Skip to main content

बाई माझी, ही तंगडी मोडली

(चाल: बाई माझी, करंगळी मोडली)

ऐन दुपारी, नमुना फेरी,
गाडी नवी काढली - काढली
बाई माझी, ही तंगडी मोडली || धृ ||

झणी मारून मी कट वळताना
कुठून अचानक आला श्वान हा
गुपचुप येऊन, पाठीमागून
माझी साडी ओढली || बाई माझी ...

समोर भुंके कसा आडवा
पायच धरला, (-अंगाला घाम फुटायचं ते कारण होतं का?) माझा उजवा
मी ओरडले, तिथेच पडले,
उठताना मोडली || बाई माझी ...

त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (श्रावणबेळगोळ) भाग - ४

मागील भागात आपण बेल्लुर पाहिले. आता म्हैसूरपासून ९०-९५ कि.मी. दूर असलेल्या विंध्यगिरी पर्वतावर जैनधर्मियांचे मोठे तिर्थक्षेत्र आहे श्रावणबेळगोळ. मराठी माणसाला श्रावणबेळगोळ व तेथील गोमटेश्वराची मुर्ती माहिती असण्याचे कारण म्हणजे त्या मुर्तीच्या पायथ्यावर मराठीमध्ये केलेले शिलालेखन. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांना ही माहिती सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचा मान जातो.

बोस्की-इंटीमेट आणि सी -९०

१९६९ किंवा ७० साल असावं . एल निनोचं नाव तेव्हा कुणालाच माहीती नव्हतं. नैऋत्य मोसमी वारे आणि खारे वारे -मतलई वारे इतकंच भूगोलाचं ज्ञान होतं.. याच दरम्यान एक नविन वारं खेळायला लागलं. दुबईचं सोनेरी वारं .या वार्‍याची जाणीव आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांना उशीराच झाली .

भारतात एस.टी.डी. (सेक्शुअली ट्रान्समिटेड डीसीजेस) वर बंदी

कांदा संस्थान, दि. ३१. मिसळपाववर झालेल्या या चर्चेमुळे कांदा संस्थानाच्या ग्रामपंचायतीमधे श्वेतपत्रिका पारीत केली. आगामी जिल्हा परिषद निवडणूका झाल्यानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाची सत्ता आली की ही श्वेतपत्रिका जिल्ह्यात कायदा म्हणून लागू करण्याचा विचार संस्थानाच्या प्रवक्त्या सु.श्री. रतिचंद्रिकादेवी म. बाणकोटे यांनी जाहीर केला. या संवेदनशील कायद्याद्वारे ग्रामपंचायत आणि पुढे जिल्हा हद्दीत एस.टी.डी.वर अर्थात 'सेक्शुअली ट्रान्समिटेड डीसीजेस'वर बंदी घालण्यात आली आहे.

सध्या काय वाचताय?

बर्‍याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता थोडे फार त्याबद्दल सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. पण अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसर्‍यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जीवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणार्‍यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहावेत ही आशा आहे. मी सुरुवात करते:

सर्वोच्च कोण? : घटना व तिचे 'बेसिक स्ट्रक्चर'

इथे नकाशाच्या धाग्यावर सुरू झालेल्या चर्चेमध्ये घटनेच्या 'बेसिक स्ट्रक्चर' बद्दल बरीच चर्चा झाली आहे. या निमित्ताने काय आहे हे 'बेसिक स्ट्रक्चर' यासंबंधी कुतूहलाने माहिती शोधू लागलो. अर्थातच जालावर भरपूरच माहिती मिळाली. माझ्या अल्पशा वकुबाप्रमाणे ती इथे संकलित करत आहे. माहितगारांनी त्यात भर घालावी ही विनंती
=========

काही किस्से...

जालरंग प्रकाशन दरवर्षी ’शब्दगाऽऽरवा’ हा हिवाळी अंक (e-Publication) प्रकाशित करते. ह्या वर्षीच्या 'शब्दगाऽऽरवा २०११' मध्ये प्रकाशित झालेला माझा एक लेख इथे पुन: प्रकाशित करतोआहे.

विश्वासघात करतो माणूस ना मुळी तो !

माणूस तोच माना, बोले विचार करुनी
बोले जसा मुखाने चालून दाखवी जो -
मदतीस धावुनी ये नात्यासही जपूनी
सर्वांस आदरून मैत्रीस मानतो जो !

वेळेवरी स्तुतीला निर्व्याज कौतुकाला
मागेपुढे न पाही, करि ना कधी ठणाणा -
निंदा करी न कधिही अपशब्द बोलतो ना
माणूस संगतीला सत्पात्र तोचि जाणा !

माणूस तो न माना व्यसनात गुंतला जो
व्यसनात राहुनीया इतरांस ओढतो तो -
अवसानघात करि जो मातापिता सख्याचा
हक्कास फक्त जाणी, कर्तव्य टाळतो तो !

नात्यास आणु पाहे गोत्यात जी लबाडी
तोंडावरीच गोडी पाठीवरी चहाडी -
राहूनिया कृतघ्न निंदा सदा करी जो

कोरल कासल (Coral castle)

मायामीत कुठे फिरायला जावं याचा खल सुरू होता. मायामी म्हणजे यू.एस.च्या दक्षिण-पूर्वेला असलेल्या फ्लॉरिडा राज्यातलं (तेच ते 'पाडस'फेम राज्य!) सर्वात दक्षिणेचं महानगर. हवेत थोडी थंडी होती म्हणून समुद्रावर जाण्याचा बेत फसला असता. आदल्या दिवशी राहिलो होतो त्या हॉटेलात एक पँफ्लेट मिळालं होतं. 'A tribute to love' अशी जाहिरात पाहिल्यावर, "आता काय इथे ताजमहाल दाखवणार का?" असा प्रश्नही विचारून झाला.