तियानानमेन चौरस्ता: 4 जून 1989 पासून काय शिकणार
आज सकाळी उद्यानात भ्रमंती करताना मला एका निवृत अधिकार्याने ने 4 जूनला तियानानमेन चौरस्त्यावर जमलेल्या लोकशाही समर्थकांवर चीन ने जी कठोर कार्रवाई केली होती, त्यावर माझे मत विचारले. मी त्याला उलट प्रश्न केला, जर चीन ने तेंव्हा कठोर कार्रवाई केली नसती तर, आज चीन आर्थिक आणि सैनिक दृष्टीने शक्तिशाली झाला असता का? चीनच्या लोकतंत्र समर्थकांना अमेरिका आणि यूरोपियन देशांची फूस होती. त्यांच्या उद्देश्य चीनचे केंद्रीय नेतृत्व कमकुवत करून जमले तर चीनचे तुकडे करण्याचा होता. पण चीनच्या कम्यूनिस्ट पार्टीच्या नेत्यांनी स्वतचे निजी स्वार्थ विसरून देश हितासाठी कठोर कार्रवाई केली.
- Read more about तियानानमेन चौरस्ता: 4 जून 1989 पासून काय शिकणार
- 3 comments
- Log in or register to post comments
चुकलो का मी?
दिवास्वप्न पाहत असताना
अधांतराची भक्कम भूमी
सोडुनी थोडा भटकत गेलो
चुकलो का मी?
वायफळाचा मळा उन्हाळी
मृगजळ शिंपून वाढविला मी
पीक पाखरे खाऊन गेली
चुकलो का मी?
वृत्त, छंद, गण बेड्या तोडून
भ्रमरासम स्वच्छंदपणे मी
फिरता, रेखीव वाट विसरलो
चुकलो का मी?
विस्मरणाची गडद सावली
झाकोळत जरी होती तरी मी
स्मरणरंजनी वाहत गेलो
चुकलो का मी?
- Read more about चुकलो का मी?
- 1 comment
- Log in or register to post comments
दवणे एक असणे !!!! दवणे एक जगणे !!!!!!!!!!!!!!
प्रातःस्मरणीय दवणे जेव्हा प्रातःस्मरणीय पदवीस प्राप्त झाले नव्हते त्या काळातला हा प्रसंग आजही मनकातळावर नाजुक स्मृतींनी कोरला गेलाय.
दवणेंचे गुरुवर्य वपुलं बाल दवणेंना म्हणाले
गुरुवर्य : " प्रवीण, मराठी वाचकांच्या अभिरुचीची घसरण आता बघवली जात नाही रे "
प्रवीण : " काय होतय गुरुवर्य नेमकं "
गुरुवर्य : " डाचतोय रे मला डाचतोय हा टचटचीत शब्द , हा शब्द म्ह्टला की वाचकांना तेच का आठवावे वहीनींची ती .......
म्हशीची कथा
म्हैस निळसर काळ्या रंगाची असते. काळ्या रंगाची महिमाच न्यारी आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी सृष्टी निर्मात्याला निळाई म्हणून संबोधित केले आहे. सृष्टीचे पालनहार विष्णुही श्याम रंगाचे आहेत. सृष्टीचे विनाशकर्ता भगवान शिव ही काळ्या रंगाचे आहेत. अर्थात ईश्वर किंवा गॉड हा काळ्या रंगाचा आहे. दुष्टांचा विनाश करणारी काळी माता ही श्याम रंगाची आहे. काळ्या गायीला पवित्र मानल्या जाते. म्हैस तर काळीच आहे. मग म्हशीच्या शरीरात देवतांचे निवास का नाही, म्हशीला कामधेनु प्रमाणे महत्व का नाही, असे अनेक प्रश्न माझ्या मनात नेहमीच येतात. पण एक कथा धार्मिक ग्रंथात आहे, महादेवाने महिषाचे रूप धारण केले होते.
- Read more about म्हशीची कथा
- 27 comments
- Log in or register to post comments
अविचारांची सरशी (उत्तरार्ध)
रूढी व परंपरा
- Read more about अविचारांची सरशी (उत्तरार्ध)
- Log in or register to post comments
तीट
ओथंबल्या नभाखाली
भारलेली हवा
सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये
सैरभैर थवा
गर्जणारा मेघ शिंपे
सृजनाचा ठेवा
वीज ओढी कड्यावर
ओरखडा नवा
काजव्यांच्या ठिणग्यांचा
पानोपानी दिवा.
आरस्पानी स्वप्नी सांगे
शकुनाचा रावा,
"दृष्टावल्या भवताला
काळी तीट लावा "
- Read more about तीट
- 1 comment
- Log in or register to post comments
कामधेनु : गोमय वसते लक्ष्मी
गाय ही कामधेनु आहे. गायीची उत्तम रीतीने सेवा केली तर गाय आपल्या सेवकाला अन्न, वस्त्र, निवारा प्रदान करते. आपल्या धार्मिक ग्रंथात गायीच्या शरीरात 33 कोटी देवता राहतात असे म्हंटले आहे. कथा आहे, जेंव्हा लक्ष्मी मातेने गायींना विचारले, मी तुमच्या शरीरात कुठे निवास करू, तेंव्हा गायी म्हणल्या माता लक्ष्मी तुम्ही आमच्या पवित्र गोमय अर्थात गायीच्या शेणात आणि गोमूत्रात निवास करा. आपल्या देशात गौ आधारित अर्थव्यवस्था होती. ....
- Read more about कामधेनु : गोमय वसते लक्ष्मी
- 119 comments
- Log in or register to post comments
‘डाइंग फॉर सेक्स’: कॅन्सर, सेक्स आणि बरंच काही...
अविचारांची सरशी (पूर्वार्ध)
(अ)विचारांचे पाठबळ
- Read more about अविचारांची सरशी (पूर्वार्ध)
- 2 comments
- Log in or register to post comments
कृष्णविवर
शतसूर्यांची जळती बिंबे
गिळुनी टाकण्या कृष्णविवर हे
स्थळकाळाची अदय शृंखला
तटतट तोडून हिंडत आहे
क्षुधा अपरिमित अंतर्यामी
धगधग पेटून उठली आहे
आदिम स्वाहाकार सूक्त का
पुनश्च अविरत गुंजत आहे?
विज्ञानाचे नियम तोकडे-
विपरित त्यांच्या घडते आहे
भवताला घोटात गिळुनिया
कृष्णविवर हे हिंडत आहे
"विझत्या सूर्यावरती लट्टू
नार नवेली पृथ्वी आहे"
कृष्णविवर संतप्त होऊनी
अथक स्वतःला कोसत आहे
:)
- Read more about कृष्णविवर
- Log in or register to post comments