मध्यमवर्गीय संगोपन मूल्ये : एक प्रसंग, काही निरीक्षणें

आपल्या दैनंदिन आयुष्यांत आजूबाजूला घडणार्‍या बारीकसारीक घटनांमधे अनेकदा गमतीदार गोष्टी आपल्याला दिसतात. कधी त्यातली विसंगती आपण हसतखेळत स्वीकारतो. कधीकधी त्या इतक्या हसतखेळत स्वीकारणें अशक्य होऊन बसते. "जळात राहून माशाशी वैर करू नये" या उक्तीला स्मरून आपण या विसंगती इतरांना सांगतोच असं नाही. मात्र इंटरनेटवरच्या बुरख्यांचा, अनोळखीचा फायदा अशा बाबतीतल्या आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्यायला कधीकधी होतो खरा.

हे प्रस्तावनेलाच घडाभर तेल घालायचं कारण लक्षांत आलं असेलच. नुकताच असा - अगदी छोटा - प्रसंग होऊन गेला. त्यावेळी काही विशेष बोलता आलं नाही. म्हण्टलं आपल्या आंतरजालीय मित्रमैत्रिणींशी यासंदर्भात थोडं बोलावं.

परवा माझ्या इयत्ता दुसरीतल्या मुलाचा शाळेमधे समूहनृत्याचा कार्यक्रम होता. (मराठीत सांगायचं तर शाळेच्या ग्यादरिंग मधे "ग्रुपडॅन्स" मधे तो होता.) इयत्ता दुसरीतलीच इतरही मुलं. आमचा हा असा पहिलाच प्रसंग. एकंदर संदर्भात हे सगळं बिनमहत्त्वाचं असलं तरी आम्ही आईबाप नि आमचा मुलगा यांच्याकरता महत्त्वाचाच प्रसंग. आता इथे हे म्हणणं क्रमप्राप्त आहे की आम्ही अमेरिकेतल्या एका शहराच्या उपनगरात रहातो. हा कार्यक्रम शाळेच्या "इंटरनॅशनल डे" अशा स्वरूपाचा होता. (याचा संदर्भ पुढे येईल - आणि कदाचित तो संदर्भ सार्थ वाटेल.)

आम्ही सर्व वेळेत पोचलो. किंचित लवकर गेलो म्हणजे पुढच्या जागा मिळतील हा हिशेब चुकला. आधीच्या तीन चार ओळी भरलेल्याच होत्या. पहिल्या तीन्ही ओळींमधे भारतीय आईबापच बसलेले होते. आम्ही आम्हाला मिळाल्या त्या सिटांमधे बसलो. कार्यक्रम ऑडिटोरियम-वजा ठिकाणी नव्हता तर बास्केट्बॉल कोर्टात होता. म्हणजे पायर्‍यापायर्‍यांच्या रचनेमधे नव्हे तर सपाट भूमीच्या रचनेमधे. पहिल्या एक दोन रांगांमधे बसलेल्या लोकांना अर्थातच कार्यक्रमाचं चित्रिकरण अधिक चांगलं करता येणार हे उघड होतं. "आपल्यालाला चित्रिकरण सर्वोत्तम करता न आलं तरी चालेल; कार्यक्रम नीट दिसतोय ना ? मग ठीक. जमल्यास आपल्या क्यामेर्‍यावाटे करू रेकॉर्डींग." असा माझा एकंदर दृष्टीकोन.

कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी काही मिनिटे एक महाशय आपला व्हिडिओ रेकॉर्डींगचा ट्रायपॉड घेऊन आले. त्यांनी पहिल्या रांगेच्या बरोबर मधे तो उभा केला. त्यावर व्हिडियो रेकॉर्डींग. त्याच्या शेजारी हे (जाडगेलेसे) महाशय उभे राहिले. हातात फोटो काढायचा क्यामेरा घेऊन. एकामागोमागची पहिली तीन गाणी भारतीय होती. या तीन्ही गाण्यांच्या दरम्यान हे गृहस्थ तिथे आपला ट्रायपॉड रोवून, शेजारी उभे राहून फोटो काढत होते. या तीन्ही भारतीय गाण्यांच्या दरम्यान इतर मुलांचे वडील त्या महाशयांच्या शेजारी सुमारे ४-५ जणांचा घोळका करून उभे होते. या तीन गाण्यांमधे आमच्या चिरंजीवांचे गाणेही अर्थातच होते.

तिसर्‍या रांगेपासून जे दुर्दैवी लोक हा कार्यक्रम पहायला आले होते त्यांना पहिल्या तीन्ही गाण्यांचा आनंद काही विशेष घेता आला नाही. सर्व मंडळी हताशपणे या प्रकाराकडे पहात होती.

तीन गाणी संपली. ट्रायपॉडवाले महाशय आणि अन्य तीर्थरूप यांनी जामानिमा आवरला. त्यानंतर अन्य देशीयांची गाणीनृत्ये होती. त्यादरम्यान त्या त्या मुलांच्या एकूण एका गाण्यांमधे सर्वांनी मागच्या रांगेतून किंवा बाजूने किंवा खाली बसून फोटोग्राफी केली.

ज्या रीतीने पहिल्या तीन्ही गाण्यांच्या प्रसंगी तो प्रकार चालला होता त्यावरून मला असं क्षणभर वाटलं की हा कॉन्सन्ट्रेशन कँप आहे आणि आपल्या मुलाकरता पावाचा तुकडा मिळावा म्हणून ही सगळी धडपड चालू आहे. तीन गाण्यांनंतर असं काही चालू नव्हतं हे लक्षांत आलं.

मी यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही. माझ्या मते हा प्रसंग पुरेसा बोलका आहे. तुम्हापैकी कुणाला असा अनुभव आला असेल तर जरूर सांगा. मी सांगतो त्यात काही अतिशयोक्ती नाही. पण असंच सर्वत्र होतं का, हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.

या विषयाशी संबंधित दुसरी छोटी गोष्ट सांगतो आणि लिखाण संपवतो. आमच्या स्थानिक महाराष्ट्र मंडळाच्या आगामी होळीच्या कार्यक्रमाचं स्वरूप वर्षानुवर्षं असं असतं की या एका प्रसंगी अगदी छोट्या मुलांपासून प्रौढांपर्यंतचे लोक समूहनृत्ये (पुन्हा एकदा "रेकॉर्ड डान्स") सादर करतात. यंदा या प्रसंगी आमचा इयत्ता दुसरीतला मुलगाही आहेच. मी स्थानिक मंडळाच्या कार्यकारिणी समितीला (बराच आधी) हा निरोप पाठवला आहे :

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार.

सर्वप्रथम, तुम्हा सर्वांचं संक्रांतीच्या यशस्वी कार्यक्रमाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. नवीन वर्षाची सुरवात खरोखरच एका यशस्वी कार्यक्रमाने झाली.

लवकरच होळीचा कार्यक्रम होईल. माझ्या मुलांसकट आपल्या भागातलं प्रत्येक मूल आणि त्याचे आईवडील यासर्वामधे आनंदाने नि उत्साहाने सामील होणार. माझी प्रस्तुतची इमेल त्या कार्यक्रमातल्या एका विभागाबद्दल आहे.

या कार्यक्रमाच्या प्रत्येक गाण्याचं रेकॉर्डींग आणि फोटो आम्ही सर्व आई-वडील करत असतो. ऐन कार्यक्रमाच्या वेळी तिथे सर्व आई-वडलांची कॅमेरा घेऊन खटपट चालू असते. बरेच कॅमेरे आणि व्हिडीओ रेकॉर्डर तिथे कार्यरत असतात. या सर्व प्रकारामधे थोडा गोंधळ उडू शकतो.

मराठी मंडळातर्फे एक कॅमेरामन आणि एक व्हिडीओवाला जर का तिथे असल्याची पूर्वसूचना मिळाली तर हा गोंधळ टाळता येईल. निरनिराळ्या कार्यक्रमांच्या निरनिराळ्या व्हिडिओज बनवाव्यात म्हणजे ज्याला त्याला आपापला व्हिडीओ पाहता/अपलोड करता/शेअर करता येईल. फोटोंचा एकच अल्बम केला तर सर्वाना हवे ते निवडता येतील.

हे करण्याच्या संदर्भातले खालील मुद्दे :

१. असं केल्याने थोडा गोंधळ कमी होईल. लोकांना सर्व कार्यक्रम शांतपणे, कमीत कमी गोंधळ होऊन पहाता येईल.
२. कमिटीला कदाचित थोडा खर्च येईल. पण एकंदर कार्यक्रम थोडा अधिक शिस्तीत पार पाडणं हा फायदा या किमतीच्या संदर्भात किती आहे याचा हिशेब करता येईल.
३. याची पूर्वसूचना कार्यक्रमाच्या आधी इमेलवाटे पत्रव्यवहारावाटे देणं आवश्यक आहे. तसं न केल्यास , हे सर्व करून व्हायचा तोच गोंधळ होईल.

मला कमिटीला अधिक कामाला लावायचं नाही. किंवा अधिक भुर्दंड व्हावा अशीही माझी इच्छा नाही. असं करून जर का होळीच्या कार्यक्रमातली गैरशिस्त कणभर कमी होत असेल तर हा एक नवा पायंडा तुम्ही पाडला असं होईल.

वरील सूचना काही कारणास्तव कार्यान्वित करता आली नाही तर माझी कसलीही तक्रार किंवा नाराजी नाही Smile

कलोअहेवि

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तुम्हाला प्रस्तुत गोष्टींबद्दल काय वाटतं ? मला ऐकायला आवडेल.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

सुचना उत्तम आहे. इथे एखाद्या कार्यक्रमात अनेक फोटोग्राफर जे विविध वृत्तपत्राचे असतात वा हौशी असतात त्यांच्या गर्दी व क्लिकक्लिकाटामुळे कार्यक्रमाचा रसभंग होतो असे मला वाटते. तेव्हा आपण केलेली सूचना माझ्या डोक्यात आली होती. लोकांना ती पटेल असे वाटत नाही.कारण त्यात सोयीचा भाग अधिक आहे. सार्वजनिक जीवनात बेशिस्त ही सोयीची असल्यामुळे बिनदिक्कत पाळली जाते. अशा वेळी स्वतःत बदल घडवणे सोयीचे असते. डोक्याला ताप नको असे हळू हळू वाटू लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

तुम्ही या विषयाला वाचा फोडलीत हे बरे झाले.

तुमची सूचना योग्यच आहे आणि आजपावेतो सार्वजनिक कार्यक्रमात आयोजकांचे अधिकृत फोटोग्राफर/व्हिडियोग्राफर नसतील असेही नाही. मी तर तुमच्या सूचनेपुढे जाऊन एक-दोन सूचना करतो - १. अधिकृत क्यॅमेरामनव्यतिरिक्त अन्य कोणलाहि क्यॅमेरे आणण्याची बंदी करावी. २. ज्यांना आपल्या पाल्याचा फोटो अथवा व्हिडीओ हवा असेल अशांनी कार्यक्रमाच्या आधी अथवा नंतर आयोजकांशी थेट संपर्क साधावा, फोटोग्राफरशी नव्हे.

पूर्वी उत्तम क्यामेरा हा प्रकार 'महाग' वाटे आणि सर्रास सर्वांकडे क्यॅमेरे नसत तेव्हा आपल्या पाल्याचा फोटो अथवा व्हिडिओ अधिकृत क्यॅमेरामनकडूनच घेतला जाई आणि त्याची प्रत पालक विकत घेत असत. आता फोटोग्राफरच्या क्यॅमेर्‍यापेक्षा सरस क्यॅमेरे पालकांकडेच असल्याने (आणि कदचित आपल्याकडे अमका-ढमाका डिएसेलार विथ ट्रायपॉड, लेन्स किट, बॅफल्स आहे हे सिद्ध करण्याची हौस असल्याने) कार्यक्रमात प्रेक्षागृहापेक्षा स्टेजच्या पायथ्याशी जास्त गर्दी झालेली असते.

हल्ली सभेत कसे वागावे म्हणजे सभ्यपणा काय असतो ते लोक विसरत चाललेले आहेत.
मीही त्याला अपवाद नाही.परवाच झालेल्या(परसूंकीच बात है...) दोन कार्यक्रमांमध्ये माझा स्वतःचा अनुभव असाच होता. पूर्वी मला स्वतःला असे वागण्याची लाज वाटत असे आणि इतरजण तसे वागले तर त्यांचा राग येत असे. पण आता हा प्रकार खूपच अंगवळणी पडत चालला आहे. त्यामुळे इतर गर्दीप्रमाणे मी स्वतः स्टेजजवळ जाऊन फोटो काढले नाहीत तरी भर कार्यक्रमात फोटोग्राफरजवळ चालत जाऊन त्याला 'माझ्या पाल्याचा फोटो काढ' असे सांगण्याचा अगोचरपणा मी करू शकलो. (यातला एक कार्यक्रम आमच्या महाराष्ट्र मंडळातच झाला.)

काळ बदलत चालला आहे आणि आपण जुने झालेले आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर त्या महाशयांकडे असा उभा राहणारा मोठा ट्रायपॉड होता तर त्यासोबत बरेसे झूम असणारा कॅमेराही असणार. मग रीतसर मागे उभे राहून कॅमेऱ्यातून झूम करुन फोटो काढायचे. मागे जायची तयारी नसेल तर खाली बसूनही फोटो चांगले येतात. मुळात आपल्या मुलांच्या फोटोंचे कौतुक आपल्यालाच असते (तेवढे ते त्या मुलांनाही नसावे). त्यामुळे आपण काढलेले फोटो जरा कमी दर्जाचे आले तरी ९९ टक्के वेळा आपणच ते पाहणार असतो एवढी जाणीव ठेवली तरी पुरे.

आजकाल या फेसबुक वगैरे प्रकारामुळे ही फोटोची डोकेदुखी वाढली आहे असे मला स्पष्टपणे वाटते. आजकाल काही कॅमेरे व फोन 'फेसबुक रेडी' अशा सोयीने सज्ज मिळतात. म्हणजे काढला फोटो की टाक फेसबुकवर. कधी एकदा तो फोटो काढून जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर तो फेसबुकवर पोस्ट करायची अनेकांना कोण घाई झालेली असते. अरे समोर काय चाललंय त्याचा आधी आनंद तर घ्या. कधी कधी असे वाटते की एखादी गोष्ट करण्याच्या आनंदापेक्षा आपण ती गोष्ट करत आहोत हे जगाला सांगण्यातच अनेकांना जास्त रस असतो. सोशल नेटवर्किंग वगैरे प्रकार ठीक आहेत पण आज आपण काय जेवलो, आज आपल्याला कंटाळा आला, आपल्या साथीदारावर आपण किती प्रेम करतो. आताच ऑफिसातून निघालो आहे वगैरे काहीही स्टेटस टाकतात आणि लोक ते चघळत बसतात. आपल्या आयुष्यात इतरांना डोकवायला द्यायची ही हौस फारशी समजत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"आपण काढलेले फोटो जरा कमी दर्जाचे आले तरी ९९ टक्के वेळा ... हौस फारशी समजत नाही."
या सर्व मुद्द्यांना सहमती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवीन लग्न झालेले लोकं बायकोने आज काय बनवले याची फेसबुकवर रोज फ***ग रोज इतकी जाहीरात का करतात तेच कळत नाही - अक्षरक्षः उलटी येते. त्यांना काल रात्री कोणती पोझिशन(आसन) होती त्याचीही जाहीरात करायची असते पण लाजेखातर करत नसावेत अशी शंका येते. कधी कधी तर शंका येते आपल्यातच काही कमी आहे का की असे येडपट लोकं आपल्यालाच भेटतात. फेसबुकमुळे खरोखर हगलं-पादलं सांगायची आणि फोटो टाकायची लोकांना सवय लागली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा लोकांच्या प्रोफाईलमधे जाऊन 'Get Notifications' काढून टाका. कोणी काय खाल्लं आणि कोणाची काय पोझिशन आहे समजणार नाही. आपला स्क्रोल करण्याचा त्रास वाचतो. त्यांना बोलायचंय ते बोलू देत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>>अशा लोकांच्या प्रोफाईलमधे जाऊन 'Get Notifications' काढून टाका. <<<<

अशा लोकांच्या प्रोफाईलमधे जाऊन 'Get Notifications' च्या ऐवजी त्यांनाच आपल्या लिष्टातून काढून टाका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

त्यानिमित्त समाजातले प्रवाह कळतात. वाचाव व सोडून द्याव हे उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

पण, फोटो वा व्हिडोओग्राफी करु नये असा प्रस्ताव मांड्ला तर? निदान, मोकळ्या डोळ्यांनी जग बघाय्चे असते या विचाराचा प्रसार होईल. अगदीच करायची असेल तर पहिल्या द्हा मिनिटात काय असेल ते फोटो वैगरे. नंतर नाही असे काही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्यातील शाळांमधे पालकांना फोटो/व्हिडीओ काढण्यास सक्त मनाई आहे, शाळेने काढलेल्या फोटो आणि व्हिडिओचाच आनंद पालकांनी घ्यावा ही सोय असते, फोटो व व्हिडिओसाठी माफक(?) शुल्क आकारले जाते.

ह्या प्रकारामुळे पालकांचे फोटोग्राफी स्वातंत्र्य (अभिव्यक्ती?) हिरावले जाते, पण सर्वांना कार्यक्रमाचा निर्भेळ आनंद घेता येतो जे निदान माझ्या पहाण्यातल्या सर्व पालकांना मान्य आहे.

त्या तीन रांगेतील लोकांनी चक्क तीन गाणी हा प्रकार सहन केल्याचे मला फारच विशेष वाटते आहे, त्यासंदर्भात पण काही शिक्षण(how-to-handle-obnoxious-parents) गरजेचे आहे.

तुम्ही लिहिलेल्या पत्राचा फारसा उपयोग होणार नाही असं माझं मत आहे, असले नियम काटेकोरपणे राबविण्यासाठी पुण्यातील दुकानदारांकडे असलेला निगरगट्टपणा असणं गरजेचं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सार्वजनिक मंडळे देणग्यांवर चालतात आणि तिथे अशी बंदी करणे अनेक उदार आश्रयदात्यांना नाराज करून पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळांच्या कार्यक्रमांत अशी बंदी करणे आयोजकांना अवघड आहे.
परंतु 'सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय' बाबापुता करून सर्वांच्या गळी हे उतरवले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सार्वजनिक मंडळांबाबत मान्य, त्यावर उपाय म्हणजे, एक कॅमेरा प्रेक्षकांकडे तोंड करुन ठेवावा त्याचे प्रोजेक्शन प्रेक्षकांनाच दाखवावे किंवा त्रासदायक प्रेक्षक दिसल्यास मुलांवरचा कॅमेरा तिकडे फिरवावा, "गोंडस मुलांचे" बाबा बाबा-पुता करुन ऐकतील ह्याचा भरवसा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी यांच्या प्रतिसादावरून भारतात लोकं सुसंस्कृत होत चालले आहेत आणि अमेरिकेत गेलेले/आलेले भारतीय मात्र होते तिथेच राहिलेले आहेत असं वाटलं. पण विसुनानांनीही प्रतिसाद दिलेला आहे.

अमेरिकेत असूनही गेल्या दीडेक वर्षात कोणी फक्त भारतीय आहेत म्हणून अनोळखी लोकांमधे मिसळावं असं कधी वाटलं नाही.

आमच्या शहरात, आजूबाजूच्या गावांमधे ऑक्टोबरफेस्ट, वूर्ष्टफेस्ट (सॉसेज फेस्टीव्हल) असे पारंपरिक जर्मन सोहळे असतात. त्याशिवाय बॅटफेस्ट (आमच्या शहरात उत्तर अमेरिकेतली, शहरी भागातली सगळ्यात मोठी वटवाघूळ वसाहत आहे), काईट फेस्टीव्हल, बुक फेस्टिव्हल असे अपारंपरिक सोहळे होत असतात. तिथे येणारे बहुसंख्य लोक वागण्या-बोलण्यावरून सुसंस्कृतच दिसतात. अशा ठिकाणी भारतीय मंडळी तुरळकच असतात. असतील तरी ती मुळातच फार 'देसी' नसावीत किंवा जनाची नाहीतर मनाची बाळगून बरी वागतात. थोडी गर्दी असते एवढं वगळता काहीही त्रास होत नाही. काही वेळा तर मोजक्या मोबदल्यात ठराविक पार्किंग लॉट्सपासून बसेसही सोडतात.

तुमच्या गावात अशा काही 'स्थानिक' गंमतीजमती नसतील तर सहानुभूती. किंवा या गरीबांच्या टेक्सासात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

किस्सा बोलका आहे. स्थानिक महाराष्ट्र मंडळाने ही सूचना स्वीकारली तर उत्तम पायंडा पडेल.

मात्र कार्यक्रमाला काहीएक 'फ्लो' असतो ह्याकडे दुर्लक्ष करून आपल्या पाल्याचा गुणसोहळा आधी घ्यावा ह्यासाठी आयत्या वेळेला आयोजकांना भरीस पाडणे (उदा. 'प्रथम तुला वंदितो'वरच्या ड्यॅन्सच्या आधी पसायदान परफॉर्म करण्याचा आग्रह केवळ 'विशेषी कार्यक्रमीं इये'च होऊ शकतो); आम्ही फक्त आमच्या मुलाच्या श्लोक/गाणे/नाच/कार्यक्रम यापुरते आलो आहोत, आम्हांला जेवण वगैरे काही नको असं सांगून कार्यक्रमाचे प्रवेशशुल्क देण्यात खळखळ करणे इ. लीळा पाहिल्या असल्याने मंडळाने अशी सूचना करूनही किती फरक पडेल, याबद्दल साशंक आहे. एकंदरीत 'त्याचा येळकोट राहीना'चे प्रत्यंतर अशा ठिकाणी वारंवार येत राहते, असाच आजवरचा अनुभव आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>आम्ही फक्त आमच्या मुलाच्या श्लोक/गाणे/नाच/कार्यक्रम यापुरते आलो आहोत, आम्हांला जेवण वगैरे काही नको असं सांगून कार्यक्रमाचे प्रवेशशुल्क देण्यात खळखळ करणे इ. लीळा पाहिल्या असल्याने <<<<

याच्याच विरुद्ध अजून एक किस्सा. असाच एक कार्यक्रम. एका कुटुंबाने आपण येणार असल्याची पूर्वसूचना दिलेली नव्हती ( मराठीत सांगायचं तर RSVP केलेलं नव्हतं.) गेटवर बसलेल्या कार्यकारिणी सदस्या आणि "गिर्‍हाईक" यांच्यातला संवाद :

कमिटीसदस्या : तुमचं नाव RSVP मधे नाही.
गिर्‍हाईक : हो आम्ही नाही केली RSVP. अधिक पैसे भरतो ना.
कमिटीसदस्या : बरं तुमच्या तिघांचे अमुक अमुक झाले.
गिर्‍हाईक : (खिसे चाचपडल्यानंतर)इतकी कॅश नाही.
कमिटीसदस्या : हम्म. आम्ही चेक घेतो.
गिर्‍हाईक : अहो आपण कुठे चेकबुक घेऊन फिरतो. क्रेडीट कार्ड घ्या.
कमिटीसदस्या : क्रेडीट कार्ड घ्यायची सोय नाहीये.
गिर्‍हाईक : ठीक आहे मी नंतर चेक पाठवतो.
कमिटीसदस्या : मला तुम्हाला आत घेता येणार नाही.
गिर्‍हाईक : अहो असं काय करताय. पस्तीस मैलांवरून आलोय आम्ही. कार्यक्रम आता सुरू होईल.
कमिटीसदस्या : सॉरी.

हे कुटुंब तसंच परत गेलं. "आपण यापुढे मराठी मंडळाच्या कार्यक्रमाला येत नाही" असं त्यांनी इमेलवाटे कळवलं.

कमिटीसदस्या अजूनही कमिटीवर असतात. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

नंदन आणि मुक्तसुनीत हे आयडीनामांमधून त्यांची ओळख पुरेशी जाहीर होत नाही. अशा सर्वच आयडींनी असे किस्से लिहून आमच्यासारख्या, देसी लोकांच्या उलट दिशेने पळत सुटणार्‍या लोकांची, करमणूक करावी ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुळात हे 'ग्यादरिंग' वैग्रे प्रकार 'बालमजुरी' मध्ये का मोडत नाहीत हा प्रश्नच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

हाहाहा!
परा! खरंतर ग्यादरिंग म्हंजे आई-बापांनी त्यांच्या आवडीनूसार 'तयार केलेल्या' सर्वगुणसंपन्न प्रोडक्टची झैरात असते बर्‍याचदा (म्हंजे झैरात पालक+शिक्षक+शाळा अश्या तिघांचीही असते. पण भाव पालकच खातात Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

परा यांना खरे तर 'बाल मग्रूरी' म्हणावयाचे असावे. Wink

आन ऋषिभौ, झैरात नै केली, तं त्या पोट्ट्यांच्या आया, झाशीच्या राणीच्या वंशज असल्या गत जीऽ त्या मास्तरांची उधडतात भोऽ.. पाहूनच भ्याव वाट्टं! केजी फिजीच्या ग्यादरिंगात ३-४ वर्षांच्या पोट्ट्याईले 'जंगल सीन' मधे 'झाडं' बनायचं काम द्येऊन अक्खा वर्ग सामील नै केला तर त्या मास्तराचं काऽय खरं नस्तं Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मुळात क्यामेरांच्या घटत्या किंमती, फोटो काढण्याचे झालेले सुलभीकरण, वाढते फेसबुकीकरण आणि सर्वात महत्त्वाचे डिजिटल फोटोग्राफीमुळे किती आणि कशाचे फोटो काढायचे यावर न राहिलेले बंधन या सगळ्या मागे आहे.

परवा मी अशाच एका कार्यक्रमाला गेलो होतो. स्टेजवरील आपले मूल क्यामेरात नीट दिसावे म्हणून ऐन नाचात मुलाला इथे बघ इथे बघ म्हणून पिटातून त्या वडिलांचा आटापिटा चाल्ला होता! ते बिचारे मूल नाचावे की बाबांकडे बघावे या विवंचनेत शेवटी नुसतेच चड्डी धरून दुसरीकडेच पाहत शेवटी उभे राहिले Wink

बाकी, अशा कार्यक्रमातच असे नाही तर वाढदिवस, शालेय खेळ, गॅदरिंग्स, गड-किल्ले, लग्नघर (मयतही सुटलेले नाही ) यातील प्रत्येक ठिकाणी गेले की हल्ली पत्रकार परिषदेला गेल्यासारखे क्यामेरामन तुटून पडतात.

यावरून हे आठवले.

बाकी, सुचना पटली नाही, जर संस्थेचा क्यामेरामन आहे तर डिजिटल क्यामेरांना बंदी घालावी. फिल्मचा असल्यास चालेल असेही सांगावे. (चिंता नको तो क्यामेरा घेण्यापेक्षा पोराचे विडियो विकत घेतील लोकं ते स्वस्त पडावे) Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काही मुद्दे मांडतो :
१. शाळेतलं ग्यादरिंग हे सक्तमजुरी वाटणं हे "ही लग्नसंस्था फार माजून राहिलेली आहे !" या जातकुळीचा विनोद आहे. तो मला आवडला. याचंच एक्स्टेन्शन "साली मानवजात माजून राहिलेली आहे" असं करता येणं शक्य आहेच Smile

२. क्यामेरे स्वस्त झालेत आणि मुले खूप झालीत Smile तस्मात् कुणीही कितीही क्यामेरे आणावेत आणि कितीही फोटो काढावेत. त्याचं रेशनिंग करावं असं मला काही वाटत नाही. पण हे सर्व करताना अन्य लोकांना जी मूलभूत शिस्त पाळता येते, इतरांची कदर करता येते तितपत आपल्याला का जमू नये अशा अर्थाचं हे पोस्ट आहे. ही शिस्त पाळता न आलेली वर्षानुवर्षं दिसल्याने मी ती सूचना केलेली होती. अशा प्रकारची व्यवस्था अस्तित्त्वात आली तर, संस्थेने नेमून दिलेले लोक आपलं रेकॉर्डींग करतीलच आणि त्याचबरोबर आईवडलांनी जागच्या जागी बसून , इतरांना डिस्टर्ब न करता, पुढच्या रांगांसमोर उभं न राहता फोटो काढता येतीलच. असा माझा मध्यममार्ग होता.

३. नंदन यांनी इतर काही प्रसंग उल्लेखलेले आहेत ते मी अनुभवलेले आहेत. त्यांची जंत्री अजूनही मोठी होईल. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

पाल्यांचे फोटो काढा न काढा पण ते करताना इतरांचा रसभंग होऊ नये ही काळजी घ्यावी.
अवांतरः पक्षी निरीक्षण करत असताना पक्ष्यांचे फोटो काढणार्यांमुळे थोडा कधी कधी रसभंग झालेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी मंडळांच्या कार्यक्रमात मराठी लोकांनीच शिस्त पाळायची? असे कसे चालेल? इतर 'ऑक्टोबर फेस्ट' मधे वगैरे ते पाळतात ना शिस्त (चुकून गेलेच तर) - आता इथेही? चॉलबे ना Smile
बापट - अहो हे तर काहीच नाही, आमच्य इथे तर काही पालक विंगेतून शूटींग करायचा प्रयत्न करतात. अहो मराठी माणूस म्हणायचे आणि सोडून द्यायचे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मूळ चर्चेविषयी मला काहीच म्हणायचे नाही. फक्त प्रत्येक गोष्टीकडे कॅमेर्‍याच्या लेन्समधूनच बघितले पाहिजे हा अट्टाहास मला समजत नाही. बाकी आपण जुने झालो आहोत असे विसुनानांनी म्हटले आहेच. खरे तर मी आधी म्हटले आणि नंतर विसुनानांनी म्हटले. म्हणजे मी तर विसुनानांपेक्षा जुना आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

हे असे वागणे पहील्यापासुन नव्हते? हे "कलागुण / अनन्यसाधारण" कल्चर आपले नव्हे? व आपला सांस्कृतीक वारसा, वैशिष्ट्ये जपणे त्याला वाव देणे ह्या उदात्त भावनेने मंडळ स्थापना वगैरे होत नाही?
घ्या लेखी पुरावे, वाक्यावाक्यत दुजोरा आहे.
१) Marathi Mandal is organized exclusively for promoting the culture, traditions, and language of "Maharashtra" (a western state of India) through various events and services. <ह्या वाक्यातच सगळे आले. मराठी बाणा जोपासला पाह्य्जे म्हंजे पाह्यजे>

२) Mandal plans to organize cultural, social, musical, and theater events related to traditional Maharashtrian culture. The programs such as Ganesh Chaturthi, Kojagiri, Diwali, Makar Sankrant, Gudhi Padawa, Marathi Natak, Marathi Sangeet and many more.[aka Bollywood stuff - अहो आमच्या दादासाहेबांनी नाही का.. आमच्याच मुंबईत...]

३) Our aim is to promote, preserve, cherish and perpetuate the socio-cultural values of Maharashtrian culture as also our history and traditions amongst all Maharashtrians in......... [रिपीट.. रिपीट]

४) We would like to create a forum of all Marathi folks to promote interaction and participation to contribute towards our "uniqueness" Wink ;-). Also in assimilation in the 'नेटिव्ह Way of Life' yet preserving our Maharashtrian Personality and tradition.

५) Welcome once again to the new organization. Please encourage your friends to join the Mandal and contribute to Mandal's activities. We look forward to your active participation.

त्यामुळे मुसुजी 'आयदर यु आर विथ अस ऑर अगेन्स्ट अस' बरं!!

जोक्स अपार्ट, जे हौशी लोक मंडळ चालवतात त्यांच्या हौशीखातर व त्यांच्या स्वयंसेवकगिरी बद्दल कौतुक व आदर ठेवून सुरक्षीत अंतर ठेवणे योग्य व तरीही त्यात सामील व्हायचे असेल तर आपणही कमी जास्त प्रमाणात त्यातलेच आहोत हे मान्य करुन "तक्रार अथवा मी काय म्हणतो" हे तिकडेच आपापसातच ठेवणे योग्य. परिघाबाहेर लोकांचे काहीही मत असले तरी आपल्या मताशी दुजोरा इतके आत्मीक समाधान सोडून त्याचा काही फायदा नाही.

बादवे - हे असे फक्त मराठी/भारतीय मंडळात होते असे नाही अन्य पब्लीक मधेही होते.

हे तरी फारच सोपे प्रकरण आहे. मराठी/ भारतीय लोक विमानात, क्रुझवर, इंटरनॅशनल इव्हेंट्स येथे कसे वागतात हे पाहीले तर .......तुम्ही पण आमच्यासारखे माणूसघाणे व्हाल बरं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"संगोपन मूल्ये" हे मराठीतल्या "म्यानर्स"चे भाषांतर आहे का हो?

वर ऋता ताईंनी म्हटल्या प्रमाणे,

इतरांचा रसभंग होऊ नये ही काळजी घ्यावी.

हा धडा यातून घेतला तर बरे.
आजकालच्या म्यानर्स मधे, माझे उपद्रवमूल्य (न्यूसन्स व्हॅल्यू) जितके मोठे, तितका मी मोठा हे समिकरण स्थापित होऊ पहात आहे. 'माझ्या' सुखाकरता मी इतरांच्या अत्यावश्यक जगण्याच्या अधिकारावरही अतिक्रमण बिनदिक्कीत केले पाहिजे, अशी एक मठ्ठ समजूत आपल्याकडे आहे.

लेख फक्त फोटो काढण्यापुरता मर्यादित असला, तरीही 'इतरांची जाणीवपूर्वक काळजी घ्या' हे 'प्रिन्सिपल' आपण शिकतच नाही, अन शिकलो तरी वापरत नाही. एक ऑफिशिअल फोटोग्राफर पैसे देऊन बोलावला, तर तो या हौशी पालकांपेक्षा जास्त त्रासदायक होतो हे अनेक लग्न समारंभांतून मी पाहिले आहे.

अशा प्रकारचे विचित्र वागणे पाहून नुसते सहन करण्याऐवजी, मी त्या कार्यक्रमात उभा राहून मोठ्या आवाजात त्या महाशयांना बाजूला होण्याची, अथवा संयोजकांना त्यांना बाजूला सारण्याची विनंती केली असती. योग्य कारणासाठी एकाने आवाज उठवला, की आपोआप बाकीचे बघे सामिल होतात व इन्सेसिटिव्ह्स अन बुलीज नरमतात असा अनुभव आहे. नेक्स्ट टाईम करून पहा. त्यांचे म्यानर्स त्यांना असे वागायला सांगत असतील, तर आपण आपल्या म्यानर्स मधे थोडी आक्रमकता आणलीच पाहिजे असा माझा गांधीवादी विचार आहे. Wink

(ट्रायपॉडवाले गृहस्थ अर्नॉल्ड श्वार्झनेग्गर यांचे आकारबंधू असलेत तर त्यांनाच "अहो, माझ्या पण मुलाचा डान्स आहे. तुमच्या शूटिंगची कॉपी मला द्या हं! पेनड्राईव्ह/एस्डीकार्ड वर ट्रान्स्फर होते ना तुमच्या क्यामेर्‍यातून?" असेही सांगता येते Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

प्रतिसाद आवडला.

>>>> "संगोपन मूल्ये" हे मराठीतल्या "म्यानर्स"चे भाषांतर आहे का हो? <<<
नाही. बहुदा माझा शब्दांचा वापर थोडा गंडला आहे तिकडे. नेमके शब्द निवडता आलेले नाहीत.

तुमच्या प्रतिसादामागची तीव्रता मी समजू शकतो. असेच विचार माझ्याही मनात आलेले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मराठी मंडळाचे (आणि तत्सम) सदस्य नसल्याने काय काय गमतीजमतींना आम्ही मुकतो आहोत!!! Wink

चालायचंच. न्यु जर्सीहून मुंबईकडे जाणार्‍या विमानात मुंबईच्या लोकलमध्ये चढताना असते (किंवा पुण्याच्या 'पीएमटीत' म्हणा, उगाच प्रादेशिक कलह नको! Wink ) तशी चढाओढ पाहिली होती तेव्हा वाटलं की लवकरच हे लोक मुंबईला जाणारी विमानसेवाच बंद करतील.

अमेरीकेतून भारतात जाणार्‍यांना (विसा वाले) पासपोर्टला जोडलेले 'आय-९४' कार्ड तिथे काढून द्यावे लागते, आधी काऊंटरवरून कार्ड काढून मग रांगेत या असे सांगूनही कोणीही ऐकत नव्हते. मग प्रत्येकाला रांगेतून हाकलून लावत काउंटरकडे पाठवताना तिथल्या कर्मचार्‍यांच्या नाकी नऊ आले. विमानात चढताना तुमच्या सीटक्रमांकानुसार गटागटाने बोलावले जाते (आणि सीटही ठरलेले असते) तरी सुद्धा सगळे लोक तिथे गर्दी करून असे उभे होते की "खिडकीची जागा जाईल"! माझ्या शेजारी बसलेल्या एका गुज्जू काकांनी (ग्रीन कार्ड होल्डर Wink ) प्रत्येक खाद्यपदार्थ दोनदा मागवला. (म्हणजे जेवणातले श्रीखंड दोन वाट्या, नाश्त्यातले पोहे दोनदा, ज्यूस दोनदा वगैरे). एका बापाने (दोन जुळी मुलं) आपल्या चिरंजीवांच्या डायपर बदलण्याच्या प्रोग्रॅम सीटवरच सुरू केला. शेवटी हवाईसुंदरीने खड्या आवाजात दम भरला तरी महाशयांना काही लाज नाही. कॉफी नको म्हणून पाच मिनीटांनी कॉफी मागणारे, पाणी सांडणारे वगैरे अजागळ लोक तर कमी नव्हतेच.

एकंदरीत "आमच्या" लोकांनी केलेल्या तमाशामुळे जवळच बसलेल्या दोन-तीन सुंदर (गोर्‍या) मुलींशी ओळख काढायची आमची संधी हुकली, म्हणून जास्त सल!!
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मी हा धागा प्रस्तुत अभिप्राय आणि प्रस्तुत अभिप्रायाला समर्पित करत आहे. एकेका वाक्यामधे आम्हाला आरसा दाखविण्यात आलेला आहे !!

बाबौ. हे असले प्रतिसाद ऑफिसमधे वाचण्याची सोय नाही. हसू दाबता दाबता मेलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हा हा हा, माझाही असाच काही अनुभव आहे. मी आणि मित्र दोघेही भारतात जात होतो. एअर इंडियाची डायरेक्ट मुंबई फ्लाईट असल्याने चिक्कार देशी होते. आमची एक्झीट रो मधली सीट होती. आम्ही तिथे गेलो तर एक गुजराती बाई आधीच आपल्या लहानग्या मुलाला घेऊन बसलेली. आम्ही तिला तिच्या जागेवर जायला सांगितले तर ऐकायलाच तयार नाही. आम्हालाच तिच्या जागी बसायला सांगत होती. तिला हे ही सांगितलं की बाई एक्झीट रो मधे लहानग्याला घेऊन बसता येणार नाही, तरी ऐकेना. शेवटी हवाई'सुंदर' आला आणि त्यानेच आम्हाला ह्यातून सोडवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

मस्त मस्त प्रतिसाद निळेश्वरजी. तुमचा सल समजू शकतो. देशी लोकांच्या प्रतापामुळे नव्हे पण ** नशिबामुळे आजवर प्रवासात एक प्रसंग वगळता कुणा सुंदरीशी वळख काढता आली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सदर प्रतिसाद वाचून Inscrutable Americans मधील पहिला प्रवास आठवला..सत्तरीतील त्याची निरिक्षणे आजही तस्शीच आहेत Wink

शिफारसः जर कोणा अभाग्याने हे पुस्तक वाचले नसेल तर चुकनही चुकवू नका! (लेखक अनुराग माथुर)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ही हा हा हा. भारी पुस्तक आहे खरे!! विशेषतः एंड Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा हा...माझाही शिकागो विमानतळावरचा अनुभव तंतोतंत असाच आहे...गोर्या मुलींशी ओळखीचा साल सोडून Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...तितकेही वाईट नाही हो!

कधी न्यूजर्सीची (विशेषतः एडिसन / आयझेलिन*) चक्कर झालेली दिसत नाही वाटते...

* ही मराठीतील शिवी नाही. असावयास हवी, हा भाग अलाहिदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न्यू जर्सीचा (नेवर्क) अनुभव 'एवढा' वाईट नाहीये माझा खरंतर. ओ'हेरला मात्र पूर्ण कुर्डूवाडी कळा आली होती. अर्थात ते विमान एअर इंडियाचं होतं. हा त्याचा भाग होता की नाही माहित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थात ते विमान एअर इंडियाचं होतं. हा त्याचा भाग होता की नाही माहित नाही.

अर्थात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे एवढे सगळे तपशीलवार लिहिण्याची काही गरज होती काय?

नुसते 'न्यू जर्सी' इतके लिहिले असते, तरी सगळेसगळे समजले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो थोडक्यात अंदाज द्यावा इतकंच लिहलं. अजून बरंच आहे. अर्थात तुम्ही ताकभात ओळखला असेल तर तुम्हीच लिहून टाका माझ्या ऐवजी. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

बोले तो, लिहिण्याची गरजच काय, म्हणतो मी. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतीय संस्कृतीत सार्वजनिक जीवनात कसे वागावे याचे संस्कार नाहीतच असे माझे मत आहे.
आजकाल तर खाजगी जीवनातही कसे जगावे याचे संस्कार पैसा कमावणे आणि उपभोग घेणे याभोवतीच फिरताना दिसतात.
आमच्याकडे मोठं घर, गाडी आणि एक/दोन मुलं आहेत आणि त्यामुळे "आम्ही सुखात आहोत" हे ओरडून ओरडून सांगायची गरज पूर्वी कशी भागवली जायची कोण जाणे?
होपलेस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या चर्चेत 'देशी' हा शब्द कधी येतो त्याची वाटच बघत होतो. तो आला आणि भरुन पावले. देशी लोकांची बेशिस्त, त्यांचा हावरटपणा, म्यानरलेसपणा आणि त्याचा दर तीन वर्षांनी आम्हाला 'इंडिया'ला जाताना कसा त्रास होतो हे सांगितले नाही तर तुम्ही स्वतःला पुरोगामी कसे म्हणवाल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा