स्वप्न (बहुतेक)

कुठल्याशा आरस्पानी मद्य़ाच्या धुंदीत गुंगून
त्याने चंद्राचं स्वप्न पाहिलं
(जडावलेल्या पापणीच्या आतून की बाहेरून
हे त्याच्याच लक्षात नाही)
किरणांच्या मायाजालात अलगद तरंगत

स्वप्नातला चंद्र होता मखमली कापसासारखा
अंगावरून हळुवार फिरणाऱ्या पिसासारखा
निःस्वार्थी ममताळू

स्वप्नातला चंद्र होता नितळ
खड्ड्यांशिवायचा, काळ्या डागांविरहित
कलांवेगळा...
गोल गरगरीत, भरलेल्या स्तनासारखा

तो विसरून गेला अंतर स्वप्नात
चंद्रापर्यंतचं आणि चंद्राच्या व स्वतःच्या आतलंही
(की चंद्रच उतरून आला होता खाली?)
आणि मग सत्य कुठचं आणि स्वप्न कुठचं
हा प्रश्न अनुत्तरीत राहाणं स्वाभाविकच होतं

मात्र
(मिटलेल्या म्हणा किंवा उघड्या पापण्यांतल्या म्हणा)
स्वतःच्या डोळ्यात चंद्रबिंब झळकत असतानाच
चंद्रडोळ्यात तो स्वतःच दिसला त्याला
हे मात्र नाकारता येत नाही

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

चांगल्या अर्थाने ल्युनॅटिक कविता.
'प्रतिसादा'साठी इच्छुकांना शीर्षक देतो - स्वप्नदोष (निश्चितपणे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काळे डाग झाकू पाहणाऱ्या
लांबुडक्या वक्षांना
जेव्हा खिजवू पाहतो चटोर चंद्र

तेव्हा ठसठसणाऱ्या स्वप्नांचे सारे संदर्भ
वितळू लागतात नेणीवेच्या मुशीत
अाणि वांझोट््या स्वप्नांचं हल्लकपण
होऊ लागतं नितंबासारखं जडशीळ

काय सांगू तुम्हाला सारस्वतांनो!
मध्यानरातीची हुरहूर
उतू जाते चांदण्यातून
आणि होऊ पाहतो माझा
वैयाकरणी स्वप्नदोष
फक्त… स्वप्नावेगळा, सत्याअागळा…

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

'आरस्पानी' हा शब्द मला नेहमी कोड्यात टाकतो. खूप वर्षाम्पूर्वी, वा. गो. आपट्याञ्च्या 'शब्दरत्नाकर'मध्ये याचा अर्थ 'सङ्गमरवरी' असा वाचल्याचे आठवते. पण वापरात तसा अर्थ दिसत नाही (असे अनेक शब्द मराठीत आहेत). बहुतेक वेळा त्याच्या वापरातून काहीतरी पारदर्शक/अर्धपारदर्शक/चकाकणारे/कवडसे पाडणारे/आरशाप्रमाणे अश्या छटा ध्वनित होतात. जिज्ञासू यावर प्रकाश टाकतील काय ?
आणि मूळ अर्थ काहीही असला तरी कवीला येथे 'सङ्गमरवरी मद्य' अपेक्षित आहे काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या माहितीप्रमाणे आरसपानी ची उत्पत्ती आ-रस-पानी अशी असावी. म्हणजे मस्तानीच्या गळ्यातून तांबुल रस-पान जसे दिसत असे तसे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म अंमल जास्त झालेला दिसतोय

ऊगाच आपल ते दिडकीची भांग वैग्रे आठवल Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0