किती विस्तीर्ण हा गोंधळ तुझाही (गझल)

गझल

तुला समजेल तर समजेल काही
तुला आनंद नाही दु:ख नाही

जिथे जातो तिथे बघतो तुला मी
किती विस्तीर्ण हा गोंधळ तुझाही

तुला का दु:ख व्हावे विप्लवाचे
तुझा साचा कुठे बनला तसाही

किनार्‍यावर उभे हे लोक सारे
घरे वाहून गेलेली प्रवाही

तुझ्या डोळ्यांमधे सरल्यात वाटा
कळेना चाललो कोठे मलाही

मने झुरतात इतक्या संयमाने
जरासा धीर सुटतो, फार नाही....

अनंत ढवळे

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

विशेषतः विस्तीर्ण गोंधळाचा शेर. जगाचा अनन्वित फापटपसारा अगदी मोजक्या शब्दांत पकडलेला आहे.

मने झुरतात इतक्या संयमाने
जरासा धीर सुटतो, फार नाही....

या दोन ओळीही खूप देखण्या झाल्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुबक. सुरेख गझल

मने झुरतात इतक्या संयमाने
जरासा धीर सुटतो, फार नाही....

हे खासच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गझलेचा शेवट उत्तमच आहे. पण मला खास करुन पुढील ओळी जास्त भावल्या.

तुला का दु:ख व्हावे विप्लवाचे
तुझा साचा कुठे बनला तसाही

खूप छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान!
शीर्षकातला (म्हणजेच दुसर्‍या द्विपदीतला) तुझा"ही" शब्द कळीचा आहे हे जाणवते आहे, पण अजून नीट समजू आलेला नाही. तुझा"ही" म्हणजे आणखी कोणाचा गोंधळ विस्तीर्ण असल्याचा आदला संदर्भ आहे? माझा म्हणजे कवीचा आतील* गोंधळ विस्तीर्ण आहे, तुझाही तसाच विस्तीर्ण आहे, असे म्हणायचे आहे काय? (आतील* गोंधळ का? कारण जिथे जातो तिथे तुझा गोंधळ आहे, म्हणजे जिथे जातो तिथला सगळा बाहेरील गोंधळ तुझा आहे, असे वाटते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर गझल. मतला आणि शेवटचा शेर फार आवडला.

तुला समजेल तर समजेल काही
तुला आनंद नाही दु:ख नाही

वा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्या आणि शेवटच्या ओळी अप्रतिम अलिप्त.
मधल्या भागातील पूर्ण होता होता सोडून दिलेली चित्रणे प्रभावी आणि गुंतवून ठेवणारी. ( ही तुमची शैली असावी, पूर्वी वाचल्याचे स्मरते- 'खन्ड')
कदाचित शेवटच्या संपूर्ण अलिप्ततेशी विसंवादी वाटू शकतात.
जराशी ; फार नाही...
अभिनंदन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रामाणिकपणे सांगते मला गझल वगैरे काही समजत नाही. हे मतला, मिसरा, शेर वगैरे शब्द ऐकले की मला एखादी परकीय भाषा ऐकल्याचा भास होतो. आमच्या शाळेतल्या, कॉलेजातल्या गझली म्हणजे दूर से देखा तो केमिस्ट्री का बुक था, तो पास जाने का सवाल नही आता या टायपाची. तसच मराठीतल्या कविता विभागाशी माझ विळ्याभोपळ्याच नात. फक्त ईन्ग्लिश कविताच तेवढ्या जाणीवपूर्वक वाचलेल्या.

तेव्हा एखादा गझलेतला जाणकार गझलेच्या बेसिक फंड्याची माहिती देऊ शकेल काय???.( मला वाटत घासूगुर्जी हे काम करु शकतील. तसही फक्त कविता त्यांनाच कळतात असा त्यांचा दावा आहे)
Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

http://smriti.com/urdu/ghazal.def.html
या लेखात गज़ल म्हणजे काय ते अभय अवचट यान्नी छान सन्दर्भ/उदाहरणासहित स्पष्ट केले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गझल आवडली. अनेक दिवसांनी तुमचं नवं काहीतरी वाचलं. आनंद झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.