त्याची प्रेग्नंट बायको

ललित

त्याची प्रेग्नंट बायको

- संतोष गुजर

"इतके लोक बसवर चढतात तरी ती प्रेग्नंट होत नाही. का? कारण सगळे मागून चढतात!"
ज्योक ऐकवून मित्र पादरं हसला. पादतच राहिला.

पण त्याला हे अजिबात आवडलं नाही. अश्लील वाटलं. त्याला प्रचंड राग आला मित्राचा. रडवेल्या घृणास्पद नजरेने मित्राकडे बघून तो म्हणाला, "माझी बायको प्रेग्नंटंए."

I am very sensitive about anything related to pregnancy. He knew it.

तो खड्ड्यात पडला. स्वत:च्या.
एकाच वेळेला, "हे माझंय, लोकांना कळलं पाहिजे" आणि "हे माझंय, माझ्यापर्यंतच राहिलं पाहिजे" ह्या दोन परस्परविरोधी भावना त्याच्या डोक्याची आयभेन करत होत्या.

जसजसं त्याच्या बायकोचं पोट वाढायला लागलं… त्याची छाती इंचाइंचाने वाढू लागली. वाढत वाढत आपल्यालासुद्धा बायकोसारखी मोठमोठी गरगरीत स्तनं येतील आणि आपणच आपल्या मुलाला दूध पाजत पाजत सोसायटीतून मिरवू आणि म्हणू, "मी काढलंय ह्याला… मी!"
तो स्वत:शीच मोठ्या अभिमानाने हसला आणि किचनमध्ये पाठमोऱ्या उभ्या असलेल्या बायकोच्या कमरेवर दोन्ही हात ठेवत तिच्या कानाशी चिकटला.

"एक ज्योक सांगू?"
"कोणता? "
"नॉनव्हेजए!"
"ऐकवा."

हार्मोनल चेंजेसमुळे कुणीही बदलत. प्रेग्नन्सीतल्या बायका जरा जास्तच. त्यांचा मूड कसाही कधीही स्विंग होतो. त्या काहीही बोलू शकतात, काहीही मागू शकतात, काहीही खाऊ शकतात, काहीही करू शकतात. त्याच्या बायकोला 'नॉनव्हेज ज्योक्स' ऐकण्याचे डोहाळे लागले होते - तो तरी काय करणार?

" तसं मला ज्योक्स वगैरे येत नाही. I am not good at it. प्रयत्न करतो. म्हणजे मी जास्त फिरवत बसत नाही, सरळच सांगतो - एक मुलगी बघायला गेलेला मुलगा मुलगीला विचारतो… तेही, काय विचारायचं, काय विचारायचं, म्हणून, की तुला चहा येतो? ती मुलगी एकदम खिदळत त्याला उत्तर देते - अजून दुधाचा पत्ता नाही, चहा कुठून येणार?"

...त्याने ज्योक सांगितला, ती तुडुंब हसली. घरभर फिरली हसत हसत आणि म्हणाली,
"कॉलेजमध्ये असताना एकमेकींना ऐकवायचो हा जोक आम्ही. माझ्या दुधाचा चहा पिणार??"
मग शांतच झाली एकदम. करंट गेल्याने घरात जी शांतता पसरते तशी शांत. तो चक्रावला. त्याला वाईट वाटलं.
वाटणारच!
नवऱ्याचा ज्योक बायकोला आधीच माहितीय? नवऱ्याच्या ज्योकचा बायको अपमान करते? तेपण आधी हसून नंतर एकदम गप्प बसून. Not acceptable!

बायको पुन्हा किचनमध्ये. पूर्ववत.

तो दरवाज्यातून बायकोकडे बघू लागला.
खाज मारते म्हणून तिने ब्रा आणि पँटी घालणं हल्ली सोडूनच दिलं होतं घरी. फक्त मॅक्सीवर. मॅक्सीच्या आत. वावरायची.

तिचं पोट. सात महिन्यांचं. वाईल्ड यलो रंगाच्या मॅक्सीला घट्ट चिकटलेला चामड्याचा अर्धगोलाकार. कधीही पडण्याच्या तयारीत असलेला. ती 'Dome of Pantheon' म्हणते. आणि त्या डोमला पडलेलं भलंमोठं भोक, तिची बेंबी. ऑक्युलस.

सूर्याचा अजस्त्र डोळा आत डोकावेल यातून आणि… ती बडबडते. असंबद्ध वाटते त्याला.
आपल्या बिल्डींगीच्या टेरेसवरची पाण्याची टाकीपण तर डोमचंय. त्यासाठी रोमला का जाते ही? त्याच्या डोळ्यात मोतीबिंदू पडतं.
- भोक एकच.

त्याला तिचं सात महिन्यांपूर्वीच चपटं पोट आठवलं. त्या पोटावर चिकटवलेले खडबडीत ओठ आठवले. तेव्हा ओठांवरून जीभ फिरवली त्याने. छातीचं, बेंबीचं तोंड लावून केलेलं कौतुक आठवलं, "बेंबीच्या देठापासून ओरडशील आता!" जीभ आणि बोटांनी चाळे करताना तिने आपले केस कसे घट्ट ओढून, आवेगाच्या की कसल्यातरी भरात आपल्या कानाखाली मारली होती खाड्कन तेही.
त्याचे हात नकळतपणे गालांवर गेले. जवळजवळ पाऊणतासाच्या त्या फोर-प्लेनंतर त्याने मुख्य कामाला हात घातला होता. त्या कामाचं हे फळ, तिचं पोट!
समाधानाचा घाम पुसत असताना त्याच्या डोक्यात विचार आला, "फुग्यांप्रमाणे असतात बायका, फुगणाऱ्या. हवा घातली की फुगतात. पण आपण हिला सोडलं तर ही उडूनही जाईल आकाशात किंवा… मध्येच फुटून जाईल."
त्याची हवाच निघून गेली. त्याने सक्तीची Parental leave घेतली.

त्याचं लक्ष. परत तिच्या पोटाकडे.
उघड्या स्लाईडिंग विंडोतून किचनच्या ग्रेनाईटवरून डायरेक्ट तिच्या पोटावर पडणारी सूर्याची लांबसडक शुभ्र बोटं त्याला दिसली. ती बोटं त्याच्या बायकोच्या पोटावरून फिरत होती. पाच-दहा नव्हे, चांगली शेकडो सूक्ष्म बोटं. त्या बोटांची लैंगिकता त्याला जाणवत होती. ती बोटं क्रमाक्रमाने तिच्या पोटावरून छातीवर, छातीवरून ओटीपोटाव… ओटीपोटावरून अगदी खाली शिरत होती आणि बायको जराशी जरी वळली तरी तिच्या ढुंगणावर सहज चान्स मारत होती. त्याला हे दृश्य असह्य होत होतं.

माझ्यासमोर माझ्या बायकोशी! हा सूर्य हरामखोर, देवाय म्हणून काय झालं. ह्या देवांचा काय भरवसा? त्यांचा भूतकाळ माहित्ये. मला कोणताही अवतार बिवतार नकोय प्लीज, get lost! त्याच्या डोक्याला झिणझिण्या आल्या. ह्या विचारांत त्याचं डोकं गिरमिटात पेन्सिल फिरावी तसं फिरलं आणि डोळ्यांसमोर बघितलं तर सूर्यफूल.
लहान होत तो ते फूल खुडण्यासाठी गेला तेव्हा हातावर चापटी बसली. वर पाहिलं तर बायको. तिच्या भरलेल्या चेहऱ्यावर तीच झळाळी पसरली होती. सूर्यफुलासारखी.
किती सुंदर असतात ना प्रेग्नंट बायका!
लहानपणापासून, अगदी आठ- दहा वर्षांचा होता तेव्हापासूनच आकर्षणंय त्याला प्रेग्नंट बायकांचं.
Oh, there is something about them!
स्वतःच्या आईलाही तास न् तास बघत बसायचा. आईने कधी हटकलं तर विचारायचा, "ह्या पोटामुळे तुला खालचं काही दिसत नसेल ना?" आईपण चापटीच मारायची. बायका खरंच किती नशीबवानएत! मला ते आवडतं, मलाही ते हवंय!

त्याच्या कमरेचा करदुडा जसजसा बदलत गेला, त्याला कळून आलंच की,
"आपण त्यांना नशीबवान करतो." कर्टसी – त्याचा सज्जन बाप.
ज्याने त्याची 'बच्चे पसीने से पैदा होते है' या बाळबोध विचारधारणेतून लौकरात लौकर सुटका केली. नाही तरी एकटाच पसीना गाळत बसण्यात काय पॉइंटए? ह्या विचाराने तो आतल्या आत फुगत गेला. मग तेव्हापासून स्वतःच्या पीसीचा वॉलपेपर बदलून कधी डेमी मूर कधी मोनिका बेलुचीचे प्रेग्नन्सीतले फोटो ठेवायला लागला तो. त्या दोघींना बघून त्याला नेहमी वाटायचं, Such a grace… there is such a pride in having someone 'living' inside you! मलाही असं करायचंय.
दरम्यान 'सर्वांनाच मुलं होत नाहीत. ज्यांना होत नाहीत त्या पुरुषांना नामर्द आणि बायकांना वांझ असं म्हणतात.' हे त्याच्या कानांवर आलंच होतं. म्हणून एका भीतीच्या सावटाखाली सर्व पुरुष वावरत असतात आणि त्यामुळेच लग्न झाल्या झाल्या 'मम्मी-डॅडी' होण्याचा कार्यक्रम आधी उरकून घेतला की आपल्या लैंगिकतेवर सुदृढतेचा शिक्कामोर्तब होतो तसंच लोकांची थोबाडंही बंद होतात ह्या जनमतावर तो ठाम होता.
सुदैवाने तो मर्द होता आणि त्याची बायको सुजलाम सुफलाम.
त्याच्या कंप्युटर स्क्रीनवर आता डेमी मूर किंवा मोनिका बेलुची नव्हती तर साक्षात त्याची प्रेग्नंट बायको होती! तसेच्या तसे अगदी, घरातल्या घरात डी. जी. कॅमने त्याने तिचे फोटो शूट केले होते - एक हात स्तनांवर, एक हात तटतटून आलेल्या चामडी अर्धगोलाखाली.
'...कोवळ्या हिरव्या पानावरून ओघळणारा पहाटेचा टपोर दवबिंदू..' - तिचं पोट प्रकाशत होतं. कल्पना नैसर्गिक होती पण त्याला खास आवडली नाही. बोटं बोटंच असतात, ती पण परपुरुषाची म्हणजे? Not acceptable! तू माझीयस, ते माझंय. माझं क्रेडीट मी कुणाला घेऊ देणार नाही. तू काय महाभारतातली बाई नाहीएस किंवा 'Leda and Swan'मधली लेडा.
- खिडकी बंद!
स्कार्फ नीट बांध कानांवर. कुणीही शिरू नये तुझ्यात माझ्याशिवाय. STRICTLY PROHIBITED AREA.
ती नेहमीसारखं हसली. त्याला न कळणारं. पलंगावर पडली. तो समोर खुर्चीवर.
तिचं लक्ष सिलिंगकडे, न फिरणारा फॅन फिरायला लागला. बघता बघता सिलिंगचं आभाळ झालं. रात्र झाली. चंद्र आला. चांदण्या आल्या.

त्याच्या डोक्यात झगमगणारा रात्रीचा 'मॉल' तयार झाला. नाकावर उगवणाऱ्या असंख्य ब्लॅकहेड्ससारखे कपल्सलोक जमू लागले. इकडेतिकडे चोहीकडे. एस्केलेटर्स आणि लिफ्ट्समधनं तो फिरतोय. तिचा हात हातात घेऊन, कधी तिच्या खांद्यावर ठेवून. सर्व पुरुष पंपिंगसाठी तयार झालेत. सर्व पुरुषांना एकेक फुग्गा द्या!
This mall is one great pussy. Get lost anywhere you want!
फुग्गेच फुग्गे. रात्र हवेची, दिवस फुग्ग्यांचे. तिच्या पोटावरून त्याची नजर आजूबाजूला सरकली. खिळली. कोण कोण बघतंय? ...सगळेच? हा क्षण स्टॅच्यू करून सार्वजनिक केला पाहिजे. प्रदर्शन भरवायला हवं हिचं. At least फेसबुकवर तरी upload करूयात ना काढलेले फोटो! त्याला यातलं काहीच करता आलं नाही - येत नाहीय.

त्याचा बाप उवाच-
"ज्या गोष्टी आपल्यायत त्या आपल्यापर्यंतच राहिल्या पाहिजेत. लोक सगळंच सांगत नाहीत. लग्न - सार्वजनिक सोहळा. हजार जणांना दाखवून, दाखवण्यासाठी केलेला. हनिमून - प्रायव्हेट लिमिटेड. त्यानंतर बायको गरोदर - हे कमीत कमी तीन महिने सांगत नाहीत कुणी कुणाला. शास्त्र सांगतं की लोकांची नजरच वाईट असते - माहीत नाही. पण सांगायचं नाही. कुणाला म्हणजे कुणालाच. बायकोलापण. हीss हीss… त्यानंतर बारसं. पुन्हा सार्वजनिक. लोकांनी त्यांच्या आयुष्याची विभागणी करून टाकलीय – सार्वजनिक/असार्वजनिक.
फेसबुकच्या नादाला लागू नकोस नायतर गांडच मारीन तुझी!"
बापाच्या वागण्यात 'Don't teach father to fuck'वाला अॅटीट्यूड होता.
नेहमीचंच.

- काळी नजर लागून तिचं पोट फुटेल एखाद्या गाठीसारखं!
त्याला एकदम सरदार वल्लभभाई पटेलांची आठवण झाली. त्यांनी म्हणे गरम गरम लोखंडी सळीने काखेतली गाठ फोडली होती. म्हणून 'Iron man of India'. येणारं हसू त्याने आतल्या आत गिळून टाकलं आणि वैतागत म्हणाला,
"THIS is irrelevant! मी वेडा होतोय..."
त्याचं नाक कापलं गेलं. त्याच्या डोक्यातला स्वयंप्रकाशित 'मॉल' बंद पडला.

पहाट कधीही होईल.
वेळ निघून चाललीय.
मी असा किती काळ, किती महिने बसून राह्यचं?
आपण आपल्या विचारांच्या आड कितीही लपून बसलो तरी तो भोसडीचा सूर्य उजळ माथ्याने नाचणारच. डोळ्यांसमोर न बघवणारया सुखी माणसासारखा.

सत्य हे प्रेग्नंट बाईच्या पोटासारखं असतं. सुरुवातीला दिसत नाही, नंतर लपता लपत नाही आणि एकदम नंतर तर सपशेल गायबच होतं. मग वाट. पुढची खेप येईपर्यंत.
- नको त्या वेळेला येणारं तत्त्वज्ञान हे शेंबडासारखं नाकातून आत ओढत परत छातीत जमवायचं कफसारखं नायतर एकदम फेकूनच द्यायचं बाहेर दुसऱ्यांवर! समजलास? – बापाची धमकी.

आता काय करायचं? खरंच सहन होत नाहीय हे. ही प्रेग्नन्सी. त्याचा हात नकळत त्याच्याच पोटावर गेला. अचानक एखाद्याने थोबाडात मारल्याप्रमाणे त्याला शुद्ध आली.
काय करतोय मी हे?
Not acceptable!

तो फ्रीजमध्ये ठेवल्यासारखा बसून बर्फाचा एकेक खडा तयार करू लागला. बाहेर फेकू लागला.
खड् खड् खड्...
- शाळेतल्या शिंदे बाईंच्या फुगलेल्या पोटाला मुलं 'फुटबॉल फुटबॉल' चिडवतायत...
- जितकी थानं तितकी पिल्लं ह्या हिशेबाने कुत्रीला पिल्लं होत नाहीत.बायकांना चारही होतात, नाहीतर नाहीच.
- नुकतीच व्यायलेली मांजर तिचं एकतरी पिल्लू खाऊन टाकते. इतकी रिकामी झालेली असते ती. मोकळी झाल्यानंतर.
- फिमेल कासव पाण्यात अंडी सोडून निघून जाते. काहीही संबंध नसल्याप्रमाणे. No maternal instinct.
- एका गरोदर बाईला नवऱ्याचं मांस हवं होतं खायला. तिने नवऱ्यापाशी हट्टच धरला. काय वेडेपणाय म्हणून नवरा दरवेळी उडवून लावायचा तिला. पण तिचा तगादा सुरूच.
"मला नकोय. तुमच्या बाळाला हवंय!" ती म्हणायची. कंटाळून त्याने आपल्या मांडीच्या मांसाचा तुकडा बायकोला खायला दिला. किती समाधानाने ती आपलं मांस खात बसलीय, हे बघून चिडलेल्या नवऱ्याने त्याच चाकूने तिला कापलं. पोट फाडलं. तेव्हा पोटातल्या मेलेल्या अर्भकाच्या तोंडात तोच मांसाचा तुकडा होता.

कुठे कुठे काय काय ऐकलेलं,वाचलेलं पॉवरपॉइंटच्या स्लाईडशोप्रमाणे त्याच्या डोळ्यांसमोर आपोआप क्लिक न करता सरकत होतं. तो प्रत्येक स्लाईडगणिक सुन्न होत होता.

तो बधिरपणे उठला. बायकोकडे बघू लागला. ती झोपलेली. गाढ. अनिर्बंध.
तिचा प्रोफाईल दऱ्याखोऱ्यांसारखा. आत-बाहेर. उंच-सखल. पाय जराशी फाकलेले. त्याने अजूनच फाकवले. मॅक्सी हळूहळू वर केली...

ओठ ओठांवर. हवा भरायला सुरुवात केली. बघता बघता पोट सिलिंगपर्यंत पोचलं. ते सिलिंगला टेकणार एवढ्यात पंख्यांच्या धारदार पात्यांनी पोटाची लक्तरं करून भिंतीभिंतींवर लटकवली. तो किंचाळला.
फॅन तर बंदय केव्हाचा.
स्लाईडशोचा ओव्हर डोस. Thank God!

त्याला बोच्यात ओलसरपणा जाणवला.

एका महाकाय गुहेत शिरण्यासाठी, बाहेरच्या अंधाराला थोपवणारी वातीइतकी एकमेव फटच दिसली होती खरी पण त्याला वाटलं हा तिसरा उभा डोळाच की तिचा! आधी कधी दिसला नाही. बंद ऑक्युलस!
काय होईल उघडल्यावर? सगळं भस्मसात? की सूर्याचा अजस्त्र डोळा आत डोकावेल यातून आणि… हट्!
आपल्याला आत शिरायचंय. हा क्षण स्टॅच्यू करायचाय. हे आपलंय. ही अवस्था. हे सत्य. आता गळता कामा नये. पुढची खेप बिप नाही आता. बस्स. जो है यही है, अभी है! पुन्हा त्याचं तोंड फटीशी.

तो अत्यंत सावधपणे फुंकू लागला. अजून थोडे पाय फाकवले तिचे आणि आत शिरला. पोचला.
थेट गर्भाशयापर्यंत. शिरताना लिंगाइतका लहान झाला होता तो.

पोट नऊ महिन्याचं झालं तिचं.
तांबडं फुटावं तशा त्याच्या प्रेग्नंट बायकोच्या किंकाळ्या फुटू लागल्या होत्या पण तो कुठे नव्हताच.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

ठेचा रे त्याला!

(प्रेरणा: पु.ल. 'खुरच्याऽऽऽऽऽऽ'.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0