कुमार गंधर्व
कुमार गंधर्वांच्या अभिनव शैलीतील एक उल्लेखनीय पैलू म्हणजे त्यांनी रागांच्या विस्तृत श्रेणीचे अन्वेषण केले. त्यांनी स्वत:ला विशिष्ट घराण्याशी निगडित माहितीपुरते मर्यादित ठेवले नाही; त्याऐवजी, त्यांनी दुर्लक्षित रागांचा अभ्यास केला, विसरलेली रत्ने पुन्हा जिवंत केली. या रागांमध्ये श्वास फुंकण्याची त्यांची क्षमता संगीतातील बारकावे आणि शास्त्रीय रागांच्या विशाल विस्तारात प्रयोग करण्याची त्यांची सखोल समज दर्शवते.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about कुमार गंधर्व
- 4 comments
- Log in or register to post comments
- 2297 views
वृद्धत्वाकडे वाटचाल - भाग २
एजिंग का होते या विषयावर बरेच संशोधन झाले आहे. बरीच जैविक कारणे सुचविण्यात आली आहेत. त्यापैकी काही कारणांची माहिती या भागात घेऊ.
- Read more about वृद्धत्वाकडे वाटचाल - भाग २
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2583 views
पीळ
कवितेच्या काही ओळी
काल सहज सुचल्या
दोन चुकल्या मात्रेत
दोन वृत्तात गंडल्या
यतिभंग एकीमध्ये
एकीमध्ये रसभंग
दोष दूर करण्यास
पछाडिले जंग जंग
मात्रा, वृत्तांची बंधने
पाळताना दमछाक-
झाली-आली कुठूनशी
मुक्तछंदाची झुळूक
मुक्तछंदाच्या स्पर्शाने
ओळ ओळ थरारली
कोष कोंदट फोडून
फुलपाखरे उडाली
खळखळा तुटताना
बेड्या आनंदे म्हणती
लघु, गुरू, मात्रा यांची
मुक्तछंदी ना गणती
वेध लागला मुक्तीचा
बंधी कोंडल्या ओळींना
सुंभ जळला-पण का
पीळ जळता जळेना ? :)
- Read more about पीळ
- 3 comments
- Log in or register to post comments
- 1102 views
प्रिंट इज डेड, लाँग लिव्ह स्क्रीन!
वाचनाची सवय झालेल्या आधुनिक मानवाचा मेंदू वाचन करत असताना कुठल्या कुठल्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जात असतो याची कल्पनासुद्धा करणे शक्य नाही.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about प्रिंट इज डेड, लाँग लिव्ह स्क्रीन!
- 6 comments
- Log in or register to post comments
- 2183 views
नर्मदापुरम (होशंगाबाद) - 25 दिसेम्बर २०२३
सकाळी उठून घाटावर जावं, नर्मदेचं पात्र पाहावं. शांत व्हावं.
भल्याथोरल्या घाटाच्या पायऱ्यांवर उभं राहून नर्मदेला पाहावं
घाट स्वच्छ नसतोच.
नर्मदेचं पात्र, नजर ठरत नाही. डुबकी मारायची इच्छा होतेच. आपण थोडीच पापं धुवायला आलेलो असतो? आपण आलेलो असतो नर्मदेच्या गोष्टी ऐकायला.
आपल्याच विचारात चालत जावं , घाटावरच्या नर्मदेच्या मंदिरात. नर्मदासूक्त लिहिलेलं असतं तिथे. प्रयत्नपूर्वक वाचावं ते. "त्वदीय पाद पंकज , नममि देवी नर्मदे"
पुजाऱ्याच्या पुढ्यातल्या ताटात पैसे टाकले की पुजारी बोलता होतो.
- Read more about नर्मदापुरम (होशंगाबाद) - 25 दिसेम्बर २०२३
- 3 comments
- Log in or register to post comments
- 1549 views
जिओचा डेटा आणि निळ्या डोळ्यांची बाळं
गेल्या वर्षीचा ख्रिसमस एका गोष्टीमुळे फार महत्वाचा ठरला. ख्रिसमसच्या मुहूर्तावर रणबीर कपूर आणि आलिया भट या उभयतांनी आपल्या पहिल्या अपत्याचं - राहाचं - जगाला मुखदर्शन घडवलं. मग बाकी सगळी महत्वाची कामं सोडून ‘नेटकरी’ ती कुणासारखी दिसते हे ठरवण्यात गुंतले. तिचे निळे डोळे राज कपूरसारखे आहेत, जिवणी नीतू सिंगसारखी आणि रंग कपूरांचा वगैरे चर्चा सुरु झाल्या. मला तर ती निळ्या डोळ्यांची आलिया वाटली. संध्याकाळी नवरा घरी आला तेव्हा मी त्याला आलियाच्या मुलीचे डोळे राज कपूरसारखे आहेत हे सांगितलं. त्यावर काहीशा अनपेक्षित सहजपणाने तो, "याला अटाविझम म्हणतात" असं म्हणाला.
- Read more about जिओचा डेटा आणि निळ्या डोळ्यांची बाळं
- 26 comments
- Log in or register to post comments
- 6437 views
वृद्धत्वाकडे वाटचाल - भाग १
चाळीस वर्षाच्या पुढच्या सर्व व्यक्तींना या विषयात रस वाटेल कारण वैद्यकशास्त्राप्रमाणे चाळीस वर्षानंतर वृद्धत्वाकडे वाटचाल चालू होते. एजिंग हा मानवप्राण्याच्या दृष्टीने नवीन अनुभव आहे. कारण शंभर वर्षापूर्वी एजिंग चालू होण्याआधीच माणसे मरत असत. आता आपण अशा युगात प्रवेश करत आहोत ज्यात लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणात लोक ७५ वर्षापर्यंत जिवंत राहतात आणि एजिंगचा अनुभव घेतात. वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने एजिंग ही एक नवीन दिशा आहे.
- Read more about वृद्धत्वाकडे वाटचाल - भाग १
- 23 comments
- Log in or register to post comments
- 8641 views
निरोप
निःशब्द मिठी सोडवून
निरोपाचा हात हाती देताना
आपण घट्ट धरून ठेवतो
उसनं आणलेलं अवसान
पाठ वळताच साथ सोडणारं
डोळ्यांवाटे मुकाट ओघळणारं
आपल्याकडे बघून कसनुसतात
समांतर विश्वातले तू अन मी
एकमेकांना विचारून पाहतात
विरहाचा अर्थ-भावार्थ...
दोघांनाही न उमजलेला
- Read more about निरोप
- Log in or register to post comments
- 932 views
सर्वधर्म(निधर्म)समवाद
माझी एक मैत्रीण म्हणते, "स्त्रीद्वेषाच्या बाबतीत सर्वधर्मसमानता आहे." नास्तिक काही निराळे असतील असं का मानायचं?
- Read more about सर्वधर्म(निधर्म)समवाद
- 16 comments
- Log in or register to post comments
- 4808 views
विचित्र स्वप्न: स्वप्नात आली ती आणि....
( काही सत्य काही कल्पना)
रात्रीचे स्वप्न:
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about विचित्र स्वप्न: स्वप्नात आली ती आणि....
- 10 comments
- Log in or register to post comments
- 3070 views