खाला

जनाजा

दिदार को टैम हे अभी
बच्ची को लि जाव
अंदर...
खर्जातला आवाज गर्जुन गेला
निपचित जनाजा हादरुन गेला
सबर करो खाला
सबर करो खाला
सबर करो..
दाढीधारी प्रेषीतांची आळवणी वाढली;
पान खाऊन खाला सबर करु लागली.
खाला तशी जहांबाज, भले भले टरकतात
आज दुःख तिच्या घरी, दाढीधारी हरकतात.
गर्दीमधली कुजबूज
रुक्सार कुठे ऎकत होती ?
जनाजात निपचित ती
पुरेपूर अलिप्त होती.
न्हाऊन धुवून स्वच्छ झाली , तरी फेस तोँडी कसला ?
कस काय विचारता राजेही , प्रश्न तुम्ही असला तसला ?
चिल्लम चिल्ली बंद करो,अल्ला की मर्जी मानो ;
तुम्हाराच गया नही हमारा भी गया जानो.
रुक्सारची बच्ची हळूच आता सांगते ;
रोज आब्बा मारते थे.
टी व्ही जैसा कर नै तो
तलाक ईच मांगते थे..
आता म्हणे फरीश्ते हिशोबाला बसणार आहेत ;
गैरहजर गुन्हेगाराच्या न्यायसभेला हसणार आहेत.
खाला लै बिझी झाली;
पुकारा गाजवण्यात .
जान जवान लेकाची ;
नवी शेज सजवण्यात.
रुक्सारचे आम्मी आब्बा कधीच हरले
खालाच्या ओरड्याने वाटेतून सरले....
---------------------------------------------------------
सतीश वाघमारे. पुणे

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

रोज आब्बा मारते थे.
टी व्ही जैसा कर नै तो
तलाक ईच मांगते थे..

यावरच नाहि तर अख्ख्या कवितेवरच काय बोलणार!.. Sad
प्रतिसाद काय द्यावा सुचह्त नवह्तं पण कविता खाली जाऊ नये म्हणून काहिबाहि लिहितोय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेशशी अगदी सहमत. यावर काही बोलायसारखे नाहीच.
त्याच त्या प्रेमभंग नि संवेदनशील मनाच्या तथाकथित तरल जाणिवाबिणिवांपासून तुमच्या लेखनाचे विश्व आणि शैली इतके दूर आहेत, की केवळ त्यामुळे अवाक होऊन पाहत बसण्याची पाळी येते. त्यातून सावरल्यावर पुढे काही बोलणार ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

खास आहे तुमचं लिखाण. लाजवाब..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दम आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिखाणातला दमखम उत्तमच आहे. मात्र धाग्यांची फ्रीक्वेन्सी बघता पूर्वी लिहिलेले पुनःप्रकाशित करताहात असे वाट्टे. तुमच्या ब्लॉग इ. ची लिंक दिली तर उत्तम, काय म्हणता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सहमत. माझ्यासहित बर्‍याचजणांनी कधी ना कधी असं केलेलं आहे. अर्थातच यांच्या लेखनाचं पाणी वेगळंच आहे.. पण अतिपरिचयात् हा एक भाग परिणामकारकता कमी करु शकतो, सर्वांनाच लागू .. कोणा एका व्यक्तीबद्दल नव्हे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय, मीदेखील असे केलेले आहेच. यांच्या लेखनाची शैली मस्त आणि वेगळीच आहे, त्यामुळे ते जास्तीतजास्त वाचायला मिळूदे म्हणून जरा हावरटपणे मागणी केली, इतकेच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान आहे कविता... आवडली... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

मनःपूर्वक धन्यवाद ! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0