कॉकटेल लाउंज : ब्लु गोवन हेवन

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे ब्लु गोवन हेवन

पार्श्वभूमी:

काजु फेणीच्या चवीवर एक्सपेरीमेंट्स करताना ही कॉकटेल रेसिपी हाती लागली. ब्लु कुरास्सो वापरुन निळ्या रंगाची समुद्राची निळाई ह्या कॉकटेलला आकर्षक आणि दिलखेचक बनवते. ही रेसिपी माझे इंप्रोवायझेशन आहे. कंप्लीट, नावासकट.

प्रकार काजू फेणी बेस्ड कॉकटेल
साहित्य
काजू फेणी 2 औस (60 मिली)
ब्लु कुरास्सो 0.5 औस (15 मिली)
लिंबाचा रस 10 मिली
बर्फ
मीठ (ग्लासच्या रिमवर लावण्यासाठी)
ग्लास कॉकटेल ग्लास

कृती:

सर्वप्रथम कॉकटेल ग्लास फ्रॉस्टी करुन घ्या. त्यासाठी ग्लासमध्ये बर्फाचे खडे आणि पाणी टाकून फ्रीझरमध्ये 15-20 मिनीटे ठेवून द्या.

ब्लु गोवन हेवन - काजु फेणी

त्यानंतर फ्रॉस्टी ग्लासच्या रीमवर मीठ लावून घ्या.

ब्लु गोवन हेवन - काजु फेणी

आता काजू फेणी, ब्लु कुरास्सो आणि लिंबाचा रस कॉकटेल शेकर मध्ये बर्फ घालून व्यवस्थित शेक करून घ्या. ते मिश्रण कॉकटेल ग्लास मध्ये ओतून घ्या. हे कॉकटेल डबल स्ट्रेन करायचे आहे, त्यासाठी हॉथ्रोन स्ट्रेनर वापरावा लागेल.

ब्लु गोवन हेवन - काजु फेणी

हॉथ्रोन स्ट्रेनर वापरुन कॉकटेल ग्लास मध्ये मिश्रण गाळून घ्या.

ब्लु गोवन हेवन - काजु फेणी

ब्लु गोवन हेवन - काजु फेणी

अफलातून चवीचे आणि समुद्राच्या निळाईचे ब्लु गोवन हेवन कॉकटेल तयार आहे Smile

ब्लु गोवन हेवन - काजु फेणी

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

आहाहा...खतरा..
जियो सोत्री...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच आहे रे एकदम. रंग अगदी मॉरिशस किंवा तत्सम समुद्राशी जुळणारा. गोव्याच्या समुद्राशी साम्य सांगायचे तर निळ्यात काहीशी हिरवट झाक द्यावी लागेल.

ग्लासमधे अंब्रेला स्ट्रॉ असता तर आणखी मजा आली असती..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्ट्रॉची कल्पना भारीच आहे. पण ह्यावेळी स्ट्रॉचा स्टॉक संपला होता

- (साकिया) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लै लै भारी!
चव घ्यायची वेळ कधी येईल कोण जाणे, पण पाहून फारच आवडले.
फक्त नावात 'हेवन' च्या ऐवजी 'लगून' आवडले असते असे आपले वाटून गेले. आहे ते नावही छानच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चव घ्यायची वेळ कधी येईल कोण जाणे, पण पाहून फारच आवडले.
फक्त नावात 'हेवन' च्या ऐवजी 'लगून' आवडले असते असे आपले वाटून गेले.

या दोन्ही बाबतीत अगदी सहमत आहे.

शेवटचे दोन्ही फोटो आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अहाहा.. 'सी-बिल्यु' रंग आणि गोवा हे काँबिनेशन फ्क्लास आहे!
बाकी शेवटाच्या फोटोत खास उन्हात ग्लास ठेऊन सूर्याच्या रिफ्लेक्शनने कडेला आण(व)लेली चमक, (किंवा ग्रहणाच्यावेळच्या डायमंड रिंगचा इफेक्ट म्हणा हवं तर ) आवडून गेली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश धन्यवाद!

कॉकटेलगीरी बरोबरच फोटोग्राफीचेही इंप्रोवायझेशन आवडले ह्याचा आनंद झालेला आहे Smile

- (साकिया) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0