Skip to main content

बुलेट ट्रेन (भाग ४) : तैवान आणि श्रीलंका

बुलेट ट्रेन प्रकल्पात इतर देशांनी आपल्याला फसवले आहे का? की आपणच आपली फसगत करून घेऊन एक पांढरा हत्ती आपल्या पुढील पिढ्यांच्या गळ्यात मारला आहे? जर हा प्रकल्प सुरु झालाच आहे तर मग आता आपण पुढे काय करू शकतो? या प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी वाहतुकीसंबंधीच्या तीन महाकाय प्रकल्पांबद्दल मी काय वाचले आहे ते चौथ्या आणि पाचव्या भागात प्रथम सांगतो आणि मग सहाव्या भागात वरील प्रश्नांची उत्तरे देऊन ही लेखमाला संपवतो.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

चहा

तर मी हल्ली चहा प्यायला शिकल्ये. अर्ल ग्रे प्रकारचा चहा, त्यात कॉफी क्रीमर घालून पिते. कॉफी क्रीमरची एक कुपी कपात रिकामी करायची, अर्ल ग्रेची एक पुडी कपात सोडायची, वरून उकळतं पाणी सोडायचं. पाच मिनीटांनी चहा प्यायला सुरुवात करायची.

बुलेट ट्रेन (भाग ३) शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरो गेज, स्टॅंडर्ड गेज, ब्रॉडगेज

ज्याला जगभरात बुलेट ट्रेन म्हणतात त्याला जपानमध्ये शिन्कान्सेन म्हणतात. शिन्कान्सेन या जपानी शब्दाचा इंग्रजीत शब्दशः अर्थ होतो New Trunk Line. आपण मराठीत त्याला म्हणूया 'नवी रेल्वे लाईन'. यातलं बाकीचं सगळं नंतर बघूया पण 'नवी' या शब्दात जपानमधल्या या प्रकल्पाचे कारण दडले आहे. ही जर नवी रेल्वे लाईन आहे तर जुनी रेल्वे लाईन असणारंच. आणि कुठल्या ना कुठल्या कारणाने जपानी लोकांना नवी रेल्वे लाईन चालू करावीशी वाटले असणार. काय होती ती कारणं? आणि नवी रेल्वे लाईन आल्यावर जपानमधली जुनी रेल्वे लाईन बंद झाली का?

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

बिनऔषधाचे उपचार

मेडीकल सायन्समध्ये असा एक सिद्धांत आहे की, ज्यात प्रत्यक्ष औषध न देता काहीही औषधी घटक नसलेल्या गोळ्या दिल्या जातात. यातील काही रुग्ण खरोखरच बरेही होतात. आपण औषध घेतले आहे, आपण आता बरे होणार असे त्यांचे मन सांगते आणि त्यावर शरी काम करते.

या सिद्धांताबद्दल कोणाला काही माहिती आहे का? स्वत:च असे उपचार करण्याचे काही तंत्र आहे का?

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

बुलेट ट्रेन (भाग २) प्रकल्पाचे लाभार्थी

बुलेट ट्रेनवरच्या लेखमालेच्या पहिल्या भागात ताजमहाल आणि हूवर धरण याची तुलना करून बुलेट ट्रेन प्रकल्पापुढील आव्हाने मांडायचा प्रयत्न केला होता.

मुख्य मुद्दा एकंच होता. ताजमहाल संपूर्ण सल्तनतीच्या गोळा करून ठेवलेल्या करातून बनला आणि जेव्हा त्यामुळे सल्तनतीचा खजिन्यात ठणठणाट झाला तेव्हा पुढील सम्राट औरंगझेबाला संपूर्ण सल्तनतीकडून नवीन जाचक कर वसूल करावे लागले. आग्र्याची भरभराट झाली नाही ते तर सोडाच पण संपूर्ण सल्तनतीतील प्रजा अजूनच दुबळी आणि असंतुष्ट झाली.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

बुलेट ट्रेन (भाग १) ताजमहाल आणि हूवर धरण

अकबराचा थोरला मुलगा जहांगीर म्हणजे मुघल- ए- आझम या चित्रपटातला सलीम, मुघल साम्राज्याचा सम्राट असूनही अफूच्या आहारी गेला होता. त्याच्यानंतर त्याचा तिसरा मुलगा खुर्रम, आपल्या धाकट्या भावाला (शहर्यारला) हटवून मुघल सल्तनतीचा सम्राट बनला. त्याला आपण ओळखतो ते शहाजहान म्हणून. मुमताजमहालचा नवरा आणि औरंगझेबाचा बाप असलेल्या शहाजहानने १६३२ मध्ये ताजमहाल बांधायचा निर्णय घेतला. १६५३ मध्ये काम पूर्ण झाले. २०,००० लोकांनी २२ वर्षे काम करून जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य यमुनेच्या तीरावर वसवले.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

गहन हे मर्म दु:खाचे

जगण्याच्या निबिड अरण्यी
शोधणे कठिण किती असते
मी मला गवसण्या आधी
वैफल्य विकटसे हसते

गहन हे मर्म दु:खाचे
उमगणे कठिण किती असते
तोडुनिया सर्व पहारे
ते फितुर अश्रुना होते

उफराटे गणित विषाचे
समजणे कठिण किती असते
मरण्यास पुरे इवलेसे
जगण्यास कितीही कमी पडते

ही बातमी समजली का - भाग १५९

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.

फिडबॅक

वर्गात interrupt शिकवायला चालू होतं. व्याख्या, व्याप्ती अन् एक-दोन real time उदाहरणं देउन झाली. तेवढ्यात दरवाजाची कडी वाजली, महामहिम. अन् मी विद्यार्थ्यांना म्हटलो, is called as??? एका सुरात उत्तर आलं interrupt... फिडबॅकसाठी आलेल्या महामहिमच्या कपाळावर पडलेल्या आट्या नजरअंदाज करत अन् हास्याची उबळ आवरत वर्गाच्या बाहेर पडलो.

ललित लेखनाचा प्रकार

संगीतकार

आमच्या समोरची तिशीतली एक मुलगी दीडशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या एक संगीतकाराबद्दल सांगत होती. निळसर डोळे , सुरेख पातळसर केस , लांब जिवणी, ती स्वतः पियानो वादक होती. तर त्या जुन्या संगीतकारानं त्या काळच्या ऑपेरा मध्ये केलेली कामगिरी, तंत्रावरील त्याची हुकूमत, कमी वाद्यांचा वापर करून जास्तीतजास्त प्रभावी संगीत देण्याचं त्याचं वैशिष्ट्य, त्याच्या सवयी याबद्दल ती भरभरून , ओसंडून बोलत होती. वास्तविक या संगीतकाराबद्दल आज फारशी माहिती उपलब्ध नाही. तरीही ही मुलगी त्याच्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीबद्दल ना थांबता बोलतच होती.