऊ का की ती पिशवी आई नव्हेच.

बहिणीला जपणारी मारग्रेट/ Music For Millions

Music For Millions
----------------------

आठवणीतला हॉलीवुड

रवींद्र दत्तात्रय तेलंग

अकल्पितपणे घडून आलेल्या योगाची लज्जत न्यारीच असते. सारखं कथानक असलेले दोन चित्रपट बारा तासांच्या आत बघण्याचा योग असाच एकदा मिळाला-एक हॉलीवुडचा, एक बॉलीवुडचा. आपआपल्या जागी दोन्हीं चित्रपट श्रेष्ठ. चित्रपट होते-‘म्युझिक फार मिलियन्स’ आणि ‘हा माझा मार्ग एकला.’

समीक्षेचा विषय निवडा

जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं! …..5

ए विंडिकेशन ऑफ दि राइट्स ऑफ वुमन (1792)
-मेरी वोलस्टोनक्रॅफ्ट (1759-1797)

photo 4

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स