येत्या पंचवार्षिक योजनेतील रस्तेबांधणी
Taxonomy upgrade extras
लवकरच भारताची पुढची पंचवार्षिक योजना जाहीर होईल. (२०१२-२०१७) . या पंचवार्षिक योजनेमधील अनेक मुद्दे हळुहळू जाहीर होत आहेत. अलिकडे वाचलेल्या एका बातमीनुसार, येत्या पंचवार्षिक योजनेत १ ट्रिलियन डॉलर्स (१००० दशकोटी डॉलर्स) रस्तेबांधणीच्या कामात खर्च होणार असे दिसते. (दुवा : http://www.ibef.org/download/Updates_150710.pdf ).
या आणि अशा बातम्यांमधून काही प्रश्न निर्माण होतात.
- Read more about येत्या पंचवार्षिक योजनेतील रस्तेबांधणी
- 8 comments
- Log in or register to post comments
- 5635 views
नर्मदे, हर!
Taxonomy upgrade extras
स्वतःलाच प्रश्न विचारणं कितपत सोपं असतं? आणि त्यांची उत्तरं आधीच्या लोकांनी, विचारपद्धतीने करून दिलेल्या धारणांपेक्षा वेगळी असतील तर? नवीन ठिकाणी गेल्यावर काही प्रकारची प्रतिक्रिया आपल्याला अपेक्षित असते. एकदम वेगळाच प्रतिसाद आला तर? कालच एका ठिकाणी फिरायला गेल्यावर असाच काहीसा अनुभव आला. खिशातून वॉलेट काढताना पहाताच, "इथे प्रवेशफी नाही. देणगी स्वीकारली जाते." आम्ही आधीच चितपट. मग काऊंटरवरच्या माणसाने हसर्या चेहेर्याने संपूर्ण भागाचा नकाशा दाखवला. पेन्सिलीने खुणा करून "इथे व्यवस्थित चढाव आहे, काळजी घ्या." असं सांगतानाच, "तिथे खाली जाणारच असाल तर या ठिकाणी मात्र नक्की जाऊन या.
- Read more about नर्मदे, हर!
- 55 comments
- Log in or register to post comments
- 43513 views
विनोबा भावे अध्यात्म्यातील वन लायनर्स
नमस्कार,
या आठवड्याच्या सुट्टीत इंटरेनेटवर लक्ष्मीबाई टिळक आणि प्रभाकर माचवे यांचे काही लिखाण शोधत असताना, अचानक हाती घबाड सापडले. ओस्मानिया विद्यापीठ च्या साईटवर बरीच मराठी पुस्तके डिजिटल स्वरूपात ठेवली आहेत. त्यात माझ्या आवडीच्या लेखकांपैकी विनोबा भावे यांचा १९४६ सालात प्रसिद्ध झालेला विचारपोथी नावाचा एक ग्रंथ सापडला. पुस्तक प्रथम अधाशासारखे उतरवून घेतले. स्कॅन करून पिडिएफ केलेले असल्यामुळे समोर ठेवून स्वत: टंकलेखन केलेले आहे. टायपिंग च्या मर्यादेमुळे मला आवडलेले काही निवडक उतारे येथे देत आहे.
शिर्षक : विचार पोथी
लेखक :विनोबा भावे.
- Read more about विनोबा भावे अध्यात्म्यातील वन लायनर्स
- 4 comments
- Log in or register to post comments
- 6949 views
ब्लेम इट ऑन फिडेल (फ्रेंच चित्रपट)
काही चित्रपट यासाठी महत्वाचे असतात की त्यांनी वेगळे विषय हाताळलेले असतात आणि काही यासाठी की त्यांनी नेहमीच्या विषयांची वेगळी हाताळणी केलेली असते. ‘ब्लेम इट ऑन फिडेल’ (मूळ फ्रेंच मध्ये La faute à Fidel) हा चित्रपट काही अंशी वरील दोन्ही मुद्द्यांसाठी महत्वाचा आहें. दोनेक वर्षांपूर्वी पाहिलेला हा सुंदर चित्रपट परवा पुन्हा पाहिला आणि त्याबद्दल इथे लिहावेसे वाटले. वरवर पहिले तर हा विषय डाव्या विचारसरणीतील ध्येयवादाचा, बाल्यातून पौगंडावस्थेत शिरणाऱ्या एका मुलीवर कसा परिणाम होतो हे दाखवतो.
- Read more about ब्लेम इट ऑन फिडेल (फ्रेंच चित्रपट)
- 14 comments
- Log in or register to post comments
- 13813 views
सुर्योदय आणि चंद्रास्त
हिवाळ्यातली एक गुलाबी सकाळ, निरभ्र आकाश. पुर्वेला सुर्य अजून पांघरूणातून डोकं बाहेर काढतो आहे आणि पोर्णिमेचा चंद्र पश्चिमेला अस्ताला जातो आहे. हा क्षण टिपण्याचा मोह झाला नसता तरच नवल.

अपुरा प्रकाश आणि फोनमधला कॅमेरा यामुळे फोटोची 'ग्रेनी' आला आहे. पण खांबावरचा चंद्र, उगवत्या सुर्याची पुर्वेकडून पश्चिमेपर्यंत पसरलेली लाल छटा, दिव्यावरती अजूनही झोपेत असणारा पक्षी यामुळे चित्र इथे देतो आहे. टिप्पण्यांचे स्वागत.
- Read more about सुर्योदय आणि चंद्रास्त
- 14 comments
- Log in or register to post comments
- 17378 views
जे काही आहे ते सगळंच 'तत्त्वमसि' आहे!
आज कित्येक दिवसांनी आलोय तुझ्याजवळ निवांतपणे. तुझं हे सौंदर्य नेहमीच मला भुरळ घालतं, आजही घालतंय! हे मोहक रूप डोळ्यांत साठवून घ्यायला उभा जन्मही अपुरा पडावा. तुझ्याजवळ कधीही येऊन बसलो की खूप शांत, प्रसन्न वाटतं. हलकेच तुझ्या कुशीत गाढ झोप लागते नि रोजच्या दगदगीने थकलेल्या मनाला खूप आराम मिळतो. डोळ्यांना सुखावणारी ही दाट वनश्री, सोनसळी नव्हाळी ल्यालेली ही साळीची शेतं, भयाण गडगडाटांनी आसमंत भरून टाकणारे ते कृष्णमेघ, जीवाच्या आकांताने कोसळणार्या त्या जलधारा, त्या तिकडे मखमली गालिच्यावर लकाकणारी सोनेरी उन्हं, ही अवखळपणे डोंगरदर्यांना गुदगुल्या करत बागडणारी नदी - अरे आणखी किती वेड लावशील?!
- Read more about जे काही आहे ते सगळंच 'तत्त्वमसि' आहे!
- 8 comments
- Log in or register to post comments
- 6459 views
कोर्टटिपा..
कोर्टरूम या बॉलिवूडमधल्या अत्यंत महत्त्वाच्या जागेवर "कटहरे में खडा रेह के" अनेक भल्याबुर्या लोकांच्या आयुष्याचे फैसले होत असतात. काहीवेळा बाइज्जत बरी तर काहीवेळा मिलॉर्डच्या पेनाचं निब मोडून कांडकं पाडलं जातं.
मुळात सिनेमात असल्याने केस कोर्टात झटपट उभी राहून झरझर चालते..
- Read more about कोर्टटिपा..
- 19 comments
- Log in or register to post comments
- 17860 views
तो एक लाज-पुत्र
थोडी पार्श्वभूमी-इथे एका कालीज(कॉलेज) कन्यकेने एका रोड-रोमिओमुळे त्रस्त होऊन काही मैतरणींना हाताशी घेऊन,त्याला धडा शिकवला आहे...(खरं म्हणजे प्रस्तुत प्र-संग आमच्या शालीन वयात,आमच्या पल्याडच्या कालीजात आखो-देखे घडलेला होता, तो आज त्या कॉलेजला काही कामानिमित्त भेट दिल्यामुळे स्मृतिपटलावर आला...म्हणुन म्हटलं आलाय बाहेर..तर त्याला जमेल तसा मांडावा)
तो एक लाज-पुत्र,मी ही-रान्टी फूलं।
चारिन मी ,मी त्याला ग्राउंडची माती/धूळ॥धृ॥
कंठात बगळ्याचे हाड,केसात उवांची जाळी
अंगाला सार्या बरबटुन शाई,घालीन चपलांची माळ।१।
खाशील का पुंन्हा माती..?करशील का उचापती..?।
- Read more about तो एक लाज-पुत्र
- Log in or register to post comments
- 3644 views
हा खेळ संख्यांचा! - एक
अंकांच्या विशिष्ट गुणधर्मासंबंधी विचार करताना 1 या अंकाचे भरपूर गुणधर्म आहेत हे लक्षात येईल.
- पहिली विषम संख्या.
- Read more about हा खेळ संख्यांचा! - एक
- 6 comments
- Log in or register to post comments
- 6190 views
पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड
पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड
मागे एकदा पाली -रायगड येथील सरसगडावर गेलो होतो. यावेळी मुलगा अनंत व भाचा शुभम आणि भाची आर्या यांनी सरसगडावर येण्याचा फारच आग्रह केला. मागील पावसाळा संपल्यानंतर सरसगडावर त्यांना घेवून जाणे झाले. त्याची काही छायाचित्रे.
सुरूवातीची चढण
- Read more about पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड
- 6 comments
- Log in or register to post comments
- 7496 views