Skip to main content

थोडे मजला कळाया लागले.

थोडे मजला कळाया लागले.
तव रुप छळाया लागले.

काजलनेत्र वा पिन पयोधर
दोघेहि मला खुणवु लागले.

गंधित मादक केश संभार
मन त्यात अडकू लागले..

पहाताच तव यौवन रुप
सारे आईने तडकु लागले.

पहाता रसाळ अधर फोडी
मन कविता प्रसवू लागले.

निरखता मादक आक्रुति बंध
द्वैताद्वैत रहस्य उकलू लागले.

अविनाश

शिरोरेखा

Taxonomy upgrade extras

जर तुम्ही तीसचाळीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या मराठी पुस्तकाचं एखादं पान अाणि अलीकडच्या पुस्तकाचं पान पडताळून पाहिलं, तर एक फरक स्पष्ट जाणवतो. पूर्वी शब्दांवरची शिरोरेखा दोन अक्षरांमध्ये तोडली जात असे, तर अलीकडे ती एकसंध असते. हा फरक अर्थात typesetting संगणकांवर होत असल्यामुळे उद्भवलेला अाहे. नेटवर जिथेजिथे मराठी पहायला मिळतं, तिथे कुठेही शिरोरेखा तोडलेली मी पाहिलेली नाही, अाणि माझ्या समजुतीप्रमाणे सध्या उपलब्ध असलेल्या कुठल्याही editor मध्ये ती तशी तोडण्याची सोय नाही.

बनाना लीफ ग्रीन चिकन

राम राम मंडळी.
दिवाळीच्या सुट्टी नंरत आमची ही पहिली पाककृती.
महिनाभर आयतच गिळायला मिळत होतं. त्यामुळे किचनकडे जास्त फिरकण्याची गरज पडली नाही.
आता परत येरे माझ्या मागल्या.

आज ग्रीन मसाला चिकन बनवलं होते. चांगलं लागल. मग म्हटलं तुम्हा सोबत शेअर करावं.
फार काही कटकटीचं नाही.

४-५ मोठे चमचे हिरवं वाटण. (यात भरपूर कोथिंबीर + ४-५ हिरव्या मिरच्या + ४-५ पाकळ्या लसुण + १" आलं + एका लिंबाचा रस.)

एक कविता, आणि तिचं भाषांतर

मी काही तासांपूर्वीच सदस्य झालो आहे. सर्वांना नमस्कार. ऑगडेन नॅशची एक कविता, आणि त्यानंतर मी केलेलं तिचं भाषांतर:

The one-l lama,
He's a priest.
The two-l llama,
He's a beast.
And I will bet
A silk pajama
There isn't any
Three-l lllama.

❈

एक ट अटल
झाला पंतप्रधान
दोन ट अट्टल
चोरापासून सावधान
पण देईन मी बक्षीस
सोनं एक क्विंटल
जर असेल कुठे जगात
तीन ट अट्ट्टल

❈ ❈

हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत....... भाग - १

हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत.

पंड्त बिरेंद्र किशोर रॉय यांच्या लेखावर आधारीत.

हिंदूस्थानी संगीत परंपरा इतकी जूनी आणि थोर आहे की त्याचे मुळ शोधायला गेले तर असे वाटले तर आश्चर्य वाटायला नको की हे संगीत दैवी आहे. हे देवानेच जन्माला घातले आहे. प्राचीन काळी गांधर्व संगीत आणि वैदिक संगीत या दोन्ही पद्धती ऋषीमूनींच्या आश्रमातच जोपासल्या गेल्या असे मानायला भरपूर जागा आहे. अर्थात ज्या राजांच्या आश्रयाला हे ऋषीमूनी होते, ज्यांचा सक्रीय आधार या गुरूकूलांना लाभला होता, त्यांनाही या परंपरेचे श्रेय द्यायलाच लागेल.

लैंगिक उपासमार व गुन्हेगारी

Taxonomy upgrade extras

'आपल्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नवर्‍याला मारुन त्याच्या मांसाचा बायकोने कुर्मा बनवला' अशा आशयाची बातमी आजच्या "टाईम्स" मध्ये वाचली. 'सहा महिन्याच्या मुलीवर बलात्कार', 'दरोड्यादरम्यान साठ वर्षाच्या वृद्धेवर सामूहिक बलात्कार' अशा बातम्या बर्‍याच वेळा वाचनात येतात. पंधेर आणि कंपनीचे निठारी वासनाकांड कोण विसरेल? अशा लोकांना सरसकट 'लिंगपिसाट', 'कामपिसाट', 'वासनांध पशू' अशी निर्भत्सनावाचक विशेषणे लावली जातात.

युगलगीत: गार गार वारा अंगाला झोंबला

युगलगीत: गार गार वारा अंगाला झोंबला
तो:
गार गार वारा अंगाला झोंबला
तुझी साथ हाय माझ्या उबार्‍याला

ती:
नका जावू पुढं थांबा की थोडं
आसं शोभत नाय तुम्हाला

तो:
आगं तू येडी का खुळी
काय बोलतीया अवेळी
आगं काय म्हनू मी तुला?

ती:
काल रातीला एकटीच व्हते
घरात नव्हतं कुनी
तुमी यावं आसं वाटलं
पन आला नाय तुमी
आज आला तर थांबा थोडं
गुलुगुलु बोलू गोड गोड
गुलाबी थंडीचा मोसम ह्यो आला

तो:
आंगाश्शी..गार गार वारा अंगाला झोंबला
तुझी साथ हाय माझ्या उबार्‍याला

तो:
देव देव कराया नवस बोलाया

(एरोप्लेन)

सकाळचे पावणेअकरा वाजण्याचा सुमार असेल. काल रात्रपाळी होती त्यामुळे पलंगावर झोपलो होतो. म्हणजे स्वप्नात यंत्रावर वीजनिर्मीती कशी करायची याचे दृष्य पाहत होतो. स्वप्न सुरू होवून मुख्य विषयात शिरत होतो तोच गल्लीतल्या लहान मुलांचा आरडाओरडीचा आवाज, मागोमाग विमानाचा घरघराट. झोप थोडी विस्कळीत झाली. पुन्हा एखाद्या मिनीटाने घरघराट झाली. असा प्रकार तिनेक वेळा घडला. आता एरोप्लेन म्हणजे काही नवलाई नाही हे खरे पण आवाजावरून ते बरेच जवळ वाटले. झोपेच्या अंमल अजून असल्याने सुर्यप्रकाश न येवू द्यावा म्हणून खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला नाही. आमच्या भागात आर्टीलरीचे शिकावू हेलिकॉप्टर नेहमी उडतात.