Skip to main content

अडनिडी मुलं-२

मागच्या भागात काही मुलांच्या हट्टीपणाबद्दल लिहिले, काहींच्या मानसिक प्रोब्लेम बद्द्ल लिहिले... आता पोंगडअवस्थेतेतिल परिस्थिती मधुन उद्भ्वनार्या प्रश्नांविषयी...

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

१००० डबे - कोडे

हे कोडे मला सोडवता आले नाही. या कोड्याच्या उत्तराचे २ भाग आहेत पैकी पहीला मला सिद्ध करता येत नाहीये :( (कोणीतरी मदत करा) पण दुसरा भाग कळला.
मी ते दोन्ही भाग शेवटी सांगीन.
तोपर्यंत आपापल्या पद्धतीने कोडे सोडवा.
.
(०) एका हॉस्टेलवरती १००० मुले-मुली आहेत. प्रत्येकाचा एक खाऊचा डबा आहे. अर्थात १००० डबे आहेत.
(१) हॉस्टेलच्या पर्यवेक्षिका एका मुलाला सांगतात की जा सर्व डबे उघडून ये.
(२) नंतर दुसर्‍या मुलाला सांगतात तू जा आणि प्रत्येक दुसरा डबा बंद करुन ये.
(३) तीसर्‍या मुलाला सांगतात की प्रत्येक तीसरा डबा उघडा असेल तर बंद कर व बंद असेल तर उघड,

लोकसाहित्य संशोधक रा. चिं. ढेरे

सुप्रसिद्ध लोकसाहित्य संशोधक, लेखक डॉ. रा. चिं. ढेरे यांचे नुकतेच निधन झाले. ठिकठिकाणी त्यांच्या बद्दलचे लेख, त्यांच्या कार्याची ओळख करून देणारे लेख आले आणि अजूनही येत आहेत. त्यांच्याबद्दल मी काही लिहावे असा माझा त्यांचा काही व्यक्तीगत परिचय नव्हता. त्यांचे क्षेत्र वेगळे, माझे तर अतिशय वेगळे. पण ते ज्या क्षेत्रात काम करायचे, तो माझ्या आवडीचा, अभ्यासाचा विषय-भारतविद्या(Indology), लोकसंस्कृती, रुढी परंपरांच्या मागील मतितार्थ तपासणे, मिथकांचा मागोवा घेणे, त्यांचा इतिहास समजावून घेणे इत्यादी.

ललित लेखनाचा प्रकार

मॉलला भेट

येथे न्यू जर्सीत दुपारची वेळ , कडक सूर्य,
तपमान 30 सेंटीग्रेडच्या आसपास
मॉलात गेलो तर सर्वत्र अमेरिकन बायका
अर्ध्या गरम चड्ड्या घालून फिरत होत्या,
आणि सर्व गोरे पुरुष (शालीनपणे) त्यांच्या मांड्यांकडे
न बघता फिरत होते. (समलिंगी साले!, मनात म्हणालो!)
पण म्हणजे एव्हड्या आक्ख्या मॉल मध्ये बायकांच्या मांड्यांकडे
बघायची जबाबदारी आपलीच! हे सोपे नव्हते .
अनेकदा अडखळत ती पार पाडली झाले.
मुली जपानी चिकनच्या लायनीत उभ्या राहून एकमेकींना
ढकलीत होत्या, व आपण काहीतरी प्रचंड सेक्सी वागत
आहोत असा त्यांचा ग्रह झालेला दिसत होता.बरे,मैत्रिणींना कितीही

मुलांसाठी एक शैक्षणिक खेळ - पायमोजा!

आज २२/७ - भारतीय पायदिन. त्यानिमित्ताने सुमारे चौथी ते आठवीच्या मुलांसाठी हा खेळ किंवा उपक्रम सुचवतो आहे.

पायमोजा - म्हणजे पायात घालायचा मोजा असा अर्थ नसून 'पाय (ची किंमत) मोजा' याचं थोडं गोंधळात टाकणारं संक्षिप्तीकरण आहे.

या खेळाचा उद्देश खूप सोपा आहे. घरातली अगदी साधी उपकरणं वापरून पायची किंमत शक्य तितक्या अचूकपणे आणि प्रामाणिकपणे मोजायची. यासाठी अनेक पद्धती वापरता येतील.

ही बातमी समजली का - ११९

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं. अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.

____

एकाकी लांडग्यांच्या (Lone Wolf Terrorist) हल्ल्यांविरुद्ध करायचे सात उपाय :

अडनिडी मुलं

लेक मागच्या वर्षी दहावीला होती . मैत्रिणी इतकंच सख्ख्य असल्यामुळे बऱ्याच हृदयातल्या गोष्टी ती शेअर करते . अगदी मैत्रिणीसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा सल्ला मागते .तिला माहित आहे काहीही सांगितले तरी चालते, ओरडा मिळत नाही मग बरीच देवाण घेवाण होते . ती आणि तिचे मित्र मैत्रिणीविषयी अपार माया आहेच पण काय होणार ह्या अडनिड्या मुलांचे याची चिंता सतत सतावत असते . म्हणून हा थोडासा प्रयत्न .

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

प्रीती

काही महीन्यांपूर्वी प्रीती फेसबुकवरती सापडली. या पूर्वीही अनेकदा शोध घेऊनही सापडली नव्हती ती अवचित गुगलवरती पहील्यांदा सापडली. फोटोवरुन मी तिला तत्काळ ओळखले व नंतर फेसबुक रिक्वेस्ट पाठवली. तिने ती अ‍ॅक्सेप्ट केली तो दिवस अतिशय आनंदात गेला. कारण हॉस्टेलवरचे मनोरम दिवस आम्ही एकत्र एन्जॉय केलेले होते, तिला माझी सिक्रेटस जशी माहीत होती तशी मला तिची. अनेक एकत्र केलेले नाईटआऊटस व मग्गुगिरी डोळ्यांसमोर तरळून गेली. प्रीती सुंदरच दिसत होती. अंगयष्टी राखलेली, राँग साईड ऑफ ४० शी मध्ये असली तरी पस्तीशीची वाटणारी, डिझायनर कपडे व बॅकग्राऊंडला वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरील फोटो.

ललित लेखनाचा प्रकार

" धूर्त , चतुर वगैरे ..."

पुण्याच्या छप्पन्न वर्षे पाहिलेल्या धूर्त, चतुर वगैरे मित्रांची
वयस्क केसाळ कांती कलत्या उन्हात
चमकत असते.
मुलांनाही आता मुलं होऊ घातलीत आणि बायको
विरागिणी.
शेजारच्या सिगारेटच्या धुराचा
त्रास होत नाही: (पुण्यात आता चांगले
कॅन्सर हॉस्पिटल आहेच.)
पोटही तसे हात फिरवायला...
जॉगिंग वगैरे नसते धंदे नकोच या वयात.
अमेरिकेतून आलेल्या त्रस्त युद्ध्ग्रस्तांना ते विचारतात: भलत्या
जड तलवारी उरापोटी उचलायला तुला
कोणी सांगितलं रे माठ्या ? दूरच्या खिंडींवर
विकतची लढाई!
आमच्या टेकडीवरच्या खिंडीतून आम्ही जातो
सहज पलीकडे,