जातधर्म

विवेक सुटला बांधही फुटला तुटली नातीगोती
मनामनातील भिंतींनाही चिकटल्या नवीन जाती
स्वातंत्र्याच्या उगवतीला होता धर्माचा गाडा
स्वातंत्र्याच्या साठीलाही जातीचाच जोडा
दशके सहा आपल्यामधे जातधर्म वागवला
या काळात कुणी येथे मानवधर्म जागवला
पुसुन टाकू रंग आपल्या खांद्यावरील झेंड्याचा
शरीरामधल्या रक्ताचा तो लाल रंग साचा
कुणास केले जातीधर्माने मोठे अन छोटे
जातीसाठी करु लागले खरयाचेच खोटे
विसरा जाती जागवा नाती आठवा काळी माती
सारं संपून गेल्यावरती सत्यच येइल हाती
जाती साठी लढण्यापेक्षा माती साठी लढा
अन या लढ्याच्या जोरावरती एकेक शिखर चढा

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

म्हणतात ना जात नाहि ति जात
जाती साठी लढण्यापेक्षा माती साठी लढा
अन या लढ्याच्या जोरावरती एकेक शिखर चढा ..........
सुंदर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0