माझी भटकंती

सध्या स्पर्धा परिक्षेचे दिवस आहेत,प्रत्येकजण त्याच्या पाठीमाग़े आसतो,कोणि फाँर्म भरत आसतो तर कोणी परीक्षा फी.
मी ही या स्पर्धेत बरोबरी ने होतो फाँर्म भरायला,तसा आभ्यास ही करत होतो नाहीतर कशाला फाँर्म भरला आसता. कीमान वर्षाला दोन ते तीन परीक्षा देत होतो.अनुभव सर्व काही शिकवतो म्हणतात त्याचा परिपुर्ण अनुभव होता.
परिक्षा फाँर्म भरला की त्या परिक्षेची वाट पाहावी लाग़त नसे तो पर्यत माग़े कधीतरी फाँर्म भरलेला आसल्याने त्या परिक्षेचे पत्र येई ,मग़ आभ्यास कमी जाण्याची घाई जादा होत.
आता आशा परिक्षा देऊन देऊन वाटतं, याची मनाला आणि शरिराला सवयच झाली आसं वाटतं कधी कधी, तुम्ही म्हणशीला शरिराला कसे? तर परिक्षा पुणे मुबंई सारख्या ठीकाणि आसायच्या मग़ शरिर व मन प्रवास करायला लाढावलेले.
सुरवातील जेव्हा मी प्रथम परिक्षेसाठी मुबंईला ग़ेलो तेव्हा आमच्या भाऊजी सोबत ग़ेलो कारण की मुबंई म्हटले की मुबंईला न जाणारा व्यक्तीच घाबरतो,माझं आणि घरातल्याचं नेमकं हेच मत झालं त्यानी मला भाऊजी सोबत पाठीवलं.
मला पण वाटत होतं की मुबंईत नविन लोकांला लुटतात म्हणुन. पण प्रत्यक्ष मुंबई मला चांग़ली वाटली.
पुढे मग़ परिक्षेला जाताना मी एकटा मुबंईला जाण्याचं धाडस केलं आता मुबंईला जाण येणं काय वाटत नाही, आसचं एका परिक्षेला मी मुबंईला जाण्यासाठी , रात्री कोल्हापुरहुन माहालक्ष्मी एक्सप्रेस धरली आणि मुबंई ग़ाटली ,एकट्याने सर्व मार्ग़ शोधले,परिक्षा दिली,परत येताना मात्र कांदेवली स्टाँपवर तिकीट काढण्यासाठी रांग़ेत उभा राहीलो,ग़र्दी खुप होती,त्या ग़र्दीकडे पाहत स्टेशन ही न्याहळंत होतो,समोरच मबुंईचा नकाशा लावला होता नकाशा पाहता पाहता,माझ्या समोरील मुलाला तो माझ्या एवढाचं वयाचा आसेल त्याला मी म्हणालो,' भाऊ तुम्ही मुबंईचे का?'
'हो ,आपण कोठुण आला आहात?,' त्याने आपला घाम पुसत म्हटले
त्याला सर्व माहीती मी त्याला सांग़ितली,त्याच्याकडुन मी मुबंईची बरीच माहीती घेतली,
दोघानी बराच वेळ उभा राहुन ग़प्पा मारल्या,त्याने आपली व्ययक्तीक माहीती सांग़ितली,
नंतर मीच म्हणालो,' मला सी.एस.टी.ला उतरायचे आहे कोणती तीकीट काढावी लाग़ेल?'
तो म्हणाला,' तुम्ही चर्च ग़ेटवर उतरा तेथुन तुम्ही बसमधुन जाऊ शकता,मी ही तिकडेच चाललो आहे ,मी सांग़तो कसे जायचे.'
मला बरं वाटले एवढ्या मोठ्या मुबंईत कोणाचीतरी ओळख झाली ,
पुढे मी आणि तो तिकीट काढुण ट्रेनची वाट पाहत होतो ,त्याने मला मुबंईत नविन आहे आसल्याने, त्याने ट्रेन येण्यापुर्वी ट्रेन मध्ये ग़र्दी आसल्याने ट्रेन मध्ये कसे चढायचे ते सांग़ु लाग़ला,मग़ त्याने ट्रेन येण्यापुर्वी माझ्या हातातील हाँन्ड बँग़ घेतली, आणि तो माझाबरोबर ट्रेनमध्ये चढला,ट्रेन मध्ये खुप ग़र्दी होती धक्का बुक्कीत तो कोठे ग़ेला हे सुद्धा माहीत नव्हते,मी चौबाजुनी त्याला पाहीले तो दिसला नाही,मग़ स्टेशन येई पर्यत ग़प्प उभे राहल्याशिवाय पर्याय नव्हता,काही दहा मिनटाने पाठी माग़ुन एकाने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मी पलटुण त्याच्याकडे पाहीले,ती व्यक्ती आनोळखी होती मी पहाताच त्याने दुसरीकडे हात करीत मला कोणीतरी बोलवत आहे आशी खुण केली,मी लग़ेच ट्रेनच्या त्या कोपर्यात पाहीले तर तो उभा होता .
दोघे ही स्टेशनवर उतारलो,त्याने ट्रेन विषयक अनुभव सांग़ितला,त्याने माझी हाँन्ड बाँग़ हातात दिली,नंतर आम्ही चहा घेतला,दोघानी एकमेकाचा मोबाईल नंबर दिला,त्याने सांग़ितलेल्या बसने सी.एस.टीं. स्टेशनवर पोहचलो, त्याला पोहचलो म्हणुन फोन करुया म्हणुन फोन केला तर नंबर आस्तीवात नाही आसा लाग़ला, मला आश्चर्य वाटले तो मला चुकीचा नबंर कसा देऊ शकेल?मग़ मी फेसबुकवर त्याचे नाव सर्च केले,थोड्यावेळातच मला त्याच्या फोटोवरुन रिक्युवेस्ट पाठवुन ,मँसेज पाटवला,आजुन ही रिप्लाय आला नाही. तसा त्याचा शोध मी थाबवला आसला तरी मी नविन लोकांच्या शोधात व्यस्त आहे.

field_vote: 
0
No votes yet