Skip to main content

कोपनहेगन-पॅरीस भटकंती-१

युरोप! कधी आपण युरोपात जाऊ असं वाटलंही नव्हतं, मिपा, माबो अश्या साईट्सवर जाऊन आलेल्यांचे अनूभव ऐकणे ह्यापलिकडे कधी युरोपशी संबंधं आला नव्हता. बैलपोळ्याच्या दिवशी बैलासारखं काम करून आल्यावर रूमवर पडलो होतो. मोबाईल हातात धरला नी वाट्सअप पाहीलं “I have enrolled you for ***** advanced training in Denmark in November”

शाकाहारी कोंबडी आणि भागिरथी

समोरच्या घरातल्या भाव्यांच्या मांजरीने भारी उच्छाद मांडला आहे. रोज खिडकीतून येऊन दुधाच्या पातेल्याला तोंड लावून जाते. तिला सांगून पहिले. ती ढिम्म लक्ष देत नाही. रोज मांसमच्छी खाणारी ती. तमोगुण वाढले आहेत झालं. हा भाव्या दिवसभर तिला घेऊन फिरतो 'माझी भागू, माझी भागाबाई' करत. पण त्या भागिरथी मांजरीवर संस्कार मात्र नाहीत. काय कामाचं ते प्रेम!

लोकशाहीसाठी लढणारा हुतात्मा अलेक्सी नव्हालनी

नव्हालनी जुलमी राजवटी आणि विकृत हुकूमशहाच्या विरोधात उभा राहिला. तो राजकीय हेतूने केलेल्या विषबाधा आणि विविध हल्ल्यांमधून वाचला. नव्हाल्नी लोकशाही, लोकांची शक्ती यासाठी उभा होता. तुरुंगवासाची शिक्षा भोगत असताना तो चालायला बाहेर पडला, आणि तेव्हाच अचानक, अनपेक्षितपणे (!) त्याचा मृत्यू झाला.

रावणाच्या लंकेत सोन्याच्या विटांचा निष्फळ शोध!

श्रीलंकत जाऊन तिथ बुद्धाच्या मूर्ती चमत्कारिक लोकांच्या संगतीत बघण्याचा अनुभव

हार्ट शेप्ड तिळाच्या वड्या

सोसायटीमधल्या तरुणांनी व्हॅलेंटाईन डे साजरा करू नये असं काल आम्ही सोसायटीच्या मीटिंग मध्ये ठरवलं. एक तर व्हॅलेंटाईन हा तमाशा आपला नाही. ती परक्यांची थेरे. आपली प्रभुरामाची भूमी. सीतामाईने नाही म्हंटले प्रभूंना 'व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करूया.' इथे या असल्या गोष्टी खपवून घेणार नाही. समाजाचे पावित्र्य आपणच जपायला हवे. आपल्या परीने आपण समाजाच्या उन्नतीसाठी हातभार लावावा, हाच आमचा विचार. पाचव्या मजल्यावरील ठाकरे सेक्रेटरी आहेत. त्यांना म्हंटलं, सरळ एक पत्रक छापूया. आणि डकवूया लिफ्ट जवळ. वाटलं तर लिफ्ट मध्ये, एवढंच काय प्रत्येकाच्या घरी जाऊन देऊया.

ललित लेखनाचा प्रकार

श्रीरामा, वाचव रे!

आज सकाळपासूनच टीव्ही लावला. इतकं पवित्र वाटत होते. लवकर उठलो. हिने १५ दिवसापूर्वीच उटणे आणले होते. ते काय आहे, कोपऱ्यावरच्या जोश्याकडे श्रीराम प्रतिष्ठापनादिनानिमित्त सुवासिक उटणे, गंध, उदबत्या आल्या आहेत. पेढे पण ठेवले आहेत. सातारी कंदी पेढे आण म्हंटले हिला. तर म्हणे शुगर सांभाळा आधी. अरे श्रीराम आहे माझा .. बघेल तोच. तोच काळजीवाहू, तोच जीवनदायी. या दिवशी पेढे नाही खायचे तर कधी? बायकोशी वाद घालण्याइतका वेळ नाही माझ्याकडे. मग मीच आणले जाऊन पेढे. शुगर काय शिंची.

ललित लेखनाचा प्रकार

नायट्रोजन वापरून मृत्यूदंड: योग्य पर्याय की चुकीचं पाऊल?

अमेरिकेच्या अलाबामा राज्यानं जानेवारी महिन्यात केनेथ स्मिथ नावाच्या गुन्हेगाराच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेची कार्यवाही केली. त्यासाठी प्रथमच जी पद्धत वापरण्यात आली त्यामुळं ही कार्यवाही वादग्रस्त ठरली. याबद्दल 10 फेब्रुवारीच्या लोकमत मध्ये लिहिलेला लेख.

-------------

नायट्रोजन वापरून मृत्यूदंड: योग्य पर्याय की चुकीचं पाऊल?

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

झोनरिजम

p1झोनरिजम म्हणजे विज्ञानातील (वा इतर कुठल्याही क्षेत्रातील) वस्तुस्थितीचा विपर्यास करून जनसामान्यांची दिशाभूल करणे.
महाभारत युद्धातील एका प्रसंगात नरो वा कुजरोवा असे अधांतरीचे विधान करून द्रोणाचार्य यांना मारण्यात आले. कदाचित हाच आपल्याला ज्ञात असलेला झोनरिजमचा पहिला विधान असू शकेल. आताच्या इंटरनेट व समाजमाध्यमाच्या जमान्यात या प्रकारे विपर्यास्त व दिशाभूल टीका-टिप्पणी करून वाचकांचे मत आपल्या मताशी जुळवून घेण्याचे प्रयत्न होत असताना या झोनरिजमची आठवण येत राहते.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

ज्योत

रिकाम-टेकडी मोठी तिच्या माथ्यावर
माझा वायफळमळा-त्याच्या बांधावर
मृगजळ साठवितो रोज थोडे थोडे
पिऊनीया दौडतात कल्पनांचे घोडे
एकशृंगी घोडे त्यांचे पसरूनी पंख
उडतात - टाळण्यास समीक्षकी डंख

कल्पिताचे वास्तवाशी जुळवी जो नाते
ज्योत त्याची विझण्याच्या आधी मोठी होते