कार्यकर्ता
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमचा हक्क आहे ह्या घोषणांनी कोटमगावचा परिसर दणाणून गेला होता. प्रकाश कांबळे ह्या तरुणाच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला होता . प्रकाश कांबळे हा दलित तरुण शिक्षणासाठी मुंबईला राहून आला होता.
- Read more about कार्यकर्ता
- 5 comments
- Log in or register to post comments
- 5996 views
ऐसी अक्षरे लेखन कार्यशाळा - प्रास्ताविक
तुम्हाला तबला वाजवायला शिकायचं असेल, पेटी वाजवायला शिकायचं असेल, किंवा गाणं शिकायचं असेल तर शिकवणारे आसपास सहज सापडू शकतात. तो क्लास लावला, घरी नियमित प्रॅक्टिस केली तर वर्षा दोन वर्षांत आपल्यात फरक पडलेला जाणवतो. सगळ्यांनाच काही गानकोकिळा किंवा गंधर्व व्हायचं नसतं. आपल्या मनातलं गाणं मोकळेपणे बाहेर यावं, ऐकणाराला आवडावं, आणि आपल्यालाच म्हणताना आनंद व्हावा अशी अपेक्षा असते. त्यासाठी तयारी करण्याची सोय असते. कोणीतरी जाणकार आपल्याला स्वरांची ओळख करून देऊ शकतो, कुठे बेसूर होतो आहोत हे सांगू शकतो, काही ताना हरकती घोटवून घेऊ शकतो.
- Read more about ऐसी अक्षरे लेखन कार्यशाळा - प्रास्ताविक
- 74 comments
- Log in or register to post comments
- 33376 views
"चिडकी चिऊताई -" (बालकविता)
खिडकीत दिसली चिऊताई
बाळाची बोलावण्याची घाई
"ये ये" म्हणाला हात दाखवून
"खाऊ घे" म्हणाला खिडकीतून -
चिऊताई होती फारच चिडकी
समोर दिसली बंद खिडकी
चोच आपटली खिडकीवर
टकटक केली काचेवर -
बाळाने उघडली हळूच खिडकी
पटकन शिरली चिऊताई चिडकी
बाळाने दाखवला लाडूचा खाऊ
चिऊताई म्हणाली चोचीत घेऊ -
बाळाने मुठीत लाडू लपवला
बाळ हळूच खुदकन हसला -
चिडकी चिऊताई खूप चिडली
खिडकीत "चिव चिव " ओरडली . .
.
- Read more about "चिडकी चिऊताई -" (बालकविता)
- 5 comments
- Log in or register to post comments
- 4599 views
'ऐसीला विचारा ' : घरगुती व जनरल प्रश्न - भाग ३
Taxonomy upgrade extras
याआधीचा भागः-२
व्यवस्थापकः अश्या लहान प्रश्नांसाठी माहितीसाठी हे सदर ऐसीवर सुरू असतं. वाचकांच्या सोयीसाठी या धाग्याचे रुपांतर त्या सदराच्या पुढिल भागात करत आहोत
========
मला Japanese interior design याबद्दल माहीती हवी आहे.
कमीत कमी सामान आणि जागेचा अधिक वापर अशाप्रकारच्या design चा कुणाचा अभ्यास असेल तर कळवावे.
हा धागा 'माहीती' मध्ये टाकायला हवा होता का?पण मला माहिती द्यायची नसून माहिती घ्यायची आहे. त्यामुळे चर्चामध्ये टाकलाय.
- Read more about 'ऐसीला विचारा ' : घरगुती व जनरल प्रश्न - भाग ३
- 34 comments
- Log in or register to post comments
- 32707 views
.…;मगर तुम हमारे लहू से न खेलो !
नव्वदनंतर माध्यमांचा प्रस्फोट झाला आणि जनमत ठरवण्यात माध्यमे निर्णायक भूमिका बजावू लागली. प्रतिमानिर्मिती आणि प्रतिमाहनन या दोन्ही बाबी सहजपणे केल्या जावू लागल्या. आज गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची जी प्रतिमा निर्माण झालेली आहे त्यात सोशल मिडियाचा आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा मोठा वाटा आहे. माध्यमांमधून मिळणा-या संमिश्र तर काही वेळा विरोधाभास निर्माण करणा-या वृत्तांकनामुळे युवावर्ग गोंधळलेला आहे.
- Read more about .…;मगर तुम हमारे लहू से न खेलो !
- 40 comments
- Log in or register to post comments
- 19749 views
चला, संपादकांना घोळात घेऊ या...
Taxonomy upgrade extras
इशारा: शीर्षक वाचून इथे काहीतरी खमंग वाचायला आलेल्या सज्जन वाचकांची मी क्षमा मागते. आता आलाच आहात, तर वाचून जावा. ;-)
मी 'ऐसी'वर पडीक असायला लागून बरेच दिवस झाले. हे व्यसन ओसरेल, ओसरेल असा धीर धरूनही व्यसन तसा बराच काळ जीव धरून आहे. :प त्याची कारणं आपण आधीच चर्चिलेली आहेत. त्यात नव्यानं शिरायला नको. पण मला काही प्रश्न मात्र पडले आहेत.
- Read more about चला, संपादकांना घोळात घेऊ या...
- 134 comments
- Log in or register to post comments
- 81428 views
कशाला हवे आरक्षण ?
Taxonomy upgrade extras
मा।झा जल्म स्वातंत्र्यानंतरच्या 30 सालाबादचा. तेव्हापासून मी इथे या ‘गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा’मध्ये प्रबळ ठोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते म्हणून मराठा जात समूहातील एकसे एक दांडगे नामचीन नेतृत्वधत्तुरे बहाद्दर पाहत लहानाचा जवान आणि जवानचा ओल्ड व्हायच्या मार्गावर आलो. मधल्या काळात एक सुशीलकुमार शिंदे नामक अजातशत्रू वादळ इथल्या राजकीय मराठा इतिहासात माफक वादळ उठवून गेले. शालिनीताई पाटलांनी थेट प्रतिगामित्व पत्करून या शूद्राचा आणि ज्यांनी त्या शूद्रास गादीवर बसविले त्यांचा सामायिक जहरी जातीय निषेध केला, हे आपण उघड पाहिलेच आहे.
- Read more about कशाला हवे आरक्षण ?
- 16 comments
- Log in or register to post comments
- 23692 views
चित्रातून निघणारा अर्थ
मागे एकदा चितकलेविषयी एक चर्चा झाली होती.
नुकतेच एक चित्र (पेंटिंग) पाहण्यात आले. त्यावरून मला तरी चित्रकाराला काय दाखवायचे असावे याचा अंदाज आला नाही. म्हणून चित्र ऐसीकरांना दाखवतो आहे. या चित्रातून काय अर्थ प्रतीत होतो आणि तो का प्रतीत होतो हे सांगण्याचा प्रयत्न करावा.
मी ज्या ठिकाणी हे चित्र पाहिले त्यावरून ते बर्यापैकी किमती (आणि कदाचित प्रसिद्ध) चित्र असावे.

चित्र दिसले नाही तर इथे पाहता येईल.
- Read more about चित्रातून निघणारा अर्थ
- 42 comments
- Log in or register to post comments
- 29637 views
सम्पादित.
स्यमसमपादित
- Read more about सम्पादित.
- 8 comments
- Log in or register to post comments
- 6682 views