Skip to main content

पुरोगामी महाराष्ट्र

शाहु फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र मला अत्यंत प्यारा ! राष्ट्रगीत भुलून महाराष्ट्र गीतच चोवीस तास जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी कुठेही का न घोळवावे ? च्यामायला जे व्हयील ते व्हयील. असा मंगल विचार देखील हल्ली मनात जोरदार थैमान घालू लागला आहे. त्याला कारणंही वारंवार तशीच घडलीत. घडतात. अगदी सज्जड. खैरलांजी, सोनई, सातारा, रमाबाईनगर एक ना अनेक ! किती सांगावी आणि किती शोधावी ? एक अंदाज ? तर या प्यार्या महाराष्ट्र राज्यातील कोल्हापुर जिल्ह्यात घडलेली एक ताजी घटना या ऊन्हाळी सुट्टीत अनुभवली. कोल्हापुर जिल्ह्यातलं गाव . पावण्याच्या पोरीचं लग्न. रणरणत्या दुपारीच गावात पोचलो.

'चांदण्यांचा रस्ता 'आणि 'अमलताश'

'चांदण्यांचा रस्ता 'आणि 'अमलताश' ही दोन्ही पुस्तके फार अपेक्षेने घेतली गेली पण अपेक्षाभंग झाला . चांदण्यांचा रस्ता हे ललित लिखाण आहे . लंपन च्या अपेक्षेने आपण ते वाचयला घेतो इथेच चूक होते . सगळेच लेख थोडे वर वरचे वाटतात . काही एकदम त्रोटक वाटतात . लंपन ची संवेदनशीलता , इंटेसिटी , लोभसपणा इथे सापडत नाही . प्रकाश संतांची सुंदर सुंदर चित्रं आणि मुखपृष्ठ हे मात्र नक्कीच जपून ठेवावे असे आहे .

जिया खान आणि एका समुपदेशकाची फेसबुक भिंत

जिया खानची आत्महत्या यासंदर्भात सुलभा सुब्रमण्यम यांच्या फेसबुकवर काही रोचक आणि माहितीपूर्ण मजकूर मि़ळाला. त्यांच्या अनुमतीने हा स्वैर अनुवाद प्रसिद्ध करत आहे. सुलभा मानसोपचार-समुपदेशक म्हणून ठाण्यात काम करतात.

----

टुकार मीशिभोबोची प्रभातवारी

टुकार मीशिभोबोची प्रभातवारी

या लोकशाही उत्पत ( उद्धट हि चालेल) देशात पोटासाठी कोण काय करेल सांगता येणे 'लै म्हणजे लैच' अवघड आहे. कोण पोटासाठी काकडीच्या साली काढून काकडी बरोबर सालीही विकत, तर कोण त्या काकडीच्या सालापेक्षाही फालतू सिनेमे काढून लोकांच्या भावनेचे भांडवल करून स्वतःचे पोट भरत.

येथे आता या दुसऱ्या टुकारगिरी विषयी लाक्षणिक विवेचन होणार आहे. कोणाला पटेल न पटेल. पण "कुत्ता जाने, चमडा जाने" अश्या ( उदात्त!) हेतूने लिहायचा प्रयत्न आहे.

२०१४ लोकसभा निवडणुका: पर्याय व अंदाज (भाग - ३)

भाग: १ | २ | ३

याआधीच्या तीन शक्यतांनंतर आता आपण २०१४ लोकसभा निवडणुकांसाठी चौथी आणि शेवटची शक्यता विचारात घेऊयात.
शक्यता ४: काँग्रेस व भाजपा दोघेही आपापल्या मतदारांचे धृवीकरण करू शकले मात्र काँग्रेसविरोधी राष्ट्रीय भावना.

पुन्हा इथे आपण एकेक गटाचा विचार करूयात.
लहान राज्ये व केंद्रशासित प्रदेश

नरोत्तम उर्फ अर्जुनराव पांडव यांचा हेप्पी बड्डे..

Happy Birthday, Arjun!

आज नरोत्तम उर्फ अर्जुनराव पांडव यांचा हेप्पी बड्डे..!

भगवंत म्हणतात : बहूनि में व्यतीतानि जन्मानि तव 'चार्जुन'| श्रीमद्भगवद्गीता ४:५

अर्जुनराव पांडव हे अतिशय धांदरट असले तरी त्यांना आज बड्डेला विश करायला हवंच! अगदीच 'हा' नव्हता पठ्ठ्या...!! काय मंडली...?

तेव्हा केक कापायला संद्याकाली ७ वास्ता जमायचा, कल्ला?

जोडीदाराचे फेसबुक किंवा इमेल खाते चोरुन वाचणे कितपत योग्य आहे?

Taxonomy upgrade extras

ही बातमी वाचून प्रश्न डोक्यात आला- आपल्या जोडीदाराचे फेसबुक किंवा इमेल खाते चोरुन वाचणे कितपत योग्य आहे?

त्या मित्राने चीटींग (विश्वासघात किंवा व्यभिचार) केला हे योग्य की अयोग्य हा प्रश्न तूर्तास बाजूला ठेऊ. माझ्यामते ते अयोग्यच पण तूर्तास हा प्रश्न बाजूला ठेऊ.

पण खातं उघडं दिसलं म्हणून त्यात डोकावणे/मेसेजेस वाचणे कितपत योग्य आहे? त्याने केलेल्या गुन्ह्याइतकाच त्या मैत्रिणीचाही गुन्हा अक्षम्य नाही का? का आपला जोडीदार आहे म्हणून सगळे हक्क गृहीत धरायचे?

तुमचा बातम्यांचा प्रमुख सोर्स काय आहे?

Taxonomy upgrade extras

हा धागा "ही बातमी समजली का?" चाळता चाळता सहजच डोक्यात विचार आला म्हणून. तुम्ही रोजच्या बातम्या कुठुन मिळ्वता? सर्व बातम्यांसाठी एकच सोर्स वापरता का प्रत्येक प्रकारच्या बातमी साठी वेगळा वेगळा? एखाद्या सोर्स ला तुम्ही का प्राधान्य देता?

माझ्या पासून सुरुवात करतो:

१. news.ycombinator.com

सध्या काय वाचताय? - भाग ५

याआधीचे भागः १ | २ | ३ | ४

प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेत म्हटले होते: