Skip to main content

म्हातारी मांजर

आमच्या गावाला शेजारील घरात एक मांजर पाळलेली होती.( नाव वैगेरे काही ठेवत नाही) तिची प्रकट होण्याची कथा अशी.

ललित लेखनाचा प्रकार

स्धल-कालाचे ताणे-बाणे

अथांग धूसर भविष्य उडवी तुषार अविरत अधुनाचे
झरझर सरत्या..
थेट धडकत्या...
अधुना मधुनी स्फटिक जन्मती अतिताचे

उत्पत्ती अन् स्थिती, लयाचा रहाट अविरत चालतसे
स्थूल, सूक्ष्म, चेतन नि जडाचे..
अनंतरंगी घाट चणींचे..
पोहोरे माळुनी फिरत असे

स्धल-कालाचे ताणे-बाणे तोलुनी धरिती विश्वाला
जटिल नि बहुमित..
अमूर्त, अनवट..
रूप तयांचे गोचर केवळ गणिताला

(मान‌व‌वंश‌शास्त्र‌वादी ल‌यीत) अनु राव‌ कोण आहेत?

अनु राव‌ म्ह‌ट‌लं कि ऐसीव‌र एक ख‌ळ‌ब‌ळ‌ माज‌ते. का? ख‌रं त‌र त्यांच्या व्य‌क्तिम‌त्वाभोव‌ती अनेक सुस्प‌ष्ट‌ व‌ल‌यं आहेत. त्यांच्या विविध‌ विषयांव‌रिल भूमिका थेट‌ आहेत. त्यांच्या स्व‌भावाचे अनेक प‌द‌र सुस्प‌ष्ट आहेत. उदा. त्या मी आणि बॅट‌मॅन‌प्र‌माणे पत्र्यांव‌र भांड‌णाऱ्या मांज‌रांप्र‌माणे आवाज‌ होऊ देत नाहीत. हिरो विलेन‌च्या गुंफेत घुसुन शांत‌प‌णे एकेक मुड‌दे पाड‌तो त‌श्या प्र‌कार‌चा प‌ंगा त्या घेतात. एकूण किती मुड‌दे प‌ड‌ले हे विलेन‌साईड‌चं कोणीच मोजू श‌क‌त‌ं नाही कार‌ण‌ प‌हिलेच्याचा ख‌ट्ट म्ह‌णून प‌ड‌ण्याचाच‌ काय तो आवाज दुस‌ऱ्याने ऐक‌लेला अस‌तो.

मध्यरात्री

मध्यरात्री गजबजावे नभ वितळत्या चा॑दण्याने
भरुनी घ्यावा ओ॑जळीचा चषक त्या फेनिल प्रभेने

मध्यरात्री सळसळावे बेट पिवळे केतकीचे
अंथरावे वायुकोशी गंध थरथरत्या तृणांचे

मध्यरात्री कुजबुजावा मेघ बिलगुनी पर्वता
कूस बदलून पांघरावी दाट दुखरी शांतता

दिवाळी अंक २०१७ - आवाहन

नमस्कार,

गेल्या पाच वर्षांची परंपरा पाळत यंदाही 'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकाबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. त्यासाठी 'ऐसी अक्षरे'च्या सदस्यांकडून लेखन मागवण्यासाठी हे आवाहन.

चुम्बकीय क्षेत्राचे आरोग्यावर परिणाम

मोबाईल व विविध वायरलेस उपकरणाच्या वाढत्या वापरामुळे आप‌ण एक्स्ट्रीम लो फ्रिक्वेन्सी चुम्बकीय क्षेत्राच्या सतत सम्पर्कात येत आहोत‌. हा सम्पर्क मान‌वी आरोग्य दृष्ट्या घातक आहे की नाही यावर ब‌रीच म‌त‌भिन्न‌ता आहे. या विषयाबाबत अद्ययावत व विश्वासार्ह माहिती कुठून मिळेल‌? त‌सेच ओव्हरहेड विजेच्या तारामधून वीज-प्रवाह वाहत अस‌तानाही एक्स्ट्रीम लो फ्रिक्वेन्सी चुम्बकीय क्षेत्राची निर्मिती होत असते व ते काच, भिन्त, धातू , कापड वगैरे सर्व भेदून संक्रमित होत असते.

अल्पसंख्यानका विरुद्ध हिंसा: उद्गम आणि परिणाम.....

Seeds of a million tyrannies हा श्री प्रवीण स्वामी ह्यांचा उत्कृष्ट लेख उपरनिर्दिष्ट विषयावर उत्तम प्रकाश टाकतो। (Indian express Sunday, 8 July).

त्यांची काही निरिक्षणे अत्यंत मार्मिक आहेत। उदा-

"The anti-Muslim violence India is witnessing is significant not principally because of its scale, but because of the processes engendering it. The new element is this: The state is abandoning the republican project, and ceding control to local squads independent of central authority. These are the seeds from which a million tyrannies may flower."

आणि

जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा.

(व्यवस्थापन : एकाच सदस्याचे खूप धागे एकाच वेळी ट्रॅकरवर दिसू नयेत म्हणून सगळे धागे एका ठिकाणी आणले आहेत.)

ललित लेखनाचा प्रकार

दिंडी

अभिजात सुमारांची बहुश्रुत दिंडी
लॅपटॉपी कीबोर्डाचे चटचट अहिर्निश टाळ
निष्क्रिय मत-मतांतरांचे डब्ब दुतोंडी मृदंग
वैचारिक साठमारीचे गुगलपुष्ट निर्दय घोडरिंगण
जितं मया च्या एकेकट्या भेसूर आरत्या

तिथे सुदूर चंद्रभागेकाठी
काळाभोर त्याच्या अट्टल दगडी मौनातल्या शयनी एकादशीत
कल्पांतापर्यंत अकिम्बो

ही बातमी समजली का? - भाग १५१

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.