म्हाळसादेवी म्हाळसाकोर्याची
(श्री. म्हाळसादेवी देवस्थान, म्हाळसाकोरे, ता. निफाड, जि. नाशिक, महाराष्ट्र, भारत)
म्हाळसादेवी म्हाळसाकोर्याची आहे लई पावन
माथा झुकतोया तिच्या पायी भक्तीनं ||धृ||
या हो तुम्ही दर्शन घ्याया म्हाळसाकोर्याला
पावन भुमी आहे ही निफाड तालूक्याला
बागाईत मुलूख शेतीवाडी बिनघोर
अंतरी दिपमाळ जळूद्या तुम्हां देवीची आन
- Read more about म्हाळसादेवी म्हाळसाकोर्याची
- Log in or register to post comments
- 3342 views
खड्यांच्या मुगुटाची गोष्ट (३)
मी रात्री साडेबारापर्यंत होम्सची वाट बघत बसलो होतो. पण त्याचं घरी परतण्याचे काही चिन्ह दिसेना. त्याला ताजा माग लागलेला असला की दिवस रात्रीची फिकीर न करता अनेक दिवस आणि अनेक रात्री तो गायब असायचा. या गोष्टीची मलाही चांगली सवय झाली होती. त्यामुळे जास्त काळजी करायच्या फंदात न पडता मी माझ्या खोलीत जाऊन झोपलो. होम्सला घरी यायला किती वाजले कोणास ठाऊक! पण सकाळी न्याहारीसाठी मी खाली आलो तर स्वारी प्रसन्न मुद्रेने टेबलावर बसलेली होती. एका हातात कॉफीचा कप आणि एका हातात ताजे वर्तमानपत्र घेऊन दोन्हींचा आस्वाद घेणे चाललेले होते.
- Read more about खड्यांच्या मुगुटाची गोष्ट (३)
- 8 comments
- Log in or register to post comments
- 6490 views
कोंबडी म्हणाली कोंबड्याला (चार चारोळ्या)
'पहाटे ओरड पाहिजे तेवढे-'
कोंबडी म्हणाली कोंबड्याला,
'ऐकावी लागणार दिवसभर
नंतर पक् पक् माझी तुला !'
मांजर निघाले घाईघाईत
शिकार उंदराची करायला -
आडवा आला माणूस नेमका
परतावे लागले मांजराला !
मुंगळयाने पाहिली गुळाची ढेप
निघाला तुरुतुरु खायला -
मधेच एक माशी शिंकली
माणसाच्या पायाखाली आला !
एक खेकडा सकाळी उठला
पूर्वेकडून पश्चिमेला निघाला -
संध्याकाळ होईपर्यंत
उत्तरेला नेमका पोहोचला !
- Read more about कोंबडी म्हणाली कोंबड्याला (चार चारोळ्या)
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2915 views
कॉकटेल लाउंज : पान सरप्राईज ('हॅप्पी न्यु इयर' स्पेशल)
आज 2011 ह्या वर्षातला शेवटचा शुक्रवार म्हणून एक न्यु इयर स्पेशल कॉकटेल टाकतो आहे.
‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे पान सरप्राईज
पार्श्वभूमी:
ह्या सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना एक धमाका कॉकटेल टाकायचे असे ठरवून ठेवले होते. सर्वांना करता येईल असे आणि चवही आपली देशी ओळखीची असावी अशी इच्छा होती. कुठचे कॉकटेल टाकावे असा विचार करत होतोच आणि एक मित्र घरी जेवायला येताना आमच्यासाठी मघई पान घेऊन आला. ते पान खाताना एकदम एक कॉकटेल आठवले. पूर्ण देशी चव असणारे 'पान सरप्राईज'.
- Read more about कॉकटेल लाउंज : पान सरप्राईज ('हॅप्पी न्यु इयर' स्पेशल)
- 10 comments
- Log in or register to post comments
- 7028 views
युगलगीत: बासूंदी गोड गोड
तो:
तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड
तुला पिवू का पिवू का पिवू का थोडं थोडं ||धृ||
ती:
तू माझा गुलाबजाम गुलाबजाम गुलाबजाम गोल गोल
तुला खावू का खावू का खावू का पोटभर ||धृ||
तो:
दुधासारखे शुभ्र तुझे ग आहे गोरं गोरं अंग
बशीमधे घेवू तुला की कपामध्ये तू जरा सांग
गरमा गरमी सहवेना ग तू हो आता थंड थोडं
तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड ||१||
ती:
माझ्या दिलाच्या मिठाईचा तू आहे एक हलवाई
मीच तूझी कधी बर्फी झाले, कधी झाले रसमलाई
बासुंदीची धार चोखण्या तू आता तोंड उघड
- Read more about युगलगीत: बासूंदी गोड गोड
- Log in or register to post comments
- 3590 views
(प्रेमी)युगुलगीत: तुझी माझी प्रित जमली
(टु ऋ : चाल एखाद्या भांगड्यासारखी आहे ब्वॉ.)
तो:
दे हातात तुझा मला हात सजणे
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //
ती:
दे हातात तुझा मला हात साजणा
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //
ती:
लपून छपून प्रेम ते केले
कधी कुणा नाही कळले
आता वाट नको पाहू
वेळ लग्नाची झाली
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //
तो:
कानी तुझ्या ग डूल डुले
पायी पैंजण रुणझूण बोले
गाली लाली येण्याची
वेळ जुळूनी आली
हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //
ती:
- Read more about (प्रेमी)युगुलगीत: तुझी माझी प्रित जमली
- Log in or register to post comments
- 3069 views
मदत पाहिजे - जीवनशाळांच्या रेकॉर्ड्सचे संगणकीकरण
मित्रहो,
जीवनशाळांच्या गेल्या वीस वर्षातील रेकॉर्ड्सचे संगणकीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. आज पर्यंत शाळेत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे रेकॉर्ड व्यवस्थितपणे पण लेखी चोपड्यांमधून जतन केले गेले आहे. हे सगळे आता संगणकावर घेतले जात आहे.
यासाठी, आम्हाला, युनिकोड मराठी टंकन करणार्यांकडून काही मदत मिळाल्यास हवी आहे. प्रत्येकजण आपापल्या उपलब्धतेनुसार यात भाग घेऊ शकतो. मात्र सध्या फक्त पुणे अथवा मुंबईत राहणार्या लोकांनाच यात सहभागी करून घेता येईल.
- Read more about मदत पाहिजे - जीवनशाळांच्या रेकॉर्ड्सचे संगणकीकरण
- 26 comments
- Log in or register to post comments
- 13328 views
खड्यांच्या मुगुटाची गोष्ट (२)
ही सगळी कथा ऐकल्यावर पुढे काय होणार याची उत्सुकता मला लागली होतीच. खरे सांगायचे तर झाल्या प्रकारात आमच्या दुर्दैवी सावकारबुवांचा मुलगाच दोषी आहे याबद्दल मला स्वतः सावकारबुवांच्या इतकीच खात्री वाटत होती. पण होम्सवरही माझा तितकाच विश्वास होता. ज्या अर्थी घडलेल्या गोष्टींचा सावकारबुवांनी लावलेला अन्वय होम्सला पटलेला नव्हता, त्या अर्थी अजूनही या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळू शकते असे मला राहून राहून वाटत होते. त्यामुळे होम्सने जेव्हा मलाही आपल्याबरोबर येण्याचा आग्रह केला तेव्हा मला ती एक इष्टापत्तीच वाटली. स्रीटहॅम हे उपनगर लंडनच्या दक्षिणेला आहे.
- Read more about खड्यांच्या मुगुटाची गोष्ट (२)
- 4 comments
- Log in or register to post comments
- 4376 views
छबू आणि ठोंबा
एक होता छबू
त्याला दिसला भुभू
भुभू होता झोपेत
घोरत होता मजेत
छबूने धरली शेपूट
भुभूला म्हटला ऊठ ऊठ
भुभूला आली जाग
चढला भलता राग
भुभू भुंकत उठला
छबू धावत सुटला
एक होता ठोंबा
त्याला दिसली हंबा
हंबा होती चरत
हिरवे हिरवे गवत
ठोंबा गेला मधे
आणि म्हटला, "दुध दे"
हंबाने उचलली मान
जोरात हलवले कान
चिडली होती भारी
ठोंबा म्हटला सॉरी
- ग्लोरी
- Read more about छबू आणि ठोंबा
- 7 comments
- Log in or register to post comments
- 5761 views
इन ट्रान्सिट...
टेंडरचे काम संपवून एअरपोर्टला पोहोचता पोहोचता रात्रीचे आठ वाजलेच.मुंबईला जाणारी रात्री साडे नऊ वाजताची फ़्लाईट पकडायची म्हणजे आधीच उशीर झाला होता.गडबडीत ऒन्लाईन चेक-इन करता आले नव्हते.
ई-तिकिटावर कन्फ़मर्ड असे स्टेटस जरी दाखवत होते तरी मनात थोडी धाकधुक होतीच. सामानाचे स्कॆनिंग वगैरे सोपस्कार पार पाडून आत जातो तो काउंटर समोर हि भली मोठी रांग पाहून पोटात गोळाच आला.इतर फ़्लाइटना असलेली गर्दी पाहता इमिग्रेशन व सेक्युरिटी चेक संपवायला अर्धा एक तास सहजच लागणार होता.
- Read more about इन ट्रान्सिट...
- Log in or register to post comments
- 5950 views