Skip to main content

करतं कोण आणि भोगतं कोण?

आज या वेळेला त्या माऊलीचा आक्रोश ऐकायला तिथे कुणीच हजर नव्हतं. तशी ती जागा एरवीही निर्मनुष्य म्हणूनच ओळखली जायची. एका छोट्याश्याच शहराच्या बाहेरचा तो भाग. तिथलाच हमरस्ता पण रस्त्यावर चिटपाखरू दिसणंही मुष्किल. रस्त्यावर असावेत म्हणून दोन-चार मिणमिणते दिवे होते पण त्यांच्यामुळे रस्तातरी दिसत होता की नाही अशीच शंका यावी.

Banyan

There used to be a Banyan outside
my house in Parle
a few years before
where stands a huge
fifteen storey structure
resplendent in colors
rank and raucous.

I have neither memories
nor associations of the tree...

Moreover I don't remember
if any kids played below
it nor any swings
that hung on its buxom barks...

The days were so frantically frazzling,that
the day when it was felled I have forgotten...

I do not even remember who felled it
how and when
and how the little hillock
that stood as a pimple
on facialised floors of Mumbai,
got flattened

अर्थ समजून सांगा ना

Taxonomy upgrade extras

ऐसिअक्षरेवर एक नवीन सोय आहे. श्रेणी देण्याची. ती संपादनासाठी उपयोगी आहे असे मॉडरेटर्स म्हणतात. ते एकवेळ मान्य करू. पण आणखी एक प्रॉब्लम आहे त्यावरून ऐसिअक्षरेवर श्रेणी फक्त प्रतिसादाशी संबंधित नाही. सदस्यांमध्येही आहे. म्हणजे काही समजले नाही तर 'फलाणे फलाणे यांनी अर्थ समजून सांगावा' असे वाचनात येते. पुर्वी वेदबिद म्हणजे काय आहेत ते समजवुन सांगणारे उच्चवर्णिय ठरले. इथे कविताबिविता समजून सांगणारे नवीन भाट निर्माण होत आहेत असे वाटते का? हे अर्थभाट म्हणजे नवी वर्णव्यवस्थाच नाही का?

तक्रारविल

हार्ड आणि पॉर्नी इमेजीचं, पोएटिक क्रिएशन
तुझ्यावरती फुगा फुटल्यासारखं येऊन आदळतं,
आणि तुझ्या अनावधनाची सिचुएशन साधून
कडव्यांमुळे तुटलेल्या जालथ्रेडचं
निमित्त साधून एक जण
बाहेर काढतो अलगद फेसबुकी ओळख.

तिथून मी पॅन करतो तर
खरडीवर आणि थ्रेडवर स्ट्रीम होत होत
तू रतिब घातलेल्या, पझलवलेल्या
कवितांच्या अर्थावर काही मिनिटे आणि
घाम गाळून, ऑफिस विसरुन
चौकटीत बडबड पिंका टाकणार्‍या
एका वाचनात कळेनाशी होतेस.

आम्ही वाचक अवाक्.
आमचे मॉडरेटर अवाक्.
आमच्या साइटवर, प्रतिसादात
आम्ही सारेच दात दाबून
स्तब्ध.

तू एका हींट ने आम्हाला
सॉलिड अर्थ
पाठव.

आम्ही सारेच जंतू -

ह्या खिडकीतून...!!

प्रथमच विमानाने प्रवास करीत होतो.प्रवास खूप लांबचा होता
लहानपणी कधी क्रिकेट खेळता खेळता नि कधी कधी हिवाळ्यात आमचा वर्ग जेव्हा शाळेच्या मैदानातील झाडाखाली भरायचा . तेव्हा किती मस्त वाटायचे
कधी कधी आभाळात खूप उंचावरून जेट विमानाचे चांदणी एवढे ठिपके दिसायचे.
त्यांचा लांबलचक शुभ्र धूर फुली मारल्यासारखा दिसायचा
किती छान नि मस्त वाटायचे ते बघताना कधी कधी विमान दिसायचे.
येशूच्या कृसासारखे शुभ्र धवल असा क्रूस तसे विमान वाटायचे.
आम्ही विमानाच्या दुप्पट वेगाने मैदानातून पळत असू.
नि आम्ही त्या विमानाला देखील हरवत असू.
तरी देखील आपण कधी विमानात बसावे असा विचार मनात कधी येत नव्हता.

ते दिवसच तसे असतात...!!

ती दिसली नि तिच्यावर जीव जडला
असे होते काहो तुमचे ?
[किंवा असे कधी झाले होते काहो तुमचे ?]
तसे माझे तर फार झाले बाबा
माझा तर चक्क बोल्ड झाला !!
काय गमंत असते ह्या प्रेमाची
जीव खरेच खुळावला
काय आवडले मला
तिचे डोळे?
तिचे बोलणे ?
नजरेतील कोवळेपणा ?
काय कुणास ठाऊक ?
पण माझा तर जीव जडला
तिच्या साध्या साध्या संवादातून
माझा जीव हरवून गेला !!!

कधी सकाळी सकाळी ती आली
की , किती छान दिसायची
अबोली रंगाच्या साडीत ती किती मस्त वाटायची
आई तिच्याशी बोलता बोलता
माझ्याकडे हलकेच बघायची
कुणास ठाऊक ती का अशी बघायची ??
का ती पण कोठल्या स्वप्नात हरवून जायची ?

जिम पोरी जिम


जिम पोरी जिम
पावर फ्लेक्स जिम
बर्न करो कॅलरी ऍन्ड
बन जाओ स्लिम.
जिम पोरी जिम
पावर फ्लेक्स जिम ...

2.

ओ, 20 मिन्टं ट्रेडमिल मारा
मॅम आज फक्त कार्डिओ करा

जॉर्ज ऑरवेल - मी का लिहितो?

जॉर्ज ऑरवेलच्या ‘१९८४’, ‘अ‍ॅनिमल फार्म’सारख्या कादंबऱ्या अनेकांना परिचित असतील. १९४६ साली प्रकाशित झालेल्या ‘व्हाय आय राईट’ या निबंधात लिखाणामागच्या आपल्या प्रेरणा त्यानं समजावून सांगितल्या आहेत. कोणत्याही लेखकाला/वाचकाला रोचक वाटाव्या अशा त्या आहेत. म्हणून त्यांचा सारांशरूपी परिचय इथे दिला आहे. या निमित्तानं काही साधकबाधक चर्चा व्हावी अशी आशा/अपेक्षा आहे.

लक्ष्मीनारायणाचा महिमा.

कवयित्री कविता प्रांतात कायम "ढ" राहिल. इतकी वर्षे नेटावर वावरून तिने कवितांमध्ये कोणतीही प्रगती केलेली नाही हे जाणून खालील कविता वाचावी. कविता कळत नसतानाही उगीच कवितेच्या फंदात पडायचा हा तिचा दोष सर्वांनी गोड मानून घ्यावा. कवितेची प्रेरणा येथे आहे. अनेक प्रयत्नांनंतरही कवयित्रीला कविता करणे जमेलच असे नाही याची जाणीव ठेवावी.


मोठ्या माणसात दडलेलं
लहान मूल
लहान मुलात दडलेला
मोठा माणूस
तत्वतः सारखेच

निळ्या फिल्मचा
आस्वाद
दोघे आनंदाने घेतील
एकाचा कळत आनंद
दुसर्‍याचा नकळत

बाईला बाई का म्हणावं?