एक दक्खनी कविता - कुतुबमिनार

येथील एक सन्माननीय, ज्येष्ठ आणि गुरुतुल्य सदस्य सन्जोप राव यांनी दिलेल्या आज्ञेचे पालन करून दस्तुरखुद्द संकेतस्थळांवर अतीच लिहायला लागले आहेत याची जाणीव आम्हास आहे.
इथल्या संस्थापिका-सदस्या ( किंवा संस्थापक-सदस्य : जेंडर बायसने लिहिलेले त्यांना कदाचित आवडणार नाही > सगळ्याच गोष्टी जास्त स्पष्ट लिहिण्याची आवश्यकता नसते हे मान्य करूनही स्पष्ट करतो) ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी आम्हाला झालेल्या शाब्दिक संग्रहणीचे अचूक निदान इतरत्र एका 'धाग्यावर' केलेले आहेच.त्यावर उपाय करायचा म्हणून काही दिवस मौनव्रत धारण करण्याचे अस्मादिकांनी ठरवले होते. परंतु फरसाण (म्हणजे मिक्ष्चर)नामक पदार्थ पोटाला कितीही अपायकारक असला तरी जिव्हालौल्य अनिवार असल्याने तो खाण्याची इच्छा दाबता येत नाही आणि हकीमांनी कितीही 'परहेज' सांगितला असला तरी जे व्हायचे ते होतेच , वैसाईच हुया!
दक्खनी भाषेचे एक अभिमानी, उर्दु-हिंदीचे हरहुन्नरी कवी आणि प्रथितयश चित्रकार श्री. नरेन्द्र राय श्रीवास्तव 'नरेन' यांची एक विनोदी दक्खनी कविता वाचनात आली आणि मग रहावेना. तिचे नुसतेच ग्रहण करू नये तर नंतर कुठेतरी संग्रहणही करावे अशा अनिवार इच्छेने ती येथे देत आहे.

या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे ती केवळ दक्खनी भाषेचा लेहजा अचूक पकडते इतकेच नसून ती दक्खनी (विशेषतः हैदराबादी) मानसिकतेचेही अचूक चित्रण करते.
थोड्या खेदाची गोष्ट अशी की ही कविता ज्यांना या भाषेचे उच्चारण ऐकून माहित नाही त्यांना तिचा पूर्ण आस्वाद घेता येणार नाही.

तर पेश है-


कुतुबमिनार

टीचर हूं मैं एक इस्कुल का, एक सवाल बच्चे से पुछा,
कुतुबमिनार कू कोन बनाया, सोच समज को बोलो बेटा |
बच्चा बोला, ये क्या पूछरैं, ये सवाल है भौतिच आसाँ,
कुतुबमिनार बनाए, अपन के,हैदराबाद के कुली कुतुबशा|

मैं बोला,ये जवाब ग़लत है,पोट्टा बोला, आप ग़लत हैं|
मैं चकराको फिर फिर पूछ्या, बावा तुम ये काँ पडको आँइ,
उन बोला पड़ने का क्या है, कुतुबमिनार है, कुतुबशा बनवाँइ|

सिर पीट लेको फिर मैं पूछ्या, चान्मिनार कू कोन बनाया,
शान से उटको ज़रा अकड़ को पोट्टा मेरे कू समजाया|
मौक़ा नँई देना चाहते थे, गिरी पड़ी तो पचताने कू,
एक मिनार दिल्ली में बनवाए, कुली कुतुबशा अज़माने कू|
सीदी सच्ची अच्छी बन गई, ख़ुश हो को फिर हैदराबाद आए,
पिलान विलान के सात उनो फिर, दक्कन मे चान्मिनार बनवाए|

-श्री. नरेन्द्र राय श्रीवास्तव 'नरेन'

१. पिलान-विलान : इंग्रजी प्लान - मराठी 'प्लॅन-बीन' - आराखडा

field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

प्रतिक्रिया

क्या शायरी लिखते लोगां, दिल होगया भौतिच खुश
हौ नक्को करको करको लिखरा प्रतिसाद फुसफुस
ये देखके याद आयी मुल्ला नुसरती की बातां,
बिज्यापुर मे था पर लिख्ख्या शिवाजी की करामातां!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कविता भारीच आहे.
तुमच्या आवाजात रेकॉर्ड करून का टाकत नाही कविता? हे छापील माध्यम थोडीच आहे!

साधारणतः काही बिघडलेलं असताना 'गेट वेल सून' असं म्हणण्याची पद्धत आहे. विसुनानांचा आजार बरा न होवो अशी सदिच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रयत्न करतो. - जमल्यास मूळ कवीच्या आवाजातच टाकेन.
नाहीतर मग दुधाची तहान ताकावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारीच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

जबरा....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाषेमुळे कवितेत मजा आली.

पण कविता "गाल-गाल गा गागागागा गाल लगा लगागा गागा" या (पहिल्या ओळीच्या) वृत्तात बसवण्याचा प्रयत्न केला. मीटरचा आणि कवितेचा विशेष संबंध नाही हे चटकन लक्षांत आलं.
कदाचित कवितेपेक्षा संवादवजा लिखाणामुळे अधिक मजा येती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मागे धनंजयांनी नमूद केल्याप्रमाणे 'कवितेचे मीटर उच्चरणाने बनते' या निरीक्षणाचे हेही एक उदाहरण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त. आता याचे मराठी भाषांतरही करुन टाका.नाहीतरी आरोप व्हायचा तो झालेलाच आहे. वाघ म्हटला तरी खातो, वाघोबा म्हटला तरी खातो...
सन्माननीय, ज्येष्ठ आणि गुरुतुल्य
निषेध, त्रिवार निषेध!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

गुरुतुल्य

दत्त, की अफ़ज़ल?

नाही, हल्लीच्या दिवसांत हेही विचारून खात्री करून घ्यावी लागते, म्हणून... कालाय तस्मै नमः, दुसरे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाषा भारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारीच. दखनीत कवितेची परंपरा खूप जुनी आहे. उर्दूतला गझल लिहीणारा पहिला कवी वली औरंगाबादी हा देखील दखनीच होता. जुन्या द्खनीतले हे काही शेर पाहा :

- इस रात अंधहरी में , मत भूल पडूं तुस्सूं
तू पांव के झांजे की झनकार सुनाती जा

तूस्सूं = तुला
झांजा = पैंजण
अंधहरी = अंधारी

- वली उस गोहरे काने हया का वाह क्या कहना
मेरे घर इस तरह आवे है ज्यूं सिने में राज आवे

गुहर = रत्न
ज्यूं = जसे

- सजन तुम मुख सिती उलटो निकाब आहिस्ता आहिस्ता
के ज्यूं गुल से निकसती है गुलाब आहिस्ता आहिस्ता

सिती = से
निकसती = उमलते

(सर्व शेर वली औरंगाबादीचे आहेत)

उत्तरेतून आलेले सुफी संत, प्रवासी,कारागीर आणि आक्रमणकर्ते, यांचा दक्षिणेतील लोकांशी संपर्क येत गेला त्यातून दखनी आणि पुढे उर्दूचा जन्म/विकास झाला असे म्हणण्यास पुष्कळ वाव आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>येथील एक सन्माननीय, ज्येष्ठ आणि गुरुतुल्य सदस्य सन्जोप राव यांनी दिलेल्या आज्ञेचे पालन करून दस्तुरखुद्द संकेतस्थळांवर अतीच लिहायला लागले आहेत याची जाणीव आम्हास आहे. <<<<

या वाक्यातला जो "दस्तुरखुद्द" शब्द आहे तो "अस्मादिक" या शब्दाचा पर्याय म्हणून आलेला आहे असं दिसतं. थोडक्यात प्रथमपुरुषी एकवचनाचा एक तिरकस/विनोदी/जुन्या भाषेतला एक शब्द म्हणून आलेली मजा.

माझी शंका अशी आहे की "दस्तुरखुद्द" हा शब्द ( या शब्दात "खुद्द" हा आत्मसूचक भाग आलेला असला) तरी तो शब्द "अस्मादिक" , "आम्ही" किंवा इंग्रजीत "युअर्स ट्रुली" या सर्व प्रथमपुरुषी एकवचनाच्या शब्दाप्रमाणे वापरला जात नसावा. त्याचा वापर "दस्तुरखुद्द महाराजांनीच मला हे करायला सांगितलं" किंवा "दस्तुरखुद्द सन्जोपराव यांनी दिलेल्या आज्ञेचे पालन...." अशा प्रकारचा आहे असं मला वाटतं.

याबाबत नेमकं काय आहे ते जाणून घ्यायला मला आवडेल. चूभूदेघे.

हे सर्व मूळ धाग्याच्या संदर्भात अतिअवांतर होतंय हे मला मान्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

दस्तुरखुद्द या शब्दाच्या वापराबाबत माझेही मत आपल्यासारखेच आहे.
आणि मी तो शब्द यापूर्वी अनेक ठिकाणी तसाच वापरला होता. ("दस्तुरखुद्द महाराजांनीच" वा "दस्तुरखुद्द सन्जोपराव यांना" असा.)

परंतु,
अन्य संकेतस्थळावरील एका लेखावरील मला आलेल्या खरडीत हे दिसेल:

धनंजय
सोम, 07/09/2012 - 16:24
> अशी शंका दस्तुरखुद्द संशोधकांनीच व्यक्त केल्याने...
"दस्तुरखुद्द" शब्द साधारणपणे लेखक स्वतःचा उल्लेख करण्यासाठी वापरतात ना? म्हणजे विसुनाना यांच्या लेखात विसुनानांचा उल्लेख "दस्तुरखुद्द विसुनाना" असा येऊ शकतो. येथे "अशी शंका खुद्द संशोधकांनीच व्यक्त केल्याने..." असे म्हणायचे असावे, बहुधा.

तेव्हापासून माझ्या मनात या शब्दाच्या वापराबाबत शंका आहे. धनंजयांनी (जर ते ही चर्चा वाचत असतील तर) याबाबत लिहावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरडीतला अर्थही "दस्तुरखुद्द संजोप राव" असाच निर्देश करतो. "दस्तुरखुद्द विसुनाना" असा वाटत नाही.

बाकी कविता मस्तच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

गैरसमज होतोय. खरड एवढीच आहे-
धनंजय
सोम, 07/09/2012 - 16:24
> अशी शंका दस्तुरखुद्द संशोधकांनीच व्यक्त केल्याने...
"दस्तुरखुद्द" शब्द साधारणपणे लेखक स्वतःचा उल्लेख करण्यासाठी वापरतात ना? म्हणजे विसुनाना यांच्या लेखात विसुनानांचा उल्लेख "दस्तुरखुद्द विसुनाना" असा येऊ शकतो. येथे "अशी शंका खुद्द संशोधकांनीच व्यक्त केल्याने..." असे म्हणायचे असावे, बहुधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आय मीन "दस्तुरखुद्द विसुनाना" असं विसुनानांनी म्हणायचं नसतं असा समज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

+१.

हेच म्हणायचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"दस्तुरखुद्द विसुनाना" असं स्वत: विसुनानांनी म्हणायचं नसतं असा माझाही समज होता. तसेच मी पूर्वी लिहीत असे आणि त्याप्रमाणेच माझ्या एका लेखात लिहिले होते. ("परंतु हा शोधला जाणारा शेवटचा मूलकण नसावा अशी शंका दस्तुरखुद्द संशोधकांनीच व्यक्त केल्याने यापुढेही ही शोधप्रक्रिया सुरूच राहणार असे दिसते."- असे ते वाक्य होते.)
त्यावर धनंजय यांनी खरडीतून शंका व्यक्त केल्याने माझा उपयोग कदाचित चुकला असावा अशी शंका मला आली. (खरड वर दिली आहे.)

मला वाटते आता तरी त्या खरडीचा संदर्भ स्पष्ट झाला असेल.

अवांतर बरेच झाले तरी कदाचित यावर एक चर्चा होऊ शकावी. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोल्सवर्थ म्हणे :

दस्तूरखुद [ dastūrakhuda ] a (With कागद-खत-पत्र-&c.) With one's own hand (written): opp. to a letter written or a signature attached by an amanuensis.

(हे श्री. कोल्हटकरांनी उद्धृत केलेलेच आहे.)

दस्तूर - खुद = लेखनिक - स्वतः

म्हणजे कागदपत्राचे संदेशजनक "विसुनाना" असतील समजा (ते कागदपत्रात कुठेसे सांगितलेच असेल. उदाहरणार्थ, या लेखाच्या मथळ्याजवळ लेखक/लेखिका: विसुनाना असे दिसते). कागदपत्राच्या शेवटी "दस्तूरखुद्द" असे लिहिल्यास लेखन विसुनाना यांनी आपल्या हाताने लिहिले-टंकले आहे, असे वाचणार्‍यास कळते. नाहीतर विसुनानांसारखा असामी तोंडी फर्मावत असतील, आणि लेखनिक लिहून घेत असेल, असे गृहीत धरणे साहजिक आहे. (विसुनानांसारखे फर्मान सोडणारे असामी पूर्वीच्या काळी लेखणी चालवण्याच्या बाबतीत कच्चे किंवा निरक्षरही असतील, म्हणा. एवढे मोठे वतन/सैन्य/राज्य सांभाळायचे तर कित्ते गिरवायला वेळ कुणाकडे असणार?)

काही का असेना, मोल्सवर्थ ज्या काळात ही व्याख्या लिहीत होता, त्या काळाच्या अर्थाप्रमाणे बघूया : ज्या लेखाचे निर्माता-लेखक विसुनाना आहेत, त्या लेखात "दस्तूरखुद्द" असे केवळ विसुनानाच लिहू शकतात, आणि त्याचा निर्देश "विसुनाना" यांच्याकडेच असणार. दुसरा कोणीही लेखनिक "दस्तूरखुद्द" लिहू शकत नाही, आणि त्याचा निर्देश विसुनानांकडे जाणार नाही.

आता आपण असे मानू शकतो की विसुनाना हे कवी "नरेन" यांचे लेखनिक म्हणून लिहीत आहेत. असे असले, तर "दस्तूरखुद्द" हा शब्द या ठिकाणी निरवकाश आहे : फक्त कवि "नरेन" तो शब्द लिहू शकतात. (विसुनाना शेवटी वाटल्यास "कवी : श्री. नरेन्द्र राय श्रीवास्तव 'नरेन' ; दस्तूर - विसुनाना" असे लिहू शकले असते)

परंतु करड्या ठशातील परिच्छेद हा कवि "नरेन"च्या सांगण्यावरून लेखनिक विसुनाना लिहीत आहेत, असे समजू येत नाही. उलट करड्या ठशातील संदेश विसुनाना यांचाच आहे, असे स्पष्ट जाणवते. त्या संदेशाबाबत विसुनाना हेच "दस्तूरखुद्द" लिहू शकतील आणि त्याचा निर्देश विसुनाना यांच्या दिशेनेच असेल.

मुक्तसुनीत उदाहरण देतात : "दस्तुरखुद्द महाराजांनीच मला हे करायला सांगितलं"
याचा पूर्वीचा संदर्भ/अर्थ असा काही असणार : महाराजांनी पत्र लिहून मला हे करायला सांगितले, आणि पत्र खुद्द महाराजांनीच लिहिले, लेखनिकाकरवी लिखाण केले नाही, महाराजांनी पत्रात "दस्तूर - खुद" असे लिहिलेले होते.

अर्थात मोल्सवर्थच्या संकलनानंतर "दस्तूरखुद्द" शब्दाचा संदर्भ आणि अर्थ बदललेला असेल, ही शक्यता आहेच. त्याचा प्रचलित अर्थ "अगदी तोच तुम्हाला ठाऊक असलेला प्रसिद्ध व्यक्ती" असा झाला असेल. "दस्तूरखुद्द मुक्तसुनीत" म्हणजे नव्या संदर्भात "अगदी तुम्हाला ठाऊक असलेले तेच ते प्रसिद्ध मुक्तसुनीत", असे असेल. नव्हे, नव्या संदर्भात असे आहेच, असे वरील सर्वेक्षणावरून जाणवते.

(विसुनाना, खरडवही बघणे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद, धनंजय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुक्तसुनीत,नितिन थत्ते आणि बॅटमॅन यांस -

१८ सप्टेंबर १०१२ च्या दैनिक सामनातील एका स्तंभलेखात अधिकृतपणे ही माहिती मिळाली :

वृत्तपत्रातील मराठी शब्द

‘बोलबच्चन’ हा वास्तविक मराठीतला रूढ शब्द नाहीच. हा हिंदीतला असून बडबड्या वा त्याहूनही ‘थापाड्या.’ माणसाला ‘बोलबच्चन’ म्हणत असावेत ही आमची समजूत. पण संबंधित वृत्तामध्ये ‘बोलबच्चन देऊन’ फसविले असा विचित्र वाक्प्रयोग केला आहे. यासाठी थापा देऊन, भुलवून, बोलण्यात गुंगवून, भुलथापा देऊन, गोड बोलण्याच्या जाळ्यात फसवून अशा कोणत्याही एका रीतीने मराठीत लिहायला हवे. मराठीत इतके शब्द असताना हा चुकीचा वाक्प्रयोग रूढ करू नये. आणखी एक गोष्ट ‘दस्तुरखुद्द’ हा शब्द अनेकजण चुकीच्या पद्धतीने वापरतात. ‘दस्तुरखुद्द’ हेही मराठी नव्हेच. परंतु तो शब्द वापरला तर तो एखाद्याने स्वत:विषयी लिहितानाच स्वत:च वापरण्याचा असतो. म्हणजे मराठीत असे ‘अस्मादिक’ तेथे तेव्हा उपस्थित होते’ म्हणजे ‘मी तेथे तेव्हा उपस्थित होतो.’ असा अर्थ होतो. त्याचप्रमाणे ‘दस्तुरखुद्द’ म्हणजे आपण स्वत:, परंतु ‘दस्तुरखुद्द’ मुख्यमंत्रीसुद्धा असे जेव्हा लिहिले जाते तेव्हा तिथे केवळ ‘खुद्द मुख्यमंत्री’ किंवा ‘स्वत: मुख्यमंत्री’ असे हवे. ‘दस्तुरखुद्द’चा प्रयोग बोलणार्‍यावाचून अन्य कुणासाठी होऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे बातमी लिहिताना अनेकदा मंत्रीमहोदय यांनी घडलेली घटना गंभीर असून त्याविषयी मला काहीही पूर्वकल्पना नसल्याचे सांगितले. असे लिहिले जाते इथे ‘मला काहीही पूर्वकल्पना नव्हती, असे सांगितले.’ असे वाक्य पाहिजे आणि किंवा ‘त्यांना त्याविषयी काहीही पूर्वकल्पना नसल्याचे त्यांनी म्हटले / सांगितले,’ असे यायला हवे. इथे ‘मला’ हा शब्द आल्यास ते वाक्य अवतरण चिन्हात पूर्ण वाक्य यावे, अन्यथा ‘त्यांनी’ यावे. ही सुधारणा केल्यास बरे होईल. एकाच नव्हे सर्वच वृत्तपत्रांत ही चूक पाहावयास मिळत आहे.

-अनुराधा खोत

(माझा कंस - स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कार्यवाह श्रीमती अनुराधा खोत??)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक आहे.

जुन्या काही पुस्तकांत "स्वदस्तुर" हा शब्द वाचलेला आहे त्याची या निमित्ताने आठवण झाली. त्याचा अर्थही असाच "स्वतःचा दस्तुर, सही", "स्वतःचे लेखन" इ. छाप आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'दस्तुरखुद्द' हा शब्द सर्रासपणे 'अस्मादिक'चा उर्दू समानार्थी म्हणून वापरला जातो पण ते का ते समजत नाही.

मोल्सवर्थप्रमाणे 'दस्तूर' ह्या शब्दाचे जे सहा अर्थ दिले आहेत त्यांपैकी दोन 'Handwriting' आणि 'The signature of the amanuensis' असे आहेत. तसेच 'दस्तुरखुद्द' ह्याचा अर्थ 'with one's own hand',(as opposed to) 'a letter written or a signature attached by an amanuensis' असा दिला आहे - थोडक्यात म्हणजे स्वतः सही केलेले किंवा लिहिलेले लिखाण म्हणजे 'दस्तुरखुद्द' लिखाण. आपटे कोशात 'दस्तुरखुद' असा शब्द आणि त्याचा 'स्वतःच्या हातचे लिहिलेले' हा अर्थ दिलेला आहे. येथून सुरुवात होऊन त्याला केवळ नकळत झालेल्या वापरामुळे 'अस्मादिक' असा अर्थ केव्हातरी चिकटलेला दिसतो.

असाच दुसरा उर्दू शब्द म्हणजे 'मशारनिल्हे'. 'वर उल्लेखिलेले' अथवा 'उपरिनिर्दिष्ट' अशा अर्थाचा पण थोडी कुचेष्टेची झालर असलेला हा शब्दहि, विशेषतः जुन्या लिखाणात, कधीकधी भेटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा गमतीदार कविता

दुसर्‍या कडव्यात एक ओळ अधिक असती, तर सुनीत ठरले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'गेल्या वर्षी या आठवड्यात' सदरासाठी जुने धागे उपसताना हे वाचलं
लै भारी प्रकार आहे. तेव्हा कसा काय निसटला होता आठवत नै.

नव्या ऐसीकरांसाठी पुन्हा वर आणतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अशीच ढकलपत्रातून आलेली, ख़ास यारों के लिए.......... हैदराबादी कविता...एन्जॉय !!!

इत्ता कैकू याद आरे तुम?

इत्ता कैकू याद आरे तुम?
हौला बनाके घुमारे तुम
कित्ते दिन हुआ अपने को मिल के....
कैकू तो बी तडपारे तुम?

कोई बहाना करके कबी आ जाओ ना ...
कहीं तो बी मिल लेंगे अपन ,
थोडा मेरी तकलीफ का ख्याल करो यारों....
कैकू तो बी तरसारे तुम ?

ना मेसेजाँ भिजारे ना फोनाँ उठारे तुम ....
बाहर मिलने के नामाँ तक नै लेरे तुम ....
तुमारे नखरे देख के लगरा ....
होना बोलके सतारे तुम ....

मेरेकू और फिराऊ नक्को ....
दिल को और जलाऊ नक्को .....
खाली पिली ड्रामे करके ....
क्या तारे ज़मीन पे दिखारे तुम .....

यारों कुछ तो बी बोलके घर से बाहर निकलो ....
टाइम - प्लेस पैले कन्फर्म करलो ....
ये थर्सडे को प्लान फिक्स कर्रा ....
अब कुछ बी नहीं सुन्तू ....बस आरे तुम ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदम मस्त है!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तंच की... खरंच छान...
सिनेमातले गाणे वाटते... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

मस्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

विसुनाना नि वामन, मस्तच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.