कोडं - प्रेमाच्या चौरसातली पायपीट
आपल्याला प्रेमाचा त्रिकोण माहिती असतो. अ चं प्रे ब वर, ब चं प्रेम क वर. पण खऱ्या अर्थाने तो प्रेमाचा त्रिकोण असण्याऐवजी ती साखळी असते, कारण क चं पुन्हा अ वर प्रेम दाखवण्याइतका हिंदी सिनेमा प्रगल्भ झालेला नाही. मुकद्दर का सिकंदर मध्ये अशी प्रेमाची पाच कड्यांची साखळी होती. अमजद -> रेखा -> अमिताभ -> राखी -> विनोद खन्ना. पण पारंपारिक अर्थाने बंद आकार तयार करण्यासाठी सम बाजू असलेला बहुभुज हवा.
- Read more about कोडं - प्रेमाच्या चौरसातली पायपीट
- 11 comments
- Log in or register to post comments
- 8866 views
.
हवीच असते मी!
न्यूयॉर्कच्या अतिप्रगत रस्त्यांवर
सिंगापूरच्या अदृष्य गल्ल्यांमध्ये
रोमच्या ऐतिहासिक चौकाचौकात
आणि मुंबईच्या प्रत्येक फुटपाथवर
निवांत लोळत पडून असते मी
तुमच्या दिशादर्शक नाकाखाली
गाडीच्या पारदर्शक काचेबाहेर
हवं तेच पाहणार्या डोळ्यांसमोर
आणि तुमच्या घरामागच्या बोळीत
सुखेनैव विहरत असते मी
उंची मखमली बैठकींवर बसून
सिंगल मॉल्टच्या घुटक्यांबरोबर
कबाबसोबत तोंडी लावायला
मला हटवायच्या गप्पा करतात
तेव्हा पांढर्या गणवेशात 'सर्व्ह' करते मी
अॅपलपासून बर्गरपर्यंत
आणि केकपासून पिझ्झ्यापर्यंत
ठासून भरलेल्या फ्रीजसमोर
आमचा बबडू काही खातच नाही म्हणतात
तिथेच अर्धपोटी भांडी घासते मी
- Read more about हवीच असते मी!
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2952 views
दुखवट्याचा ठराव
Taxonomy upgrade extras
ज्या बॅटिंगच्या जोरावर भारत टेस्ट क्रिकेटमधला अव्वल संघ बनला होता तिचा नुकताच मृत्यू झाला. तशी गेले बरेच महिने तिची तब्येत तोळामासाच होती. इंग्लंडच्या दौऱ्यावर एकाही इनिंगमध्ये तिला ३०० च्या पलिकडे जाता आलं नाही. त्यामुळे अर्थातच ०-४ असा मार खावा लागला. मध्ये वेस्ट इंडिज वगैरे लोकांबरोबर किंवा भारतातल्या भारतात खेळून तिला जरा बरा काळ आल्यासारखं वाटलं. प्रकृती सुधारते की काय अशी आशा वाटायला लागली.
- Read more about दुखवट्याचा ठराव
- 52 comments
- Log in or register to post comments
- 26999 views
सूर्य - २
मागचा भागः सूर्य - १
मागच्या भागात सूर्याच्या शांत भागाची, अर्थात रवाळ दिसणाऱ्या पृष्ठभागाची माहिती घेतल्यावर आता अशांत पृष्ठभाग कसा दिसतो, त्याचा आपल्यावर काही परिणाम होतो का आणि अशांततेची आत्तापर्यंत आपल्याला माहित असलेली कारणे, निरीक्षणे यांची माहिती घेऊ.
- Read more about सूर्य - २
- 18 comments
- Log in or register to post comments
- 25740 views
एका कल्पनेतलं जग
त्या दिवशी रात्री संगीतावर आधारलेला तो चित्रपट अगदी रंगतदार अवस्थेत होता. शाळेच्या आणि शालेय शिक्षणाच्या पार्श्वभूमीवरची कथा असलेल्या चित्रपटातल्या त्या भागात एकूणच बदललेला काळ आणि त्या काळातली शालेय मुलांची बदललेली अभिरूची दाखवणारा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून सरकत होता. नेहमीप्रमाणेच मी चित्रपटाचा अगदी गंभीरपणे आस्वाद घेत होतो आणि तेवढ्यात बदललेली सांगीतिक अभिरूची दर्शवताना पार्श्वभूमीवर एक गाणं वाजू लागलं आणि ते ऐकताच काळजात कुठेतरी लक्कन् हललं. तो प्रसंग आणि चित्रपट पुढे सरकला पण ते गाणं काही माझा पिच्छा सोडत नव्हतं.
- Read more about एका कल्पनेतलं जग
- 7 comments
- Log in or register to post comments
- 5127 views
आमंत्रण - जीवनशाळांचा बालमेळा!

जीवनशाळांच्या मुलांचं दरवर्षी एखादं संमेलन भरत असतं. त्याला नाव असतं 'बालमेळा'. त्यात या शाळेतील मुलं विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असतात. त्याजोडीनेच त्यांचा क्रीडामहोत्सवही असतो.
यंदा हा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यातील आमलीबारी येथे, गुरूवार दि. २ फेब्रुवारी २०१२ ते शनिवार दि. ४ फेब्रुवारी २०१२ या दिवसात होणार आहे. या निमित्ताने नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे सर्वच सुहृदांना आमंत्रण दिले आहे.
- Read more about आमंत्रण - जीवनशाळांचा बालमेळा!
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3315 views
कोडं- २
कॉलेजमध्ये 'बायंसी' शिकताना जेव्हा सर्वप्रथम हा प्रॉब्लेम समोर आला तेव्हा बर्याच जणांचा गोंधळ झाल्याचं आठवतं. बहुदा ह्या कोड्याचं उत्तर काउंटर इंट्युटिव्ह असावं.
कोडं:
एका ग्लासमध्ये पाणी आहे. त्यात एक बर्फाचा तुकडा टाकला. बर्फ टाकल्यानंतर पाण्याची पातळी मोजली. तर बर्फ संपूर्णपणे वितळल्यावर पाण्याची पातळी;
अ) वाढेल
ब) कमी होईल
क) तीच राहील
- Read more about कोडं- २
- 20 comments
- Log in or register to post comments
- 17710 views
निया मधल्या लाकडी पाट्या
सातव्या शतकाच्या सुरूवातीला (602-664) होऊन गेलेला ह्युएन त्सांग (Xuenzang) हा प्रसिद्ध चिनी बौद्ध भिक्कू आणि पर्यटक बहुतेक सर्वांना माहीत आहे. 17 वर्षाच्या कालखंडात त्याने भारतभर केलेला प्रवास आणि बौद्ध धर्माच्या सूत्रांच्या प्रती काढण्यासाठी त्याने केलेले परिश्रम हेही प्रसिद्धच आहेत. त्याने आपल्या प्रवासाचे अत्यंत बारकाईने केलेले वर्णन हा त्या काळच्या भारतातील परिस्थितीचे ज्ञान करून घेण्याचा एक सुलभ मार्ग मागची 1400 वर्षे जसा होता तसा आजही आहे. हा बौद्ध भिक्कू चीनहून खुष्कीच्या मार्गाने भारतामधे आला, फिरला व चीनला परत गेला.
- Read more about निया मधल्या लाकडी पाट्या
- 17 comments
- Log in or register to post comments
- 12220 views
कॉकटेल लाउंज : गाथा ब्रॅन्डीची
ब्रॅन्डीची ओळख सनातन महाराष्ट्रातील बहुजन समाजाला आचार्य अत्र्यांनी 'ब्रॅन्डीची बाटली' ह्या सिनेमाची कथा लिहून करून दिली. त्यानंतर बहुजन समाजाला खोकला झाला की चमचाभर ब्रॅन्डी घ्यायची असा शोध लागला. त्यामुळे ब्रॅन्डी ही चमचाभर औषध म्हणून घेण्यापलीकडे दारू किंवा मादक द्रव्य म्हणून माझ्या खिजगिणतीतही नव्हती. त्यात देशी दारूमध्ये ब्रॅन्डी जास्त विकला जाणारा प्रकार आहे (अजून एक ब्लेंडी नावाचा प्रकार असून तोही ब्रॅन्डीच्या नावावार खपतो असे जाणकार सूत्रांकडून कळते).
- Read more about कॉकटेल लाउंज : गाथा ब्रॅन्डीची
- 16 comments
- Log in or register to post comments
- 9512 views