Skip to main content

आपण यांचं मीठ खाल्लंय!

आगरी समाजाचे भारतीय संस्कृतीवर फार मोठे उपकार आहेत. कारण त्यांनी मीठाचा शोध लावला. या समाजाचा इतिहास मीठाइतकाच जुना म्हणजे किमान सात हजार वर्षे एवढा प्राचीन आहे. आपण सर्वांनीच त्यांचं मीठ खाल्लंय. इतिहास हा फक्त राजा-महाराजांचाच नसतो तर ज्यांनी संस्कृती घडवली अशा निर्माणकर्त्यांचाही असतो. म्हणून आपण आगरी समाजाच्या ऋणात राहायला पाहिजे…

कोष्टी-साळी...विणकरांचा इतिहास!

पुरातन काळापासून मानवी समाजाने प्रतिकुल निसर्गाशी झुंज देण्यासाठी कल्पकता व प्रतिभा वापरत एकामागुन एक जी साधने शोधली त्याला तोड नाही. आजच्या वैज्ञानिक प्रगतीने आपण जेवढे थक्क होतो त्याहीपेक्षा अधिक, पराकोटीच्या प्रतिकुलतेत, अत्यंत वन्य अवस्थेत पुरातन मानवाने जे शोध लावले त्यामुळे चकित व्हायला होते. किंबहुना आजचे विज्ञान आपल्या पुरातन पुर्वजांच्याच अथक प्रयत्नांच्या पायावर उभे राहत आकाशाला गवसणी घालायला सज्ज आहे.

गुवाहाटी आणि बागपत

Taxonomy upgrade extras

गेल्या काही दिवसात आपल्याच देशात अशा काही घटना घडल्या आहेत ज्यामुळे कोणाही सुसंस्कृत भारतीयाची मान शरमेने खाली जाईल आणि संतापाचे अंगार दाटून येतील.आणि दुर्दैवाने आपण त्याविषयी काहीही करू शकत नाही म्हणून हळहळ व्यक्त करण्याशिवाय फारसे काही करू शकणार नाही.

(भिकार छायाचित्रण+रसग्रहण - एक आव्हान)

या स्पर्धेला विषयाचे कोणतेही बंधन नाही. ते चित्र कसलेही असू शकेल. छायाचित्रच हवं असं नाही, हाताने कागदावर किंवा कंप्यूटरवर (डिजिटल आर्ट) काढलेलं चित्रही चालेल. माणसाचेच, वस्तूचेच, प्राण्याचेच हवे असे नाही. हे छायाचित्र फोकस्ड असावेच, योग्य प्रकारे एक्स्पोज्ड असावेच, स्थिर असावे (फोटो काढताना कॅमेरा हललेला चालेल) असेही नाही. हे छायाचित्र उदात्त विचार, मानवी भावनांचे कंगोरे, मानवी जीनवाचा अर्थ सांगणारं शक्यतोवर नसावं अशी अपेक्षा आहे. पण अपवादात्मक परिस्थितीत पुरेसं स्पष्टीकरण दिल्यास अशा प्रकारच्या चित्रांचा समावेश होऊ शकतो.

अनपेक्षित...

.
काहीतरी चांगल पोस्ट करायला जातो,
नेमकी एरर समोर येते आणि आपण काहीतरी करण्याआधीच पोस्ट अपडेट होते
.. अनपेक्षित पेचातून सुटका !
पोस्टला कुणी लाईक केले आहे का पहातो, तो पोस्टला चार शेअर दिसतात
.. अनपेक्षित आनंदाचा झटका !
रस्त्यातून जाताना पुढच्यास ठेच- म्हणून शहाणा व्हायला जातो,
तर आपल्याला ठेचच लागत नाही तर आपण नेमके समोरच्या खड्ड्यात पडतो
.. अनपेक्षित शहाणपणापणाला फटका !
वाहतुकीचा सिग्नल तोडून पुढचे दोघे भरधाव निघाले की,
आपणही 'प्रयत्न' करायला जातो आणि नेमके 'त्या'च्या तावडीत सापडतो
.. अनपेक्षित प्रयत्न लटका !
बायकोला फोन करून खूष करण्यासाठी सिनेमाची तिकीटे घेऊन गेल्यावर,

अस्पृश्यता, आरक्षण आणि पुणे करार

मागच्या रविवारचा सत्यमेव जयतेचा भाग अस्पृश्यता ह्या सामाजिक विषयाला वाहिलेला होता. शहरी भागात राहणार्‍या बर्‍याच जणांसाठी त्यात दाखविलेल्या बर्‍याच गोष्टी कदाचित धक्कादायक असू शकतील. ह्या भागानंतर बर्‍याच मराठी संस्थळांवर ह्या अनुषंगाने चर्चा झडल्या. मिपावर कोणाचा रे तू' ह्या शीर्षकाचा लेख आला आणि त्यावरच्या प्रतिसादांमधून एक चर्चासत्र झडले. त्या चर्चेत बहुतकरून सध्याच्या तरुण पिढीतले युवक युवती हिरीरीने सहभाग झाले होते. त्या गदारोळात चर्चा अपरिहार्यपणे 'आरक्षण' ह्या मुद्द्यावर येऊन थडकली.

कोण आवडे अधिक तुला?

हे विडंबन मी केलेले नाही. ईमेलने आले ते थोडे सुधारले नि इथे ढकलले.

व्हिस्की आणखी रम यातुनी, कोण आवडे अधिक तुला?
सांग मला रे सांग मला ||

व्हिस्की दिसते गोजिरवाणी, थोडा सोडा थोडे पाणी
बर्फ टाकुनि मजेत प्यावी, ग्लास भिडवुनि ग्लासाला
व्हिस्की आवडे अधिक मला ||

गोजिरवाणी दिसते व्हिस्की, परंतु असते भलती रिस्की
सकाळ होता डोके चढते, जाउ न देई कामाला
रम आवडे अधिक मला ||

काळी सावळी असते रम, थंडीमध्ये करी गरम
कोल्यामध्ये मिसळुनि घेता, कळे न काही कोणाला
रम आवडे अधिक मला ||

थंडीमध्ये करी गरम, नशेत नसतो काही दम
व्हिस्की घेता विमान उडते, सुसाट जाई आभाळा
व्हिस्की आवडे अधिक मला ||

उच्चभ्रूंची सद्दी संपली?

गुणवत्ताधारित व्यवस्था (meritocracy) असं म्हटलं की साधारणत: ती चांगली गोष्ट आहे असं मानण्याचा प्रघात आहे. मागासलेल्या लोकसमूहांच्या उन्नयनासाठी विशेष पावलं उचलावी असं म्हणणारे पुरोगामी लोक याला अपवाद असतात, पण कित्येक वर्षं समाजात असणारे जातिभेद किंवा वंशभेद यांसारखे घटक हे शुद्ध गुणवत्ताधारित अशा आदर्श समाजापर्यंत पोहोचण्यातले अडथळे आहेत एवढंच त्यांचं म्हणणं असतं. म्हणजे गुणवत्ता वाईट किंवा हानिकारक आहे असं सहसा त्यांचंही मत नसतं. पण नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका पुस्तकानं असा काहीसा सूर लावल्यामुळे त्याविषयी गरमागरम चर्चा चालू आहेत.

माता वाक्यम् प्रमाणम्।

Taxonomy upgrade extras

ऋजुता दिवेकर यांचे 'Don't lose your mind, lose your weight' या पुस्तकाचं मराठी भाषांतर 'वजन कमी करा, मनःशांती नाही' नामक पुस्तक अर्ध्याधिक वाचलं१. वाचण्याचं कारण भोचक उत्सुकता. ऋजुताच्या भक्तगणात झिरो फिगरवाली करीना, अलिकडच्या काळात पिळदार स्नायू दाखवणारा सैफ हे तर आहेतच. शिवाय इतर प्रसिद्ध लोकांमधे अनिल अंबानी, इ. लोकं आहेत. मला या पुस्तकाबद्दल कुतूहल असण्याचं कारण हे प्रसिद्ध लोकं नसून या पुस्तकाचा होणारा हातोहात खप हे आहे. सामान्य लोकांना या पुस्तकात काय एवढं आवडतं असा मला पडलेला प्रश्न होता आणि आहे.

अनुवादत्रयी-१

एखाद्या साहित्यकृतीचा अनुवाद करण्यासाठी नेमकं काय काय लागतं असा विचार केला तेव्हा नजरेसमोर या तीन गोष्टी आल्या-
१. माहिती (सांस्कृतिक संदर्भ इ.)
२. साधने (कोश इ.)
३. कौशल्ये (अनावश्यक अर्थ अनुवादात आणणे कसे टाळायचे इ.)
या मालिकेच्या तीन भागांत वरील तीन गोष्टींची चर्चा मी करेन. या तीन भागांतून अनुवादप्रक्रियेच्या विविध शक्यता धुंडाळण्याचा प्रयत्न करायचा आहे; त्यांद्वारे कोणतीही नियमात्मक (प्रिस्क्रिप्टिव्ह) मांडणी करायचा उद्देश नाही.
------------------------------------------------------------------

माहिती

अनुवाद करण्यासाठी लागणारी किमान माहिती/ज्ञान-